DJ , प्रदूषण मुक्त गणेशोत्सव.
*'DJ आणि ध्वनी प्रदूषण' यावर काही उपाय करण्याची मागणी गणेशभक्त करत आहेत.*
... वैशाली जोग.
*|| ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव ||*
https://youtu.be/dBcHjEK2_ak?si=-QHjNCUjVp3oC4al
*_संकलन आणि शब्दांकन - साहेबराव माने._*
_पुणे - 9028261973_
*आरती लेखन - वैशाली जोग. अलिबाग, रायगड.*
_साभार : मंदाकिनी सानप,पुणे_
*_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇
https://chat.whatsapp.com/Kpkf75ekxV9IfnIg6H1MiW?s=sh&p=a&ilr=1
*|| ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव ||*
सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची
गल्ली बोळात गर्दी कर्कश डीजेची
कापती भिंती, निज ना ये लेकरा हैराण वृद्ध, विद्यार्थी कावला छळती जे लोकां त्यांना कसा तू पावला?
*|| जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती या गोंगाटातून दे आम्हा मुफ्ती ||१||*
आरतीचा आवाज ऐकू येईना पुरा DJ च्या ध्वनीने हलतोय देव्हारा गाड्या खाली श्वान घेती आसरा सोडवं गणराया आता तुझ्या पामरा
*|| जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती या गोंगाटातून दे आम्हा मुक्ती ||२||*
सुख कर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दारात उभी टोळी सक्तीच्या वर्गणीची
पावती न फाडता, सुटका नाही आमुची
सदबुद्धी दे यांना, हीच आस मनाची
*|| जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती या गोंगाटातून दे आम्हा मुक्ती ।।३||*
तासन् तास पाय रांगेत, पाय हा थकला
'व्ही आय पी' पासाने पुढेच गेला । गरीब हा भक्त देवा, गर्दीत चिरडला तुझ्या दारी न्याय, असा का रे नुरला
*|| जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती, या गोगटातून दे भाम्हा मुक्ती ॥४||*
रहदारीला जो करी अडथळा
शिक्षा कर बाप्पा, तू त्या नाठाळा
कचरा नदीत टाकी त्याला शाप दे देवा
आवाज करी मोठा, त्याचा DJ जप्त व्हावा
*|| जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती या गांगाटातून दे आम्हा मुक्ती ॥६||*
|| शांतता दे बाप्पा, पाव गजानना ||
*|| ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव.||*
आरती - वैशाली जोग.
अलिबाग. रायगड .
🙏आपुलकी जपणारी माणसं🙏
*_संकलन, शब्दांकन - साहेबराव माने. पुणे. 9028261973_*
Comments
Post a Comment