बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने..

*_बुद्ध पौर्णिमा निमित्ताने : “युद्ध नको 'बुद्ध’ हवा."_*
*संस्कृतीच्या पाऊलखुणा.*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
लेखन – प्रा. डॉ. धनंजय बाबुराव लोखंडे. 

https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp

*“युद्ध नको बुद्ध हवा’ असे जगाने मान्य केले आहे. तथागताच्या शांतीच्या संदेशाची आजही जगाला गरज आहे. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागतांचे तत्त्वज्ञान कृतीत आणूया.*

जो धम्म समतेवर आणि मानवतेवर आधारित आहे, माणूस हा केंद्रबिंदू असून माणसाला महत्त्वाचे स्थान आहे, जो धम्म विज्ञाननिष्ठ आणि शांतीच्या मार्गाचा आहे अशा धम्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिन. देवदह आणि कपिलवस्तू या दोन नगरांच्या सीमेवर एक सुंदर बाग आहे लुंबिनी. या लुंबिनी वनात एका फुलोरा आलेल्या शालवृक्षाखाली इ.स. 563 मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला.

त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान सर्व मानवजातीला क्रांतिकारी उपदेश आहेत. बुद्ध म्हणतात, मन घडविते तसा मनुष्य होतो. मनाला सत्याचा शोध करायला लावला पाहिजे. मनुष्याच्या सर्व व्यवहारांचे उगमस्थान मन आहे. मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्याबरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्याबरोबर राहते. मन हे चंचल आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र आणि सरळ करतो. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्‍तीचे प्रमुख आहे. प्रत्येक गोष्ट माणसाने आपल्या बुद्धीच्या पातळीवर घासून पाहावी आणि स्वानुभवांतून पटली तरच त्या गोष्टीचा स्वीकार करावा.

*सद्यःवर्तमान जीवनात मागच्या जन्माचा काडीमात्र संबंध नाही. याविषयी बुद्ध म्हणतात- माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते. पूज्य माणसांनो, तुम्हांला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? उत्तर साहजिकच “नाही’ असेच आहे. परंतु एखादी व्यक्‍ती गरीब कुळात जन्मली तर तिचे कारण गतजन्माचे दुष्कर्म आणि एखादी व्यक्‍ती श्रीमंताच्या घरात जन्मली तर मागच्या जन्माचे सत्कर्म, असे लोक अंधपणाने समजतात.* बुद्ध म्हणतात, ज्ञान म्हणजे प्रकाश. ज्ञानमार्ग हा सगळ्यांना मोकळा असला पाहिजे मग तो पुरुष असो अथवा स्त्री.
*वैज्ञानिक दृष्टिकोन 9028261973*
अहिंसेबाबत बुद्ध म्हणतात, अहिंसा म्हणजे जीवहत्या न करणे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी अहिंसेचा जवळचा संबंध आहे. सर्व प्राणिमात्रावर प्रेम करा, म्हणजे तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते खाऊ नये. बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होते. ते न्यायाच्या बाजूने होते. बुद्ध म्हणतात, जगात सर्वत्र दुःखच दुःख भरलेले आहे. इच्छेप्रमाणे न होणे किंवा न मिळणे हे देखील दुःख होय. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू ही सर्व दुःखे होत. तृष्णा दुःखाची जननी आहे. तृष्णा म्हणजे हवेहवेसे वाटणे. दुःख थोपविता येते. तृष्णेचा नाश म्हणजे दुःखाचा नाश. दुःख निवारण्याच्या उपायांत माणसाकडे अंधविश्‍वासापासून मुक्‍त असलेली दृष्टी असली पाहिजे. बुद्धिमान माणसाला योग्य असे उच्च विचार असले पाहिजेत. सत्ययुक्‍त दयेने भरलेली आणि निष्कपट असलेली वाणी असली पाहिजे. शांत, प्रामाणिक आणि शुद्ध असलेले कर्म केले पाहिजे. कोणालाही दुःख न देणारी आणि प्रामाणिक अशी उपजीविका असली पाहिजे. स्वत:ला वळण लावण्याचा आणि स्वतःवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
*वैज्ञानिक दृष्टिकोन 9028261973*
मन नेहमी जागृत आणि सावध ठेवले पाहिजे आणि जीवनातील सत्याविषयी सखोल चिंतन आणि मनन केले पाहिजे. म्हणजेच दुःख निवारणासाठी बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब प्रत्येक माणसाने केला पाहिजे. अष्टांगिक मार्गात प्रत्येक माणसाजवळ सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे गुण असले पाहिजेत. बुद्ध म्हणतात, माणसाने मन हे नेहमी जागृत ठेवले पाहिजे. बुद्ध तत्त्वज्ञानात असे म्हटले आहे की, घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे कारण असते. प्रत्येक कारण हे मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. *दैवी चमत्कृतीवादाचे खंडण करण्यात भगवान बुद्धांचे तीन हेतू होते. पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे. दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. म्हणजेच बुद्धांचा धम्म हा विज्ञाननिष्ठ आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून माणसाने वैज्ञानिक निकषांवर विसंबले पाहिजे.*

मुर्खाच्या संगतीपासून दूर राहणे, पंडितांची संगती करणे आणि पूज्य जनांची पूजा करणे ही उत्तम मंगले होत. पुष्कळशी विद्या शिकणे, कला शिकणे, सद्‌वर्तनाची सवय लावणे, समयोचित भाषणे करणे, आई-बापांची सेवा करणे, व्यवस्थितपणे कर्मे करणे, मद्यपानाविषयी मनाचा संयम करणे, सत्पुरुषांचा गौरव करणे, नम्रभावाने वागणे, संतुष्ट असणे, कृतज्ञ असणे, गोड बोलणे ही सर्व उत्तम मंगले होत. जगण्याचा मार्ग दाखविणारा हा धम्म म्हणजे जीवनदीप आणि मार्गदीपच आहे. बुद्ध तत्त्वज्ञानात असे म्हटले आहे, ज्याप्रमाणे गुराखी आपल्या काठीने आपली गुरे गोठ्याकडे हाकीत नेतो त्याप्रमाणे वय आणि मृत्यू माणसाचे जीवन हाकीत असतात. ज्याला झोप येत नाही त्याला रात्र लांबलचक वाटते, जो दमलेला असतो त्याला थोडे अंतरही कंटाळवाणे वाटते आणि ज्याला सत्य धर्म ठाऊक नसतो त्याला जीवन हे प्रदीर्घ वाटते. जे मन विचार करीत नाही त्या मनात विकार शिरल्याशिवाय राहणार नाहीत. बिनशाकारलेल्या घरात जसे पाणी प्रवेश करते, तसे हे आहे.
*वैज्ञानिक दृष्टिकोन 9028261973*
सर्व माणसांना शिक्षेची भीती वाटते. मृत्यूची भीती वाटते, तुम्हीही तसेच आहात हे लक्षात ठेवा. कोणाचीही हत्या करू नका. बुद्धांनी जगातील सर्व मानवजातीला शांतीचा, समतेचा, मानवतेचा संदेश दिला. प्रकाशाने देदीप्यमान तेज ज्यांनी अखिल मानवजातीला दिले ते करुणासागर, करुणेचं लेणं तथागत बुद्ध होत.
*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973.*

*तथागत बुध्द आणि त्रिसंयोग👇*

*संस्कृतीच्या पाऊलखुणा.*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
लेखन : अंजु निमसरकर. 
नवी दिल्ली.

*आज बुध्द पोर्णिमा. या निमित्ताने हा विशेष लेख.*

‘बुद्ध पोर्णिमे’ चे महत्व आपल्या देशासह सर्व जगात आहे. जगभरात मोठया उत्साहात ही पोर्णिमा साजरी केली जाते.

जग आजही भारताकडे बुध्दाचा देश म्हणुन पहाते. भारताला तथागत बुध्दांमुळे एक विशेष ओळख मिळाली आहे. या देशाने बुध्दांच्या तत्वज्ञानाचे ज्ञान संपूर्ण जगाला दिले आहे.

दिल्लीमध्ये वेगवेगळया देशातील बरेच बुध्द विहार आहेत. यात बरूआ बुद्धीस्ट, श्रीलंकेचे महाबोधी विहार, कम्बोडियन बुध्द विहार आणि येथील राष्ट्रीय संग्रहालयात भगवान बुध्दांच्या अस्ती आहेत. या सर्व ठिकाणी बौध्द अनुयायी एकत्रित येऊन वैशाख बुध्द पोर्णिमा साजरी करतात.

 सिद्धार्थ गौतम यांचा जन्म हा वैशाख पौर्णिमेला लुम्बिनी येथे खुल्या आसमाना खाली निसर्गरम्य वातावरणात इ.पु 563 मध्ये झाला. महामाया या आपल्या माहेरी घरी जात असताना रस्त्यात त्यांना कळा लागल्या आणि तिथेच त्यांनी सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. त्यानंतर लगेचच काही दिवसातच महामाया यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सिद्धार्थ गौतमाचे संगोपण त्यांची मावशी महाप्रजापती गौतमी यांनी केले. गौतमाचे बालपण, तरूणपण त्यांच्यावर तत्कालीन शिक्षणपद्धीतीचे संस्कार, स्वत:ची विश्लेषण विचारशैली, त्यावेळेचे राजकीय वातावरण या सर्व परिस्थितीचा सिद्धार्थ गौतम यांच्या जीवनावर परिणाम झालेला असून त्यातूनच त्यांनी गृहत्याग केला.

सिद्धार्थ गौतम हे क्षत्रिय वंशाचे होते. त्यांच्या काळात शुद्धोधन राजाचे सौख्य हे अनेक राजांशी असल्यामुळे गृहत्याग केल्यानंतर त्यांचे मन वळविण्यासाठी त्यांना बऱ्याच राजांनी आपले राज्य ही देऊ केले होते. मात्र, सिद्धार्थ गौतम दृढ संकल्प‍ित असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या विचारापासून फारकत न घेता गृहत्यागाच्या निर्णयावर ते ठाम राहीले.

त्यानंतर त्यांनी या सर्व काळात त्याकाळातील दु:खाचे मुळ कारण शोधण्यासाठी साधू, संत, ऋषी मुनी, वैचारीक, पारंपारिक विचारसरणी अनुसरण करणाऱ्या आणि समाजावर प्रभाव पाडणाऱ्या प्रभावी लोकांशी चर्चा करीत असल्याचे दिसुन येते. त्यांना त्यावेळी जो जो मार्ग योग्य वाटला तो त्यांनी अनुसरून पाहिला त्याचे परिणामही अनुभवले.

वेगवेगळया प्रकारची घोर तपर्श्चया केली. स्वत:ला अनेक शारिरीक वेदना दिल्या. या घोर तपर्श्चेतून काहीही साध्य होत नसून उलट शारिरीक नुकसानच होत आहे असे लक्षात आल्यावर त्यांनी अशी अती शारिरीक वेदना देणारी तपश्चर्या सोडून दिली. स्वत:ला सशक्त केले बिहारमधील गया येथे निरंजना नदी काठी ध्यानाला बसले. पारंपारिक विचारसरणी न पाळता. तार्कीक आणि कारणम‍िमांसा करणारी विचारसरणी मानवाच्या कल्याणास उपयोगी असल्याचे सांगितले. यासाठी काही मापदंड मांडले. याला पंचशील, चार आर्य सत्य, अष्टांग मार्ग, प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात.

काय आहे हे पंचशील ? प्राणी हिंसा न करने, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे, कुठल्याही मादक पदार्थाचे सेवन न करणे. हे अगदी ‘आम’ जनतेसाठीचे संदेश आहेत. थोडक्यात पंचशीलचे पालन केले तर पुण्य आणि नाही केले तर पाप. पुण्य म्हणजे लाभ होईल तो हर प्रकारे होऊ शकतो. अनुसरण अथवा पालन नाही केले तर पाप म्हणजे आपले नुकसान होईल. हे ही तेवढे खरेच आहे. जेवढया वेळा पालन केले तेवढया वेळा लाभ आणि जेवढया वेळा पंचशील मोडले तेवढया वेळा नुकसान होईल. असे ढोबळमानाने समजु शकतो.
*वैज्ञानिक दृष्टिकोन 9028261973*
बुध्द हा असा पहिला वैज्ञानिक आहे ज्याने मानवी दु:ख निर्माणामागची कारणमीमांसा केली. बाकी इतर सांगितलेले तत्वज्ञान फार मोठे आहे. काही भाग भंतेंजींसाठी (माँकसाठी) लागु आहे. काही उपासकांसाठी तर काही अगदी सामान्यांसाठी आहे.

ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली तो दिवस वैशाख पौणिमेचा होता. गया येथे खुल्या असामानाखाली पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आहे. तेव्हा त्यांचे वय केवळ 35 वर्ष होते. ज्ञान म्हणजे काय असेल. तर मला असे वाटते जागरूक पणे जीवन जगण्याची पद्धत. ती पूर्ण वेळ डोळे उघडूनच जगता येते असे नाही तर कधी कधी शांत, एकांतात, स्वंय विश्लेषनही करने असते. त्यासाठी डोळे बंद करून जागरूकपणे आत अंर्तमनात पहाणे ही आलेच. हे ज्ञान त्यापुर्वी ही असेल पण त्याला अधिष्ठानाची जोड बुद्धांनी दिली.

सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळीपासून ते ‘तथागत बुद्ध’ झाले आणि श्रमण संस्कृतीचे प्रवर्तक ठरले. असे म्हणतात यापुर्वी ही अनेक बुद्ध होऊन गेले. परंतू त्यात सर्वात आधुनिक तथागत बुद्ध हे सिद्धार्थ गौतम जे नंतर तथागत बुद्ध झालेत ते आहेत.

सिद्धार्थ गौतम हे वर्णाने क्षत्रिय होते. परंतू तथागत बुध्द झाल्यानंतर त्यांनी वर्ण व्यवस्थेचा कडाडून विरोध केला. त्यांनी स्थापन केलेल्या धर्मात त्याकाळी सर्वच वर्णाचे लोक मोठया प्रमाणात सहभागी होते. तथागत बुद्ध झाल्यावर त्यांनी सर्वात आधी खीर या गोड पदार्थाचे सेवन केले. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला आणि सर्वच पोर्णिमेला बुद्ध धम्म अनुसरणारे लोक खीर हा गोड पदार्थ बनवितात. तांदूळ आणि दूधापासून बनणारा खीर हा पदार्थ शेती व्यवस्थेशी निगडीत आणि सर्व सामान्यांना त्याकाळात आणि आजच्या काळातही सहज सोप्या पद्धतीने बनविता येणारा असा हा पदार्थ आहे.

तथागत बुद्धाने एका जागी बसून कधीच धम्म (निसर्गाचे नियम) देसना (प्रवचन) केले नाही. त्यांनी त्यांच्या धम्मात सामील झालेल्या भंतेनाही एका ठिकाणी बसून धम्म देसना करू नये असे सांगितले. त्यामुळे ते आणि त्यांचे शिष्य आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी मार्गदाता म्हणून फिरत राहीले. समाजाला धम्माची आवश्यकता का आहे हे पटवित राहीले. या प्रवासात सामान्य लोक, दानी लोक, समाजाला प्रभावित करणारे, व्यापारी, राजे असे असंख्य लोक प्रभावित होत गेले आणि बुद्धाने सांगितलेल्या धर्मात सामील होत गेले. त्यामुळे हा धम्म सर्वदूर पसरला. ज्यांच्याशी भारतीय उपमहाव्दीपांचे व्यापारीक संबंध होते त्यांच्या सोबत तो पसरत गेला. तिथे गेल्यावर त्या-त्या रूपात वाढत राहीला.

तथागत बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत, वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत करीत राहीले. त्यांचे महापरिनिर्वाण झाले ते वैशाख पोर्णिमेला इ.पू. 483 कुशीनगर येथे शाल वृक्षा खाली तो ही निसर्गातच झाला. म्हणून वैशाख बुध्द पोर्णिमेचे विशेष महत्व आहे. असा त्रिसंयोग क्वचितच आहे इतिहासात.

तथागत बुद्ध सर्वांना आपलेसे वाटतात. त्यांचे छायाचित्र बडया दिवाणखाण्यात असू देत अथवा झोपडीत त्यांच्याकडे बघितल्यावर ते शांत चित्त दिसतात आणि ती शांती आपल्यालाही मिळो असे मनोमन सर्वच सदिच्छतात.

बुद्धांनी कोणताही कधीही दावा केला नाही. ना आग्रह केला. ते म्हणतात. ‘ऐही पस्सिको……’ म्हणजे या आणि पहा. मी मोक्षदाता नाही. मी तुमचे भले करणारा नाही. पण मी सांगितलेला मार्ग जर तुम्ही अनुसरला तर तुमचे नुकसान होणार नाही. तुम्हाला आंतरीक शांती नक्कीच मिळेल.

धम्म देयसनेतील गाथा (श्लोक) या संवादात्मकच आहेत त्यात एकेरी सांगणे असे नसुन दूहेरी आहेत. काही प्रश्न/समस्या असल्यास ते विचारणे त्यावर चर्चा करणे असे संवादात्मक देयसना तथागतांनी दिलेली आहे. त्यामुळेही तो सर्वप्रिय ठरला.

बुद्धांनी तत्कालीन पाली भाषेत धम्म देयसना दिली. त्याकाळी पाली बोली भाषा होती. बुध्दांचे सर्व तत्वज्ञान हे गाथेंमध्ये पाली भाषेतच आहे. या एकूण बौध्द साहित्याला ‘त्रिपीठक’ असे म्हणतात. यात सर्वात लोकप्रिय ते ‘धम्मपद’ आहे. हा गाथांचा संग्रह असून यामध्ये बुद्ध धर्मातील त्याकाळातील प्रमुख अनुन्यायांशी झालेला संवाद आहे.

तथागत बुध्दांनी रक्ताचा थेंबही न पाडता जगात बदल घडविला. तार्किक, बुद्धीप्रामाण्यवादी, वैज्ञानिक दृष्टीने जगाकडे पाहणाऱ्या लोकांसाठी बुध्द नेहमीच आदर्श राहीलेले आहेत. बुध्दांच्या विचारांच्या सहायाने जगल्यास जगता युद्धाची आवश्यकता कधी भासणार नाही.
*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.