"अंधश्रद्धा निर्मूलन होणे आवश्यक आहे."
*_पंचसूत्री भोंदू प्रतिकाराची...!_*
_पुणे - 9028261973_
साभार - अडव्होकेट रंजना पगार-गवांदे.
चतुरंग.
*_नवीन वाचकांनी आपल्या विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फॉरवर्ड करा._* 👇
https://chat.whatsapp.com/CIrYKUoFpYDICjIa1NwqSp
अशोक खरात प्रकरणांशी संबंधित आजही काही ना काही बातम्या येतच आहेत. गेली कित्येक वर्षे समाज म्हणून आपणही भोंदू बाबा-बुवांनी केलेल्या शोषणाच्या, फसवणुकीच्या घटना ऐेकतो आहोत. त्यातही सर्वात जास्त संख्येने आणि सर्वाधिक शोषण होणार्या स्त्रियाच का असतात, अगदी आजही? समाज म्हणून आपण याचा विचार केव्हा आणि कसा करणार आहोत? काय चुकतेय नेमके आपले? बुवा-बाबांच्या या षड्यंंत्रातून कायमचे सुटण्यासाठी वैचारिक बदल घडवणारी पंचसूत्री आहे का?
माणूस अंतराळात झेपावला. परग्रहावर वस्ती करण्याची स्वप्ने पाहू लागला. दैनंदिन जीवनातही महत्त्वपूर्ण बदल झाले. विज्ञानाच्या साहाय्याने एका बाजूला ही प्रगती साधली जात आहे,तर दुसरीकडे अधोगतीही होते आहे, भोंदू बुवा-बाबांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीत फसवणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बदल केले आणि त्याचे दुष्परिणाम समाजात दिसत आहेतच. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात आजही एकेक गोष्टी बाहेर येत असताना कित्येक वर्षांपासून भोंदू बुवांच्या विरोधात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती’च्या माध्यमातून आम्ही करत असलेले काम अजूनही थांबवू शकलेलो नाही, याचे कारण अर्थातच त्यांना पोसणारी सामाजिक मानसिकता.
मागच्या वर्षी जूनमध्ये पुण्यात घडलेले एक प्रकरण. प्रसाद तामदार हा उच्चशिक्षित बाबा भक्तांच्या मोबाइल फोनमध्ये छुपे ॲप घालून त्यांच्या फोनवर नियंत्रण मिळवत होता. भक्तांचे फोन स्क्रीन पाहणे, फोनवरील संभाषण ऐकणे त्याला त्यामुळे शक्य होत होते. हा बाबा पीडित स्त्री-पुरुषांचा संपूर्ण मोबाइल डेटा मिळवत होता. त्या माहितीच्या आधारे ‘तुमच्या आयुष्यात ‘हे-हे’ चालू आहे…’ असे सांगून मानसिक खेळ खेळत होता. हे पोलीस तपासात बाहेर आले आहे. बाबाच्या या ‘दैवी शक्ती’बाबत चर्चा होऊन त्याला मोठा ‘भक्तगण’ मिळाला. आर्थिक प्राप्ती वाढली. या बाबाकडून स्त्री-पुरुषांचे लैंगिक शोषणही केले गेले. काही प्रकरणात खासगी छायाचित्र आणि ‘चॅट’चा उपयोग करून धमकावले. नाशिक येथील अशोक खरात प्रकरणातही त्याच्याकडे येणार्या भक्तांची माहिती मिळविण्याची स्वतंत्र यंत्रणा होती. यंत्रणेद्वारे माहिती मिळाल्यानंतर त्या व्यक्तींच्या समाजमाध्यमांवर जाऊन माहिती जमा केली जात होती असे कळते आहे.
आताच्या डिजिटल जमान्यात अनेक भोंदूबाबा विज्ञान, तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना ठकवत आहेत. मागच्या पंधरवड्यात मी काही आश्रमांना भेटी दिल्या. जाणीवपूर्वक पाहणी केली. माहिती घेतली. प्रत्येक पंचक्रोशीत पाच-दहा बुवा-बाबा सापडतातच. गरिबांचा भगत, मांत्रिक. मध्यमवर्गीयांचा बाबा, महाराज तर उच्चभ्रू वर्गाचा खरात, आसाराम, राम-रहीम आदी, अशी वर्गवारी करावी लागेल. आसाराम, रामरहीम यांना स्त्रियांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात शिक्षाही झाल्या.
अहिल्यानगर येथील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावात एका कीर्तनकाराने एका सोळा वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचे समजले. मुळात नाशिक जिल्ह्यातील पाथरे गावचा हा विवाहित पुरुष आण्णासाहेब गुंजाळ पोथी वाचनासाठी एका कुटुंबाकडे जात होता. नाशिकमधल्या एका कुटुंबातील १५-१६ वर्षांची मुलगी पळवून हा कथित कीर्तनकार नाव बदलून त्या मुलीसोबत राहत होता. गावात आश्रम बांधला. आश्रमासाठी जागा बांधकामासाठी पैसे गावातल्या लोकांकडून मिळवले. आश्रम पाहणीसाठी गेल्यावर तिथं जमा झालेले तरुण सांगत होते. ‘‘बाई, कधी कुणाला दहा रुपयांचा चहा न पाजणार्या लोकांनीही या आश्रमासाठी लाख-लाख रुपये दिलेत…’’ मात्र या मुलीच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
दुसर्या एका आश्रमातील भोंदूकडे महाराष्ट्राभरातून लोक येतात. आपला क्रमांक लवकर येण्यासाठी ११ हजार, २१ हजार रुपये देतात. हा बाबा कर्करोगादी रोग बरे करण्यापासून ते मूल देण्यापर्यंतचे दावे करतो. त्याच्या औषधांसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. अनेक लोक फसवले गेल्याच्या तोंडी तक्रारी करतात. लेखी तक्रार करण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते. उलट, ‘‘तुम्ही आजपर्यंत काय केलंय? बाबाला अद्दल का घडवली नाही, असे प्रश्न आम्हा ‘अंनिस’ कार्यकर्त्याला मात्र धिटाईने बिनदिक्कत विचारतात.
डिसेंबर २०१३ मध्ये महाराष्ट्रात ‘जादूटोणा कायदा’ पारित झाला. गेल्या २० ते २५ वर्षांच्या काळात १०० पेक्षा जास्त बुवा-बाबांची मी आणि माझ्या सहकार्यांनी भांडाफोड केली. ‘अंनिस’च्या माध्यमातून तर त्यापेक्षा किती तरी जास्त प्रकरणे बाहेर आली. कायदा नव्हता तोपर्यंतच्या काळात गुन्हे दाखल करून घेतले जात नव्हते. त्यामुळे अनेकदा बुवा-बाबांकडून स्टॅम्प पेपरवर ‘पुन्हा गुन्हा करणार नाही’ असे लिहून घेतले जात होते. २०१३ नंतर मात्र गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्रात आजपर्यंत भोंदूगिरी, जादूटोणाविरोधात २००० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रातला पहिला गुन्हा नांदेडमध्ये दाखल झाला, तर पहिली शिक्षा भंडार्यातल्या एकाला झाली. आत्तापर्यंत झालेल्या शिक्षा पाहता भोंदूगिरी प्रकरणांमध्ये ४३ टक्के प्रकरणांत शिक्षा झाल्या आहेत. अन्य फौजदारी गुन्ह्यांप्रमाणेच साक्ष देताना पंच फितूर होणे, पीडित डगमगणे, योग्य ते पुरावे समोर न येणे या बाबींचा फायदा आरोपीस (भोंदूस) होतो. एक मात्र नक्की, त्यांना इतका हिसका बसलेला असतो की शिक्षा न झालेले भोंदूही पुन्हा फसवणूक करण्याचे धाडस करत नाहीत.
अशोक खरात प्रकरणावर झालेली एकूण चर्चा पाहता ज्या ्त्रिरया या बाबाकडे स्वत: गेल्या त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, असा सूर खूप मोठ्या प्रमाणात ऐकू येत होता. स्त्रिया का असल्या भोंदूकडे जातात? ्त्रिरयाच जास्त जातात का? या प्रश्नांची उत्तरं आपण समाज म्हणून शोधायला हवीत. समाजव्यवस्थेने स्त्रियांना बहाल केलेले दुय्यमत्व हेच याचे एक उत्तर असेल. मुळात मुलीचा जन्मच ज्या समाजात स्वागतार्ह मानला जात नाही. गर्भातच मुली नष्ट करण्याचे षड्यंंत्र रचले जाते. मुलगी जन्माला आल्यास तिचे लग्न, अपत्यप्राप्ती, त्यात तिने कुटुंबाला मुलगाच दयावा. कुटुंबाचे सुख, नवर्याची प्रगती, मुलांची भरभराट ही सर्वच जबाबदारी स्त्रीवर आजही लादलेली आहे. त्यासाठी व्यवस्थेने स्त्रियांना उपायही दिले आहेत. व्रत-वैकल्ये, पूजा, कर्मकांड, सत्संग मेळावे, साधूंचे आश्रम, बुवा-बाबा-माता यातला कोणताही मार्ग अनुसरत तिने कुटुंबाचे भले केलेच पाहिजे. हे कित्येक पिढ्यांपासून चालतच आले आहे. वेगवेगळी व्रतवैकल्ये स्त्रीनेच करावीत असा नियम. माझी आई, सासू करत होती. तेच व्रतवैकल्य लेकी, सुनेने करावे आणि पुढच्या पिढीतील विज्ञान शिक्षण घेणार्या डॉक्टरेट मिळवणार्या तरुण नातीनेही करावे अशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अपेक्षा, सक्ती, सामाजिक दबाव मुलींवर लादलेला असतो. हे सर्व करताना अनेक मुलींनाही वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानाच्या महत्त्वाच्या कसोट्या, निरीक्षणे, तर्क, अनुमान, प्रचीती या सर्वच बाबींचा विसर पडतो. अशा वेळी अनिष्ट प्रथा-परंपरांना श्रेष्ठत्व बहाल करत चिकित्सक बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला जात नाही. शिक्षण लग्न जमण्यासाठी अथवा नोकरी मिळण्यासाठी असते का?
कुटुंबकल्याण, अपत्यप्राप्ती, त्यात मुलगाच हवा यासाठी कौटुंबिक नातेसंबंधांमधील, सामाजिक दबावही अनेकदा खूप मोठा असतो. त्या दबावातूनही स्त्रिया भोंदू बुवा-बाबाकडे जातात. लैंगिक शोषणाला बळी पडतात. मृत्यूचाही धोका पत्करतात. उषा बाजीराव रेपाळे. बाजीरावच्या पहिल्या पत्नीला मूलबाळ झाले नाही म्हणून त्याने उषाशी लग्न केले. उषालाही मूलबाळ होत नाही, असे लक्षात आल्यावर उषा अगतिकतेपोटी भगताच्या सांगण्यावरून पारनेर तालुक्यातील मौलचौंडवीच्या डोहात अंघोळीसाठी गेली. हिरवी साडी, बांगड्या घालून डोहात उतरण्यापूर्वी ती म्हणाली, ‘‘मी सातव्या दिवशी डोहातून बाहेर येईन…’’ उषा खोल डोहात अंघोळीसाठी उतरली. दुसर्या दिवशी फुगून तिचा मृतदेह पाण्यावर आला. डोहाच्या परिसरात वाद्य वाजत होते. यात्रा भरली होती. उषाचा जयजयकार सुरू होता. ‘अंनिस’चे कार्यकर्ते तिथे गेले. पोलिसांत तक्रार केली. पोलीस नि्क्रिरय. एकीकडे जमलेले लोक उषा सातव्या दिवशी पुन्हा जिवंत होईल असे म्हणत होते. शेवटी कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याने उषाचा मृतदेह बाहेर काढावा लागला. केवळ अपत्यप्राप्तीसाठी कुटुंब व समाजाच्या दबावापोटी उषाने मृत्यूस जवळ केले. उषाला जिवाची भीती वाटली नसेल का? या डोहात आपला अंत होऊ शकतो हे तिला जाणवले नसेल का…? इथे अगतिकता, दबाव, अंधश्रद्धा या बाबी सरस ठरल्या.
आज अनेक प्रश्नांनी मानवी मन ग्रासले आहे. चंगळवादी जीवन जगण्याकडे कल वाढला आहे. झटपट श्रीमंत, सुख-समृद्धी कशी मिळेल? व्यापार, नोकरी, बढती, लग्न, पैसा अशा अनेक बाबी सहज विनाकष्ट प्राप्त होण्यासाठी सोपे मार्ग अनुसरले जातात. या व्यवस्थेत मग प्रसाद तामदार, अशोक खरात उदयाला येतात. त्यांच्यासारख्यांना राजकारण्यांचे आशीर्वाद तर शासकीय यंत्रणेचे अभय मिळते. त्यांच्यासमोर ‘भक्तां’च्या मोठ्या-मोठ्या रांगा लागतात. त्यात मुख्यत्वे शारीरिक शोषण होते ते स्त्रियांचे. त्यांच्या ‘दरबारा’त गेल्यानंतर अनेकदा तिला भोंदूकडून मानसिक आधार दिल्याचे भासवले जाते. सहानुभूती, प्रेम, आस्था दाखवली जाते. मग पुढच्या टप्प्यावर जाऊन शारीरिक शोषण केले जाते. अनेक घटनांत ते करताना पवित्र भावनेतून, ‘योनिपूजा’सारखे भ्रामक नाव देऊन केले जाते. असे न केल्यास पती, अपत्य, कुटुंब यांच्यावर संकट येण्याची भीतीसुद्धा घातली जाते.
डिसेंबर २०१३ मध्ये महाराष्ट्रात ‘जादूटोणा कायदा’ पारित झाला. गेल्या २० ते २५ वर्षांच्या काळात १०० पेक्षा जास्त बुवा-बाबांची मी आणि माझ्या सहकार्यांनी भांडाफोड केली. ‘अंनिस’च्या माध्यमातून तर त्यापेक्षा किती तरी जास्त प्रकरणे बाहेर आली. कायदा नव्हता तोपर्यंत बुवा-बाबांकडून स्टॅम्प पेपरवर ‘पुन्हा गुन्हा करणार नाही’ असे लिहून घेतले जात होते. २०१३ नंतर मात्र गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्रात आजपर्यंत भोंदूगिरी, जादूटोणाविरोधात २००० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. आत्तापर्यंत भोंदूगिरी प्रकरणांमध्ये ४३ टक्के प्रकरणांत शिक्षा झाल्या आहेत. एक मात्र नक्की, या सर्वांंना इतका हिसका बसलेला असतो की शिक्षा न झालेले भोंदूही पुन्हा फसवणूक करण्याचे धाडस करत नाहीत.
हल्लीच अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला एक भोंदू १२ वर्षांपूर्वी अहिल्यानगरमध्ये आला होता. त्याचे हजारो चाहते-भक्तगण जमा झाले होते. भक्तांच्या गराड्यात व्यासपीठाच्या दिशेने जात असताना या गर्दीमुळे भोंदूचा तोल गेला. तोल सावरताना त्याचा हात गर्दीतील पुढे चालणार्याच्या पाठीवर पडला. भक्तांनी ते पाहिले. महाराजांचा विशेष आशीर्वाद त्या व्यक्तीला लाभला म्हणून भोंदूचा हात पाठीवर पडलेल्या व्यक्तीच्या पाया पडणार्यांची मोठी रांग लागली. बापू, आण्णा, महाराजांचा केवळ कटाक्ष, त्यांचा स्पर्श, त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वस्तू त्यांचा सहवास, त्यामागची पावित्र्याची भावना, जीवन सफल झाल्याचा भ्रमात बहुसंख्य वावरतात. त्यामुळे अशा घटनांमध्ये स्त्रीचे शोषण झाले तरीही शोषकाबद्दल सहानभूती किंवा सहजभाव बाळगत टीका या स्त्रियांवर होते. इथे आपण जबाबदार समाजघटक म्हणून काही बाबी समजून घ्यायला हव्यात. त्यासंबंधाने बदलासाठीही पूरक भूमिका घ्यायला हवी. अशोक खरातकडे जाणार्या स्त्रियांना सहआरोपी करणे आवश्यक आहे, असे बोलले जाताना यात कायदेशीर आणि मानसशास्त्रीय या दोन्ही बाजू बघाव्या लागतील.
कायदा सांगतो, ‘मुक्त संमती’ (फ्री कन्सेंट) असेल तर तो बलात्कार नाही. मात्र एखादी स्त्री भीती, फसवणूक, खोटे आश्वासन, मानसिक नियंत्रण यामुळे संबंधात आली तर ती संमती वैध मानली जात नाही. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास ‘सत्ता असमतोल’ महत्त्वाचा आहे. बहुतांशी बाबांना सत्ता, प्रतिष्ठा, समाजमान्यता मिळालेली असते. खरातबाबत तर त्याच्याकडे येणारे राजकीय पुढारी, सरकारी अधिकारी यामुळे त्याला राजमान्यताही होती. म्हणजे बाबांकडे अधिकार, श्रद्धा, सामाजिक प्रतिष्ठा असते तर त्याच्याकडे जाणारी स्त्री वैयक्तिक, कौटुंबिक समस्येत जखडलेली असते. भोंदू बाबामध्ये असलेल्या ‘दैवी शक्ती’ची तिला भीती आणि आदर असतो. या असमतोलामुळे अशी स्त्री बाबाकडे गेल्यावर अनेकदा स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही. भीती, दबाव किंवा गोंधळलेल्या मन:स्थितीत माणसाची मानवी प्रवृत्ती ‘लढा’ किंवा ‘पळा’ हे घडत नाही. स्त्री गोठून जाते. त्यामुळे अनेकदा ती विरोध करत नाही.
भोंदू बुवा-बाबांच्या या षड्यंंत्रातून समाज मुक्त होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी, अनिष्ट प्रथा-परंपरांना नकार, दैववादाचा अस्वीकार आणि जादूटोणाविरोधी कायदा अंमलबजावणी ही पंचसूत्री परिणामकारक ठरणारी आहे, मात्र ती कठोरपणे पाळायला हवी.
*_संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973_*
Comments
Post a Comment