"रुपेरी मुकुटाचे मानकरी".
*_👑रुपेरी मूकुटाचे मानकरी.👑_*
भाग - ३३
*जेष्ठ गायिका - आशा भोसले.*
8 सप्टेंबर 1933
12 एप्रिल 2026
https://youtu.be/lFJx0XA44oQ?si=TqrzQlwRHFCIfl12
*लग्न, संसार, मुले सगळ काळाने हिरावलं पण त्या गात राहिल्या. प्रसिद्धी मागची दुर्दैवी गोष्ट.*👇
https://youtu.be/-IzTUtCxzj4?si=osA7PVjWPXMMt-yQ
_*🎦 "सफर सिनेमांची." 🎦*_
संकलन - साहेबराव माने.
पुणे 9028261973
साभार - आकाशवाणी पुणे.
=======================
*सफर सिनेमांची ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि पोस्ट इतरांना फाॅरवर्ड करा.*👇
https://chat.whatsapp.com/E8l1UxMYgEKL8kpIJIdkZa?mode=gi_t
https://youtu.be/ZpkauD-Iqn0?si=KoEuVch-3VXtoD1i
दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित कलाकारांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष कार्यक्रम मालिका - *'रुपेरी मुकुटाचे मानकरी'*
*भाग ३३ - भारतीय चित्रपट सृष्टीतल्या दिग्गज, अष्टपैलू, हरहुन्नरी, विविध भाषातली गीतं लिलया गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि २००० सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा.*
लेखन - श्रीपाद ब्रह्मे
निवेदन आणि सादरकर्ते - प्रसाद कुलकर्णी
संगीत क्षेत्रात जगभरात नावाजेलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे आशा भोसले, हे नाव सर्वांनाच परिचित असून शास्त्रीय आणि पाश्चिमात्य शैलीचे गाणे गाणारी ‘मेलोडी क्वीन’.
८ सप्टेंबर १९३३ रोजी आशा भोसलेंचा जन्म सांगली येथे झाला.
*लग्न, संसार, मुले सगळ काळाने हिरावलं पण त्या गात राहिल्या. प्रसिद्धी मागची दुर्दैवी गोष्ट.*
एक चीर तरुण आवाज… जो कधी खट्याळ, कधी विरहाने भरलेला, कधी उधास तर कधी आयुष्याचा उत्सव साजरा करणारा होता… आज तो आवाज कायमचा शांत झाला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 12 एप्रिल 2026 रोजी अखेरचा श्वास घेतला… आणि भारतीय संगीतविश्वाने आपला एक अनमोल ठेवा गमावला. आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी आपल्या सुरांनी इंडस्ट्री गाजवली. केवळ हिंदीच नाही, तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन त्यांनी आपली अढळ छाप निर्माण केली. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार R. D. Burman, O. P. Nayyar यांच्यासोबत त्यांनी असंख्य अजरामर गाणी दिली. त्यांचे ‘दम मारो दम’, ‘ओम शांती ओम’सारखी सुपरहिट गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. काळाच्या पडद्याआड त्या गेल्या असल्या, तरी त्यांचा आवाज, त्यांची जादू आणि त्यांच्या गाण्यांची आठवण कधीच मावळणार नाही… म्हणूनच त्यांच्या निधनाचं नेमकं कारण काय होतं ? आणि ९२ वर्षांची त्यांची ही अफाट कारकीर्द कशी घडत गेली, याचाच घेतलेला हा आढावा.
जाणून घेऊयात आशाताईंशी संबंधित २० रंजक गोष्टी...
१) आशा भोसले यांनी वयाच्या १० व्या वर्षी म्हणजेच १९४३ मध्ये ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता.
२) वयाच्या १६ व्या वर्षी १९४९ मध्ये ‘रात की रानी’ या चित्रपटात पहिले सोलो गाणे गायिले होते.
३) आशा भोसले यांनी वयाच्या १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला होता. त्यावेळी गणपतराव आशाताईंपेक्षा १५ वर्षांनी मोठे होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोन मुलांसह आशाताई आपल्या माहेरी परत आली, त्यावेळी आशाताई गरोदर होत्या.
४) त्यानंतर आशाताईंनी गायनात सातत्य ठेवले आणि मोहमंद रफींसोबत गायलेल्या ‘ नन्हे मुन्हे बच्चे...’ या गाण्यामुळे आशाताईंना खूपच प्रसिद्धी मिळाली.
५) आशा भोसलेंना सुप्रसिद्ध गायक रफी, आर.डी.बर्मन, सचीन देव बर्मन आदींसोबत गायनाची संधी मिळाल्याने प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
६) १९६० आणि १९७० मध्ये आशाताई बॉलिवूडमधील अभिनेत्रींसाठी आवाज बनल्या आणि डान्सदेखील उत्तम करायच्या.
७) आशा भोसले यांनी १९८० साली आर.डी.बर्मन यांच्याशी विवाह केला. मात्र लग्नाच्या १४ व्या वर्षानंतर १९९४ मध्ये बर्मन यांचे निधन झाले.
८) आशा भोसले यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी २०१३ साली ‘माई’या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले होते.
९)आशाताईंनी आतापर्यंत गायलेल्या गाण्यांची दखल घेत २०११ साली ‘गिनीज बुक आॅफ द वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली आहे.
१०) भारत सरकारतर्फे त्यांना २००० साली ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि २००८ साली ‘पद्म विभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल आॅफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.
११) आशाताईंनी त्यांच्या करिअरची सुरुवात गायनातून केली, मात्र त्यांना अभिनयातदेखील आवड होती.
१२) आशाताईंनी २० वेगवेगळ्या भाषेत २० हजार पेक्षा जास्त गाणी गायिली आहेत.
१३) आशाताई ह्या चांगल्या आणि उत्तम गायिका असून त्या मिमिक्री कलाकारदेखील आहेत. विशेष म्हणजे त्या लता मंगेशकर आणि गुलाम अली यांच्या आवाजात चांगले गाणे देखील गाऊ शकतात.
१४) आशा भोसले ह्या ‘ग्रॅमी अॅवार्ड’साठी पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय गायिका होत्या.
१५) १९४८ साली आशा भोसले यांनी ‘चुनरियॉ’ या चित्रपटात ‘सावन आया रे...’ हे गाणे कोरस म्हणून गायले होते. त्याचे बोल होते ‘बहना खूश हो के सगन मनाये.....’
१६) आशाताईंनी ‘आजा आजा मैं हुॅँ प्यार तेरा...’ हे गाणे गाण्यास सुरुवातीला नकार दिला होता. त्यांच्या मते ते हे गाणे चांगले गाऊ शकणार नव्हत्या, मात्र शेवटी जेव्हा त्यांनी हे गाणे गायिले तर आपल्या जादुई आवाजाने सर्वांना बेहोश केले होते.
१७) आशाताई स्वयंपाक देखील चांगल्या पद्धतीने करू शकतात, त्यांना स्वयंपाक करणे खूपच आवडते.
१८) आशाताईंची मुलगी वर्षा हिने २०१२ मध्ये आत्महत्या केली. ह्या घटनेनंतर आशाताईंना खूप मोठा धक्का बसला होता.
१९) आशाताईंनी १९४७ पासून ते १९८९ पर्यंत एकूण १० हजार ३४४ गाणे भारतीय भाषेत, पैकी ७ हजार ५९४ गाणे हिंदी भाषेत गायले आहेत.
२०) आशा भोसले यांच्या सांगितिक आयुष्यावर अनेक पुस्तके असून त्यापैकी आशा भोसले : नक्षत्रांचे देणे (संपादक - वामन देशपांडे, मोरया प्रकाशन)खय्याम (विश्वास नेरुरकर)नामांकित (अनघा केसकर)मंगेशकर - स्वरांचा कल्पवृक्ष (प्रभाकर तांबट)सुरा मी वंदिले (कृष्णकुमार गावंड) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
(प्रथम प्रसारण - भारतीय सौर दिनांक २२ माघ शके १९४७ अर्थात बुधवार, दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता पुणे विविधभारती १०१ एफएम केंद्रावरून)
*"सफर सिनेमांची" ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973*
=======================
Comments
Post a Comment