"ओळख हिरकणी ची" - 2 जून." "प्रतिभाताई जाधव : लेखिका, साहित्यिका, कवयित्री, एकपात्री प्रयोग सादरकर्त्या." "महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्." संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 2 जून 2023.

*"ओळख हिरकणी ची" - 2 जून.*

*प्रतिभाताई जाधव : लेखिका, साहित्यिका, कवयित्री, एकपात्री प्रयोग सादरकर्त्या.*

*महाराष्ट्राचा चांगुलपणा*
आणि 
*सत्यम् शिवम् सुंदरम्.*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
2 जून 2023. 

*🎂🌹प्रतिभाताई : जन्म 2 जून. 🌹🎂*

*डॉ. प्रतिभा जाधव - प्राथमिक शिक्षिक ते डॉक्टरेट प्राध्यापक.*

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇

http://Sahebraomane1967.blogspot.com
_____________________________

*अरुणा शानबाग साकारताना डॉ. प्रतिभा जाधव. 👇*
https://youtu.be/cYx3FIj5EyQ
____________________________

*सातासमुद्रापार मॉरिशसच्या मातीत डॉ.प्रतिभा जाधव (नाशिक) यांनी साकारलेला 'मी जिजाऊ..!' हा एकपात्री प्रयोग.* 👇
https://youtu.be/7kAXjHsG7sI

______________________________

*"मी अरुणा शानबाग बोलतेयं" प्रतिभाताईंची काळीज विदीर्ण करणारी कविता.👇*

https://youtu.be/fWidVTYdBmI

_____________________________

*डॉ. प्रतिभाताई यांचा "मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेयं" एकपात्री* 
प्रयोग. 👇

https://youtu.be/o4LNvsthTFw
_____________________________

*प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापक - आकाश भरारी.*
...अभिवाचन - वैशाली आहेर.👇

https://youtu.be/h6PifZA5Du0
_____________________________
https://youtu.be/LXco9yP7h3A

डॉ. प्रतिभाताई जाधव आमच्या घरच्या छोटेखानी कार्यक्रमात.
(आपुलकी जपणारी माणसं या यु ट्यूब चॅनेल कडून साभार) 
____________________________
https://youtu.be/1_tuZbxlkYo

*"मी पाहिलेले माने दादा."*
...डॉ. प्रतिभाताई जाधव.
(आपुलकी जपणारी माणसं या आपल्या यु ट्यूब चॅनेल कडून साभार.) 
_____________________________

*सत्यम् शिवम् सुंदरम्* ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या, *प्रतिभाताई जाधव* यांनी आकाशवाणी नाशिक मध्ये काही वर्षे उद्घोषिका म्हणून काम केले आहे. आता स्वेच्छा निवृत्ती घेऊन -
१) मी जिजाऊ, 
२)मी अरुणा शानबाग बोलतेयं,
३) सावित्री तू होतीस म्हणूनच.
 हे तीन एकपात्री प्रयोग घेऊन त्या समाजप्रबोधनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि विदेशात दौरे करताहेत. 

*प्राथमिक शिक्षिका ते डायरेक्ट प्राध्यापक* पर्यंत त्यांनी मजल मारली आहे. 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप मध्ये त्या ग्रुप च्या सुरवातीपासूनच आहेत. 
साधारणपणे ४ वर्षांपूर्वी मी माझ्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने सत्यनारायण पूजाच्या ऐवजी प्रतिभाताईंचा *सावित्री तू होतीस म्हणूनच* हा एकपात्री प्रयोग ठेवला होता. त्या साठी त्या नाशिकहून आमच्या पुण्यातील घरी आल्या होत्या. पंचविसेक हजार देणगीमुल्य असणारा *सावित्री तू होतीस म्हणूनच* हा एकपात्री प्रयोग त्यांनी एकही पैसा न घेता निशुल्क सादर केला होता. त्या कार्यक्रमावर आधारीत नाशिकच्या सकाळ वर्तमानपत्रातून लेख प्रसिद्ध झाला होता.. 👇
*आज मंगळवार दि. 26 फेब्रुवारी 2019 रोजीच्या "सकाळ वर्तमानपत्रातील'' विचारधन-अंतर्नाद' सदरातील नववा लेख👇*

 *जुने जाऊ द्या मरणा लागुनी...*
*********************
मागील रविवारी (१० फेब्रुवारी २०१९) आळंदीत भाषणभ्रमंतीच्या निमित्ताने जाणं झालं. पण हे भाषण एरवी होतात तशा कार्यक्रमाचा भाग नव्हतं तर हे भाषण होतं एका 'लगीनघरी'! होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंय. हे भाषण किंवा व्याख्यान जे होतं ते नवरदेवाच्या घरी स्वागत सोहळ्यात ! लग्न किंवा रिसेप्शन म्हटलं की डीजे, बँड, मोठ्या आवाजात फिल्मी गाणे, धांगडधिंगा, बडेजाव, हजारोंच्या फटाका लडी, आतिषबाजी वगैरे वगैरे नजरेसमोर येतं; पण ह्या लगीनघरी मात्र यातलं काहीच नव्हतं. विवाह नोंदणी पद्धतीने झालेला, वरवधू विनायक आणि रुपाली दोघे उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ. वायफळ खर्चाला फाटा देत दोन्ही पक्षांनी सहमतीने हा निर्णय घेतलेला. विवाहाच्या निमित्ताने वेगळा पायंडा पाडावा, नातलग, स्नेही यांनी एकत्र येऊन स्नेहभोजन घ्यावे आणि आलेल्या प्रत्येकाला सभोवताली काय घडतेय याचं भान, सजगता देता यावी म्हणून साहेबराव माने या विज्ञाननिष्ठ, आधुनिक विचारसरणीच्या बांधवाने माझा 'सावित्री तू होतीस म्हणूनच...!' हा कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केलेला. नाशिकहून निघाले तेव्हा मला शंका होती ती श्रोत्यांची संख्या किती असेल व स्वागत सोहळ्यात त्यांची मनस्थिती असं काही प्रबोधनपर ऐकण्याची असेल का? दोन तास आधी माने दादांच्या लगीनघरी 'अहो' व मी पोहचले. आनंदाने स्वागत झाले. खरं तर ही पहिलीच भेट पण सारं घर फार जुनी ओळख असल्यासारखं आमचं प्रेमाने स्वागत करत होतं, औपचारिक वगैरे असं काही नव्हतं. एवढया भाषणभ्रमंतीत असा सुखद अनुभव सर्वच ठिकाणी येत नाही पण इथली 'बात कुछ और ही थी|' 'डॉक्टर फॉर बेगर्स' समाजसेवी श्री. व सौ.डॉ.अभिजित सोनवणे आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ हे दोघे या कार्यक्रमास निमंत्रित होते. पण डॉ. सोनवणे महत्वाच्या सभेस मुंबईत आणि माई परदेशात असल्याने येऊ शकल्या नाही. त्यामुळे अस्मादिकांची जबाबदारी वाढल्याची जाणीव झाली, कारण निमंत्रितांपैकी मी एकमेव वक्ती हजर होते.
       हळूहळू सर्व नातेवाईक जमू लागले. हल्ली सगळ्याच आप्तांच्या आयुष्याला इतका वेग आलाय नं की, कुणी कुणाकडे असे मुक्कामी राहण्याच्या भानगडीत पडत नाही जे काय असतं ते 'वन डे रिटर्न प्रोग्राम'. त्यामुळे सर्व निमंत्रित नियोजित वेळेवर हजर होत होते. बरोबर ठरल्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजता कथाकथन सुरू झाले. माईक व्यतिरिक्त कोणतंही ध्वनिप्रदूषण करणारं साधन तिथे नव्हतं. मी कथाकथनास सुरुवात केली आणि येणारे शांतपणे खुर्चीवर बसत होते. ऐकत होते, काही वाक्यांना टाळ्या पडत होत्या तर काही वाक्यांना हशा मिळत होता तेवढाच काय माझ्या आवाजाव्यतिरिक्त येणारा दुसरा आवाज. 
      या श्रोत्यांमध्ये सासू-सुना, बाप-लेक, माय-बाप, माय-लेक, नणंद-भावजया, चुलते-पुतणे, मामा-भाचे, आजोबा-नातू,भाऊ-बहीण शेजारीपाजारी, तिथे बाजूलाच अन्न शिजवणाऱ्या महिला आणि काही तान्ही लेकरंही होती पण प्रत्येकात मला जाणवली या नवीन प्रयोगाबद्दल, या नवीन प्रथेबद्दल असलेली पराकोटीची उत्कंठा आणि सकारात्मक स्वीकार. भरभरून प्रतिसाद या नविन उपक्रमास मिळाला त्याच आनंदात आमचा परतीचा प्रवास आणि श्रोत्यांचा वैचारिक प्रवास सुरु झाला होता. आणि आठवू लागल्या केशवसुतांच्या ओळी-
 'जुने जाऊ द्या मरणालागूनी,
जाळून अथवा पुरून टाका..'
  म्हणून वाटतं की ,कुणीतरी तारणहार येईल आणि बदल घडवेल वा चमत्कार होईल असा खुळचट समज न ठेवता बदलाची सुरुवात स्वतःपासून करणारे माने दादा मला खूप 'मोठे' वाटू लागले. 'ये बदलेगा, वो बदलेगा फिर देश बदलेगा!'असं नसतं तर 'हम बदलेंगे तो देश बदलेगा' हे स्वतःच्या कृतीतून दाखवून देणारे माने कुटूंब. त्यांचा आदर्श ठेवत अवाजवी खर्चाला फाटा देत मंगलकार्य होऊ शकतात. दुष्काळाचे सावट, महागाई, बेरोजगारी, बेभाव शेती ह्या समस्या असताना 'ऋण काढून सण' साजरा करून जीवाला घोर लावण्यापेक्षा, जाण अन भान देणारा 'विचार' रुजवून
 'विकार' संपवता आला तर......? पण आपण मात्र फुकटचे सल्ले देतो आचरण शून्य! बदलाची नांदी देऊ स्वतःपासून, होऊ या अंतर्मुख, आणि फोल ठरवू या हा शेर -
'उम्रभर गालिब यही भूल करता रहा,
चेहरे पर थी धुल और आईना साफ करता रहा....….|'

----- *डॉ.प्रतिभा जाधव*
            *लासलगाव,(नाशिक)*

अशा आवलिया कलाप्रेमी प्रतिभाताईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून "सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप कडून मी प्रतिभाताईंना शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आहे. 
प्रतिभाताई 🙏
*🎂🌹जिवेत् शरद् शतम्. 🎂🌹*

औक्षवंत व्हा. किर्तीवंत व्हा. यशस्वी भव. दीर्घायुष्य लाभो. 
साभार - प्रतिभाताईंच्या फेसबुकवरुन. 

"सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप कडून आपल्या कार्यासाठी सदिच्छा आहेतच.
.....साहेबराव माने. पुणे.
9028261973.

*डॉ. प्रतिभा जाधव - प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापक.*
संकलन... साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
लेखन - प्रमोद शेंडे. 
थिंक महाराष्ट्र. 

प्रतिभा जाधव-निकम यांचा प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापक असा प्रवास थक्क करणारा आहे. त्या नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात लासलगाव येथे ‘नुतन विद्याप्रसारक मंडळा’च्या ‘कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’त मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांना लहानपणापासून वेगळे, नवीन काही करण्याचा ध्यास होता. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय जोमाने गाठले. त्या एम.ए., एम.एड., सेट (मराठी, शिक्षणशास्त्र), पीएच.डी. आहेत. त्यांचे भाषा व शिक्षणविषयक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या ‘अक्षराचं दान’ या पहिल्याच कवितासंग्रहाला उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार 2012 साली प्राप्त झाला व पाच राज्यस्तरीय पुरस्कारही लाभले. त्यांना साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पंधरा पुरस्कार मिळाले आहेत! त्यांचे लेखन विविध मासिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके व दिवाळी अंक यांतून प्रसिद्ध होत असते, त्यांचे ‘झी मराठी’, ‘कलर्स मराठी’, ‘आय.बी.एन. लोकमत’, ‘साम टिव्ही’, ‘मायबोली’ या वाहिन्यांवर समाज प्रबोधनाचे कार्यक्रम झालेले आहेत. विशेष म्हणजे त्या दै. सकाळ-मधुरांगण (जून 2014) आयोजित ‘नाशिक स्मार्ट सौ.’ स्पर्धेच्या विजेत्या आहेत.

प्रतिभा प्राध्यापक झाल्यावर त्यांच्यासाठी प्रगतीचे, सामाजिक कार्याचे व संपर्काचे अनेक मार्ग खुले झाले. त्यांची महाराष्ट्रभर ‘रंग कवितेचे’, ‘सावित्री तू होतीस म्हणूनच...’ व ‘आई’ या विषयांवर व्याख्याने होत असतात. त्या ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल मंडळा’च्या व्याख्यात्या आहेत. त्यांचे पती निलेश हेही येवला येथे शिक्षकी पेशात आहेत.

अशा चतुरस्रपणे वावरणाऱ्या व तळपणाऱ्या प्रतिभा यांनी षटकार मारला, तो ‘मी अरुणा बोलतेय...!’ या त्यांनीच लिहिलेल्या व सादर केलेल्या एकपात्री प्रयोगाने. तो एकपात्री प्रयोग के.ई.एम. रुग्णालयातील अत्याचारग्रस्त अरुणा शानभाग या परिचारिकेच्या वेदनामय जीवनावर आधारित आहे. प्रतिभा बेचाळीस वर्षें कोमात असलेल्या अरुणाच्या मृत्यूच्या बातमीने अस्वस्थ झाल्या, अरुणा शानबाग गेल्यावर टिव्हीच्या सर्व वाहिन्यांवर भरपूर सांगण्यात आले. वर्तमानपत्र, साप्ताहिक यांच्यामध्येही त्यांच्याबद्दल खूप चर्चा झाली. तरीही प्रतिभा जाधव यांची अस्वस्थता कमी होईना. त्या म्हणाल्या, “वासनांध प्रवृत्तीला बळी पडलेल्या अभागी अरुणा शानबाग या भगिनीच्या वेदना काळजाला भिडल्या. ती बाईपणाच्या नात्याने मला अंतर्मुख विचारप्रवृत्त व दु:खी करून गेली. त्या वेदनेनेच मला लिहिते केले.”

    त्यांनी प्रथम अरुणावर ‘एक होती अरुणा’ ही कविता लिहिली. ती काही ठिकाणी सादरही केली, पण त्यांची अस्वस्थता जाईना, तेव्हा त्यांनी ‘महिला साहित्य संमेलना’च्या आदल्या दिवशी फक्त एका तासात झपाटल्यागत ‘मी अरुणा बोलतेय...!’ या एकपात्री नाटकाची संहिता लिहून काढली. दुसऱ्या दिवशी ‘महिला साहित्य संमेलना’तील सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत, कोठल्याही सरावाशिवाय ‘मी अरुणा...!’ हा त्यांचा पहिलावहिला एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्याचे चौतीस प्रयोग झाले. पारनाका, वसई येथे ऑक्टोबर २०१५ मध्ये पार पडलेल्या ‘नरवीर चिमाजीअप्पा साहित्य संमेलना’त प्रतिभा यांनी तो एकपात्री प्रयोग सादर केला. त्यास प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली.

अरुणाबद्दलची त्यांची कविता -
एक होती अरुणा
शब्द, ताल, सूर, लय नसलेले तुझे भेसूर जीवनगाणं...
किती किती सोसलंस बाई
मती शून्य होते माझी...

               कशी झालीस गं अरुणा तू कुमारिकेची एकदम आजी?
तुला रूप, रस, गंध कसलाच आनंद घेता आला नाही,
की ऋतूंचे सोहळे बघता आले नाही
ऋतूंमध्ये पाहिला तू फक्त जीवघेणा उन्हाळा...

शब्द रूसले नंतर तुझ्यावर
तू आज शब्दांची प्रेरणा झालीस...
तू कोण? कुठली? माहित नाही सखे...
पण बाईपणाच्या नात्याने तू मला माझीच वाटलीस
तुला नाही वाटलं का गं कधी पक्वान्न, नवी कोरी साडी वा फुलांची हौस...
तुझ्याभोवती सदैवच वेदनांची फौज...

तू असून नव्हतीस अन् नसूनही असल्यासारखी...
भयाण जगलीस पण जे काही जगलीस...
तो सुटला मोकाट पण तू मात्र संपलीस...
अरुणा तुझं जगणं किती रेंगाळणारं होतं खरंच
आज जेव्हा विचार करते तेव्हा शहारा अन् गुदमरच
तुझ्या दु:खाची जाणीव भयंकर पिडते...

एक प्रश्न पडतो, क्षण क्षण जाळतो
पोखरतो खोलवर आत आत
अरुणा... अरुणा खरं सांग...
खूप काही पेटत होतं ना... तुझ्या विझलेल्या मनात...

संपर्क - डॉ. प्रतिभा जाधव-निकम (९६५७१३१७१९)
- प्रमोद श्री. शेंडे.

*महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973.*
*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*
2 जून 2023.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.