*ओळख हिरकणी ची - 19 मे. भाग्यश्री ताई चेंबुरकर.* *🌹💐🎂* *महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम्.*संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973.
*ओळख हिरकणी ची - 19 मे. भाग्यश्री ताई चेंबुरकर.*
*🌹💐🎂*
*महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम्.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
पर्यावरणासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या आणि कचऱ्यावर प्रेम करायला शिकवणाऱ्या निसर्गप्रेमी आवलिया "भाग्यश्री ताई चेंबुरकर."
गेले अनेक वर्षांपासून विविध मार्गाने कचऱ्याची समस्या काही अंशी का होईना पण त्या साठी भाग्यश्री ताई चेंबुरकर झपाटून काम करत आहेत.
सत्यम् शिवम् सुंदरम् आणि UNIVERSAL TRUTHS AND SCIENCE GROUP च्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्या पोस्ट अपलोड होतात.
सेवा मंडल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या ४ महाविद्यालयांनी G 20 च्या अनुषंगाने 'पर्यावरण' या विषयावरील कार्यक्रमाचं आयोजन केले होतं. online विषय होता 'Wet Waste Management and Home Composting.'
एक तासभर छान विस्तृत कार्यक्रम सादर झाला. शेवटी जास्तीत जास्त जणांनी मनातील शंका विचारल्या. जून, जुलै महिन्यात offline कार्यक्रम करण्याचे ठरवून कार्यक्रमाची सांगता झाली. धन्यवाद.
*...कचरा व्यवस्थापन आणि कंपोस्ट तज्ञ, भाग्यश्री चेंबूरकर, 9870035189.*
भाग्यश्री ताई चेंबूरकर, बोरीवली, ह्या मागील पाच वर्षांपासून स्वतः च्या घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करत आहेत आणि त्याच बरोबर शिकवतात सुद्धा. "आपल्या घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन" या विषयावर गृह संकुलात व्याख्यान देण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात येते. यात वर्गीकरण आणि Composting याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करतात.
Home Composting Kit तयार करून २ महिने follow up करतात, जो अत्यंत आवश्यक आहे. लोकांना आपल्या घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास सांगतात . *My Garage....... My Responsibility.......* हे त्यांचं घोष वाक्य आहे. वर जो कोलाज आहे तो म्हणजे ज्यांना ज्यांना home composting शिकवलं आहे, त्यांच्या घरी तयार झालेलं कंपोस्ट खत आहे. आत्ताच मितेष कदम या विद्यार्थ्याने डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेसाठी या विषयाची निवड केल आहे. आतापर्यंत ७००-८०० जणांना कंपोस्ट करायला शिकवलं आहे. गेले अनेक वर्षे त्यांच्या घरातील कचरा त्यांनी बाहेर टाकलेला नाही.
*आम्ही कचऱ्यावर प्रेम करतो, त्यामुळे माझं घर zero Waste आहे. आम्ही कचरा तयार करत नाही, तर आम्ही कंपोस्ट खत तयार करतो.*
*.... कचरा व्यवस्थापन तज्ञ भाग्यश्री चेंबूरकर, 9870035189.*
भाग्यश्री ताई 🙏
तुम्हाला तुमच्या अनोख्या कार्यासाठी सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आहे.
*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973.*
19 मे 2023.
*🙏आपुलकी जपणारी माणसं 🙏*
Comments
Post a Comment