"ओळख हिरकणी ची - गुरुतुल्य वंदनीय 'वंदना ताई'." 🎂🌹1 जून. 🌹🎂* "सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा". लेखन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 1 जून 2023.
*ओळख हिरकणी ची - गुरुतुल्य वंदनीय 'वंदना ताई'.*
*🎂🌹1 जून. 🌹🎂*
*सत्यम् शिवम् सुंदरम्"*
आणि"
*महाराष्ट्राचा चांगुलपणा".*
लेखन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
1 जून 2023.
प्रथम वंदनीय आणि मला गुरुतुल्य असणाऱ्या वंदना ताईंची माफी मागून लिखाण करत आहे . 🙏
_____________________________
https://youtu.be/PxajeTsxVqc
*"हरि ॐ दादा...मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. कृपया मला चूकीचं घेऊ (समजू) नका."*
... वंदना ताई.
*"☝️आपुलकी जपणारी माणसं" अशी भेटतात.*
_____________________________
*आपुलकी जपणारी माणसं आपलं यु ट्यूब चॅनेल.👇*
संकल्पना - वंदना ताई.
https://youtu.be/NU4T83VYboE
_____________________________
*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप ची concept.*
संकल्पना - वंदना ताई 👇
https://youtu.be/Qu8tBFlnP2o
____________________________
https://youtu.be/qCQX_8M8bP8
*आपल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुपच्या संग्रहातून... 13/5/2018. वंदना ताई, सत्कार प्रसंगी आभार आणि चिंतन व्यक्त करताना...*
____________________________
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
_____________________________
https://youtu.be/NZJHCgr6Hno
*तणाव नियोजन भाग 1 - आयुष्याचं व्याकरण.*
...वंदना ताई.
____________________________
https://youtu.be/Yl1dNZ3M9yU
*तणाव नियोजन - भाग 2 - प्राधान्यक्रम.*
...वंदना ताई.
____________________________
https://youtu.be/qjLg10_eacc
*पालकत्व निभावताना - भाग 1.*
...वंदना ताई.
____________________________
https://youtu.be/p41N1j3kheQ
*पालकत्व निभावताना... भाग - 2.*
...वंदना ताई.
____________________________
https://youtu.be/9SmrJXPkPFA
*निरोगी शरीरामध्ये सशक्त मन.*
... वंदना ताई.
___________________________
२०१८ सालच्या जानेवारी महिन्याची ती १८ तारीख होती. गुरुवार होता त्या दिवशी. गुरुवार माझ्या साप्ताहिक सुट्टी चा दिवस असतो.
सकाळचे १० वाजून ४५ मिनिटे झाली आणि माझ्या मोबाईल ची रिंग वाजली. फोन उचलला आणि कानात कर्णमधुर आवाज घुमला... *"हरि ॐ दादा...मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. कृपया मला चूकीचं घेऊ (समजू) नका."*
... वंदना ताई.
आवाज होता आपल्या गुरुतुल्य वंदनीय 'वंदना ताईंचा'. त्या माझ्याशी पहिल्यांदाच बोलत होत्या. ते वरीलपैकी पहिल यु ट्यूब लिंक चा संवाद ऐकून समजेलच तुम्हाला.
वंदना ताई माझ्याशी पहिल्यांदाच बोलत होत्या. मी त्यांचा आवाज बरोबर ओळखला.
कारण मी त्यांची ब्रह्मविद्या च्या वर्गातील बऱ्याच वेळा चिंतन ऐकली होती.
आता त्यांना नक्की काय बोलायचं होतं ते ह्या लिंक च्या माध्यमातून ऐका.
साधारणपणे ४० मिनिटांचे पाच वर्षापूर्वीचे हे ध्वनीमुद्रण माझ्या मोबाईल मधून डिलीट होण्याची शक्यता आहे म्हणून ते ध्वनीमुद्रण वंदना ताईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यु ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून 'सत्यम् शिवम् सुंदरम्' आणि 'महाराष्ट्राचा चांगुलपणा' ग्रुप साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
खरं तर या ध्वनीमुद्रणात खाजगी असं काहीच नाही. पण ऐकलं तर समजेल की "आपुलकी जपणारी माणसं कशी असतात?"
... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
१ जून २०२३.
आदरणीय वंदना ताई 🙏
गरज आहे म्हणूनच हा उपद्व्याप केला आहे. भले मग तो तुमच्या मनाच्या विरोधी असो...
शुभेच्छा देण्यासाठी जन्म तारीखच हवी असा काही नियम नाही. गगनाला गवसणी घालणारे कार्य असेल तर अशांनी आमच्या सारख्या पामरांना शुभेच्छा देण्यापासून अडवू नये.🙏
*गुरुतुल्य आणि वंदनीय वंदना ताई : ओळख हिरकणी ची अंतर्गत.*
*ब्रह्मविद्या प्रतिष्ठान. ठाणे. समाजाप्रती उल्लेखनीय कामगिरी.*
आमची प्रथमदर्शनी ओळख वेद विज्ञान ग्रुप मधली. सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सुरुवातीलाच मी वंदना ताईंना ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली होती. ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी माझ्याकडे बिल्कूल वेळ नाही असं मला त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. पण त्याच वेळी तुमच्या पोस्ट आणि video फारच छान असतात अशी पुस्तीही जोडली होती. कधी काळी ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी नकार देणाऱ्या वंदना ताई ह्या आता आपल्या बहुतेक सर्व ग्रुप मध्ये सहभागी आहेत. फक्त सहभागी नाहीत तर ग्रुप साठी पडद्याच्या पाठीमागे चालणाऱ्या JUSTICE MEMBERS GROUP च्या सुद्धा सन्मानिय भगिनी सदस्या आहेत जिथून सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या कामकाजाचं नियंत्रण केलं जातं. सहसा वंदना ताई प्रसिद्धीच्या झोतात नसतात. प्रसिद्धीच्या झोतापासुन सुरुवातीपासूनच त्या लांब राहील्या आहेत.
ग्रुप मध्ये सहभागी असणाऱ्या आणि माझ्या मते विशेष कामगिरी करणाऱ्या भगिनींची ओळख करून देण्यासाठी "ओळख हिरकणी ची" हा कार्यक्रम/विशेष सदर सुरू केलं आहे. ज्या मध्ये संबंधित भगिनींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओळख करून दिली जाते.
"वंदना ताईंची जन्म तारीख माझ्या दप्तरी नाही."
माफ करा ताई, 🙏. कधीतरी हे होणारच होतं. एनकेन (सर्व) प्रकारे प्रयत्न करुनही मला जन्म तारीख मिळवण्यात यश आले नाही. पण त्यामुळे काहीही अडणार नव्हते. माझ्या पद्धतीने मला योग्य वाटेल (त्या काळात 1 जून ठरलेले असायचे) त्या दिवशी मी शुभेच्छा देण्यासाठी बांधील होतो/आहे. करत असलेलं काम झाकोळलं जाणार नाही याची आम्ही दक्षता घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. आजच्या शुभेच्छा हा त्याचाच एक भाग आहे. ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे मला ती संधी दवडायची सुद्धा नव्हती. शुभेच्छा देण्यासाठी जन्म दिवसच पाहिजे असे काही नाही. आम्ही आपलं निमित्त शोधत असतो.
आपलं कार्य पाहता आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा तोकड्या ठराव्यात असं दैदीप्यमान यश तुम्ही संपादन केले आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे.
स्वतः इंस्ट्रुमेंटल इंजिनिअर असणाऱ्या वंदना ताईंनी काही वर्षे UK मध्ये कामाच्या आघाड्या सांभाळल्या आहेत. परंतु ब्रह्मविद्या च्या ओढीने त्यांना मायदेशी येण्यासाठी भाग पाडले आहे. गेली अनेक वर्षे त्या ठाणे येथील 'ब्रह्मविद्या वसुंधरा प्रतिष्ठान' साठी विनामूल्य (एकही पैसा न घेता) सेवा देत आहेत. त्यांच्या वर्गातील चिंतेने ऐकण्यासाठी सर्वांचेच कान आसुसलेले असतात. मधुर वाणी आणि चौफेर अभ्यास हा त्यांचा आणखी एक गुण. वंदना ताई ग्रुप मध्ये कधीच कोणत्या पोस्ट अपलोड करण्यासाठी सरसावत नाहीत. पण वैयक्तिक पातळीवर मात्र आमच्या बऱ्याच विचारांची देवाणघेवाण होत असते. आवडलेल्या पोस्ट साठी त्या वैयक्तिक पातळीवर हमखास अभिप्राय आणि प्रतिक्रिया देतातच. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या उभारीने मला पोस्टिंग करण्यासाठी हत्तीचं बळ मिळते.
बरचं काही लिहायचं होतं. लिहायचं राहिलं आहे. शेवटी वेळेचं गणित सांभाळत कसरत करत आहे. म्हणूनच आपल्या सर्व ग्रुप मध्ये *आपुलकी जोडणारी माणसं* गोळा झाली आहेत.
*आपुलकी जपणारी माणसं 👇*
*UT&S GROUP NO 1 = 1016.*
*UT&S GROUP NO 2 = 1013.*
*UT&S GROUP NO 3 = 977.*
*सत्यम् शिवम् सुंदरम् = 479.*
*आपलं आरोग्य ग्रुप क्रमांक 1 = 997.*
*आपलं आरोग्य ग्रुप क्रमांक 2 = 164.*
*महाराष्ट्राचा चांगुलपणा = 738.*
*नातीगोती.. खरी.. खोटी? =1019.*
*🚩भटकंती-किल्ले मंदिरांची 🛕 = 1023.*
*विचारवेध - BEYOND THOUGHTS = 1014.*
*गंगा आली रे अंगणी = 479.*
*सफर सिनेमांची - 1019.*
*चला व्यसनमुक्ती कडे = 293.*
*🇮🇳मेरा गाँव मेरा देश 🇮🇳 = 416.*
*😄हास्यानंद 😄 = 40.*
*पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल = सर्व भाग अपलोड झाल्यानंतर सद्ध्या अपलोडींग बंद आहे.*
आपल्या कुटुंबात इतकी आपुलकी जपणारी माणसं जमली आहेत. त्यांच्या पर्यंत दररोज सकाळी मी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. त्या साठी काही ठराविक ग्रुप साठी मला आपल्या 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या सौ. दिपाली पडवळ, ठाणे / सौ. 'संध्या ताई सुर्यवंशी, पुणे' / सौ. 'नीता माळी, कोल्हापूर' आणि नाशिक चे मेघश्याम सोनवणे यांची दररोज सकाळी मोलाची मदत होते आहे. या सर्वांचा मी आभारी आहे. कारण त्यांच्या शिवाय मी अधुरा आहे.
आपल्या कुटुंबात बरेच परदेशस्थ भारतीय सुध्दा सहभागी आहेत.
*👉आणि या सगळ्या उपक्रमात तुमची पडद्यामागची भूमिका मी कधीच विसरणार नाही.*
*".... आणि हो तुम्ही १८ जानेवारी २०१८ रोजी मला माझ्याशी बोलताना दिलेला आपुलकीचा लाखमोलाचा सल्ला नक्कीच आमलात आणत आहे कारण मलाही आपल्या आपुलकी च्या माणसांसाठी जास्त दिवस जगायचं आहे. मला तुम्ही सर्वजण हवे आहात."*
*वंदना ताई, 🙏तुमच्या कार्याला 'सत्यम् शिवम् सुंदरम्' आणि 'महाराष्ट्राचा चांगुलपणा' ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.*
*🎂🌹वंदना ताई - 1 जून.🌹🎂*
*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*
*🙏दादा. 9028261973.🙏*
Comments
Post a Comment