"ओळख हिरकणी ची" - संगीता पाटील : समाजपरिवर्तन व सुधारणांसाठी अत्याचारी व सत्ताधारी यांच्याशी लढणाऱ्या रणरागिणी." "महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्." संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 20 एप्रिल 2023.

*महाराष्ट्राचा चांगुलपण.*
आणि 
*सत्यम् शिवम् सुंदरम्.*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
साभार - मैत्रेय दिवाळी अंक 2019.
20 एप्रिल 2023. 

*ओळख हिरकणी ची*
20 एप्रिल.
जन्म दिनाचे औचित्य साधून. 
*🎂संगीता ताई पाटिल. शहादा.🎂*
(पूर्व लोकमत सखी संपादक)

*ओळख हिरकणी ची - 20 एप्रिल.*
*वाढदिवसाचे औचित्य साधून.*
*संगीता ताई पाटील, शहादा, (लोकमत सखी, पुर्व संपादिका.*) 

समाजासाठी काही तरी देणं लगतं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात हातखंडा.
सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇*

http://Sahebraomane1967.blogspot.com


💐संगीता ताई 💐🙏
तुमच्या कार्याची दखल सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप घेत आहेत.
तुमच्या कार्याची दखल घेणारा लेख (मैत्रेय दिवाळी अंक 2019) अपलोड करत आहे. 

*संगीता पाटील : समाजपरिवर्तन व सुधारणांसाठी अत्याचारी व सत्ताधारी यांच्याशी लढणाऱ्या रणरागिणी.*
सौ संगिता पाटील यांनी शहादा शहरात प्रथमतः पाय ठेवला तो गृहिणी म्हणून. बी ए पर्यंतचे शिक्षण केले. पुढे शिक्षणाची आवड होती पण काही वर्षाच्या सांसारिक व्यस्ततेमुळे शैक्षणिक कारकिर्दीत खंड पडला. २००३ साली धुळे येथे निवासी योग शिक्षकाचा कोर्स केला. त्यानंतर महिलांचे योग वर्ग घेऊन त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थासाठी कार्य सुरू केले जे आजवर सुरू आहे. आज महिला पतंजलिच्या त्या नंदुरबार जिल्हा प्रभारी आहेत. तळोदा, शहादा, नंदुरबार धडगांव व नवापुर येथील महिला व मुलींना योगाद्वारे व्यक्तिमत्त्व विकासाची संधी मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरू असते. महिला व मुलींना वैयक्तिक मार्गदर्शनही त्या उत्तमपणे करतात.

२०१३-१४ साली त्यांनी बी एड हा शिक्षिकेचा नियमित अभ्यासक्रम डिस्टींग्शन मध्ये उत्तीर्ण केला. तत्पूर्वी स्वतःच्या इंग्रजी शाळेत समन्वयकाची भूमिका चार वर्ष पार पाडली. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पूर्ण वेळ शिक्षिकेची नोकरी केली. विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून नावलौकिक मिळवला. परंतु ठरावीक चौकटीत काम करण्याचा पिंड नसल्यामुळे स्वेच्छेने नोकरी सोडून एल एल बी या विधी शाखेच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला दरम्यान जायंटस इंटरनॅशनल फेडरेशन या स्वयंसेवी संस्थेशी त्या जुळल्या आणि सामाजिक क्षेत्राला अनुकूल असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळाला. निष्ठावान स्वातंत्र्य सैनिकांची नात असलेल्या सौ. संगिताताईंचे दोन्हीही आजोबा स्वातंत्र्य सैनिक व जळगाव जिल्ह्यात नामांकित शैक्षणिक संस्थांचे निस्पृह संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्याकडून अनुवंशिकपणे आलेले गुण, शिक्षकांविषयी प्रचंड विश्वास व आदराची भावना तसेच शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन असल्याची ठाम निष्ठा, संगिताताई यांच्या आचार व विचारातून जाणवते. महिलांचा शैक्षणिक विकास झाला तरच समाजात वैचारीक संपन्नता रुजेल म्हणूनच लोकशाहीचा हा अर्धा हिस्सा सजग व्हावा यासाठी त्या आग्रही असतात. त्यांच्या महिला सबलीकरणासाठी विविध ठिकाणी होणाऱ्या व्याख्यान वा प्रबोधनपर कार्यक्रमातून ते प्रतिबिंबींत होत असते.

जायंटस सहेलीच्या त्या अध्यक्ष असताना व आजवर महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करून त्यांच्या सबलीकरणाची दिशा स्पष्ट केली.
स्त्रियांना कुटुंबात दुय्यम स्थान असते आणि पती अथवा घरातल्या कर्त्या पुरुषाच्या निधन वा कायमस्वरूपी अपंगत्वानंतर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते अशा अनपेक्षित परिस्थितीचा सामना कसा करावा यासाठी 'पति पश्चात आर्थिक नियोजन' या विषयी नागपूर येथे अर्थ सल्लागाराची कार्यशाळा घेतली. ब्युटीपार्लर व्यवसायाद्वारे महिलांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी एकदिवसीय कार्यशाळा घेतली. वयात येणाऱ्या मुलींत होणाऱ्या मनोशारीरिक बदलांना कसे सामोरे जावे या विषयी तज्ज्ञ महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे व्याख्यान उर्दू विद्यालयातील मुलींसाठी घेतले. गर्भाशयाचा व स्तनांचा कॅन्सर याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत महिलांचे प्रबोधन व मोफत तपासणी करण्यात आली.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त शहाद्यातील महिलांसाठी ग्रंथालयात वर्गणीदार वाचक नोंदणी अभियान राबवून वाचनाची गोडी वाढविण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदविला. आपल्या वाढदिवसाला साधना मासिकाचा दिवाळी अंक - २०१६ चे विद्यार्थ्यांना मोफत वाटप तसेच वृद्धाश्रमातील व्यक्तींना फलाहार वाटप आदी उपक्रम राबवून घरगुती सोहळ्यातून सामाजिकतेचे भान जोपासलं. स्त्रियांच्या मनःशांतीसाठी ध्यान शिविर व मनोरंजनासाठी दांडिया गरबा प्रशिक्षणाचे आयोजन करून महिलांच्या भावविश्वात असणाऱ्या अशा अनेक विषयांना त्यांनी स्पर्श करून स्त्रियांचे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

बारावी नंतर विद्यार्थ्याना आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होऊन करीअर निवडता यावे यासाठी 'व्यक्तिमत्त्व विकास आणि पुढील वाटा' याविषयीची प्रबोधन कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना स्वमूल्यमापनाची संधी उपलब्ध करून दिली.

पर्यावरण बचाव रैली असो वा ग्रंथदिंडी वा वृक्षारोपण, अवयवदान, आदिमध्ये ताईंचा हिरीरीने सहभाग असतो.

शहाद्यात अनिस सारख्या संघटनेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन विषयक जागृतीचे कार्यही त्या करत आहेत. तसेच शहाद्यात महिलांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी महिलांसाठीचा नवा जायंटस हिरकणी सहेली ग्रुप या वर्षी स्थापन केला आहे. नुकतेच यामार्फत 'आईपण समजून घेताना' याविषयीचा प्रबोधनात्मक हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.

शहाद्याच्या परिघाबाहेर चे कार्य आदिवासी भागात रक्ताल्पता अथवा अनिमिया या सारखे आजार जास्त आढळतात त्यासाठी रक्तगट माहिती असणे आवश्यक आहे म्हणून कन्साई येथील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात येऊन रक्त व रक्तगटाविषयी मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

धडगाव सारख्या आदिवासी बहुल व दुर्गम भागात आरोग्य सेवा मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे व अज्ञानामुळे असंख्य लोकांना प्राणाला मुकावे लागते ह्या बाबीची दखल घेऊन तेथील महाविद्यालयाच्या विद्यार्थी व जागरूक नागरिकांसाठी दुर्घटना नियोजन व प्रथमोपचार ह्या विषयीचे तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रबोधन कमालीचे यशस्वी झाले. रस्ता अपघात, अग्निजन्य अपघात वा जलोपघात, सर्प वा विंचु दंश, आणि हार्ट अॅटॅक या बाबतीत सजग करणारे दृकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या ह्या प्रबोधनाचे कौतुक तेथील संस्थाचालक, न्यायाधीश, पोलीस निरीक्षक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातल्या मंडळींनी केले.

बामखेडा येथे आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाश्वत शेती आणि जलव्यवस्थापन या विषयीच्या राज्यस्तरीय परिषदेत नामवंत जलतज्ज्ञ, शिरपूर पॅटर्नचे प्रवर्तक सुरेश खानापूरकर व नाशिकचे शाश्वत शेतीतज्ज्ञ अण्णासाहेब हांडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरित्या आयोजित केला. विशेषतः दुसऱ्या वर्षी या गावाने पानी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये संगिताताईंनी आपल्या सामाजिक संघटनांसोबत जाऊन श्रमदानही केले व गावकऱ्यांचा उत्साह वाढविला. तसेच भोंगरा गावच्या वॉटरकप मधील सहभागाला गावकऱ्यांचे सहकार्य नव्हते, तेव्हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तेथे दोनदा जाऊन श्रमदान तर केलेच पण आर्थिक योगदानही दिले.

सावळदा येथे वृक्षारोपण, लेगापानी, तोरणमाळ येथील पर्यावरण बचाव रॅली, नागझिरा, विरपूर येथील वन भाजी महोत्सव, कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथे बचत गटांच्या महिलांसोबत संवाद, लोणखेडा येथील बचत गटाच्या महिला सोबतचा संवाद, बुधावल येथील महिलांसाठी लोकशाही उत्सवात व्याख्यान, आपल्या माहेरच्या तालुक्यात किनोद ता. जळगाव येथे महिला जागृतिवर प्रबोधन तथा वेळोवेळी परिसरातील विविध शाळा कॉलेजमध्ये महिला सवलीकरणावर व्याख्यानांच्या माध्यमातुन संगिता ताईंनी उपयुक्त प्रबोधन केले आहे. याच कार्याची पावती म्हणजे नुकत्याच इंदौर येथे संपन्न आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास परिषदेत मुख्य बीज भाषणासाठी त्यांना मिळालेले आमंत्रण हे त्यांच्या कार्याचा अनोखा सन्मान करणारे ठरले. एवढेच नव्हे तर परिषदेतील शाश्वत विषयात रस असलेल्या जाणकारांना त्यांनी प्रभावित केल्यामुळे ताईंना आणखी दोन ठिकाणच्या परिषदांच्या व्याख्यानाची आमंत्रणे मिळाली. अशा रितीने सौ संगिताताईंनी एक गृहिणी ते सामाजिक कार्यकर्ती असा अल्पावधीतला प्रवास करून आपल्या सामाजिक तळमळीची अनोखी छाप सोडली आहे व खान्देशात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. सर्व सामाजिक वाटचालीत ताईंना संघटनांतील पदाधिकारी, सहकारी सदस्य तसेच त्यांचे पती प्राचार्य डॉ एच एम पाटील यांचे सक्रीय सहकार्य मिळत आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

पुढील रूपरेषा : महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांना मानसिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करणे गरजेचे आहे यासाठी स्वतःच्या शैक्षणिक योग्यतेचा व विविध संघटनांच्या व सहकार्य वा सहभागाचा उपयोग करायचा सौ. संगिताताईंचा मानस आहे.

तुमच्या कार्याला सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा.
*🎂🌹संगीता ताई पाटिल 🌹🎂*

*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*

*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973.*
20 एप्रिल 2023.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.