*ममता ताई सपकाळ यांचा आदर ठेवून...* *महाराष्ट्राचा चांगुलपणा* शब्दांकन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - ममता ताई सपकाळ. 3 मार्च 2022.
*ममता ताई सपकाळ यांचा आदर ठेवून...*
*महाराष्ट्राचा चांगुलपणा*
शब्दांकन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार - ममता ताई सपकाळ.
3 मार्च 2022.
चार दिवसांपूर्वी (बहुतेक 26 फेब्रुवारी 2023 रोजी) ABP माझा कट्ट्यावर ममता ताई सपकाळ यांना निमंत्रित करण्यात आले होते. माईंच्या नंतर चा चाललेला संघर्ष ऐकला. ममता ताई सपकाळ यांना ऐकत असताना त्यांनी रचलेल्या काही गझला मनाला हेलावून गेल्या. इतक्या की मला न राहवून त्या शब्दबद्ध कराव्या वाटल्या. त्या ब्लॉग च्या माध्यमातून आपणापुढे ठेवत आहे.
... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
ABP माझा कट्ट्यावर ममता ताई सपकाळ यांनी ३ गझला सादर केल्या आहेत. त्या आतल्या मनाला इतक्या भिडल्या आहेत की त्या ऐकून तुमच्या मी साठी शब्द बद्ध करुन इथे दिल्या आहेत.
*१)* हे चित्त किती दिवसांनी थाऱ्यावर आले होते
पाहून सुखाचे माझ्या दारावर आले होते
मी फक्त यासाठी ओघळले नाही कारण...
*प्रतिबिंब तुझे डोळ्यातील पाण्यावर आले होते.*
--------------------------------------------
*२)* त्या वेलीमुळे कदाचित सुखले ते झाड असावे
असले आरोप किती रे माझ्यावर आले होते
कळले का पुन्हा नव्याने का जन्म घेतला आपण
कळले का कोण कुणाच्या मागावर आले होते
होऊन अनावर तेंव्हा मी बिलगताच बेल्हाळा
राधा हे नाव तुझ्या ओठांवर आले होते
हे चित्त किती दिवसांनी थाऱ्यावर आले होते
*पाऊल सुखाचे माझ्या दारावर आले होते.*
--------------------------------------------
*३)* जन्म मला तू द्यावा आंदण पुढल्या जन्मी
या जन्माची आठवण नको पुढल्या जन्मी
या ही जन्मी चूकली नाही पायपीट ही
*नसेल ना रे एकत्र आपण पुढल्या जन्मी.*
----------------------------------------------
*माई गेल्या नंतर २१० मुलं आणि १४० गायींचं प्रतिनिधित्व करणारी ही गझल.*👇
*४)* काय काय समजाऊन घेऊ, तुम्हीच घ्या समजून मला
एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला
तीच उनं होऊन बिलगते, तीच सावली पांघरते
तीच आताशा जणू भेटते, पाऊस पाण्यातून मला
ती नाही हे माहीत असते, म्हणून लावते कुलुप मी
एक हाक ऐकू आतून येते कशी काय मला
संकटावरी पाय रोऊनी उभी राहिल्यावर कळले
तूच घडवले आहे आई, तुझ्याच साच्यातून मला
जशीच्या तशी आठवते, पण असे वाटते कधी कधी
झलक जरा तुझी दिसावी, आता माझ्यातून मला
काय काय समजाऊन घेऊ, तुम्हीच घ्या समजून मला
*एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला.*
...ममता सपकाळ.
शब्दांकन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
3 मार्च 2023.
*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*
=======================
Comments
Post a Comment