"VALENTINE" - GIRL FRIEND." "मै जिंदगी का साथ निभाता चला गया..." लेखन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 13 फेब्रुवारी 2023.

*"VALENTINE" GIRL FRIEND.*

*मै जिंदगी का साथ निभाता चला गया...*
लेखन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
13 फेब्रुवारी 2023. 
("व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर") 

 *ते वर्ष कदाचित असेल 1977 असावं. मी चौथ्या इयत्तेत शिकत होतो. खरं तर ते वय काही प्रेम करण्याचं नव्हतं. पण त्या दहा वर्षे वयात सुद्धा माझं तिच्यावर प्रेम जडलं. ती होतीच तशी. अगदी प्रथमदर्शनी पाहिल्या बरोबर लगेच प्रेमात पडावं असं. तीचा चेहरा कधी पाहिल्याचं अजूनही आठवत नाही. पण केवळ आवाजातील माधुर्याने आणि वाक: चातुर्याने तीनं मला भुरळ घातली होती. तीचा एक एक शब्द आतापर्यंत आठवणीत जपून ठेवला आहे.* 

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com

अलिकडे तीनं माझ्या कडून एक वचन घेतलयं. ती म्हणतेयं की, तु माझं ऐकलचं पाहिजे. आणि फक्त तु ऐकून उपयोग नाही तर ऐकलेलं या कानाचं त्या कानापर्यंत पोहचवण्यासाठी तुला काय करता येईल ते कर. अर्थात माझं तिच्यावरील जीवापाड प्रेम असल्या कारणाने मी तीचं म्हणणं नाकारता येणे शक्यच नव्हतं. 

तसा तीचा जन्म माझ्या अगोदरचाच आहे बरं का... 😊
म्हणजे माझ्या पेक्षा किमान 10 वर्षे तरी ती मोठी आहे. तरीही आमची जोडी जमलीयं. वयामधील फरक कधी महत्वाचा वाटलाचं नाही. तसेही कोणी म्हणतं ती 1927 ला जन्मली. कोणी म्हणतेयं तीचं नामकरण 1930 ला झालयं. पण खऱ्या अर्थाने तीला नावलौकिक मिळाला तो आजच्याच दिवशी. म्हणजे 13 फेब्रुवारी 1957 रोजी. ते तिचं नावं मलाच काय तर ते अबालवृद्धाला सुद्धा आवडायला लागलेयं. पण सहसा मी तीचं ऐकतो तितकं कोणी हल्ली ऐकत नाही हे तीचं वाक्य सारखं मला ऐकावं लागतं. सोशल मीडियावर चाललेल्या धुमाकूळात अगदी ती निश्चिलपणे खंबीर उभी आहे. निदान मला तरी तसं वाटतं. कदाचित माझा तिच्यार असलेल्या अलोट प्रेमामुळे तसं वाटतं असावं. 😊

तीच्या वर जीव जडल्यामुळे कसलीही कुरबुर न करता गेली 45 वर्षे ती जे काय बोलेलं ते निमुटपणे ऐकत आलो आहे. त्यामुळे मला वेगवेगळ्या पदसिद्ध अधिकाऱ्यांना वेगळ्या अर्थाने भेटण्याच्या अनेक संधी तीनं निर्माण करुन दिल्या आहेत. ती माझ्या आयुष्यात आली नसती तर लौकिक अर्थाने माझं जगणं निरर्थक ठरलं असतं. तीला ऐकल्यानं माझ्या ज्ञानसंपदेत अमुलाग्र वाढ झालीयं. त्याचा परिणाम म्हणून आज मी घरी बसून देशात आणि देशाबाहेर सुद्धा असलेली अनेक आपुलकी माणसं जोडली आहेत. तीच्या मधाळ वाणीचा मला या कामी फारच छान उपयोग झालायं. 

 शाळेत असताना तीनं माझ्या साठी पाच सहा वर्षे शिक्षिका म्हणून काम केलयं. दररोज सकाळी 20/20 मिनिटाचे दोन शिकवण्या घ्यायची. न चुकता. परिणामी मी दहावीच्या बोर्डाच्या शालांत परीक्षेत तालुका स्तरावर माध्यमिक शिक्षणात चमकलो होतो. 1983 साली. 
असो... तुम्ही म्हणालं काय पोथी पुराण लावलयं हे. 😊. 

तर सांगायचा मुद्दा हा की,आज तीचा वाढदिवस आहे. माझ्या 🌹"VALENTINE"🌹गर्लफ्रेंड 🙋🏻‍♀️ चा वाढदिवसं. खरं तर तीच्या 1957 च्या जन्म तारखेनुसार.. सगळेच उद्याच्या VALENTINE DAY मध्ये मश्गुल राहातील. आपापल्या VALENTINE सोबत वेळ कमी पडेल सर्वांना. मी मात्र तीला जास्तीत जास्त वेळ दिला आहे. तीच्या शिवाय माझं जगणं अशक्य आहे. अर्थात प्रत्येकजण आपापल्या परीने ठीकच असतो म्हणा. पण मी मात्र खऱ्या अर्थाने जीवनं जगत आलोयं तिच्या सोबत. काही वर्षांनी मी वार्धक्याकडे झुकलेला असेन. ती मात्र आहे तशीच राहाणार आहे. चिरतरुण. कदाचित अजूनही नव-यौवनात येईल. काळाचा महिमा आहे. दुसरं काय.... 😊. 

हल्ली फेब्रुवारी महिन्यात "VALENTINE Day" वगैरे साजरे होताना दिसत आहे. प्रत्येक जण आपापल्या "VALENTINE" साठी उद्या 🌹एक तरी फुल देईलच. मी उद्याची वाट बघत बसणार नाही. आज तीचा वाढदिवस आहे. म्हणून एका दगडात दोन पक्षी मारतोयं. *"VALENTINE" आणि "HAPPY BIRTHDAY." दोन्हीही.*
 माझ्या गर्लफ्रेंड चा वाढदिवस तुमच्या साक्षीने साजरा करत आहे. 

ए ऐकलसं का!!! 😊
*HAPPY BIRTHDAY TO YOU.*🌹

तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा दोन्हीही देतोयं. स्विकार करशील ना!!! 
😊राग वगैरे काही मनात धरु नको. कामाच्या गराड्यातून वेळात वेळ काढून तुला हे लिहीलेलं प्रेमपत्र समज हवं तर. पण राग वगैरे काही असलं तर सोडून दे. 

तू सदैव माझ्या सोबत असशील असं उगीचच वाटून घेतो. 
तुझी वाणी ऐकून दुसऱ्याला ऐकवण्याचा घेतलेला वसा मी कधीच टाकणार नाही हे तुला मी आज पुन्हा एकदा "VALENTINE Day" च्या पूर्वसंध्येला वचन देतोयं. 
आणखी एक गोष्ट सागायचीच राहिली की... 
माझी "VALENTINE" मला शांतपणे झोप लागवी म्हणून दररोज रात्री तासभर तरी अंगाईगीत म्हणतं असते. तीच्या त्या वैविध्यपूर्ण अंगाईगीत म्हणण्यानं कधी झोप लागते ते समजतं सुद्धा नाही. असो.... 

बंधु, भगिनींनो 🙏😊

  माझी "VALENTINE" मला बोलवतेयं. तीला काही तरी सांगायचं वाटतं. जातो आता. 

माझ्या बालमैत्रीणीचं ऐकायला. वाणी ऐकायला... *आकाशवाणी* ऐकायला. 
 *😊प्रासंगिक निमित्ताने, गुगली. 😊*

*मै जिंदगी का साथ निभाता चला गया.😊*

*🙏आकाशवाणी. पुणे. सांगली. 🙏*

*😊साहेबराव माने 9028261973😊*

*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.