"JUSTICE MEMBER GROUP - माझे सेनापती". लेखन - साहेबराव माने. पुणे - 9028261973. 9 फेब्रुवारी 2008.
*"JUSTICE MEMBER GROUP - माझे सेनापती".*
लेखन - साहेबराव माने.
पुणे - 9028261973.
9 फेब्रुवारी 2008.
कधी कधी लिहीताना मी "JUSTICE MEMBERS GROUP" चा उल्लेख करतो म्हणून बऱ्याच वेळा मला अनेकजणांनी विचारले आहे की "JUSTICE MEMBERS GROUP" म्हणजे काय आहे?
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
म्हणून आज सर्वासाठी माहीती ब्लॉगच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे.
*या ग्रुप मध्ये प्रत्येकी 10 जण सहभागी आहेत. एखादा बाहेर पडला तर त्या वेळी सर्वमान्य सदस्याला रिक्त जागेवर सहभागी करून घेतले जाते. विधानपरिष सारखे.*
जेंव्हा अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती एका ग्रुपमध्ये एकत्र येतात तेंव्हा विचार वेगवेगळे असल्याने बऱ्याच वेळा शाब्दीक वादावादी होताना अनेक ग्रुप मध्ये मी अनुभवले आहे.
बऱ्याच ग्रुपचे विषय ठरलेले नसतात. त्यामुळे सदस्यांच्या अपलोडींग ला काही संयम राहात नाही. बरेच सदस्य पोस्ट फाॅरवर्ड करताना खऱ्याखोट्याची शहानिशा न करताच फॉरवर्ड करतात. ग्रुप अॅडमीन म्हणून त्या त्या ग्रुपचे अॅडमीन आटापिटा करतात. बऱ्याच वेळा सदस्यांना , निरोपाचा नारळ देण्याची वेळ येते. ही कामे प्रामुख्याने अॅडमीन स्वतः च्या पातळीवर निभावत असतो. पण बऱ्याच वेळा मॅडमीनच एखाद्या पोस्ट च्या बाबतीत निर्णय घेताना द्विधा मनस्थीतीत अडकतो अशावेळी इतर ठराविक सदस्यांनी मुख्य ॲडमीन साठी मदतीचा हात पुढे करावा या उद्देशाने प्रेरीत होऊन मी हे "JUSTICE MEMBERS GROUP" तयार केले आहेत. लोकसभा किंवा विधानसभा सारखे मदान करून एखाद्या पोस्ट च्या बाबतीत निर्णय घेला जातो. त्यासाठी ग्रुप मधील विवादास्पद पोस्ट "JUSTICE MEMBERS GROUP" कडे पाठवली जाते. तिथे संबंधित पोस्ट पाहून ऐकून निर्णय घेतला जातो तो सर्व ग्रुप साठी बंधनकारक असतो.
कधी कधी मी स्वतःच चुका करतो त्यावेळी मी स्वतः ग्रुप सोडतो. दोन वेळा असे झाले आहे. ग्रुपच्या अॅडमीन वर कोणाचेच नियंत्रण नसते. पण आपल्या "UT&S" आणि फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम शिवम सुंदर" या ग्रुप साठी स्वतंत्र दोन JUSTICE MEMBERS GROUP" काम करत आहेत. तिथले सदस्य चार वर्षापूर्वी निवडले आहेत. थोडक्यात काय तर हे सदस्य आपल्या ग्रुपच्या न्यायाधीशाच्या भूमिकेत असतात असी व्यवस्था कदाचीत वॉटस् अपच्या इतिहासात पहिलीच असावी.
एखादी ग्रुप सुरळीत चालावा म्हणून त्या ग्रुपसाठी स्वतंत्र ग्रुप असावा ही कदाचीत वाटस् अप च्या इतिहासात पहिलीच सोय असणारा आपला ग्रुप
असावा.
ग्रुप ची ध्यय धोरण याच "JUSTICE MEMBERS GROUP" मध्ये ठरवली जातात.
मी फक्त अंमलबजावणी चे काम करतो. हे करत असताना ग्रुपचे नियम आणि अटींचे पालन सर्वांनीच करणे अत्यावश्यक आहे.
अपघाती दृश्ये अपलोड करु नयेत हा नियम आहे.
घराघरात प्रेशर कुकरच्या स्वरुपात बाँब असतो. आपल्या घरातील भगिनी दररोज या बाँब बरोबर खेळत असतात.
स्वयंपाक चालू असताना प्रेशर कुकर ची शिट्टी उडाली आणि ती महिलेच्या डाव्या डोळ्यात जाऊन अडकली. पेपर मधील ते दृश्यं विदारक आणि भयावह होते. अपघात दाखणेही नियमाची पायमल्ली होते हे माहीत असूनही मी ते "सत्यम् शिवम सुंदर" ग्रुप मध्ये अपलोड केले आणि ग्रुप सोडला. उद्देश साफ होता. चांगला होता. सर्व भगिनींची आपापसात चर्चा झाली असावी. तासाभरात मला पुन्हा एकदा "सत्यम शिवम सुंदरम्" ग्रुप मध्ये सहभागी करून घेतले होते.
*"JUSTICE MEMBERS GROUP" चा दुसरा किस्सा.*
झी मराठी वाहिनीवर पवित्र रिस्ता या मालिकेत मानव ची भूमिका चे काम करत असलेल्या
कलाकाराने दोन तीन वर्षापूर्वी आत्महत्या केली. आणि ती बातमी "सत्यम शिवम सुंदरम" ग्रुप मध्ये अपलोड होते. ती पण रात्री साडेअकरा वाजता. आणि अपलोड केली होती IBN लोकमतवर 13 वर्षे नितीन वागळे सोबत वार्तांकण करणाऱ्या आरती कुलकर्णी यांनी. "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप मध्ये आजरोजी सहभागी असलेल्या 480 भगिनी पैकी किमान 100 जणी विविध क्षेत्रातील (लेखिका /साहित्यिका /कवियीत्री /आकाशवाणी उद्घोषिका /दुरदर्शन /चित्रपट /मालिका /शास्त्रज्ञ /नाटक अशा मान्यवर भगिनी विविध क्षेत्रातील मान्यवर सदस्या आहेत.
आरती कुलकर्णी यांनी अपलोड केकेल्या आत्महत्या केलेल्या बातमीचा निचरा करण्यासाठी ती पोस्ट "JUSTICE MEMBERS GROUP" कडे पाठवली होती. कारण आरती कुलकर्णी सारख्या निष्णात व्यक्तीच्या बाबतीत निर्णय घेताना चूक होऊ नये म्हणून.
निर्णय होण्यापुर्वीच आरती कुलकणी यांनी रूप सोडला होता. पण आजही तो पोस्ट JUSTICE MEMBERS GROUP मध्ये तशीच पडून आहे. निर्णयाशिवाय.
सांगायचे तात्पर्य हेच आहे की आपल्या सर्व ग्रुप चे नियंत्रण करणारे स्वतंत्र राखीव ग्रुप आहेत. ग्रुप ची ध्येय आणि धोरणे तिथूनच राबवली जातात.
.... *"मी फक्त कठपुतळी."*
लेखन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
9 फेब्रुवारी 2023.
Comments
Post a Comment