"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 22 जानेवारी 2023. "फलज्योतिष आणि शास्त्रज्ञांचा इशारा".भाग 40
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
22 जानेवारी 2023.
*"फलज्योतिष आणि शास्त्रज्ञांचा इशारा".*
भाग 40
*अमेरिकेतील 'द ह्युमॅनिस्ट' मासिकाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर, १९७५ मधील अंकातील डॉ. एस. चंद्रशेखर आणि इतर अठरा नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांसहित १८६ प्रथितयश शास्त्रज्ञांचे निवेदन...👇*
आम्ही खाली सही करणारे खगोलशास्त्रज्ञ, खगोल-भौतिकतज्ज्ञ आणि इतर क्षेत्रातील शास्त्रज्ञ जनतेला, फलज्योतिषकारांनी खाजगी किंवा सार्वजनिक पद्धतीने जी भाकिते दिली आहेत, त्यासंबंधी धोक्याचा इशारा देत आहोत. ज्यांचा फलज्योतिषाच्या भाकितावर विश्वास आहे, त्या भाकितांना शास्त्रीय आधार नाही असे सांगावेसे वाटते.
पुरातनकाळी फलज्योतिषांनी केलेल्या भाकितांवर आणि सल्ल्यांवर लोकांना नभोमंडळातील तारे, ग्रह इत्यादी म्हणजे देवाची स्थाने किंवा शकुन आहे, असे वाटत असे. याचा पृथ्वीवरच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे असे वाटत असे. त्यांना ग्रह आणि तारे पृथ्वीपासून किती प्रचंड अंतरावर आहेत याची कल्पना नव्हती. आता ही अंतरे अचूक मोजली गेली आहेत. ग्रह, तारे यांच्या गुरुत्वाकर्षणाचे बल अतिशय कमी आहे. अति दूरच्या ताऱ्यांचे बल तर नगण्य आहे. जन्माच्या वेळी हे तारे किंवा ग्रह यांच्या बलांचा आपल्या जीवनातील घटनांवर परिणाम होतो ही कल्पना चुकीची आहे. त्याचप्रमाणे दूरवरचे तारे आणि ग्रह यामुळे काही दिवस लाभकारक किंवा काही काळ विशिष्ट घटनांसाठी अनुकूल असतात किंवा ज्या राशीत एखादी व्यक्ती जन्माला आलेली असते ती व्यक्ती इतरांशी सुसंगत किंवा विसंगत वागते हे सुद्धा खरे नाही. मग लोकांचा फलज्योतिषावर विश्वास का बसतो ? आजच्या ताणतणावाच्या दिवसात लोकांना सुखकारक निर्णय घेण्यासाठी मार्ग हवा असतो. त्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या बलांमुळे आपले विधिलिखित ठरत असावे असा त्यांचा समज असतो. आपले विधिलिखित किंवा भविष्य हे आपल्या स्वतःवर अवलंबून असते. ते तारे किंवा ग्रहांवर अवलंबून नसते.
आजच्या काळात बहुप्रसारित शिक्षण आणि माहिती यामुळे अंधश्रद्धा आणि जादूंवर आधारित अशा समजुतीचे सत्य स्वरूप उघड करून दाखवणे सहज शक्य आहे. तरीसुद्धा आजच्या आधुनिक समाजात फलज्योतिष सर्वत्र पसरले आहे. वृत्तपत्रे, मासिक आणि पुस्तके यांमधून फलज्योतिषांची भाकिते आणि तर्क प्रसिद्ध झाल्यामुळे आपण गडबडून जातो. केवळ तर्कदृष्टता, कल्पनारंजन आणि प्रतिगामिता यांचाच प्रसार होतो. या भोंदू ज्योतिषांच्या अहंकारी वल्गनांना थेट आणि जोराने आव्हान देण्याची वेळ आली आहे. फलज्योतिषांच्या भाकितांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. उलट त्यांचा फोलपणाबाबत बरेच पुरावे उपलब्ध आहेत. तरीसुद्धा अतिशहाणे लोक त्यावर विश्वास ठेवतात.
*"यापूर्वीचा पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग 39 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक.*
http://sahebraomane1967.blogspot.com/2023/01/9028261973-21-2023.html
*वैज्ञानिक दृष्टिकोण.*
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
22 जानेवारी 2023.
*पुढील भागात फलज्योतिष आणि थोरांचे बोलके अभिप्राय*
.... डाॅ. नितिन शिंदे.
Comments
Post a Comment