"महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्." लेखन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 15 जानेवारी 2023. "ओळख एका आधारस्तंभाची" "मनिषा ताई काकडे /शिंदे". पुणे. 🎂💐🌹
*महाराष्ट्राचा चांगुलपणा*
आणि
*"सत्यम् शिवम् सुंदरम्."*
लेखन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
15 जानेवारी 2023.
*"ओळख एका आधारस्तंभाची"*
मनिषा ताई काकडे /शिंदे. पुणे.
🎂💐🌹
*"ओळख हिरकणी" ची अंतर्गत आज "ओळख एका आधारस्तंभाची" करून देण्याचा प्रयत्न केला आहे.*
"सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप चा जन्मच मुळात UNIVERSAL TRUTHS AND SCIENCE GROUP मधून झाला आहे. त्या ग्रुप मध्ये फक्त चार भगिनी सहभागी होत्या. त्या पैकी मनिषा ताई काकडे /शिंदे ह्या एक. काही तरी अघटित घडले (त्या बद्दल नंतर कधीतरी लिहिले जाईल) आणि UNIVERSAL TRUTHS AND SCIENCE GROUP मधून सर्व चारही भगिनींना ग्रुप मधून निरोप देण्याचा निर्णय मी घेतला होता. त्या चारही भगिनींना UNIVERSAL TRUTHS AND SCIENCE GROUP तुम्ही त्वरित सोडून निघून जावे असे मी सांगीतले होते पण त्या चारही भगिनी शेवटपर्यंत UNIVERSAL TRUTHS AND SCIENCE GROUP मध्ये राहिल्या. भगिनींच्या हिताचा आणि सामाजिक गुप्ततेचा विचार करत राहीलो. महिलांच्या बाबतीत अजूनही काही बोटावर मोजता येतील अशा पुरुष वर्गाची मानसिकता विक्षिप्त असल्याचे कधी कधी जाणवते. क्वचित प्रसंगी खाजगीमध्ये वैयक्तिक पातळीवर तशा तक्रारी भगिनी माझ्याकडे करतात. तसे प्रसंग येऊ नयेत म्हणून सात महिने विचार करत राहिलो आणि त्या विचारांची फलश्रुती म्हणून अथक प्रयत्नानंतर फक्त महिलांसाठी राखीव असलेला "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप ला जन्माला घातले.
फक्त भगिनींच्या साठी एखादा तरी स्वतंत्र लेख असणारा आणि फक्त महिलांसाठी राखीव असलेला ग्रुप तयार करावा या उद्देशाने या ग्रुप साठी सुरवातीपासूनच विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
http://Sahebraomane1967.blogspot.com
फक्त चार भगिनींना हाताशी धरून सुरु केलेल्या" सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप मध्ये आजरोजी 480 बहिणी सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप ची लिंक आम्ही कधीच कोणालाही दिली नाही. कारण एकदा का लिंक दिली की फक्त महिलांसाठी राखीव असा शिक्का पुसला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या साठी कानोकानी एकमेकींना सांगून शेवटी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधल्यानंतर आणि संबंधित भगिनींने सहभागी होण्यासाठी होकार दिला तरच सहभागी करून घेतले जाते. काही शंकास्पद वाटले तर कधी कधी ग्रुप कडून अचानकपणे फोन केले जातात. कारण आम्ही "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप मध्ये भगिनींच्या खाजगीपणाला फार महत्व दिलेले आहे.
"सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप चे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत भगिनी आपापले शारीरिक आरोग्याचे प्रश्न मांडून शंकानिरसन करुन घेतात. त्या साठी आपल्या फक्त पुरुषांसाठी राखीव असलेल्या 'आपलं आरोग्य' ग्रुप मध्ये सहभागी असलेल्या डॉक्टरांची मदत मी घेत आहे. इथे प्रामुख्याने नाशिकच्या सिन्नर येथे गेले 35 वर्षापासून प्रॅक्टिस करत असलेल्या MBBS डॉ. अशोक सोनवणे यांचा उल्लेख मी करु इच्छितो. आम्ही कसलीही लज्जा न बाळगता निसंकोचपणे 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप साठी विचारांची /शंकासमाधान करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत.
मनिषा ताई काकडे /शिंदे ह्या आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.
"सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप रुपी मंदिर बांधण्यासाठीचा निर्णय घेतला तेंव्हा पायाभरणी करण्यासाठी ज्यांनी मदत देऊ केली त्याच्याही अगोदर पासून मनिषा ताई काकडे /शिंदे माझ्या सोबत ग्रुप मध्ये सहभागी आहेत. यांचीच नावे सांगून मी 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप साठी भगिनींना निमंत्रण देत असे. 😊
'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप ची सुरवात फार कठीण होती. सहजासहजी महिला नाजूक अशा वेगळ्या विषयावर पोस्ट असणाऱ्या ग्रुप मध्ये सहभागी होत नसतात हा माझा अनुभव आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता सदस्य गोळा करण्यासाठी बिल्कूल प्रयत्न करावे लागत नाहीत. 😊 एक बहीण दुसऱ्या बहिणीला सहभागी करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि आपोआप भगिनी सहभागी होतात. त्या सुरवातीच्या कठीण काळात 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप साठी ज्या चौघींची मला बहुमोल साथ मिळाली त्या साठी मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. त्या चौघी होत्या म्हणून आजरोजी फक्त महिलांसाठी राखीव असलेला 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप चं सुंदर रुप दिसत आहे. ग्रुपला उर्जितावस्था देण्यासाठी या चौघीजणींनी सहभागी राहून दिलेल्या मदतीसाठी 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप आणि मी सुध्दा त्यांचा शतशः मनापासून आभारी आहे.
"सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप ची "हिरकणी" म्हणून नाही तर "आधारस्तंभ" म्हणून मनिषा ताईंची ओळख करून द्यावी असे वाटले म्हणून गेल्या वर्षापासून चालू केलेल्या "ओळख हिरकणी ची" अंतर्गत हा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
मनिषा ताई 🙏
तुमच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही पोस्ट 'महाराष्ट्राचा चांगुलपणा' आणि 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप मध्ये अपलोड केली आहे. निदान त्या निमित्ताने का होईना 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप साठी खारीचा वाटा उचलणाऱ्या भगिनींची ग्रुप च्या माध्यमातून ओळख त्या त्या भगिनींच्या जन्म दिनाचे औचित्य साधून करून दिली जात आहे.
खरं तर "ओळख हिरकणी ची " हा कार्यक्रम एकच वर्ष चालू ठेवण्यासाठी आमच्या JUSTICE MEMBERS GROUP ने परवानगी दिली होती पण अलिकडे काही पोस्ट मी ब्लॉग च्या माध्यमातून अपलोड करत आहे म्हणून आणखी एक वर्ष वाढवून मागीतले आहे जेणेकरून हे सर्व लिखाण जगभरात कुठेही उपलब्ध असेल. त्या साठीच ब्लॉग च्या माध्यमातून अपलोड करत आहे.
आता JUSTICE MEMBERS GROUP बद्दल थोडीशी माहिती...
वाॅट्स अप ग्रुप हे नेहमी संबंधित ग्रुप च्या अॅडमीन च्या नियंत्रणाखाली असतात. अॅडमीनचं सर्वेसर्वा असतात. इथं 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप च्या बाबतीत काहीसं वेगळं चित्र आहे. 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप चं मी फक्त सारथ्य करत आहे. JUSTICE MEMBERS GROUP च्या दहा भगिनींचा आसुड माझ्यावर रोखलेला आहे. त्या दहाजणी म्हणजेच 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप चं न्यायालय आहे. तुमच्या माहितीसाठी' JUSTICE MEMBERS GROUP चा DP देत आहे.
' सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप चं नियंत्रण याच JUSTICE MEMBERS GROUP च्या आधिपत्याखाली चालू आहे. मी फक्त 'कठपुतळी' म्हणून नाचतो आहे. राज्य आणि देशाचा कारभार उचित सुरु राहावा म्हणून विधानसभा आणि लोकसभा असते. अगदी त्याचं धर्तीवर 'JUSTICE MEMBERS GROUP' चं कामकाज चालू असतं. थोडक्यात काय तर अॅडमीनाचे अॅडमीन अशी जगावेगळी रचना 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप साठी गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. म्हणूनच कुठलीही कुरकुर न करता 'सत्यम् शिवम् सुंदरम् : ग्रुप ची आगेकूच सुरू आहे. आणि या ' JUSTICE MEMBERS GROUP' साठी सुरवातीला काही महिने मनिषा ताईंनी सेवा दिली आहे.
इथं आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या 'UNIVERSAL TRUTHS AND SCIENCE' ग्रुप साठी सुद्धा हीच पद्धत गेल्या महिन्यापासून सुरू केली आहे. अगोदर म्हणजे पाच वर्षापूर्वी होतीच. पण त्याची गरज पडत नव्हती म्हणून बंद करण्यात आली होती. पण विज्ञान ग्रुप ची सदस्य सामावून घेण्याची क्षमता 1024 पर्यंत वाढली आहे आणि कोणीही काहीही विषयांतर आणि अवांतर पोस्ट अपलोड करु शकते म्हणून 'UNIVERSAL TRUTHS AND SCIENCE' ग्रुप ची सर्व सुत्रे या ग्रुप च्या 'JUSTICE MEMBERS GROUP' च्या हातात सोपवली आहेत. माझ्या साठी हे सदस्य न्यायालयाचं काम करत आहेत. सर्व अधिकार त्यांना आहेत. दोन्ही ग्रुप मध्ये मी फक्त *"कठपुतळी."*
*"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार" यासाठी वेगवेगळ्या 13 विषयांवरील ग्रुप मधून वेगवेगळ्या पद्धतीने प्रसार सुर आहे.*
*त्या साठी माझ्या काही भगिनी मला अपलोडींग साठी जसं मला हवं त्या पद्धतीने वैयक्तिक पातळीवर मदत करत आहेत ही माझी जमेची बाजू आहे.*
त्यांच्या बद्दल कधीतरी लिहिनचं.
तुर्त इथचं थांबतो.
*गुरूने दिला ज्ञानरूपी वसा| आम्ही चालवू हा पुढे वारसा||*
*💐🎂🌹 मनिषा ताई, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'सत्यम् शिवम् सुंदरम्' आणि 'महाराष्ट्राचा चांगुलपणा' ग्रुप च्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो.*
*🌹🎂15 जानेवारी 🎂🌹*
*😊...असा मी आसामी😊*
*🙏आपुलकी जोडणारी माणसं.🙏*
... साहेबराव माने. पुणे. 9028261973.
15 जानेवारी 2023.
Comments
Post a Comment