"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग 42. "🙏समारोप🙏" संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 24 जानेवारी 2023.

*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल"*
 भाग 42.
*समारोप* 
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
साभार - डॉ. नितीन शिंदे. 
इस्लामपूर. 


*मित्रहो, हल्ली जोरात चालणारा पत्रिकेचा खेळ आणि त्यावर आधारित लग्न जुळवण्याचा प्रकार पाहिला तर हसू येणारच. अगदी चौथीपासून शिकलेला ग्रह ताऱ्यांचा अभ्यास ज्योतिषवाल्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि उच्चशिक्षितांना आपल्या हातचं बाहुलं बनवलेलं आहे. माणसाला आधार देण्याचं नाटक करत त्यांचं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करण्यात हे वाकबगार आहेत. त्यांच्या पोतडीत असणारे शब्दप्रयोग पाहिले तर धडकी भरते. पुत्रनाश, संपत्तीनाश, वैधव्य, शत्रूपिडा, व्याधी आदींची जंत्रीच त्यांच्याकडे उपलब्ध आहे.*

 पत्रिका जुळवणे हा तर केवळ आकड्यांचा खेळ आहे. या खेळात आपण अडकायचं की, मुलगा आणि मुलगीच्या आवडी निवडीचा विचार करायचा. मुला मुलींचं वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी त्यांच्या स्वभावाची आणि कर्तृत्वाची जुळवा जुळव करणे इष्ट ठरेल. सर्वजण पत्रिका पाहतात म्हणून आम्ही पाहतो, आमचा विश्वास नाही पण मुलीकडच्यांचा आहे, असं शिकलेल्यांनी म्हणणं म्हणजे आपल्या समाजसुधारकांचा अपमान ठरेल.

धर्मानं बहुजनांच्या सर्व पत्रिकांना शिक्षणबंदी केली होती. मग ही पत्रिकेतली बंदी घातली कोणी ? आणि उठवली कोणी ? कोणत्याही ग्रहाची शांती न करता केवळ आणि केवळ शिक्षणामुळेच आपला विकास झालेला आहे, हे अजिबात विसरता कामा नये. मुख्य म्हणजे शिक्षणाची संधी देणारे, महात्मा फुले, सावित्रीबाई, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदींचं योगदान विचारात घ्या आणि आपल्या भावी पिढीला पुढे घेऊन जाणारा मार्ग दाखवा.

 *आज मानवाने अंतराळ क्षेत्रामध्ये प्रचंड झेप घेतलेली आहे. त्या तुलनेत ज्योतिषी वापरत असलेली ग्रह, नक्षत्र, रास आदींची माहिती अत्यंत तुटपुंजी आहे. भावी पिढीला आपण कोणत्या गोष्टींमध्ये रममाण व्हायला लावणार आहोत याचा सुज्ञांनी विचार करावा. संशोधनाच्या वाटा निवडून अंतराळात झेप घेण्यातच आपलं हित आहे, ना की पत्रिकेतील ग्रह ताऱ्यांच्या जंजाळात अडकणं. समाज प्रबोधनाच्या मालिकेचे आपण शिलेदार व्हा. एवढीच माफक अपेक्षा.*

हा या लेखमालेचा शेवटचा भाग आहे.

*यापूर्वीचा पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल* भाग 41 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇

http://sahebraomane1967.blogspot.com/2023/01/41-9028261973-23-2023.html

*वैज्ञानिक दृष्टिकोन*
साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
24 जानेवारी 2023. 
साभार - डॉ. नितीन शिंदे.

*🙏पत्रिका आणि जन्म कुंडली ला निरोप.🙏*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.