"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग - 41. "फलज्योतिष आणि थोरांचे बोलके अभिप्राय." संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 23 जानेवारी 2023.

*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."* 

भाग - 41.
*फलज्योतिष आणि थोरांचे बोलके अभिप्राय*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
23 जानेवारी 2023. 

शुभ झाल्या दिशा अवघाचि काळ । 
अशुभ मंगळ मंगळाचे ।। 
हातीचिया दीपें दुराविली निशी ।।
न देखिजे कैसी आहे तेही ।।
सुख:दुखाहूनि नाही विपरीत ।
देतील आघात हितफळे ।।
तुका म्हणे आता अाम्हांसी हे भले ।
अवघेची जाले जीव जंत ।।
             - *संत तुकाराम*


पुसे जन्मकाळ राशीचक्र मांडी
चाळी बोटे कांडी वेडा जैसा !
न्याहाळुनी सर्व भोळ्या पित्या बोले
मुळावरी आले बाळ तुझ्या !!

मागणीच्या वेळी जोशीबुवा येई
राशीबळ पाही दिमाखाने !
स्वहिताची अास न्यून कल्पोनियां
ग्रह योजुनिया जप स्थापी !!
     - *महात्मा ज्योतिबा फुले*


 ज्योतिषी यास लग्नासंबंधी काही एक पुसू नये. गण, मैत्री, खडाष्टक आणि मुहूर्त हे पाहण्याची काही गरज नाही. येणेकरून फार अकल्याण होईल. चांगले सुस्थळ मिळाले व सर्व गोष्टी अनुकूल झाल्या तरी हे जोशी यांचा विध्वंस करीतात; पहा बरे आजपर्यंत ब्राह्मणांनी जोशींचे अनुमतीने लग्न केली तरी बहुत विधवा झाल्या आहेत व बहुत विघ्ने आली आहेत. तेव्हा परिणाम पाहता या फुकट अडचणी वेडेपणाच्या आहेत. जोशांच्या नादी लागून लोकांनी आपला घात करू नये.
               - *लोकहितवादी*


नको नको रे ज्योतिषा 
नको हात माझा पाहू,
माझे दैव मला कळे
माझ्या दारी नको येऊ...
            - *बहिणाबाई* 


 एकविसाव्या शतकातील विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो की ग्रहांचे मानवी जीवनावर परिणाम होतात का ? तेव्हा मला आश्चर्य आणि खेद दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्चर्य यासाठी की एकविसाव्या शतकातील माणूस हा प्रश्न विचारतोय आणि खेद यासाठी की विचारणारा भारतीय आहे.
    - *डॉ. जयंत नारळीकर*
          संस्थापक संचालक                
              आयुका, पुणे  

*महात्मा फुले, छत्रपती शाहूमहाराज , बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई चौधरी, जयंत नारळीकर, नरेंद्र दाभोळकर यांच्या सारखे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे थोर व्यक्ती, विचारवंत म्हणून ज्या महाराष्ट्रात जन्माला आल्या अशा थोर वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे. त्या थोरांचे काही वर्षांपूर्वी चे (किंबहुना काही ठिकाणी तर 300 ते 800 वर्षे पूर्वी चे सुद्धा) वैचारिक गोष्टी आपणास समजतील तो सुदिन असेल. आता आपण खरचं शैक्षणिक दृष्टीने सुशिक्षित झालो आहोत का याचा विचार करण्याची गरज आहे. कारण आपले विचार काही वेळा आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर उपरोक्त उल्लेखीत व्यक्तींच्या विचारांशी विपरीत वागायला भाग पाडतात. जरा विचार करा...*
 
*या पूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल"* भाग 40 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
 
http://sahebraomane1967.blogspot.com/2023/01/9028261973-22-2023-40.html

*वैज्ञानिक दृष्टिकोन.*
साहेबराव माने. 
पुणे. 9028261973 
23 जानेवारी 2023. 

पुढील भागात - 'समारोप'

*साभार - डॉ. नितीन शिंदे.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.