"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग 37 चा 2 . लेखन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 19 जानेवारी 2023. "जूने जाऊद्या मरणालागुनी." भाग 2
*"पत्रिका आणि कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग ३७ चा २ रा.
*"जूने जाऊद्या मरणालागुनी".*
लेखन - साहेबराव माने
पुणे 9028261973
19 जानेवारी 2023.
*"जुने जाऊद्या मरणालागुनी.*"
https://youtu.be/sK2erp5mSBk
*आमच्या घरातून - भिक्षेकऱ्यांनी प्रेमापोटी भेट म्हणून दिलेल्या अंगठी बद्दल आम्हाला सांगत आहेत डॉ. अभिजीत सोनवणे.*
*@doctorforbeggars.*
पाठीमागच्या भागात माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने "सावित्री तू होतीस म्हणूनच" या एकपात्री प्रयोगाबद्दल लिहिले होते.
उत्तरार्धात आज त्याच्याचं पुढील भाग.
सज्जनहो,🙏
मी स्वतः अगोदर आचरणात आणतो तेंव्हाच त्या गोष्ठी इतरांना सांगतो. एखाद्याने केलेलं अनुकरण सार्थक होईल या हेतूने. लग्नासारख्या दोन कुटुंबाच्या प्रसंगामध्ये फक्त स्वतःचा आणि आपल्याच कुटुंबाचा आनंद शोधायचा का? त्यावर पारंपारीकपणे होणारा गरजेपेक्षा जास्त होणारा खर्च टाळून तोच वाचलेला पैसा समाजासाठी खर्च केला तर? किती कल्पना छान आहे ना?😊
पण असं करणं सोप्पं आहे का? पारंपरिकतेला पायदळी तुडवण्यासारखचं होईल. खर तर ते आवश्यक आहे. गरजेचं आहे. मी नेमक तेच केलं.
'पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवून' केलेली कित्येक विवाह मध्येच तुटलेले मी पाहिलेले आहेत. मग हा पत्रिका आणि जन्म कुंडलीचा खेळ आपण कशासाठी खेळायचा?
मी तोच खेळ टाळला.
असो...
आता मुळ मुद्दयावर येऊया.
पुण्यातील लोकांनी आणि माध्यमांनी "भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर" असे बिरुद लावलेले "डॉ. अभिजीत सोनवणे" आणि "माईंना (सिंधुताई सपकाळ यांना सपकाला") मी घरच्या एका वेगळ्या पद्धतीने होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले होते. माई त्या वेळी अमेरिकत होत्या. त्यांनी तुमच्या लहान मुलाच्या लग्नाच्यावेळी नक्की येईन असे सांगून वेळ मारून होती, ती कायमचीच. कारण आता माईच आपल्या मध्ये नाहीत. आता हे माझंच दुर्दैव. 😔
डॉक्टर अभिजित सोनावणे सहकुटुंब माझ्या घरी आले होते. त्यांनी त्यांची कामाची पद्धत आमच्या घरात पाहूणे म्हणून आलेल्या उद्योजक श्री प्रशांत कापसे यांना समजावून सांगितली.
*डॉ. अभिजीत सोनवणे श्री. प्रशांत कापसे यांना @doctorforbeggars संकल्पना समजाऊन सांगतानाचे क्षण.*
https://youtu.be/nv1RHrJ9sJo
*डॉ. अभिजीत सोनवणे श्री. प्रशांत कापसे यांना @doctorforbeggars संकल्पना समजाऊन सांगतानाचे क्षण. भाग 2.*
https://youtu.be/iE9jY-xhw2o
आमच्याशी सुद्धा आपुलकीने गप्पा मारल्या. भिक्षेकऱ्यांनी प्रेमापोटी भेट म्हणून दिलेल्या अंगठीचा किस्सा सांगितला.
*@doctorforbeggars आमच्या घरी.*
https://youtu.be/wZwA7woOwx4
*@doctorforbeggars आमच्या घरी. भाग 5.*
https://youtu.be/Mw51mXPBQOQ
त्या वेळी "पत्रिका आणि जन्म कुंडली" च्या जंजाळात न अडकता तोच काटकसर केलेला पैसा डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या कार्याला खारीचा वाटा म्हणून मदतीचा धनादेश सुपूर्द केला. माईंच्या आश्रमाला आणि आळंदी मधील एका मुलींच्या अंधशाळा संचालक संस्थेला फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही आर्थिक मदत दिली.
गेले चार वर्षापासून मी डॉ. अभिजीत सोनवणे यांच्याशी जोडलो गेलो आहे. समाजाचं ऋण काही अंशी तरी उतराई व्हावं म्हणून डॉ. अभिजीत सोनवणे १५ वर्षाची उच्च पदावरची डॉक्टरकी सोडून गेल्या सहा वर्षापासून ४७ मंदिराच्या बाहेर भिक्षा मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांच्या साठी मोफत सेवा शुश्रूषा देत आहेत. *भिक्षेकऱ्याला कष्टकरी, आणि कष्टकऱ्याला गावकरी बनवणे* त्यांचं ध्येय आहे. त्यांच्याकडे रजिस्टर असलेल्या सुमारे 1200 भिक्षेकऱ्यांपैकी करोनाच्या जगभरातील महामारीत पुण्यातील एकही भिक्षेकऱ्याचं निधन झालं नाही. हे फक्त आणि फक्त डॉ. अभिजीत सोनवणे चं करु शकतात. त्या पाठीमागे असणारे प्रचंड कष्ट आम्ही पाहिले आहेत. त्या कामी त्यांच्या अर्धांगिनी डॉ. मनिषा ताई सोनवणे यांची प्रचंड धडपड सुरू आहे. करोना गेला तरीही आजसुद्धा सुमारे 50 डबे दररोज हाॅस्पीटल मधील निराधारांच्या साठी जात आहेत. अगदी निशुल्क. अशा व्यवस्थेचा काडीचा आधार घेऊन मी उभा आहे. आज एक भिक्षेकरी पुणे मेट्रो रेल्वे मध्ये सुपरवायझर म्हणून काम करत आहे.
*पूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" भाग 37 चा 1 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
http://sahebraomane1967.blogspot.com/2023/01/37-1-9028261973-6-2023.html
माई आणि डॉ. अभिजीत सोनावणे करत असलेली कामे आपण करू शकत नाही. पण त्यांच्या पाठीशी आपल्या मुलामुलींच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळून आर्थिक पाठबळ नक्कीच उभे करू शकतो. आणि कसे का होईना मी ते केले आहे. आणि करतंच राहणार आहे.
दोन वर्षापूर्वी हिंजवडी येथील आॅर्केड या 5 स्टार हॉटेलमध्ये डॉ. अभिजीत सोनवणे यांनी शिक्षण देण्यासाठी भिक्षेकऱ्यांच्या मुलांना मदत करता यादी म्हणून भरवलेल्या प्रदर्शनात मी एक फोटो घेतला आहे. त्याच्या पाठीमागे लिहिलेल्या किंमतीत कोणतीही काटछाट करता. तसही तो फोटो फारतर शंभर दोनशे रूपयांचा असेल. पण तो मी एक हजार रुपयांना घेतला. उद्देश एकच.. लग्नतील अनाठायी खर्च होतकरु विद्यार्थ्यांच्या कामी यावा.
आजकाल घरच्या आपल्या मुलांना शिक्षण देताना नाकी नऊ येतात. अशा परिस्थीत डॉ. अभिजीत सोनवणे यांनी भिक्षेकऱ्यांच्या ५२ मुलांना संपूर्ण शिक्षण देण्यासाठी जबाबदारी घेतली आहे. किमान अशा कार्याला दिलेली आर्थिक मदत ही "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवून" स्वतःची गुजराणं करणाऱ्या भटजींच्या पेक्षा निश्चितच हजार पटीने सरस आहे.
विविध क्षेत्रात काम करत असताना निदान सोशल मिडीयाच्या वापरातून समाजाला काही सेवा देत आहे. त्यासाठी आपले 13 विषयाचे एकूण 17 समूह (अगोदर 27 होते) सुरु आहेत. यापैकी "महाराष्ट्राचा चांगुलपणा" समूहात डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या कडून येणाऱ्या स्वकर्तृत्वाचे लिखाण (पोस्ट) अपलोड होत असतात.
त्या विविध माध्यमातून सुमारे ७ लाख वाचकांपर्यंत पोहचवल्या जातात. आणि मग माझ्या सारखी वेडी माणसं डॉक्टरांच्या पाठीमागे पाठबळ उभा करतात.
हेच ते, *" जुने जाऊद्या मरणालागुनी"*.
डॉ. अभिजीत सोनवणे घरी आले असतानाच्या चित्रफीती सोबत जोडलेल्या आहेत.
शक्य असेल तर तुमच्या मुलामुलींच्या लग्नात येणारा खर्च काटकसर करून समाजाचं ऋण फेडण्यासाठी वारण्याचा विचार करावा.
परंपरा एकदम मोडीत काढा असं मी मुळीच म्हणणार नाही पण एक "नवीन पायंडा" पाडायला नक्कीच हरकत नसावी.
मी तो "नवा पायंडा" पाडला आहे, त्यासाठी "पत्रीका आणि जन्म कुंडली" ला तिलांजली दिली आहे.
कदाचीत माझे विचार तुम्हाला किती पटतील ते माहित नाही. निदान थोडसं उतराई व्हावे असं मला वाटतं. आमचे चालूच राहणार आहे - *"जूने जाऊद्या मरणालागुनी."*
*वैज्ञानिक दृष्टिकोण.*
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
19 जानेवारी 2023.
*पुढील भागात - गोत्र आणि विवाह संबंध.*
Comments
Post a Comment