"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग 37 चा 1.ल "जूने जाऊद्या मरणालागुनी." लेखन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 6 जानेवारी 2023.
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग 37 चा 1.
लेखन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
6 जानेवारी 2023.
*"जूने जाऊद्या मरणालागुनी."*
साभार - डॉ. प्रतिभा जाधव. अस्वस्थतेची डायरी.
लेखिका, साहित्यिका, समाजप्रबोधनासाठी एकपात्री प्रयोग - सादरीकरण : प्रतिभाताई जाधव. नाशिक.
*"जूने जाऊद्या मरणालागुनी."*
*डॉ. प्रतिभा ताई जाधव. नाशिक. 👇*
https://youtu.be/1_tuZbxlkYo
*सर्व साधारणपणे आपल्याकडे लग्न झाले की मग सत्यनारायण पूजा ठरलेलीच असते. यामधून शक्यतो कोणी निसटत नाही. एखाद्याने केलेचं तसे तर समाज अशा व्यक्तीला सळो की पळो करून सोडतो. किंबहुना अघोषित तिटकाराच म्हणा की.*
*डॉ. प्रतिभा जाधव, "सावित्री तू होतीस म्हणूनच" चे प्रास्ताविक. आमच्या घरच्या छोटेखानी कार्यक्रमातील चार वर्षांपूर्वी चे छायाचित्रण.*👇
https://youtu.be/LXco9yP7h3A
मी ज्या वेळी या गोष्टी इतरांना सांगतो त्या वेळी मी प्रथम त्या अमलात आणलेल्या असतात. तेंव्हाच मला त्या बद्दल प्रबोधन करण्यासाठी चा अधिकार असतो हे माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे "लोकां सांगे ब्रह्मज्ञान अन् स्वतः कोरडे पाषाण" असं मी होऊ देत नाही.
माझ्या लग्नाला जवळपास 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्यापही मी भटजीकडून सत्यनारायण पूजा करून घेतलेली नाही. 😊
आणि सत्यनारायण पूजा केली नाही म्हणून माझ्या वैवाहिक जीवनात काहीही बिघडले नाही. एक गोष्ट लक्षात असु द्या की इथे खर्चाच्या पैशांची कमतरता होती असं मुळीच नाही. पूजा केली नाही तर नक्की काय होतं ते पहायचं होतं मला. कारण मी वयाच्या 10 वर्षापासून या विषयावर एकटेपणाने विचार करत असायचो. ऐकीव गोष्टी पेक्षा वास्तववादी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. त्या काळात (37 वर्षापूर्वी) खरचं लोकांची अशा गोष्टी नाकारायची हिम्मत नव्हती. पण मी ती दाखवली. विशेष म्हणजे आमचा संसार सुखाचा सुरू आहे. सत्यनारायण पूजा केली नाही म्हणून कोणतही वितुष्ट आलेलं नाही आणि येतही नाही हे मी सत्य परिस्थिती अनुभवली आहे म्हणून सांगतो आहे. अर्थात माझा देवदेवतांना विरोध आहे असं मुळीच नाही. तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी, शाहू, फुले, आंबेडकर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो आहोत याचा मला अभिमान आहे. हीच माझी दैवत आहेत. आणि या दैवतांनी सांगितलेल्या गोष्टींचंच मी अनुकरण केले आहे. त्यामुळे मी कुठे चूक केली आहे असे मला वाटत नाही. कारण माझ्या दैवतांच्या पेक्षा मी नक्कीच मोठा नाही.
आज एकंदरीत लग्नाच्या बाजारात डोकावून पाहिले तर माझ्या प्रचंड वारसा असलेल्या महाराष्ट्रात माझ्याच दैवतांचा अपमान केला जातो आहे असं जाणवत आहे.
ज्यांना तथाकथित पत्रिका आणि जन्म कुंडली बद्दल महाराष्ट्राच्या दैवतांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायच्या नाहीत त्यांना त्या दैवतांची नावं घेण्याचा अधिकार सुद्धा नाही या मताचा मी आहे.
शिकल्यानंतर माणूस खरचं सुशिक्षित झाला आहे का? असं अगदी नाइलाजाने विचारावं वाटतं. जितका माणूस जास्त शिकला तितका तो पत्रिका आणि जन्म कुंडली च्या बाबतीत अधिक अडाणी झाला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. असो...
चार वर्षापूर्वी (1999)माझ्या थोरल्या मुलाचं लग्न झाले. पुन्हा एकदा तोचं मुद्दा... "सत्यनारायण पूजा".
यावेळी सुद्धा पहिले पाढे पंचावन्न... 😊
लग्नानंतर अगदी घरगुती (नवरी मुलीच्या आई बाबांचे आग्रह आणि त्यामुळे मन दुखाऊ नये म्हणून) पुजापाठ केला आणि आलेल्या सर्व पाहुण्यांच्या साठी "सावित्री तू होतीस म्हणूनच" हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला होता. त्या साठी आमच्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या प्रतिभाताई जाधव ह्यांना खास निमंत्रण दिले होते. त्या नाशिकहून आमच्या घरी आल्या होत्या. त्यांची त्या वेळची एकपात्री प्रयोगाची फी सुद्धा त्यांनी घेतली नाही. डॉ. प्रतिभा जाधव ह्या "सावित्री तू होतीस म्हणूनच /मी अरुणा शानबाग बोलतेयं आणि मी जिजाऊ" हे तीन एकपात्री प्रयोग घेऊन जगभर प्रबोधनासाठी फिरत आहेत. त्यांचा एक कार्यक्रम मला आयोजित करण्यासाठी मिळाला हे माझं सौभाग्य.
साध्या पद्धतीने लग्न कार्य करताना आणि कुठलाही बडेजाव न करता वाचवलेले पैशांचा उपयोग सत्कारणी लावला तर तो आनंद काही औरच असतो. अर्थात त्या विषयावर पुढील भागात लिहीनं.
याच कार्यक्रमासाठी मी माई (सिंधुताई सपकाळ) आणि पुण्यात भिक्षेकऱ्यांची गेल्या सहा वर्षांपासून मोफत सेवा करणारे डॉ. अभिजीत सोनवणे यांना सुद्धा निमंत्रित केले होते. माई त्या वेळी अमेरिकेत होत्या आणि डॉ. अभिजीत सोनवणे मुंबई मध्ये अखिल भारतीय डॉक्टरांच्या मिटींगमध्ये अडकले होते. त्यामुळे ते दोघेही येऊ शकले नाहीत. पण माईंनी तुमच्या लहान मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात मी नक्की येईन असे वचन दिले होते आणि डॉ. अभिजीत सोनवणे दोन तीन दिवसांनी येऊन गेले होते. आता मीच कमनशिबी आहे कारण आजरोजी माईच आपल्याला सोडून गेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांचा स्मृतिदिन झाला.
सत्यनारायण पूजा च्या दिवशी "जूने जाऊद्या मरणालागुनी" चा डंका वाजवला. एक नवीन पायंडा पाडला आहे मी.
मी केलं ते तुमच्या दृष्टीने चूक असेल तर मी नक्कीच चूक केली आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. कारण मी माझ्या महाराष्ट्राच्या दैवतांचा (छत्रपती शिवाजी, शाहू, फुले, आंबेडकर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचा) अपमान करु इच्छित नाही. त्यांनी त्यांच्या काळात सांगितलेल्या पत्रिका आणि जन्म कुंडली च्या बद्दल च्या गोष्टींचं मी अनुकरण केले आहे. आजच्या सारखं वाहवत गेलो नाही.
सत्यनारायण पूजा दिवशी "जूने जाऊद्या मरणालागुनी" च्या कार्यक्रमावर आधारित लेख नाशिक येथील सकाळ वृत्तसेवा मध्ये चार वर्षापूर्वी प्रसिद्ध झाला आहे. त्याची soft copy माझ्याकडे सेव्ह आहे.
गेल्या वर्षी "अस्वस्थतेची डायरी" नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. तोच लेख "अस्वस्थतेची डायरी" मध्ये सुद्धा घेतलेला आहे.
मी चूकीचं काही केलं असतं तर सकाळ सारख्या वर्तमानपत्रातून "जूने जाऊद्या मरणालागुनी" वरचा लेख प्रसिध्द झाला असता का? किंवा एखाद्या लेखकाने ह्या गोष्टीची दखल घेतली असती का? आता यावर तुम्ही चिंतन करावे.
तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" च्या या 37 व्या भागात सुरवातीला आमच्या घरी झालेल्या डॉ. प्रतिभा ताई जाधव यांच्या कार्यक्रमाचा त्या वेळचा दोन मिनिटांचा Video लिंक च्या माध्यमातून आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या सोबत डॉ. प्रतिभा ताई जाधव यांचा आणखी एक video उपलब्ध करून दिला आहे जेणेकरून मी लिहिलेल्या "जूने जाऊद्या मरणालागुनी" साठी तो दुजोरा आहे.
सोबत "अस्वस्थतेची डायरी" मधील "जूने जाऊद्या मरणालागुनी" च्या लेखाची पानांच्या छायाचित्रे दिली आहेत.
लग्नासारखं एक शुभकार्य करत असताना मी "जूने जाऊद्या मरणालागुनी" सारखा नवीन पायंडा पाडला आहे. तुम्ही तो पाडावा असं मी मुळीच म्हणणार नाही कारण काय करायच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला तुमच्या पैकी काही जण नावही ठेवतील. हरकत नाही. मी माझ्या दैवतांचा मान राखला आहे. तुम्ही तो राखायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे.
"आपला हात जगन्नाथ" आणि "लाथं मारीन तिथं पाणी काढीनं" इतकी हिम्मत असलीच पाहिजे. नाहीतर त्या जगण्याला काय अर्थ आहे.
लिहीताना कदाचित थोडं भरकटलो असेल. पण मला जे सुचवायचे होते ते नक्कीच सांगितले आहे.
*तुम्ही सर्व जण "सुज्ञ आहात आणि सुज्ञास सांगणे न लगे."*
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" चा भाग 36 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.* 👇
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/11/36-9028261973-10-2022.html
*वैज्ञानिक दृष्टिकोण*
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
6 जानेवारी 2023.
*पुढील भागात - "जूने जाऊद्या मरणालागुनी" भाग 37 चा 2.*
Comments
Post a Comment