"एक गाव- एक स्मशानभूमी चळवळ." "महाराष्ट्राचा चांगुलपणा." संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - सुमीत जाधव. आयोजक : कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर. झरी. परभणी. 9423776600. 8 डिसेंबर 2022.

*👉एक गाव- एक स्मशानभूमी चळवळ.*
*महाराष्ट्राचा चांगुलपणा.*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
साभार - सुमीत जाधव.
 *आयोजक : कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर*
झरी. परभणी. 9423776600
8 डिसेंबर 2022. 
(श्री. कांतराव देशमुख हे आपल्या "महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि इतरही काही ग्रुप चे सन्मानिय सदस्य आहेत.)
https://www.facebook.com/1218471521614509/posts/3391720530956253/?sfnsn=wiwspwa
*☝️साभार - अनघा पाठक. BBC News.* 
*👉नवीन वाचकांना "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंक दिली आहे. 👇*
https://chat.whatsapp.com/HX1b1ARWjXaBKcDMXy7pTx

*👉एक गाव- एक स्मशानभूमी चळवळ.*👇

https://youtu.be/2w1zT1xjUYo
(☝️निवेदक - सुभाष ढगे.) 
*एक गाव- एक स्मशानभूमी चळवळ. कृषीभूषण कांतराव देशमख यांच्या तर्फे स्व. मातोश्री वच्छलादेवी देशमुख झरीकर यांच्या स्मरणार्थ एक लाखाचे बक्षीस पारितोषिक. उत्कृष्ट स्मशानभूमी पुरस्कार- १५ आॅगस्ट २० ते १५ आॅगस्ट २२*

प्रवेश निःशुल्क प्रवेश. एक लाखाचे रोख प्रथम पारितोषिक सन्मानपत्र व गावकऱ्यांचा सत्कार 
11 उत्कृष्ट गावास रोख बक्षिसे ,सन्मानपत्र व गावकऱ्यांचा सत्कार अनेक गावांत स्मशानभूमीसाठी जागा नाही आणि असेल तर तिथं कुठलीही सुविधा उपलब्ध नाही अनेक गावांमध्ये जागा भरपूर आहे पण वेगवेगळ्या समाजाच्या, जाती-धर्माच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्मशानभूमी आहेत. अनेक वेळेस अंत्यविधी करतेवेळेस पाऊस येतो किंवा इतरही कारणाने प्रेताची ची विटंबना होते म्हणून एका गावामध्ये एकच स्मशानभुमी असली पाहिजे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी स्वच्छ सर्व सोयींनी युक्त अशीच स्मशानभुमी गावोगावी असावी म्हणून ही चळवळ उभी करायचे ठरले आहे.
आपले जीवन प्रखर संघर्षमय आहे ही जाणीव प्रत्येकालाच आहे परंतु आयुष्याची अखेर शांत, निवांत व पवित्र वातावरणात व्हावी यासाठी व स्मशानभूमी वैकुंठधाम ठरावे या उद्देशाने परभणी जिल्ह्यात एक गाव-एक स्मशानभूमी चळवळ राबविले जात असून यामध्ये सामील होणाऱ्या गावांमधून निवडलेल्या प्रथम येणाऱ्या गावास उत्कृष्ट स्मशानभूमी पुरस्काराने सन्मानित करून मातोश्री वच्छलादेवी देशमुख स्मरणार्थ १ लाखाचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे.

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*

http://Sahebraomane1967.blogspot.com

 *ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी - मुदत दिनांक १ सप्टेंबर २०२० ते १ ऑगस्ट २०२२*

 स्पर्धेचे नियम व अटी -
1) ही स्पर्धा परभणी जिल्ह्यासाठी   
निःशुल्क आहे. 
स्मशानभूमी सर्व जाती धर्मासाठी असली पाहिजे
2 ) स्मशानभूमी निर्मिती साठी दोन वर्षाचा कालावधी दिला जाईल. विजेत्यांचा सन्मान व पुरस्कार १५ ऑगस्ट सन २०२२ मध्ये केला जाणार आहे. सहभागी गावांमधील 11 उत्कृष्ट गावांचा सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येईल व सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावास सन्मानपत्र देण्यात येईल.

3) स्पर्धेत भाग घेण्यासाठी सोबत दिलेला ऑनलाइन फॉर्म दिनांक १ सप्टेंबर २०२० ते १ आॅगस्ट २०२२ पर्यंत या मुदतीत भरावयाचा आहे.

https://docs.google.com/forms/d/1sP2q
काही अडचण आली तर श्री. कांतराव देशमुख यांच्याकडे विचारणा करावी. 

4 ) स्मशानभूमी ची निवडलेली जागा विवादित नसावी व स्मशान भूमि कडे जाणारा रस्ता गैरसोयीचा नसावा.

5 ) आपली स्मशानभूमी स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राहील या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. 

6 ) स्मशानभूमीचे बांधकाम, अंत्यसंस्कारा साठी शवदाहिनी असावी. 

7 ) अंत्यसंस्कारा साठी उपस्थित लोकांना बसण्याची, पाण्याची व लाईटची व्यवस्था असावी.

8 ) स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक देशी झाडांची लागवड व संगोपन करण्यात यावे तो परिसर झाडांच्या सुंदरते सोबत ऑक्सिजन पार्क झाला पाहिजे.

9 ) आपण आपल्या निवडलेल्या स्मशानभूमीचा फोटो GPS कॅमेरा या मोबाईल मधील अँप मध्ये काढून location सह खाली दिलेल्या व्हाट्सउप नंबरवर पाठविणे आवश्यक राहील.

10 )निवड समिती द्वारे एका प्रत्यक्षपणे भेट देवून उत्कृष्ट ठरणाऱ्या गावांना पुरस्काराने सन्मानित केले जाईल. 
मिळालेली पुरस्काराची रक्कम स्मशानभूमी वरच खर्च केली पाहिजे.

11) स्पर्धे संबंधित सर्व अधिकार निवड समितीस राहतील.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी वरील सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक राहील..​
 
आयोजक
 *कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर* 
एक गाव-एक स्मशानभूमी चळवळ 
 मु.पो.झरी
ता.परभणी
जिल्हा-परभणी
संपर्क - 
९४२३७७६६००
"महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप साठी मी साहेबराव माने.
पुणे. 9028261973. 
8 डिसेंबर 2022. 

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.