"एक नवे कर्मकांड कसे जन्माला येते? "संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार लेखन - हमीद दाभोळकर.अंधश्रद्धा निर्मूलन समिती.मॅक्स महाराष्ट्र. 8 डिसेंबर 2022.
*"एक नवे कर्मकांड कसे जन्माला येते?"*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार लेखन - हमीद दाभोळकर.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
मॅक्स महाराष्ट्र.
8 डिसेंबर 2022.
"एक नवे कर्मकांड कसे जन्माला येते?"
https://youtu.be/QPbs6sZSND0
🖕... हमीद दाभोळकर.
*नवीन वाचकांना या ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंक दिली आहे*👇
https://chat.whatsapp.com/DdjS68CkiaCB8RTufbFFp8
*करोनाच्या निमित्ताने येणाऱ्या सुरस आणि चमत्कारिक बातम्या आपण गेले दोन अडीच वर्षे रोजच पाहत आणि वाचत आहोत. बार्शीमध्ये करोना देवीची स्थापना करण्यात आली ही बातमीदेखील आपल्याला त्यापैकी एक वाटू शकते. थोडं थांबून विचार केला आणि सविस्तर माहिती घेतली तर त्यामधले वेगळेपण लक्षात येवू शकते. पहिल्यांदा ही घटना काय आहे ते समजून घेवूया.*
*त्याचे झाले आहे असे की, बार्शीमधल्या एका वस्तीवर एका कुटुंबाने करोना देवीची स्थापना केली. त्यांचा असा दावा आहे की ह्या देवीची आराधना केल्यामुळे करोनाचा आजार होत नाही. केवळ एवढेच नाही तर मुंबईवरून आणि बाहेरच्या गावातून इथे राहायला आलेल्या लोकांनादेखील करोना झालेला नाही . ह्या देवीला कोंबडे बकरे कापले तर ती प्रसन्न होते आणि त्यामुळे लोकांना करोना होत नाही असे देखील जाहीरपणे तिथे सांगितले जात होते. साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर देव देवतांच्या विषयी धारणा समाजमनाची पकड घेणे ही काही नवीन गोष्ट नाही.*
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*
http://Sahebraomane1967.blogspot.com
देवी(smallpox) च्या आजाराच्या विषयी आपल्यातील अनेक जणांनी ऐकले असेल. १९८० साली पूर्ण जगातून हा विषाणू नष्ट झाला. जेव्हा हा आजार कशामुळे होत आहे हे मानवाला माहित न्हवते, तेव्हा तो ‘देवीचा कोप’ आहे म्हणून त्याकडे बघितले जायचे. त्यामधून त्याचे नाव ‘देवीचा रोग’ असे पडले. आजच्या युगात जेव्हा करोना हा एका विषाणू पासून होणारा आजार आहे .त्याची लक्षणे काय ,त्याने नक्की शरीरात काय होते ह्या संबधी बरीच माहिती आपल्या कडे आहे. युद्ध पातळीवर त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.
*वैज्ञानिक दृष्टिकोण 9028261973.*
लसीचे संशोधन चालू आहे. असे असताना देखील हे सर्व करोना नावाच्या देवीच्या कोपाने होत असेल आणि ह्या कोरनामैयाची शांती केल्याने हे दूर होईल, असा समज एका मोठ्या समाज घटकात दिसून येतो. मानवी समूहाने कितीही वैज्ञानिक प्रगती केली तरी जीवनाच्या विषयी अनिश्चिततेच्या भावनेने त्याला ग्रासले जाते तेव्हा कुठल्या तरी बाह्य शक्तीवर त्याचा भार टाकून मोकळे होण्याची मानवी प्रवृत्ती आपल्यामध्ये किती खोलवर रुजलेली आहे ते ह्या मधून दिसून येते.
*दुसरा महत्वाचा मुद्दा आहे कर्मकांडांच्या जन्माचा. जगातील सर्व धर्मांमध्ये धर्माचा मूल्य आशय आणि कर्मकांड यांचे सोबत अस्तित्व राहिलेले आहे. मानवी जन्माच्या पासून ते मृत्यूपर्यंत आयुष्यातील प्रत्येक गोष्टीशी संबंधित वेगवेगळी कर्मकांडे सगळ्या धर्मात आहेत.*
*लहान मुलाला वाईट नजर लागू नये म्हणून दृष्ट काढणे, पायात काळा दोरा बांधणे, गळ्यात ताईत बांधणे अथवा क्रॉस घालणे अशा अगदी सरळ सोप्या कर्मकांडांच्यापासून ते लग्नाचे सात फेरे, निकाह लावण्याच्या पद्धती, नववधूने हातातील फुलांचा गुच्छ मागे फेकणे आणि तो इतर विवाह इच्छुक मुलीनी उचलणे, अशी अनेक कर्मकांडे आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो.*
*पण ही कर्मकांडे कधी तयार झाली ह्या विषयी सहसा ती पाळणाऱ्या कोणालाच माहिती नसते. एका पिढीकडून पुढच्या पिढीच्याकडे ती संक्रमित होत असतात. बहुतांश कर्मकांडांना धर्माचे अधिष्ठान लाभले असल्याने त्यांची चिकित्सा करणे हे जवळपास अशक्य होऊन बसते. बहुतांश कर्मकांडांना कोणताही कार्यकारण भाव नसतो. नवीन गाडीला दृष्ट लागू नये म्हणून आपल्याकडे लिंबू आणि मिरची बांधण्याचे कर्मकांड केले जाते. लिंबू – मिरची आणि गाडीची सुरक्षिता ह्याचा एकमेकांशी काय संबंध असा प्रश्न विचारणे आपल्याकडे अप्रस्तुत समजले जाते. पिढ्यानपिढ्या आपण ही कर्मकांडे पाळत राहतो.*
करोनामैयाच्या मुळे एक नवे कर्मकांड कसे जन्माला येते याचे अगदी दुर्मिळ म्हणावा असा अनुभव आपल्या सर्वाना मिळाला आहे. त्या निमित्ताने कर्मकांड कशामुळे निर्माण होते आणि त्याचे मानवी आयुष्यात महत्व काय आहे हे समजून घेण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
*‘अज्ञाताची भीती’ हे कर्मकांडांच्या निर्मिती मागचे एक महत्वाचे कारण आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जिथे महत्वाचा बदल येत असतो म्हणजे जन्म, बारसे, लग्न, गरोदरपण , लहान मुलांचे वाढणे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अशा बहुतांश गोष्टींशी कर्मकांडे जोडलेली आहेत. इथून पुढचे जीवन सुखकर व्हावे ह्या मागची भावना त्याच्या मागे असते. ज्यावेळी विज्ञानाचा उगम आणि प्रसार मानवी जीवनात नव्हता त्या कालखंडात यामधील बहुतांश कर्मकांडांच्या मूळ रूपाचा शोध लागू शकतो. मानवी मेंदूच्या पातळीवर देखील कर्मकांडांचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. मानवी मेंदूमधील भावनांचा मेंदू (Limbic cortex) आणि विचारांचा मेंदू (Cerebral cortex) असे दोन भाग असतात. त्यामधील भावनांचा मेंदू हा एखाद्या अडचणींच्या वेळी तातडीने प्रतिक्रिया देण्यासाठी अधिक तयार असतो. त्यामध्ये दीर्घकालीन नियोजन आणि कार्यकारणभावाच्या पेक्षा तातडीने प्रतिक्रिया देणे महत्वाचे असते.*
*बहुतांश कर्मकांडांच्यामध्ये मेंदूतील हा भाग अधिक कार्यरत असतो. जीवाला धोका असताना दिलेल्या नैसर्गिक प्रतिक्रियेपेक्षा कर्मकांडांचे वेगळेपण असे की, ती एका पातळीवर मेंदूला देखील फसवत असतात! प्रत्यक्षात त्यामधून आपला धोका कमी होतो आहे असे त्या व्यक्तीला वाटते. पण प्रत्यक्षात कर्मकांडांच्या कृतीचा आणि धोका कमी होण्याचा काहीही संबंध नसतो. उदा. लिबू मिरची बांधणे आणि धोका टाळणे ह्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ज्यावेळी ही गोष्ट धर्माच्या कोंदणात बसवली जाते आणि त्याला पावित्र्य प्राप्त होते तेव्हा तिची चिकित्सा होणे अधिक अवघड होते आणि त्या मधून एका पिढी कडून दुसऱ्या पिढीच्याकडे ती संक्रमित केली जातात.*
*वैज्ञानिक दृष्टिकोण 9028261973*
*कर्मकांडांचा शास्त्रीय अभ्यास असे दाखवून देतो की कर्मकांड जितके व्यामिश्र असेल तितके लोकांचा त्यावर विश्वास बसण्याची शक्यता अधिक असते.* मानवी बुद्धीची गंमत अशी आहे की खेळाशी संबधित मानसशास्त्रात मानवी मनाच्या कर्मकांडांचा सहज अंगीकार करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा करून मेंदूला ट्रेन केले जाते. जसे फलंदाजीला जाण्याच्या आधी यशस्वी फलंदाज एक ठराविक रुटीन पाळतात, हे देखील एक कर्मकांडच असते. त्यामध्ये कोणताही कार्यकारणभाव नसतो पण समोरील सामन्याच्या भीतीला सामोरे जाण्यासाठी मेंदूला त्यामधून सवय लागते.
करोनादेवीच्या कर्मकांडाची गंमत अशी आहे की शासन हे करू नका सांगत असताना देखील महिला ते करण्याचा आग्रह करीत आहेत ! ‘जसे बेडूक बेडकीचे लग्न लावल्याने पाऊस येतो’ हे कर्मकांड अजूनदेखील आपल्या आधुनिक समाजात अनेक शाळा आणि सरकारे पाळतात, तसे उद्याच्या जगात साथीचे आजार ताब्यात यावेत म्हणून करोनादेवीची पूजा हे व्रत होऊ नये एवढी माफक आशा आपण करू शकतो.
अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे बार्शीमधील प्रशासनाने ह्या प्रकरणाला वेळीच आळा घातला आणि त्यामुळे ही अफवा समाजात पसरून होणारा अनर्थ टाळला गेला. एका बाजूला कर्मकांडांचा मानवी मनावर पडणारा प्रभाव समजून घेणे आणि आपल्या आयुष्यात आपण कोणत्या शोषण करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या कर्मकांडाला बळी पडणार नाही एवढा धडा तर आपण ह्या निमित्ताने स्वत:साठी नक्कीच घेवू शकतो.
अशीच काही इतरही कर्मकांडं पिढ्यानपिढ्या आपल्या कडे आली आहेत.
... हमीद दाभोळकर.
अनिस. पुणे.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
8 डिसेंबर 2022.
Comments
Post a Comment