*महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी*... संकलन... साहेबराव माने. पुणे. 9028261973. आज 23 डिसेंबर. *"ओळख हिरकणी ची"* *सविता ताई जाधव.**🌹🎂23 डिसेंबर 🎂🌹*

*महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी*... 
संकलन... साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
आज 23 डिसेंबर. 
*"ओळख हिरकणी ची"* 
*सविता ताई जाधव.*
*🌹🎂23 डिसेंबर 🎂🌹*

*सविता ताई जाधव. आकाशवाणी सातारा केंद्र, उद्घोषिका.*


*सविता ताईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून...*
 
  *साधारणपणे चार वर्षांपूर्वी माझी सविता ताईंशी ओळख झाली ती सुद्धा अनाहूतपणे. आपल्याच ग्रुप च्या एक सन्मानिय भगिनी सदस्या मानिकताई वाघमारे यांच्या कडून. मानिकताईंनी शिक्षण क्षेत्रात पुण्यातील देहू भागात कार्य करुन गगनाला गवसणी घातली आहे. मानिकताईंची ओळख नंतर कधीतरी करुन देईनच.*
 
*तर मानिकताई ह्या सविता ताईंच्या 'वन्स'.*

*सविता ताई आकाशवाणी सातारा केंद्राच्या माध्यमातून उद्घोषिका म्हणून चार चाँद लावले आहेत.*
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*

http://Sahebraomane1967.blogspot.com


सविता ताईंना एखाद्या व्यक्तींच्या कुटुंबातील माहिती दिली तर त्या कुटुंबातील चित्र कवितेच्या माध्यमातून लगेच आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. आपल्या घरी भेट न देता अगदी घरच्या सदस्यांची सुरेख फुलांची माळ त्या कवितेच्या माध्यमातून कागदावर लगोलग उतरतात. हे मी दोन तीन वेळा अनुभवलयं.
आपल्याच सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुडच्या सन्मानिय भगिनी सदस्या सुरेखा ताई नेसरीकर यांच्या शौर्य नावाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सहज म्हणून सविता ताईंना व्यक्ती चित्रण कविता लिहाल का म्हणून विचारले असता त्यांनी कुटुंबातील माहिती दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत सुंदर असे चित्र उभं राहिल अशी कविता दिली होती. आज ती कविता माझ्याकडे आणि सुरेखा ताई नेसरीकर यांच्याकडेही उपलब्ध नाही.
सविता ताईंना आज मी पुन्हा एकदा लिहीण्यासाठी उद्युक्त केले होते. पण किरकोळ अपघातने उजवा हात दुखावल्याने त्या लिहू शकल्या नाहीत. पण त्यांनी लिहिलेली त्यांच्या संग्रहातील कविता तुमच्या साठी मी देत आहे. 👇
*🌹तुझ्यातली तू🌹*

              सविता जाधव,सातारा


तुझ्यातल्या तुझ्यासाठी 
आज तरी हे करून पहा...
आरसा साफ करताना क्षणभर आरशात निरखून तरी पहा...🥰

दुधावरची साय..
दुधाला विरजण...
ओट्यावरची भांडी..
झालं बाई सगळं...
आता कपभर दूध पिताना........ थोडीशी साय 
चेहऱ्याला लावून तरी पहा....😍

तव्यातली पोळी...
त्यावर तुपाची धार...
नैवैद्याच्या ताटात देवासाठी पक्वान्न लज्जतदार...
नैवैद्याच्या पहिल्या घासाचा
मान घेऊन तरी पहा...😘

तूच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार...
एकदा तरी या देहाला मनाला जिवंत करून पहा....🙃

किती विचार करशील ...
हसताना, बोलताना..
रडताना, उठताना 
आणि बसताना...
एकदा तरी स्वतःला ..
विसरून पहा....😇

असू दे गं....सगऴच सगळ्यांना कसं बरं पटेल...
तूच स्वतःला आधी विचार..
तू जे करते आहेस ते तुला पटतंय का पहा....🤨

आजच नाही तर आजपासून एवढंच कर..

स्वतः वर प्रेम करून ..
स्वतः साठी तासभर जगून तरी पहा....😊

तुझ्यातल्या तुझ्या साठी तू एवढंसुद्धा नाही का करणार?
बाकीच्यांनी तुला वेळ द्यावा म्हणून मग तू आयुष्यभर का रडणार?😞

तूच दुबळी तूच अबला असं जगणं तूच ठरवलं आहेस...
अगं तुझ्या सारख्या स्त्रियांनीच तर इतिहास घडवल आहे.🤗

जायचंय सगळ्यांना एक दिवस या पृथ्वीतलावरून...
जाण्याआधी एकदा तरी
स्वतः साठी जगून पहा
तुझ्यातल्या तुझ्यावर 
प्रेम करून पहा...🌹
तुझ्यातल्या तुझ्यावर 
प्रेम करून पहा....🌹
=======================
*यु ट्यूब वरुन काही Video मला मिळाले आहेत*

*ACTIVE INCOME vs PASSIVE INCOME.*👇

https://youtu.be/K6Mn_8ryKBk

=======================

*Modicare commando training.*
*PLATINUM DIRECTOR : SAVITA JADHAV.*
खर्च केलेले पैसे परत कसे इन्कम मध्ये कन्व्हर्ट करायचे या विषयावर व्याख्यान देताना सविता ताई जाधव. 👇

https://youtu.be/NDa9hntnClw

========================

https://youtu.be/TkugveeV2og

साभार - RJ सविता ताई जाधव. 

तीन अंध हौशी कलाकारांनी गायलेलं हे गीत ऐका. निरखून पहा त्यांचे हावभाव , साजेसा स्वल्प अभिनय , स्वरांची फेक ....... सर्वच उच्च कोटीचं , श्रवणीय अन् कौतुकास्पद !
... RJ
सविता जाधव. सातारा आकाशवाणी.
=======================
दोन मित्रांची गोष्ट... 

https://youtu.be/T65pJkW3kmA

=======================

*Recharge Elders* 👇

https://youtu.be/3ngneKsoXjc

========================

अलिकडे वैवाहिक जीवनात कुटुंबातील करह वाढत चालले आहेत. त्यामधून घटस्फोट होताना दिसत आहेत. अपा कुटुंबातील व्यक्तींसाठी समुपदेशक म्हणून सविता ताई सातारा जिल्ह्यात काम करत आहेत. अशी अनेक तुटलेली नाती त्यांनी जोडलेली आहेत. 
आकाशवाणी सातारा केंद्राच्या उद्घोषिका असलेल्या सविता ताईंना "सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.
*🌹🎂23 डिसेंबर 🎂🌹*
*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973*
23 डिसेंबर 2022.इ

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.