"महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप साठी. संकलन - साहेबराव माने.पुणे. 9028261973. 20 डिसेंबर 2022. "ओळख हिरकणी ची." - "संध्या ताई शेळके." - पंढरपूर. 🌹🎂🥇शुभेच्छा/सदिच्छा 🥇🎂🌹
*"महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप साठी.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
20 डिसेंबर 2022.
*ओळख हिरकणी ची.*
*"संध्या ताई शेळके."* पंढरपूर.
🌹🎂🥇शुभेच्छा/सदिच्छा 🥇🎂🌹
*घरोघरी, निर्भया पथक पंढरपूर : अभिनय : संध्या ताई शेळके.* 👇
https://youtu.be/-y0Hf-ojqSw
*संध्या ताई शेळके यांचा दर्जेदार अभिनय. जरुर पहा. शेअर करा.*
*करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. त्याला अनुसरून सामाजिक प्रबोधन करण्यासाठी संध्या ताईंनी स्व-अभिनीत एक छोटीशी टेलीफिल्म पंढरपूर शहर पोलीसांकरीता तयार केली होती.*
याशिवाय त्यांनी अनेक टिव्ही मालिकेत हजेरी लावली आहे.
समुपदेशन करण्यासाठी त्यांनी अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
संध्या ताई शेळके , ह्या आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत. आज 20 डिसेंबर. संध्या ताईंच्या वाढदिवसाचे 🎂💐 औचित्य साधून त्यांची तुम्हाला ओळख करून देत आहे.
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
त्या पंढरपूर येथे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत आणि नेहमी काही तरी वेगळं करण्यासाठी धडपडत असतात. त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी डिसले गुरुजींना पुरस्कार मिळाला. पण त्या अगोदर डिसले गुरुजींनी संध्या ताईंच्या शाळेला भेट दिली होती.
सामाजिक क्षेत्रात सुध्दा वेगवेगळे प्रयोग संध्या ताई नेहमी राबवत असतात. बऱ्याच वेळा आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो.
पंढरपूर मध्ये आपल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या दोन सन्मानिय भगिनी सदस्या "मंगलताई शहा आणि डिंपल ताई घाडगे" या गेल्या 20 वर्षापासून एड्सबाधित लहान मुले-मुलींचा अनाथाश्रमाच्या माध्यमातून सांभाळ करत आहेत. त्यांच्या त्या कामाला खारीचा वाटा उचलायला संध्या ताई नेहमी अग्रेसर असतात. त्यांचं प्राणीप्रेम फारच बोलकं आहे. विशेष करून भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत त्या फारच हवालदिल होताना दिसतात. त्यांचीही सेवा त्या करताहेत. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी भटक्या कुत्र्यांसाठी स्वतः पुढाकार घेऊन अभियान राबविले होते.
दोन वर्षापूर्वी कोरोना ने धुमाकूळ घातला होता. त्या वेळी कार्तिकी वारी चा पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. त्या साठी प्रबोधन करण्यासाठी पंढरपूर पोलिसांच्या साठी एक टेलीफिल्म बनवली होती ज्यात संध्या ताईंची भूमिका चांगलाच भाव खाऊन गेली आहे. त्याची लिंक सुरवातीला दिलेली आहे. एकदा दर्जेदार अभिनय पाहून घ्या.
पु ल यांच्या वेगवेगळ्या पुस्तकातले "गटणे , हरी तात्यांची आरोळी , नारायणाची बडबड अशी अनेक पात्र संध्या ताईंना तोंडपाठ आहेत. संध्या ताईंच्या तोंडून मला अनेक वेळा ती पात्रे ऐकण्याची संधी मिळाली आहे.
अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात ती पात्रे त्यांच्या तोंडून बाहेर पडतात.
शिक्षिका पेशा स्विकारुन नवी पिढी घडवण्यासाठी शाळेच्या माध्यमातून कार्य सुरु आहे.
त्यांची विविध क्षेत्रातील भरारी अशीच चमकत राहो अशी सदिच्छा "महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या वतीने मी व्यक्त करतो.
*संध्या ताई आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने सुयश चिंतितो. सुआरोग्य लाभो. दीर्घायुष्य लाभो.*
"जिवेत् शरद् शतम्."
*🌹🎂🥇सदिच्छा 🥇🎂🌹*
*🙏आपुलकी जपणारी माणसं.🙏*
20 डिसेंबर 2022.
*🙏दादा. पुणे. 9028261973.🙏*
Comments
Post a Comment