"ओळख हिरकणी ची - 15 डिसेंबर. वैशाली ताई गेडाम." 🌹💐🎂🎂💐🌹"महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी." "वाचन कसे आणि का शिकायचे?" संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार लेखन - वैशाली ताई गेडाम. (सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या.)

*ओळख हिरकणी ची - 15 डिसेंबर. वैशाली ताई गेडाम.*
🌹💐🎂🎂💐🌹
*महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी.*
*वाचन कसे आणि का शिकायचे?*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
साभार लेखन - वैशाली ताई गेडाम. 
(सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या.)

वैशाली ताई ह्या शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भागात परिस्थितीशी सामना करत अद्यापनाचे कार्य करताहेत. 
त्यांचे अनेक लेख मी थिंक महाराष्ट्र मध्ये वाचलेले आहेत. लेख आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक लेख अपलोड करत आहे. 
तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच. 
🌹🎂🎂🌹

... साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
15 डिसेंबर 2022.
 
*वाचन कसे आणि का शिकायचे?*
... वैशाली ताई गेडाम.

*मूल शाळेत येते पण शिकत नाही यास पालक निश्चितच जबाबदार नाहीत. शिक्षणव्यवस्थेने मुलांच्या शिकण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्था मुलांच्या शिकण्या-न शिकण्यास जबाबदार आहे. मूल नॉर्मल दिसते, शाळेतही रोज येते, मात्र शिकत नाही किंवा त्याला शिकवू लागल्यास समजत नाही, ते इतर मुलांसारखे शाळेचा अभ्यास करत नाही, शाळेत दोन-चार वर्षांपासून येते पण त्याला अजून वाचता-लिहिता येत नाही- याचा अर्थ त्या मुलाच्या शिकण्यात दोष असेल असे नसून मुलाला समजून घेण्यात दोष असू शकतो हे लक्षात घ्यावे. मूळ समस्या वाचता-लिहिता न येणे ही नाही. समस्या मुलांना व्यक्त होता येत नाही ही आहे. सर्वसामान्य दिसणारे एक मूल, घरी सर्व काही बोलते मात्र शाळेत बोलत नाही, सर्वसामान्य दिसणारे एक मूल आजुबाजूच्या व्यक्तींना ओळखते, सर्वसामान्य क्रिया करते, खेळांमध्ये वगैरे भाग घेते आणि तरीपण त्यास वाचन-लेखन शिकण्यात अडचण येते. असे जर होत असेल तर मुलाचा (मुलगा आणि मुलगी दोन्हींसाठी हा शब्द वापरला आहे) आय क्यू तपासण्याऐवजी त्याला शिकवणाऱ्यांचे कोठे चुकत आहे का ते तपासून बघावे.*

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

http://Sahebraomane1967.blogspot.com

मला शिक्षक विचारतात, की त्यांच्या वर्गामध्ये अशी मुले आहेत की ज्यांना कितीही वेळा एकच गोष्ट सांगितली तरी, ती त्यांच्या लक्षात राहत नाही. अशा मुलांसाठी काय करावे?

एक शिक्षक म्हणाले, “माझ्या वर्गात एक मुलगा आहे. त्याला कितीही सांगितले तरी तो विसरून जातो. मी त्याला ‘अजय घर बघ’ हे वाक्य वाचून दाखवले तर तो ते तेवढ्यापुरते म्हणतो, मग थोड्या वेळाने विचारले तर तो ते वाचू शकत नाही. त्याला ते एकच वाक्य पानभर लिहिण्यास सांगितले तर तो ते लिहितो, पण काय लिहिले आहे हे तो विसरून जातो! काय उपाय करू?”
मी त्यांना विचारले, त्या मुलाला/मुलीला आजूबाजूच्या माणसांची, प्राण्यांची, झाडांची, वस्तूंची ओळख आहे का? त्यांनी ‘हो’ असे उत्तर दिले. मग मी विचारले, ते त्यांच्या दैनदिन उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा वापर योग्य करतात का? ते ‘हो’ म्हणाले. मी पुढे विचारले, ते नॉर्मल बोलतात का? ते ‘हो’ म्हणाले. मी विचारले, मग अडचण कोठे आहे? ते म्हणाले, “त्याला शिकवलेले आहे त्याची त्याला आठवण राहत नाही.”

मी त्या मुलाला इतक्या साऱ्या माणसांचे चेहरे आठवत आहेत, त्यांची नावे आठवत आहेत, घरातील वस्तू – ताट, वाटी, ग्लास, कप, चटई, टेबल, खुर्ची, बेड, चादर, उशी, गाय, बैल, कुत्रा, मांजर, अगदी चित्रात पाहिलेले वाघ, सिंहही आठवत आहेत. मग त्या पन्नास अक्षरांचीच आठवण कशी काय राहत नाही? माझ्या या प्रश्नावर मला उत्तर सहसा कोणाच शिक्षकाकडून मिळत नाही. मग मी पुढे सांगते, त्याला जे काही माहीत आहे ते त्याने प्रत्यक्ष पाहिले व अनुभवलेले आहे. तो घरातील माणसांची नावे व त्यांचे चेहरे ओळखतो. कारण त्याने ते प्रत्यक्ष पाहिलेले आहेत व तो त्यांच्यासोबत वावरलेला आहे. तो घरातील, परिसरातील वस्तू ओळखतो, कारण त्याने त्या प्रत्यक्ष पाहिल्या आहेत व त्याने त्यांच्याशी आंतरक्रिया केलेल्या आहेत. त्याने त्या नुसत्या प्रत्यक्ष पाहिल्या म्हणून आठवत नाही आहेत; तर ती माणसे त्याच्यावर प्रेमही करत आहेत. त्याने त्या वस्तू नुसत्या पाहिल्या म्हणून नाही तर त्यांची ओळख झाली, त्या वस्तूंची नावे त्याच्यासोबत राहणाऱ्यांनी त्याला ती माहीत व्हावीत म्हणून प्रेमाने, कौतुकाने सांगितली व ती आजुबाजूची माणसे त्या वस्तूंचा वापर सातत्याने करतात म्हणून त्या बाळाला त्यांची नावे व आकार, रंग, रूप माहीत आहेत. म्हणून तो त्या साऱ्या ओळखतो. तो त्या वस्तू, नावे, चेहरे ओळखू लागल्यावर त्याच्यासोबतची माणसे त्याचे कौतुक करतात व त्यामुळे, मूल त्याला हुरूप येऊन इतर गोष्टी आणखी वेगाने शिकते.
शिक्षकबंधूंनी मुलाला जे ‘अजय घर बघ’ असे पानभर लिहिण्यास नि वाचण्यास सांगितले. त्या वाक्याशी त्याच्या भावना कोठे जुळलेल्या आहेत? मग ज्यात मुलाच्या भावना जुळलेल्या नाहीत अशी गोष्ट आठवण म्हणून त्याच्या मनात राहवी असा शिक्षकबंधूंनी अट्टाहास का धरावा? त्यापेक्षा त्या मुलाच्या विश्वात शिरून त्याला काय आवडते, त्याचा आनंद कशात आहे ते जाणून घेऊन, त्याच्याशी अनौपचारिक संवाद साधून तो जे बोलतो तेच त्याला लिहून द्यावे. तेच वाचून दाखवावे. त्यामुळे त्याला आनंद होईल. त्याला हे कळेल, की जे बोलले जाते तेच लिहिले जाते. त्याने बोललेले वाक्य जर शिक्षकाने त्याला लिहून दिले तर तो ते विसरेल का? माझा अनुभव असा आहे, की  शिक्षकांकडून या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे येते.
ज्ञानरचनावादात आधीच्या ज्ञानावर आधारित पुढील ज्ञान मुलाने स्वतः तयार करणे किंवा जाणून घेणे म्हणजे आधीच्या ज्ञानाचा आधार घेऊन पुढील ज्ञान स्वत: मेंदूत तयार होणे ही प्रक्रिया घडते. समजा, शिक्षकाने मुलाने वाचन शिकावे या उद्देशाने ‘अजय घर बघ’ हे वाक्य किंवा तत्सम इतर वाक्य शाळेत पहिल्या वर्गात दाखल झालेल्या मुलाला प्रेमाने जरी वाचून दाखवले; कार्डांवर लिहून, त्याची योग्य ती रचना करून, विविध खेळ घेऊन जरी वाचून दाखवले; तरी ते मूल ‘अक्षरवाचन किंवा शब्द्ववाचन’ या कौशल्याशी तोपर्यंत अपरिचित आहे, त्यामुळे त्याच्या आधीच्या ज्ञानाचा संबंध तेथे जोडला जात नाही. कारण ते वाक्य त्याच्यासाठी परके असते. त्यामुळे त्याला त्या वाक्याची आठवण राहत नाही. परंतु मुलाने ज्या गप्पा शिक्षकाशी केल्या त्यांतील एखादे वाक्य मुलाच्या पाटीवर, वहीत लिहून दिले तर ज्ञानरचनावाद कसा काम करतो ते कळून येईल, की त्या मुलाला बोलण्याचे कौशल्य प्राप्त झालेले असेल, त्याच्याजवळ काही शब्दसंपत्ती आहे, त्याला वाक्यरचना करण्याचे कौशल्य प्राप्त झाले आहे! म्हणजे ती कौशल्ये, ज्ञान त्याच्यापाशी आहे! आता, त्याच्यापाशी असलेल्या त्या ज्ञानाला आणखी पुढे नेण्यासाठी त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा थोड्या अधिक गोष्टी, माहिती, कौशल्ये माहीत असलेली एक व्यक्ती शिक्षक म्हणून त्याच्यासोबत आहे. त्या शिक्षकाचे काम हे आहे, की त्याने बोलण्याचे जे कौशल्य प्राप्त केले आहे त्या कौशल्याच्या आधाराने ते बालक त्यापुढील ‘वाचन’ हे कौशल्य शिकणार आहे. शिक्षक एक अभिभावक म्हणून, सुलभक म्हणून त्याच्या सोबत आहे. त्याने बोललेलेच वाक्य शिक्षकाने त्याच्यासमोर त्याला लिहून दिले तर त्याला हे कळते, की हे जे काही लिहिले गेले आहे ते त्याच्याकडूनच घेतले गेले आहे. ते त्याचेच आहे. त्याने बोललेले, म्हटलेले ते वाक्य असल्यामुळे ते त्याच्या लक्षात राहते व ते तो सहजतेने वाचतो. तो ते वाक्य विसरत नाही. वाचताना अक्षरांचा परिचय होत जातो. त्याने वाचल्यानंतर त्याचे कौतुक केले, की त्याला प्रेरणा मिळते व तो पुन्हा नवे वाचून पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मूल त्याच्या शिक्षकांना पुन्हा नवे वाक्य सांगतो व लिहून मागतो आणि मग ते वाचण्याचा सराव करतो. अशा रीतीने त्याचा वाचन या कौशल्याशी सहजपणे परिचय होतो व ते त्याला आवडू लागते. हाच ज्ञानरचनावाद आहे. साहित्य, खेळ, साधनांसहितचे खेळ, विशिष्ट आकृत्यांची रचना करून वाचनाचे खेळ खेळणे, शब्दकार्डे, अक्षरकार्डे, वाक्यकार्डे, पुस्तके ही सगळी वाचन शिकण्यास सहाय्यक ठरणारी साधने आहेत.

अभिव्यक्ती ही माणसाची मूलभूत गरज आहे. म्हणून ज्ञानारचनावादाची पहिली पायरी देखील ‘अभिव्यक्ती’ हीच आहे. मूल शिक्षकाशी गप्पा मारते तेव्हा ते अभिव्यक्त होत असते. मूल त्याच्या शिक्षकासोबत कितीतरी गोष्टी त्यावेळी शेअर करत असते, मुले अभिव्यक्तीला वाव न मिळाल्यास कोमेजतात व अभ्यासात मागे पडतात. काही मुले धीट असतात किंवा दुसऱ्यांशी पटकन संवाद साधणारी असतात. म्हणून मग तशी मुले शिक्षकाचे शिकवणे लवकर आत्मसात करताना दिसतात. काही मुले बुजरी किंवा लाजरी असतात. त्यांनाही त्याच्या शिक्षकांशी, इतरांशी बोलण्याची इच्छा असते, पण ती त्यांच्या स्वभावामुळे ती इतरांशी पटकन संलग्न होत नाहीत. त्यांच्या मनात काही विचारप्रक्रिया सुरू असतात. त्यामुळे त्यांचे लक्ष शिक्षक काय बोलत आहेत याकडे नसते व ती शिक्षकाने सांगितलेली गोष्ट करू शकत नाहीत. तशी मुले शिक्षकांना समस्याप्रधान वाटतात व मग शिक्षकांचा दृष्टिकोन त्या मुलांकडे पाहण्याचा बदलून जातो. तशी मुले अध्ययनअक्षम किंवा गतिमंद वाटू लागतात.

मुले विविध माध्यमातून अभिव्यक्त होऊ पाहतात – बोलण्यातून, कृतीतून, कलेतून, खेळातून. मुलांना तशा प्रत्येक माध्यमातून व्यक्त होऊ द्यावे. मुलांचे बोलणे उत्साहाने, आस्थेने, हावभावांसह ऐकून घ्यावे. त्याला प्रतिसाद द्यावा. त्यांपैकी चित्र काढणे हे अभिव्यक्ती माध्यम सर्व मुलांचे आवडते आहे. म्हणून मुलांना मनसोक्त चित्रे काढू द्यावीत. मुलांच्या मनात विविध गोष्टी, कल्पना, विचार असतात. त्या गोष्टी, विचार, कल्पना ते चित्राच्या माध्यमातून व्यक्त करत असतात.

मुलांना शाळेत मोकळीक हवी असते. नुसतीच मोकळीक असून चालत नाही; तर मुलांना चित्रे काढण्याचे साहित्यदेखील – कागद, पेन्सिल, रंग – सहजपणे उपलब्ध झाले पाहिजे. चित्रे काढण्यासाठी वर्गात मुलांना भिंतीवर जागा असायला हवी. मुलाच्या मनात चित्र काढण्याची इच्छा झाली तेव्हा चित्र काढण्याची संधी मिळायला हवी. मुलांचे कल्पनाविश्व चित्रे काढण्यामुळे विस्तारत जाते; रंगांचे, रंगसंगतीचे ज्ञान वाढत जाते. मूल त्याने काढलेले चित्र त्याच्या शिक्षकाला समजावून सांगते. मुले त्या चित्राची गोष्टही तयार करतात. मुले त्या चित्रासंदर्भात जे काही सांगतात किंवा बोलतात ते शिक्षकाने त्या चित्राजवळ लिहून द्यावे. मूल ते सहजपणे वाचते, कारण ती त्याचीच निर्मिती असते. अशा प्रकारे मूल सहजपणे आणि आशयपूर्ण वाचन करू लागते. शिक्षकाने मुलांना अक्षर आणि स्वरचिन्ह यांचा परिचय त्याच प्रवासात अलगदपणे समोर मांडायचा असतो.

चित्रे काढल्यामुळे मुलांना पेन्सिलवर पकड मिळवणे, स्नायू मजबूत होणे, हात हवा तसा फिरवता येणे या सर्व गोष्टी साध्य होतात. मुलांना आपोआपच सर्व प्रकारच्या रेषा व गोल काढणे जमू लागते. शिक्षकाने चित्रे काढण्यासाठी मुलांना वेगवेगळी माध्यमे उपलब्ध करून द्यावीत – वाळूत चित्रे काढणे, जमिनीवर बोटाने किंवा काडीने चित्रे काढणे, रांगोळीने चित्र काढणे वगैरे…
मुलांना साचेबद्ध चित्रांमध्ये अडकवू नये, अमकेच चित्र काढ असे सांगू नये. मुलांना चित्रे मुक्तपणे काढू द्यावीत. मुले त्यांच्या कल्पना, भावना चित्रांतून व्यक्त करतात. त्यांना ते करू द्यावे. शिक्षकांनी मुलांनी काढलेल्या चित्रांबद्दल त्यांच्याशी बोलावे, चित्रात काय काढले आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्यावे व ते त्या चित्राजवळ लिहावे. मुले चित्रांच्या गोष्टी तयार करतात, तर कधी गोष्ट ऐकून त्यानुरूप चित्रे काढतात. मुलांच्या गोष्टींची व चित्रांची हस्तलिखिते बनवावीत. ती मुलांना वाचून दाखवावीत. मुलांसाठी ते परिणामकारक वाचन साहित्य बनते. मुलांना ते वाचण्यास आवडू लागते. कारण त्यातील चित्रे, गोष्टी, वर्णने त्यांचे स्वतःचे असते. ते त्यांच्या परिचयाचे असते, त्यामुळे मुलांना ते लवकर वाचता येते. मुले त्यातील शब्द, वाक्ये विसरत नाहीत. त्यातूनच त्यांना लिपीपरिचय होत जातो. मुलांना तो/ती जे बोलतो/ते, जे करतो/ते ते लिहिता येते ही गोष्ट कळत जाते. त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. मुख्य गोष्ट घडून येते ती म्हणजे, मुलांना अभिव्यक्त होता येते व वाचणे आणि लिहिणे शिकणे ही गोष्ट कष्टमुक्त होते, आनंदमयी होते. अभिव्यक्त होता येणे हे मानवी जिवाच्या विकासप्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

मुलांनी वाचायला शिकावे असे वाटत असेल तर त्याला त्याच्या आजुबाजूला वाचन दिसण्यास हवे. वाचनाचे नमुने त्याच्यासमोर सादर व्हावेत. मुलांना वाचून दाखवणे फार महत्त्वाचे आहे. मूल सहजपणे बोलण्यास शिकते, कारण ते जन्मल्यापासून त्याच्या आजुबाजूला माणसे बोलत असतात, त्याच्याशी बोलत असतात. तेव्हा ते मूल सुरुवातीला बोलणाऱ्याकडे बघतही नसते. नंतर बघू लागते, पण म्हणून काही ते त्याच्यासोबत लगेच संवाद साधत नाही आणि म्हणून त्याचे आप्तस्वकीय काही त्याच्यावर नाराज होत नाहीत किंवा असेही म्हणत नाहीत, की आम्ही एवढे बोलत आहोत, पण हे मूल अजून बोलत नाही. कारण त्यांना माहीत असते, की ते बोलणार आहे! बोलणे ही गोष्ट दैनंदिन जीवन जगताना अपरिहार्य आहे. मात्र वाचन ही गोष्ट अपरिहार्य नाही, म्हणून ती मुद्दामहून मुलांसमोर आणावी लागते. त्यांना आवडेल, त्यांच्या भावविश्वाशी जुळेल, त्यांच्या परिसराशी जुळेल, ज्यात मजकुराशी संबधित भरपूर चित्रे असतील ती चित्रे लिखित मजकुराचा अर्थ लावण्यास सहाय्यभूत होत असतील असे साहित्य मुलांना वाचून दाखवावे. ओघवते, प्रभावी कसे वाचावे, वाचताना कोठे थांबावे, वाचनाचा अर्थ कसा लावावा-वाचल्यानंतर विचार करावा या सर्व गोष्टी मुलांना कळायच्या असतील तर शिक्षकाने मुलांसमोर वाचण्यास हवे.

वाचनातील चढउतार, आरोह-अवरोह मुलांना दिसण्यास हवेत. त्यामुळे शिक्षकांनी मुलांसमोर वाचण्यास हवे. शिक्षक वाचत असताना मुले त्यांच्या समोर असलीच पाहिजे असा आग्रहदेखील प्रत्येक वेळी धरू नये. मुले फार काळ एका गोष्टीकडे अवधान ठेवू शकत नाहीत. शिक्षकाने स्वतःसाठीदेखील अधुनमधून वाचत बसावे. मुलांना ते दिसते व त्यामुळे ‘वाचायचे’ असते हे मुलांना समजू लागते. हे असे एकट्याने वाचत असताना कधी प्रकट वाचावे. मुले खेळत असतील तरी त्यांचे लक्ष शिक्षकाकडे असते. कधी मूकवाचन करावे त्यामुळे मुले मूकवाचन या गोष्टीशी परिचित होतात. मुलांचा लिखित साहित्याशी परिचय वर्गात चालणाऱ्या अशा या सर्व व्यवहारातून होत जातो. लिखित साहित्य त्याला खुणावू लागते. मूल त्याकडे आकर्षित होते; स्वतः पुस्तक धरून ते अवलोकू लागते. पुस्तकातील चित्रे बघून त्याला गोष्टीची कल्पना येऊ लागते. शिक्षकाने वाचून दाखवलेली गोष्ट त्याला आठवू लागते. त्याला स्वतःला ते वाचण्याची प्रेरणा होऊ लागते व त्या प्रेरणेतून ‘वाचन’ करणे ही त्याची गरज बनते; मग ते अक्षर, स्वरचिन्हे माहीत करून घेण्याकडे लक्ष देऊ लागते. मुले स्वतः अशी वाचनासाठी प्रेरित झाल्यामुळे वाचन ही त्यांची गरज बनते व वाचनाची प्रक्रिया आनंददायी बनते.

वाचणे व लिहिणे अभिव्यक्त होत होत शिकणे, वाचनाचा आनंद लुटत शिकणे, विचार-कल्पना करत करत शिकणे हे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुलाला दोन वर्षें लागली तरी त्याबद्दल शिक्षकाने न्यून बाळगण्याचे कारण नाही. कारण मुलांना लिपीवाचन शिकवायचे नाही; तर मानवाच्या व विश्वाच्या अखिल जीवनात चालणाऱ्या क्रियाकलापांविषयी व त्या क्रियाकलापांचे अर्थ, त्यामागील विचार, प्रेरणा, त्यानुसार वाचकाच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना, त्यानुरूप घेण्याचे निर्णय हे त्या साहित्यातून समजून घेण्यास शिकवायचे आहे. मुलाला वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेता येण्यास हवा, त्यावर विचार करता येण्यास हवा, योग्य-अयोग्य असा निर्णय घेता येण्यास हवा. वाचलेल्या साहित्याचा त्याचे वैयक्तिक व सामाजिक जीवन समृद्ध करण्यासाठी, अधिक प्रगत करण्यासाठी लाभ घेता येण्यास हवा. सामुदायिक जीवनातदेखील वाचून-समजून निर्णय घेता येण्यास हवे. उदाहरणार्थ, त्याला ‘नो पार्किंग’चा बोर्ड वाचल्यानंतर तेथे गाडी लावायची नाही हा निर्णय घेता येण्यास हवा. ‘ येथे थुंकू नये’ अशी पाटी वाचल्यानंतर तेथे न थुंकण्याची भावना त्याच्या मनात येण्यास हवी. तिरका क्रॉस काढलेल्या हॉर्नची खुण बघून तो भाग हॉर्न वाजवण्यास मज्जाव असलेला आहे हे कळण्यास हवे आणि हे सगळे समजायचे तर शिक्षकांनी वाचन शिकण्याची सखोल प्रक्रिया समजून घेण्यास हवी. 
 
वैशाली ताई, 
तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला *महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.*
🌹🎂💐
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
15 डिसेंबर 2022.

*हल्ली च्या शैक्षणिक संस्थांच्या शिक्षकांना अनेक सरकारी कामे करण्यासाठी भाग पाडले जाते. मुलांना शिक्षण देण्याचं काम बाजूला पडतयं की काय असं वाटायला लागलं आहे.*

याच विषयावर 
"सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या वैशाली ताई गेडाम यांनी नुकतेच मा. शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून भावना व्यक्त केल्या आहेत. ते पत्र वाचून तुम्ही सुद्धा विचार करण्यासाठी बाद्य व्हाल. 

वैशाली गेडाम
प्राथमिक शिक्षक
जि. प. प्रा. शाळा, गोंडगुडा (धोंडाअर्जूनी)
यांनी लिहिलेले पत्र शेवटपर्यंत वाचून प्रतिक्रिया द्या.

प्रति,
मा. शिक्षणमंत्री
मा. शिक्षणसचिव
मा. शिक्षणसंचालक
             महाराष्ट्र शासन
विषय - सातत्याने येऊन आदळत असलेल्या शासकीय आदेशांमुळे माझ्या शाळेतील अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अडथळा येत असल्याबाबत. 

अर्जदार - वैशाली पुंडलिकराव गेडाम
              प्राथमिक शिक्षक
महोदय,
सविनय विनंती याप्रमाणे आहे, की मी एक प्राथमिक शिक्षक असून सद्यस्थितीत जि. प. प्रा. शाळा, गोंडगुडा (धोंडाअर्जूनी ) ता. जिवती, जि. चंद्रपूर येथे कार्यरत आहे. मी एक शिक्षक आहे आणि मुलांना शिकविण्याची, नवनवीन शैक्षणिक प्रयोग करण्याची, शैक्षणिक संशोधन करण्याची मला अत्यंत आवड आहे. मी मुलांमध्ये रमते आणि मुले माझ्याभोवती पिंगा घालत असतात. विद्यार्थ्यांसोबत माझे नेहेमीच चांगले सूर जुळलेले असतात. *परंतु या सुरांना बेसूर करण्याचे, आमचे अत्यंत शिस्तीत चाललेल्या शिक्षणाला बेशिस्त करण्याचे, शिकण्यात व्यस्त असलेल्या माझ्या आणि मुलांच्या मेंदूला डिस्टर्ब करण्याचे अनेक अनेक आदेश, हजारो आदेश आम्हा शिक्षकांवर येऊन आदळत असतात आणि आमच्या लयीत चाललेल्या शिक्षणाला विचलीत करीत असतात.* आत्ताच 2022 च्या एप्रिलच्या उत्तरार्धात *अध्ययन स्तर निश्चिती*, या शाळेतील शिक्षक त्या शाळेत पाठवून केली होती. मध्ये मे जून दोन महिने उन्हाळी सुट्टी. आता शाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले न झाले नि पुन्हा अध्ययन स्तर निश्चितीचा आदेश जिल्हास्तरावरून. काय आहे हे? यातून काय साध्य होत आहे? शासनाकडून वारंवार करण्यात येत असलेली *अध्ययन स्तर निश्चिती* कुठल्या शिक्षणतज्ज्ञाने याबाबत कोणते शैक्षणिक संशोधन लिहून ठेवले आहे, ते माझ्या वाचनात अजून काही आलेले नाही. (तसे संशोधन उपलब्ध असल्यास आपण मला ते लक्षात आणून द्यावे. मी ते नक्की वाचेन. म्हणजे सातत्याने सुरू असलेल्या आपल्या या उपक्रमात मी अभ्यासपूर्वक सहभागी होईल) 
सातत्याने आमच्या विद्यार्थ्यांवर येऊन आदळत असलेली ही *अध्ययन स्तर निश्चिती* हा कोणत्या शैक्षणिक अजेंड्याचा भाग आहे हे समजण्यास मला वाव नाही. यात अध्ययन स्तराचे पाडल्या गेलेले टप्पे हे कोणत्या शैक्षणिक संशोधनावर बेतलेले आहेत आणि त्यातून काय साध्य होणार आहे हे मला कळत नाही. आपण गणिताच्या अध्ययन स्तर निश्चितीबाबत पाहू या, ज्याआधारे शासन किंवा एखादी स्वायत्त संस्था शाळेत शिकणा-या मुलांचे अध्ययन स्तर निश्चित करून मूल्यमापन करते- 
• स्तर १- प्रारंभिक 
• स्तर २- १ ते १० अंकज्ञान 
• स्तर ३- ११ ते ९९ संख्याज्ञान
• स्तर ४- वजाबाकी 
• स्तर ५ भागाकार 
या पाच स्तरांची आपण चाचपणी करता आणि त्यावरून शाळांची गुणवत्ता ठरवता. ठरविण्यास हरकत नाही, परंतु या पाच स्तरांच्या मध्ये मध्ये अनेक अध्ययन क्षमता लपलेल्या असतात त्या आपण कधी तपासत नाहीत. उदा. मोजता येणे, वर्गीकरण करता येणे, एकास एक संगती लावता येणे, लहान मोठा, कमी जास्त ओळखता येणे, किती आहे/असेल याचा अंदाज बांधता येणे, काय करावे लागेल याचा विचार करता येणे, अंकांवरून संख्या तयार करता येणे, संख्या चढत्या उतरत्या क्रमाने मांडता येणे, संख्याचे खूले व बंद रुप करता येणे, संख्या विस्तारित रुपात लिहिता येणे, पॕटर्न शोधता येणे वगैरे वगैरे....पण हे सर्व न बघता, न पडताळता तुम्ही डायरेक्ट शेवटालाच हात घालता. त्यामुळे शिक्षक, मुलांमध्ये या क्षमता build up करण्याच्या मार्गाने न जाता डायरेक्ट बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारच घोटून घेत असतात. यात मुलांचाही दम घुटत असतो. माझ्या पहिल्या इयत्तेतील मुलांना वजाबाकी करता येते परंतु त्याचे संख्याज्ञान १ ते १० पर्यंतच आहे. मग अध्ययन स्तर निश्चिती करणाराने त्याला कोणत्या स्तरात बसवायचे असते? अनेक विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरणे घेऊन वस्तूरुप वापरून भागाकार करता येतो, परंतु बरीच मुले कागदावरचा लेखी भागाकार करताना गोंधळतात व काही चुका त्यांच्या हातून होतात कारण लेखी भागाकार ही अनेक संभावना असलेली एक गुंतागुंतीची संकल्पना आहे. मुलांना सरावाने ती जमते. पण असर वगैरे सारख्या संस्था इतके टक्के मुलांना  भागाकार येत नाही असे जाहीर करते.  प्रत्येक संकल्पना प्रत्यक्ष समजून घेत टप्प्याटप्प्याने गेले की गणित सुकर होते. मुळात याबाबत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सपोर्टची गरज आहे. आता आपण म्हणाल, आम्ही शिक्षकांना एवढी सारी प्रशिक्षणे देतो, या प्रशिक्षणांवर पैसा खर्च करतो, आम्ही भाषेची, गणिताची प्रशिक्षणे दिली आहेत. मराठी, इंग्रजी भाषा साहित्यपेटी दिली आहे, गणितपेटी दिली आहे आणि तरीसुद्धा गुणवत्ता का वाढत नाही? तर महोदय माझे नम्र निवेदन असे आहे, की प्रशिक्षणेही बहुत झाली, होतात. साहित्यही बहु मिळाले परंतु त्या सगळ्याचा वापर शिक्षकाने करावा म्हणून शिक्षक व त्याला सपोर्ट करणारी त्याची नजीकची यंत्रणा मोकळी हवी की नको? तर ही सगळी यंत्रणा आणि शिक्षक गुंत्यात अडकलेली असतात सातत्याने येऊन आदळणाऱ्या सूचना आणि उपक्रमांमध्ये.
*शिक्षकांवर किती प्रकारचे आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रेशर असते याची कल्पना आपण केली आहे का?* 
प्रत्येक जिल्ह्याच्या सि. ई. ओ. ना वाटते, की त्यांच्या जिल्ह्यातील शाळा गुणवत्तापूर्ण असाव्यात. वाटलेच पाहिजे. त्यांना ती त्यांची स्वतःची जबाबदारी वाटते हे तर चांगलेच आहे, त्यासाठी ते पुढाकार घेतात हे ही फार स्वागतार्ह आहे. परंतु अडचण अशी आहे, की शाळाशाळांमध्ये काय झाले पाहिजे, कोणते उपक्रम केले पाहिजे, मूल्यमापन कसे केले पाहिजे याचाही निर्णय तेच घेऊन मोकळे होतात आणि आदेश देत सूटतात, शिक्षणाधिकाऱ्यांना, गटशिक्षणाधिकाऱ्यांना, विस्तारअधिकाऱ्यांना, केंद्रप्रमुखांना आणि हे सगळे आदेश येऊन आदळतात शिक्षकांवर. आणि हे केवळ जिल्हास्तरावरून सि. ई. ओ. मार्फतच नाही, तर राज्यस्तरापासून असे सगळे आदेश येऊन आदळत असतात शिक्षकावर. असे एकामागून एक आदेश येऊन आदळत असतील तर शिक्षक विचार करू शकणार आहे का, आपल्या वर्गातील मुलांच्याबाबत? शिकविण्याचे, अध्ययन अनुभव आखण्याचे स्वातंत्र्य घेऊ शकणार आहे का तो? कोणत्या मुलाला कोणती अडचण येतेय? कुण्या विद्यार्थ्यांच्या घरची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक स्थिती कशी आहे याकडे लक्ष देऊन त्या विद्यार्थ्यास उबदार, पोषक वातावरण शाळेत उपलब्ध करून देण्याचा विचार करू शकण्याइतपत त्याचे डोके स्वतंत्र ठेवू शकणार आहे का तो? 
*वर्गातील / शाळेतील उपक्रम शासनाने राबवायचे असतात, की शिक्षकाने?* मुलांना कोणते शैक्षणिक अनुभव द्यायचे हे शासनाने ठरवायचे असतात की शिक्षकाने? आपल्या शाळेत आपण काय शैक्षणिक वातावरण ठेवायचे, कोणते अध्ययन अनुभव द्यायचे, नियोजन कसे करायचे हे जर शिक्षक ठरवू शकत नसेल, तर कसली गुणवत्ताधारक मुले तुम्हाला शाळाशाळांतून दिसणार आहेत? शिक्षकांच्या गुणवत्तेवर, कार्यकर्तृत्वावर शासनाला विश्वास नसेल, तर कशी काय राज्याच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार, वाढणार आहे? 
तुमची प्रशासकीय शिक्षणयंत्रणा शिक्षकांनी काय करावे हे सांगण्यासाठी आहे, की शिक्षक काय करत आहेत, शाळाशाळांतून काय घडत आहे याकडे लक्ष ठेवून शिक्षकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारी असली पाहिजे? 
*शिक्षकाने काय करावे हे सांगण्याची शासनाला गरज नसून पर्यवेक्षण करण्याची गरज आहे.* त्यासाठी शासनाने मोठी यंत्रणा उभारली आहे. आधी त्या यंत्रणेतील सर्व जागा भरलेल्या आहेत का, काही पदे रिक्त आहेत का? पदे रिक्त असतील तर ती भरली जावीत याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. सर्व शिक्षक शाळेत बरोबर जातात का, दिवसभर शाळेत राहतात का, वर्गावर्गांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया नीट सुरू आहे का, मुले शिकत आहेत का, शिक्षकांना काही शैक्षणिक अडचणी येत/जाणवत आहेत का, त्याला सपोर्टची गरज आहे का, कुणी शिक्षक वारंवार गैरहजर राहतोय का, व्यसन करून येतोय का आणि तसे असेल तर काय उपाय करावे लागतील यावर प्रशासकीय यंत्रणेने विचार करावा. शाळेत, वर्गात कोणते शैक्षणिक अनुभव द्यावेत याचा विचार शिक्षक करतील. आपण तो करू नये असे वाटते. हवे तर आपण असा एक समृद्ध प्लॕटफाॕर्म उपलब्ध ठेवावा जेथून शिक्षक नवनव्या कल्पना स्वतःहून उचलू शकतील. आपले अनुभव शेअर करू शकतील. 
एखाद्या केंद्राच्या whatsapp group वर डोकवा तुम्ही काय दिसून येते ते जरा अनुभवा. मिनिटा, तासागणिक येऊन आदळणारे प्रशासकीय आदेश आणि त्यामुळे हैरान परेशान झालेले मुख्याध्यापक, शिक्षक. केंद्रप्रमुखाचे पद शाळाशाळांतील गुणवत्ता वाढावी, शैक्षणिक विकास घडून यावा, प्रत्येक शाळेकडे लक्ष देता यावे यासाठी निर्माण झालेय. काय झालीय या पदाची अवस्था बघा जरा. मग तुम्ही विषयसाधनव्यक्ती पदाची निर्मिती केली. ते खरोखरीच रिसोर्स पर्सन होऊ शकले का, की ते ही एक कारकून होऊन बसलेत याकडे लक्ष घाला जरा. अशी कशी ही माहिती मागविण्याची भूक सा-या प्रशासकीय यंत्रणेला लागलीय? कुठे लिकेज होतेय म्हणून कागदे, प्रपत्रे, अहवाल मागणे, नानाविध लिंक्स भरणे अव्याहत सुरू आहे तरी पोट भरण्याचे लक्षण दिसत नाहीये?  आमच्या केंद्राचा केंद्रभार एका पदवीधर शिक्षकाकडे आहे. कल्पना करा त्यांच्याकडे त्यांच्या नावे असलेल्या वर्गाची काय स्थिती होत असेल. अशा परिस्थितीतही ते वर्गाची गुणवत्ता वाढण्यासाठी धडपडत असतात. या अशा अनेक बाबींकडे लक्ष द्यायचे सोडून वर्गाची गुणवत्ता स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याचा प्रयत्न करत आहात आपण.
केंद्रप्रमुख माहितीच्या देवाणघेवाणीत एवढे व्यस्त असतात, की ते आपल्या केंद्रात दर महिन्याला एक शिक्षणपरिषद आयोजित करू शकत नाहीत. एखादे वेळी केलीच तर ती शासनाकडून येणारे आदेश, उपक्रम हे सांगण्यात आणि समजावून देण्यासाठीच केली जाते. यात केंद्रातील शिक्षक आपल्या वर्गात काय नवीन कल्पना लढवत आहेत, त्यांना काय नवीन सापडले आहे, काय अचिव्ह केले आहे, कोणत्या अडचणी, समस्यांना सामोरं जावं लागत आहे याची देवाणघेवाण होऊन ते एकमेकांनी स्वीकारण्याचा, अडणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न तर होतच नाही कधी. यासाठी आहे का केंद्र, केंद्रप्रमुख आणि केंद्राची शिक्षण परिषद? नेमकी कशासाठी आहे याचा कृपया खुलासा व्हावा. 
शासनाने विविध स्तरांवरून शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी, नागरीकांच्या आरोग्यासाठी, शाळेच्या भौतिक विकासासाठी वगैरे उपक्रम, उपाययोजना, नवनवीन कल्पना कराव्यात. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी कल्पना लढवायला शिक्षक आहेत आणि ते सक्षम आहेत. 
माझ्या शाळेत केंद्रप्रमुखांनी, विस्तारअधिऱ्यांनी, जमलेच तर एखादी वेळ गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेट द्यावी याची गरज मला बरेचदा जाणवते. मला येणाऱ्या समस्यांचे समाधान, वरून, दूरच्या शासनस्तरावरून येणाऱ्या उपक्रमांमध्ये, योजनांमध्ये सामावलेले नसते. ते मला इथेच  माझ्या नजिकच्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत मिळू शकते. पण आपण ही यंत्रणा आमच्यासाठी उपलब्ध ठेवलीच नाही. त्यांना तुम्ही माहितीच्या, कागदपत्रांच्या पुरात बुडवून त्यांचा श्वास कोंडून टाकलाय तुम्ही. त्यांची जी अवस्था तीच शाळेतील मुख्यध्यापकाची, प्रभारी मुख्याध्यापकाची. त्यामुळे ही माझी नजिकची यंत्रणा कशी बरे मला सहाय्य करेल? 
माझ्या या यंत्रणेला तुम्ही मोकळे ठेवा, मला मोकळे ठेवा शैक्षणिक विचार आणि त्यानुरूप कार्य करण्यासाठी. शैक्षणिक गुणवत्ता तुम्हाला आपोआप दिसेल. तुम्ही फक्त भौतिक सोयी सुविधा पुरवा, पुरेसा निधी पुरवा. प्रशासकीय यंत्रणा, शिक्षक काम करत आहेत, नाही आहेत, नवीन कल्पना लढवत आहेत नाही आहेत याकडे लक्ष ठेवा. आम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केवळ आव्हान द्या. आम्ही तयार आहोत. 
*खरे तर, शाळा तपासायला जायचंच नसतं. जायचं असतं ते शाळा अवलोकन्यासाठी.* मुलांच शिकणं अवलोकने, शिक्षकांचं शिकवणं अवलोकने, मुलांची, शिक्षकांची शिकण्या शिकवण्यासाठीची धडपड अवलोकने, शालेय परिसर, शाळेतील सोयीसुविधा अवलोकून जे चांगले असेल त्याचे कौतुक करून नसेल त्याची पुर्तता करण्याचा विचार करून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्रप्रमुखांपासून ते वरच्या अधिकाऱ्यांनी धडपडणे असे व्हायला हवे. आणि असे झाले तर शासन प्रशासनाच्या स्वप्नात असलेली गुणवत्ता दिसून यायला वेळ लागणार नाही. कारण मुले तर मुळातच बुद्धिमान, गुणवान आहेत आणि शिक्षकही. गरज आहे ती फक्त दृष्टिकोन बदलण्याची. 

वैशाली गेडाम
प्राथमिक शिक्षक
जि. प. प्रा. शाळा, गोंडगुडा (धोंडाअर्जूनी )
ता. जिवती
जि. चंद्रपूर.

*कोरोना काळ आणि माझा परिवार.*
(प्रत्यक्ष अनुभव कथन केला आहे.)
... वैशाली ताई गेडाम. 

मी अजून विचारात आहे लिहू की नको या. लिहू तर लिहू कसं. योग्य शब्दात मांडता पण आलं पाहिजे. तसं न सांगणं हा ही गुन्हाच. ब-याच महिन्यांपासून विचार करतेय लिहिण्याचा पण....
धुडकावून तर लावलं जाणारच. कारण...असू दे. मी जे ऐकलं, ते समजून घेतलं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तो  यशस्वी झाला. त्या यशस्वीतेचा आनंद घेतला. तर ते सगळ्यांना सांगावं वाटतं. मरण्यापेक्षा अन् भीतीच्या छायेत वावरण्यापेक्षा अन् इमोशनल होण्यापेक्षा ही काय नवीन उपचार पद्धती आहे (आणि नुसतीच उपचार पद्धती नाही तर एक आहारशैली सुद्धा) ती समजून घेणं, वापरून पाहाणं अधिक चांगलं. जगभर ज्या उपचार पद्धतीचा प्रचार प्रसार होत आहे. लोक दुरूस्त होत आहेत आरोग्याचे जीवनमान उंचावत आहेत ती सर्वांपर्यंत पोचावं असं वाटतं. तसं बोलायला जरा मन कच खातं. पण हिंमत करते. चुकलं माकलं तर माफ करा. पण सांगणं तर आवश्यक आहे. 
सुदैवान घरातच पेशंट आणि तेही बक्कळ पेशंट झाले एवढ्यानं बरं. म्हणजे अनुभव गाठीशी आहे. आई, वडील, भाऊ, बहिण, मी, माझी दोन्ही मुलं असे सगळे आजारी पडून झालो. वडिलांना तर *आयसीयु* मधुन उपचार न करताच घरी परत आणलं आॕक्सीजन लेवल कमी होत असताना. ते आधी सांगते.  - 
वडीलांना चक्कर आणि उलट्यांचा त्रास होत होता म्हणून गावाहून आईबाबा चंद्रपूरला आले. ही 21 आॕक्टोबर 2020 ची गोष्ट. त्यांना एका चांगल्या हाॕस्पीटलमध्ये तीनचार दिवसासाठी अॕडमिट व्हायचं होतं. तशा तयारीनेच ते आले होते. असा त्रास त्यांना तीन वर्षांपूर्वी देखील झाला होता. आणि चार दिवस अॕडमिट राहून ते दुरूस्त झाले होते. आता पण वडीलांनी तोच विचार केला. एका चांगल्या हाॕस्पीटलमध्ये मी आणि माझी बहिण वडीलांना घेऊन गेलो. डाॕक्टरांनी तपासलं. अॕडमिट होता का विचारलं. वडील तयारच होते. वडीलांनी चांगली खोली घ्यायला सांगितली. त्याच हाॕस्पीटलच्या लॕबमध्ये युरीन आणि ब्लड टेस्ट करून झाल्या. चक्कर येते म्हणून एम. आर. आय. करायला सांगितलं. वडील सुपर डिलक्स खोलीत अॕडमिट झाले. आणि मग मोठ्ठे मोठ्ठे ट्रे भरून सलाईन, इंजेक्शन्स गोळ्या....
संध्याकाळी एम. आर. आय. करायला घेऊन गेलो. रिपोर्ट मध्ये मेंदूत रक्ताच्या गाठी तयार होत आहेत. पार्किन्सन आणि अल्झायमरची लक्षणे दिसत आहेत असं लिहून होतं.
वडीलांकडे सतत लक्ष ठेवावं लागे. बाथरूममध्ये पकडून न्यावं लागे. लघवी होतपर्यंत धरून ठेवावं लागे. हाॕस्पीटलचा पहिला दिवस गेला.
दुसऱ्या दिवशी नागपूरवरून दादा (मोठा भाऊ) आला. दुपारी चारच्या सुमारास नर्सला वडीलांची आॕक्सीजन लेव्हल कमी दिसली. (आॕक्सीजन लेव्हल 93) तिने डाॕक्टरांना फोन केला. डाॕक्टर म्हणाले, त्यांना ताबडतोब आय.सी.यु. त हलवा. वडीलांना आयसीयुत नेलं. नर्सला जेवढी जेवढी यंत्रे आवश्यक वाटली ती सगळी लावली. आॕक्सीजन लेव्हल आता स्क्रिनवर दिसू लागली. ती 92 तर कधी 93 परत 92 अशी होऊ लागली. संध्याकाळी मी आत भेटायला गेल्यावर वडील म्हणाले, मला इथं कशाला आणलं? मला इथं चांगलं वाटत नाही आहे. मला कालपर्यंत थोडं बरं वाटत होतं. आता मला चांगलं वाटत नाही. मी वडीलांच्या डोक्यावर थोपटत म्हणाले, तुम्ही घाबरू नका. आपलं पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. लांब श्वास घ्या. आॕक्सीजन लेव्हल चांगली दिसली की डाॕक्टर तुम्हाला इथून बाहेर काढतील. 
तिसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी वडीलांच्या छातीचा एक्सरे काढला. तिथे त्यांना फुफ्फुसात इन्फेक्शन दिसलं. ते म्हणाले, यांना सी. टी. स्कॕनसाठी न्यावं लागेल आणि कोरोना टेस्ट करावी लागेल. सॕम्पल घेणारा मुलगा आला आहे. कोरोना टेस्टसाठी सॕम्पल घेऊन झालं की तुम्ही सी. टी. स्कॕनसाठी घेऊन जा. 
मी विचारलं, सी. टी. स्कॕन कशासाठी? ते म्हणाले, निमोनियाचं लक्षण दिसत आहे. सी. टी. स्कॕन केलं की आपल्याला क्लिअर होईल. आणि कोरोना टेस्ट आवश्यक आहे. मी म्हणाले, थांबा. सध्याच कोरोना टेस्ट करू नका. आम्ही तुम्हाला दोन मिनिटात सांगतो. ते म्हणाले, लवकर सांगा. मुलगा थांबून आहे. 
आम्ही डाॕक्टरांच्या केबिनमधून बाहेर आलो. कोरोना म्हटल्यावर दादा जरा चरकला. म्हणाला, आता कसं? 
मी म्हणाले, आपण बाबूजींना घरी घेऊन जाऊ. दादा म्हणाला, घरी नेऊन कसं करायचं? मी म्हणाले, बाबूजींना जास्त काही झालेलं नाही. बाबूजींचा प्राॕब्लम वेगळा आहे. इथं वेगळंच सुरू होईल. समजा कोरोना रिपोर्ट पाॕझिटिव्ह आला आणि तो येणारच तर इथून कोविड सेंटरला पाठवतील अन् कोरोनाचे उपचार सुरू करतील. मूळ प्राॕब्लम बाजूलाच राहिल. कोरोना झालाही असेल तरी आपल्याजवळ उपाय आहे. आपण घरी तो करू शकतो. आपण बाबूजींना घरी नेऊ. 
दादा माझ्यावर विश्वास ठेवून तयार झाला. मी आय. सी. यु. त जाऊन डाॕक्टर काय म्हणत आहेत ते बाबूजींना सांगितलं. बाबूजी एकदम म्हणाले, नाही नाही नाही. मी काही सी. टी. स्कॕन साठी वगैरे पुन्हा जाणार नाही. त्यादिवशीच एम. आर. आय. केलं न आता पुन्हा कशाला सी. टी. स्कॕन? मी बाबूजींना सी. टी. स्कॕन कशासाठी ते सांगितलं. बाबूजींची अजिबात इच्छा नव्हती. बाबूजींना तिथे रहायचंच नव्हतं. मी म्हणाले, आपण घरी जाऊ का सुट्टी करून? बाबूजी पटकन हो म्हणाले. मला इथं रहायचं नाही म्हणाले. हे काय इतकं सगळं माझ्या अंगाला लावून ठेवलं? मला काय झालं आहे? मला त्रास कोणता होता नि इथे उपचार कोणते सुरू आहेत? 
मी पुन्हा विचारलं, घरी जायचं का? बाबूजींनी पुन्हा होकार दर्शवला. मी दादाला बाबूजींचा होकार सांगितला. दादा म्हणाला, पण सुट्टी कशी करायची? डाॕक्टरांना काय सांगायचं? 
मी म्हणाले, तू सांग की मी नागपूरहून आलोय वडिलांच्या तब्येतीसाठी. मला इथे राहून वडिलांचा उपचार करणे अडचणीचे जातेय. मला सुट्टी मिळत नाही. मी वडिलांना नागपूरला घेऊन जातो. मला ते सोयीचं होईल. दादाला पटलं. दोघेही डाॕक्टरांच्या केबीनमध्ये गेलो आणि सांगितलं. डाॕक्टर म्हाणाले, तुम्ही नागपूरला गेलात तरी कोविड टेस्ट केल्याशिवाय कुणी डाॕक्टर घेणार नाही त्यांना. दादा म्हणाला माझा मित्र डाॕक्टर आहे. मी त्याच्याशी बोललो. तो घेऊन ये म्हणाला. 
डाॕक्टर सुट्टी करायला तयार झाले. आम्ही बाहेर आलो. डिस्चार्ज फाईल तयार करायला दिडेक तास लागला. डाॕक्टरांनी मेडीसीन वगैरे लिहून दिल्या. फिस पे करून बाबूजींना घेऊन आम्ही घरी आलो. बाबूजींना घरी आल्यावर जरा बरं वाटलं  
बाबूजींना घरी तर आणलं पण पुढे आता आव्हान होतं. त्यांना बरं वाटत नसावं. ते म्हणाले तुमचे नेहेमीचे जे डाॕक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊ का आपण? आमचे नेहेमीचे डाॕक्टर म्हणजे घराजवळचे बि. एच. एम. एस. डाॕक्टर. मी म्हणाले ठिक आहे. त्यांचा सल्ला घेऊ. मी त्यांना फोन केला. सगळं सांगितलं. ते म्हणाले, तुम्ही मेंदूतज्ज्ञाकडे जा. मी म्हणाले, तुम्ही थोडं बघा नं. त्यांनी असमर्थता दर्शविली. कोव्हिड टेस्ट आवश्यक आहे त्याशिवाय बघता येणार नाही म्हणाले. मग मी आणि दादा जवळच्या एका एम. बी. बी. एस. डाॕक्टरकडे गेलो. तेथील नर्स म्हणाली, कोरोना रिपोर्ट घेऊन या. आम्ही दोघं बाहेरच होतो नि आईचा फोन आला, लवकर घरी या बाबूजींना खूप ताप भरला. कसेतरीच करत आहेत. आम्ही पटकन घरी आलो. बाबूजींचं अंग तापत होतं आणि बाबूजी कण्हत होते. आई आणि बहिण घाबरून घाबरून गेल्या होत्या. मी म्हटलं,  थांबा घाबरू नका. फ्रिजमधून बर्फ काढला पाण्यात मिसळला. ओढणी आणि रुमाल घेतले. रुमालची घडी करून थंड पाण्यात बुडवून काढून कपाळावार ठेवली. ओढणीची घडी करून तिला थंड पाण्यात बुडवून पोटाभोवती गुंडाळली. बाबूजींना थंड पाणी झोंबत होतं. ते प्रत्येक वेळी पट्टी बदलवतांना थोडे ओरडायचे. आम्ही जवळपास पंधरा वीस मिनिटं असं केलं. हात पाय थंडगार पाण्याने पाच सहा दा पुसून काढले. अंग थोडं थंड पडलं. मग संत्रा ज्युस दिला. आणि त्यानंतर एखादी तासाने काढा दिला. बाबूजींचे पाय खूप दुखत होते. ते चेपून दिले. बाबूजी झोपले. सगळे झोपले. मी जागत राहिले. बाबूजींची जराही हालचाल दिसली की उठून त्यांच्याजवळ जायचं. बाथरूमला जाता का विचारायचं. बाथरूमला घेऊन जायचं. त्यांना धरून ठेवायचं. पकडूनच आणून बेडवर झोपवायचं. 
दुसऱ्या दिवशी वडिलांना पुन्हा सिट्रस फ्रुट ज्युसेस आणि नारळपाणी दिले दिवसभर. थोडं जेवणही दिलं. दुपारी चारला पुन्हा ताप भरला. पुन्हा कालच्यासारखाच थंड्या पट्टीचा उपचार. पुढे हा ताप कन्टीन्यु पाच दिवस राहिला. बाबूजी नजर उचलून बघत पण नव्हते. बेहोश असल्यासारखे रहायचे. त्यांना तिव्र अंगदुखी होती. आम्ही हातपाय चोळून द्यायचे. 
आम्ही म्हणजे मी, माझा नवरा आणि आमची सोळा आणि 19 वर्षाची दोन मुलं,  दादा, आई, बाबूजी, बहिण, बहिणीचे मिस्टर आणि तिचा सहा वर्षाचा मुलगा सगळे बाबूजींच्या सेवेत.  रोज दोन तीन वेळा नारळपाणी, संत्रा, मोसंबी किंवा पाईनॕपलचा ज्युस आणि भूक लागली तर ज्वारीची भाकर आणि तो महासूदर्शन काढा जो आम्ही अगोदरपासून वापरत होतो. पाचव्या दिवशी संध्याकाळी बाबूजींना बाथरूम मधून परत आणताना बाबूजींनी नजर उचलून मुलांच्या खोलीत बघितलं आणि हाताने ठिक आहे अशी खूण केली. मला तब्येतीत सुधारणा होत आहे हे त्यावेळी जाणवलं. त्यानंतर बाबूजी ठिक होत गेले. दोन वेळ छान जेवण करू लागले. मग आम्ही त्यांच्या मेंदूच्या प्राॕब्लमवर उपचार सुरू केला. ते मेडीसीन डाॕक्टरांनी लिहून दिलं होतं. तेही मेडिसीन डाॕक्टरांनी सांगितलेल्या डोजच्या अर्ध देत होतो वडिलांच्या समाधानासाठी. आम्ही त्यांच्या मेंदूसाठी मुख्य उपचार केला तो केशरचा (saffron) यावर काही संशोधने उपलब्ध आहेत. महिनाभरात वडील चांगले झाले. 
ही आॕक्टोबर महिन्यातील गोष्ट होती. बाबूजी आजारी पडण्याच्या एक महिना आधी बहिण नागपूरहून माहेरी आली होती. तेव्हा तिला हेवी ब्लिडींग सुरू होतं. ती नागपूरहून आल्यामुळे घरच्या दोन् मदतनीस पंधरा दिवस सुट्टीवर गेल्या कोरोनाच्या भीतीने. घरातील सगळी कामे, आई वडील आणि आपल्या लहान लेकराचं सगळं सांभाळणं तिच्यावर आलं. आधीच ती रुमॕटाईड आर्थराईटिस ची पेशंट. शरीराला तो ताण झेपेना. ते हेवी ब्लिडींग आणखी वाढलं आणि महिनाभर सुरू राहिलं. वेदना तर जीवघेण्या होत्या. नंतर जावई आणि वडिल तिला चंद्रपूरला घेऊन आले,  स्त्री रोग तज्ज्ञाकडून गर्भाशयाची सोनोग्राफी आणि इतर तपासण्या करून झाल्यावर गर्भाशयाला सूज आली आहे, ते मोठं झालेलं आहे आणि त्यात फोड आलेले आहेत  त्यामुळे कॕन्सर किंवा टी. बी. चा धोका आहे असे सांगितल्यानंतर माझी बहिण घाबरून गेली. सहा वर्षाच्या बाळाची चिंता तिला खाऊ लागली. तसं सोनोग्राफी झाल्या दिवसापासूनच मी तिला डि. आय. पी. डाएट घ्यायला सांगितलं. तपासण्या करून ती गावाला परत गेली. आणि तिच्या मदतीसाठी मग  दोन चार दिवसांनी मी पण माहेरी गेले. ती माहेरीच होती. पोंभूर्ण्याला (माहेर) मी पाच दिवस तिथे होते. पाचव्या दिवशी मला सडकून ताप भरला. अंग खूप तापलं आणि डोकं, हातपाय ठणकत होते. आईने थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवल्या. हात पाय थंड पाण्याने पुसून दिले. मी जेवण नाही घेतलं. आईने संत्रा ज्युस दिला. काढा घेतला. 
दुसऱ्या दिवशी ताप होताच. त्यातच चंद्रपूरहून रात्री आठच्या सुमारास लेकीचा फोन आला, तब्येत चांगली नाही ताप आला आहे म्हणून. मी तिला जेवण नको करू नारळपाणी आणि सिट्रस फ्रुट ज्युस वर राहाण्याचा सल्ला दिला. मुलाला तिच्याकडे लक्ष ठेवण्यास आणि वेळच्या वेळी तिला ज्युसेस देण्यास सांगितले. माझी तर हालत उठून जाण्यालायक त्या घटकेला नव्हती. दुसऱ्या दिवशी मला कमजोरी होती आणि थोडा ताप होता. पण लेक आजारी म्हटल्यावर आईला स्वस्थ कसं बसवणार? मी सकाळी दहा वाजताच्या सुमाराला माझ्या भाच्याच्या टु व्हिलर वर बसून पोंभूर्ण्याहून चंद्रपूरला आले. हा प्रवास एक तासाचा. सिद्धार्थ (मुलगा) बहिणीची नीट काळजी घेत होता. तिला ज्युस बनवून देणे, नारळपाणी देणे त्याने सुरू केले होते. केतकीला (मुलीला) सर्दी, डोकेदुखी आणि ताप अशी लक्षणे होती. तिला आम्ही तीन दिवस फ्ल्यु डाएट वर ठेवलं. (शहाळ्याचं पाणी म्हणजे नारळपाणी आणि सिट्रस फ्रुट ज्युस. याचं तीन दिवसांचं प्रमाण आजारी व्यक्तीच्या वजनानुसार असतं) आम्ही डाॕक्टरकडे नाही गेलो किंवा तपासण्या देखील नाही केल्या. तिसऱ्या दिवशी ती बरी झाली. चौथ्या दिवशी तिला साधं जेवण दिलं. तिला छान हुशारी आली. ती नाॕर्मल झाली. त्यानंतर दोन दिवसांनीच सिद्धार्थ (वय 16वर्षे) आजारी पडला. तो तर आपलं बेड सोडून आमच्या खोलीत आला अन् आमच्या बेडवर माझ्या कुशीत शिरून झोपायचा. त्याला पहिल्या दिवशी दिवसभर पूर्णपणे फ्ल्यु डाएटवर ठेवलं. तो नुसता नारळपाणी आणि ज्युसेसवर राहू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याने रात्री थोडा वरणभात घेतला. त्याला 103 F ताप होता. तो माझ्या कुशीत शिरल्यामुळं त्याच्या अंगाचे मला चटके बसत होते. तीव्र अंग आणि डोकेदुखीने त्याला झोप येत नव्हती. आम्ही ती रात्र कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी पण दिवसभर ताप आणि अंगदुखी. अशी स्थिती चार दिवस राहिली. चौथ्या दिवशी रात्री आठच्या सुमाराला त्याचा ताप कमी झाला. डोके आणि अंगदुखी कमी झाली. त्या रात्री त्याला झोप आली आणि मग मला पण झोपायला मिळालं. तीन रात्री आम्ही जागून काढल्या होत्या. नारळपाणी, सिट्रसफ्रुट ज्युसेस, काकडी, टमाटर भाजीपोळी किंवा वरणभाताचे एक वेळ जेवण हा त्याचा चार दिवसांचा उपचार होता. हा त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीनुसार होता. पाचव्या दिवशी तो फ्रेश वाटत होता. मी फिरून येऊ का? असे त्याने मला संध्याकाळी विचारले. मी त्याला आज पूर्ण आराम कर असा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी तो सकाळी आठ वाजता  मित्राकडे जाऊन येतो म्हणून गाडी (टु व्हिलर) घेऊन निघाला. दिवसभर आला नाही. मी त्याला मध्ये दोनतीनदा फोन केले. तो, मी मित्राकडे आहो. मी इकडेच जेवलो. तू टेन्शन नको घेऊ म्हणाला. रात्री आठ वाजता घरी आला. त्याला खूप भूक लागलेली होती. जेवता जेवता त्याने मला सांगितले, की तो seven sisters hills चढून आला. ते टू व्हिलरने गेले होते. seven sisters hills चंद्रपूरपासून 100 किमी. अंतरावर आहेत. टेकड्यांची लांबी 35 किमी आणि उंची 459 मीटर आहे. त्याने मला तो कोणासोबत गेला, टेकड्या कसे चढले, रस्ता कसा होता, चंद्रपूरपासून किती दूर आहे, कशी मजा आली ते सगळे सांगितले. वरून तो म्हणाला, मी समजा दवाखान्यात अॕडमिट झालो असतो किंवा मेडीसीनवर असतो तर मला एवढी एनर्जी असती का? मी आजही बेडवरच असतो. मला माहित होतं हे मॕजिक. मी त्याला रागावले नाही. अलिकडे wildfit नावाचा शब्द रुढ होतोय आरोग्यपूर्ण शरीराबाबत. मला ते आठवले. या नवीन आहारशैलीशी स्वतःला जोडून घेऊन लोक अनुभवत आहेत ते wildfitness आणि त्यावरूनच तो शब्द रुढ होतोय. 
मुलगी आणि मुलगा आजारी पडण्याचा हा काळ 12 आॕक्टोबर ते 20 आॕक्टोबरचा. त्यानंतर दोन दिवसातच वडिलांना अॕडामिट केलं होतं ती गोष्ट वर आलीच. या तिघांच्याही आणि बहिणीला हेवी ब्लिडींगचा व पंधरा दिवस मरणप्राय यातना होण्याच्याही आधी म्हणजे 31 आॕगस्टला मी आजारी पडले होते. म्हणजे झालं असं, लाॕकडाऊन आणि शाळा बंद असण्याच्या काळातही माझ्या शाळेच्या गावी मी  मुक्कामी असायचे. सोमवारी जाऊन शनिवारी परत यायचे. गावातील आठवीपर्यंतच्या मुलांचं शिकणं गावात सुरू होतं. अशीच मी 29 आॕगस्टला शनिवारी चंद्रपूरला परत आले आणि शनिवार रविवार घरी राहून सोमवारी 31 आॕगस्टला सकाळीच गोंडगुड्याला (शाळेच्या गावी) परत गेले. त्यादिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत 1 ली ते 8 वी पर्यंतच्या मुलांना शिकवलं. आणि दुपारी दोनच्या दरम्यान मला तब्येत खराब वाटू लागली. मला हळूहळू ताप भरला, नाकातून पाणी गळू लागलं, खूप थकल्यासारखं वाटू लागलं. काही खावं प्यावं वाटेना. मला कोरोनाच झाला की काय असं वाटू लागलं. मी एस. टी. बसने प्रवास केला होता. बस पूर्ण भरून असायची प्रत्येक प्रवासात. मला नक्कीच संसंर्ग झाला असेल अशी शंका मला वाटू लागली. त्याच दिवसांमध्ये दादाला मोठ्या भावाला कोरोना डिटेक्ट झाला होता. त्याच्या आजाराचा पाचवा सहावा दिवस होता. आता मला पण लक्षणे जाणवू लागली. मी दिवसभर खाटेवर पडून राहिले. मला उठावं वाटेना. संध्याकाळी वहिणीला फोन केला तर वहिणी म्हणाली दादाला कालपासून जेवण जात नाही आहे. उलट्या होत आहेत आणि धाप लागत आहे, श्वास फुलत आहे. मी पुन्हाच घाबरून गेले. दादा घरीच क्वारंटाईन झाला होता आणि वहिणीने सुट्टया घेतल्या होत्या. भाचीला म्हणजे त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलीला वहिणीच्या भावाकडे पाठवलं होतं. दादा डाॕक्टरांच्या उपचारासह मोसंबी ज्युस वगैरे घेत होता. त्या रात्री माझ्या तब्येतीमुळं आणि भावाच्या चिंतेमुळं मला रात्रभर झोप आली नाही. मी रात्र जमिनीवर बसून जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपासूनच मुलं घरी येऊन मला बोलवू लागली. मी त्यांना आज नाही शिकायचं मला बरं नाही म्हणून परत पाठवू लागले. मुलांनी आत येऊ नये, माझ्या जवळ येऊ नये म्हणून मी अंगणातील फाटक लावून घेतलं होतं. घरी फोन करून माझ्या तब्येतीबद्दल सांगितलं. मुख्याध्यापकांनी चंद्रपूरला परत जाण्याचा सल्ला दिला. प्रवासात मोबाईल चेक केला तर भावाचा मेसेज दिसला. त्याने लिहिले होते, माझा सी. टी. व्हॕल्यु फारच कमी आहे त्यामुळे मी डेंजर झोनमध्ये आहे. मी पुन्हाच घाबरून गेले. दुपारचे चार वाजता मी चंद्रपूरला पोचले. एक स्पेशल आॕटो केला. त्याला सांगितले अगोदर मला फळांच्या दुकानात घेऊन जायचे मग घरी सोडायचे. रस्त्यात फळांच्या दुकानात थांबून मी दहा शहाळे तीन अननस आणि दोन किलो मोसंबी घेतली. हे मी तीन दिवसांच्या फ्ल्यु डाएटच्या हिशेबाने जेवढी मात्रा घ्यावी लागेल त्या क्वान्टीटीमध्ये घेतले. घरी आले. अंघोळ केली आणि बेडवर पडले. भावाला फोन करून, रिस्क नको घेऊ दवाखान्यात अॕडमिट हो म्हणाले. भाऊ पण हो म्हणाला. आणि अडीच तीन तासातच भावाचा मेसेज आला, मला बरं वाटत आहे. मी उठून बसलो आहे. मी गुळ आणि हळदची गोळी खाल्ली आणि आता चहा बिस्कुटे पण खाल्ली. त्याचा प्राॕब्लम असा झाला होता, की त्याच्या हेवी मेडिसीन डोजमध्ये डाॕक्टर अॕसिडीटीची गोळी द्यायला विसरले होते. वहिणीच्या भावाच्या लक्षात ते आलं आणि त्याने तत्काळ जाऊन अॕसिडीटीची गोळी आणली. भावाने ती घेतली आणि प्राॕब्लम साॕल्व झाला. समजा ही गोष्ट वेळीच लक्षात आली नसती तर त्याचा जीव धोक्यात असता. दादा बरा आहे म्हणून मला हायसे वाटले. पण माझी तब्येत मात्र बिघडत होती. संध्याकाळचा स्वयंपाक मुलांनी केला. मी जेवले नाही. मला जेवावे वाटत नव्हते. फळांचा उपचार मी दुसऱ्या दिवशीपासून घेण्याचे ठरवले होते. पण तब्येत आणखी आणखी खराब वाटू लागली. स्वस्थ पडून राहाणं पण जड जात होतं. शेवटी रात्री दहाच्या सुमाराला मी नव-याला दवाखान्यात घेऊन चल म्हणाले. आम्ही आमच्या नेहेमीच्या जवळच्या डाॕक्टरकडे गेलो. तिथे खूप गर्दी होती. एक तास वाट बघावी लागली. माझ्याच्याने बसवत नव्हते. अंग टाकून द्यावे वाटत होते. नाक सतत वाहत होता. बाजूला बसलेल्या नव-याला इन्फेक्शन होईल असंही वाटे. त्याला दूर बस म्हटलं तर तो तुझ्याजवळच बसतो म्हणाला. रात्री सव्वाअकरा वाजता डाॕक्टरकडे नंबर लागला. त्यांनी तपासलं व मेडीसीन लिहून दिल्या. मी विचारले, कोरोना टेस्ट करावी लागेल का? त्यांनी पाच दिवसांनी बघू सध्या हा पाच दिवसांचा डोज घ्या म्हणाले. आत्ता रात्री जेवणानंतर एक डोज घ्या म्हणाले. मी म्हटले माझी जेवण करायची इच्छा नाही. तर जेवल्याशिवाय गोळ्या घेऊ नका असं त्यांनी सांगितलं. घरी आल्यावर अनिच्छेनेच मी थोडं जेवले तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. गोळ्या घेऊन मी झोपण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी तब्येत पुन्हा तशीच होती. एकाच डोजमध्ये काही मी दुरूस्त होणार नव्हते. त्यांनी पाच दिवसांसाठी मेडीसीन लिहून दिलं होतं. मी फार्मसीतून दोनच दिवसांचा डोज आणला होता. माझ्या डोक्यात डाॕ. बिस्वरूप राॕय चौधरी यांनी सांगितलेला *थ्री डेज फ्ल्यु डाएट प्रोटोकाॕल* घोळत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पण थोडं जेवण करून चारपैकी दोन गोळ्या घेतल्या. पण मला जेवायचंच नव्हतं अन् मेडीसीन तर घ्यायचीच नव्हती. मला खरं तर दुसऱ्या दिवसाच्या सकाळपासूनच फ्ल्यु डाएट घ्यायचं होतं पण हिंमतही होत नव्हती. खरंच ही फळं काम करतील का? काही कमी जास्त झालं नि आपल्याला भलतच काही झालं तर? जिवाला धोका झाला तर? असे अनेक विचार येत होते. द्विधा मनःस्थिती होती. डाॕ बिस्वरूपकडून ऐकलं होतं, कोरोना असेल तरी किंवा इतर कोणताही वायरल आजार असेल तरी ह्या डाएटनी तीन दिवसात तो कमी होईल याची खात्री ते देत होते. मला ट्राय करायचा मोहही व्हायचा आणि भीतीही वाटायची, मी डाॕ. बिस्वरूपना मेल केली. त्यांच्या टीमकडून गुगल फाॕर्मची लिंक आली. ती भरून पाठवायची. त्यात आपले नाव, वय, वजन, उंची, खाण्यापिण्याच्या सवयी आणि सध्याची शारीरिक आरोग्य स्थिती एवढी माहिती भरायची होती. मी भरली. फाॕर्मच्या शेवटी डिस्क्लेमर होतं, की मी हा उपचार स्वतःच्या मताने घेत आहे आणि काही कमी जास्त झाल्यास ते जबाबदार राहाणार नाहीत. मला शेवटचं हे काही आवडलं नाही. तसं तर सगळ्याच दवाखान्यांमध्ये हा  सोपस्कार करावा लागतो. पण मला भय वाटलं आणि मी फाॕर्म कॕन्सल केला. पण डाॕक्टराच्या गोळ्यांचा दुपारचा आणि रात्रीचा डोजही नाही घेतला. नुसती द्विधा मनःस्थितीत होते. ताप, नाक वाहात, घशात खवखव, डोकेदुखी अशा अवस्थेत मी हा दुसरा दिवस काढला. रात्री मी काहीतरी पक्का निश्चय केला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपासून मी फ्ल्यु डाएट सुरू केलं. माझ्या वजनाच्या हिशेबानुसार मला पाच ग्लास नारळपाणी आणि पाच ग्लास सिट्रस फ्रुट म्हणजे मोसंबी, अननस चा ज्युस घ्यायचं मी ठरवलं. त्यावेळी संत्री अजून निघायची होती. मोसंबी आणि अननस भरपूर होते मार्केटमध्ये म्हणून मी ही फळे निवडली. दिवसभर याशिवाय आणखी काही खायचे प्यायचे नव्हते. मी एकेका तासाने आलटून पालटून शहाळे किंवा ज्युस पीत होते. दुपारी बाराच्या दरम्यान मी पुन्हा ती गुगल लिंक ओपन केली आणि फाॕर्म सबमिट केला. एक दिड तासातच त्यांचा रिप्लाय आला, त्यांनी तीन दिवसांचं फ्ल्यु डाएट समजावून सांगितलं होतं. ते मला आधीच माहित होतं त्यांचे व्हिडीओज पाहून पाहून. दुपारी चारच्या सुमारास एक फोन आला. तो विवेक नावाचा एक तरुण होता. त्याने सांगितले की डाॕ. बिस्वरूप राॕय चौधरी यांच्या N.I.C.E. ( Network of Influenza Care Experts ) टिमचे मेम्बर आहेत. त्यांनी माझ्या आजाराची चौकशी केली. तीन दिवसांचा आहार समजावून दिला. मी मध्ये मध्ये फोन किंवा मेसेज करून फाॕलो अप घेत राहीन म्हणाला. काही अडचण आल्यास तुम्ही मला काॕल करा किंवा मेसेज टाका म्हणाला. मी त्यांना धन्यवाद दिले आणि सकाळपासून सुरू केलेले माझे फ्ल्यु डायट  पुढे सुरू ठेवले. पूर्ण दिवसभरात इतर काहीही न खातापिता पाच ग्लास नारळपाणी आणि पाच ग्लास सिट्रस फ्रुट ज्युस वर मी राहिले. भूक वगैरे काही लागली नाही. 
दुसऱ्या दिवशी सकाळी झोप उघडल्यावर बेडवर पडल्या पडल्याच सर्वात आधी मला हे जाणवलं की आपलं नाक आणि घसा पूर्णपणे क्लिअर आहे. मी लांब श्वास घेऊन पाहिला. कोणतीही आडकाठी न येता हवा नाकातून सरळ सहज आत गेली. कालपर्यंत जी नाक वाहण्याची आणि मध्ये मध्ये नाक बंद होण्याची समस्या जाणवत होती, घसा आणि डोकं दुखत होतं असं आता अजिबातच नव्हती. मला हायसं वाटलं. फ्रेश वाटलं. दुसऱ्या दिवसाचा डोज तीन ग्लास नारळपाणी आणि तीन ग्लास सिट्रसफ्रुट ज्युस असा होता. तो घेता घेता दुपारपर्यंत मला इतकं हलकं फुलकं आणि फ्रेश वाटू लागलं की मला उड्या माराव्या,  धावावं असं वाटू लागलं. मला जणू जादू झाल्यासारखी वाटू लागली. संध्याकाळी एक काकडी आणि टमाटर खाल्लं. तिसऱ्या दिवशी दोन दोन ग्लासांचा डोज होता माझा. तो झाल्यानंतर दुपारी काकडी टमाटर, संध्याकाळी काकडी टमाटर आणि सात वाजता वरणभाताचं जेवण. वरणभात जेवतांना खूप त्रास झाला तोंडाला. कारण तीन दिवस असं ठोस अन्न काही चावलं नव्हतं. 
चौथ्या दिवशी मात्र सकाळपासूनच लूज वाटू लागलं. चक्कर आल्यासारखं, शरीरात त्राण नसल्यासारखं वाटू लागलं. मी विवेकला तसं कळवलं. त्याने मला खजूर  खाण्याचा सल्ला दिला. मी त्यादिवशी जेवण केलं नाही. मला वाटे, काल संध्याकाळी मी जो थोडासा वरणभात जेवले त्यामुळे तसं होत असावं. मी पुढचे तीन दिवस फळे, सलाद, खजूर, किशमिश, शेंगदाणे फुटाणे अशा आहारावर राहिले मग बरे वाटू लागले. सातव्या दिवशीपासून नाॕर्मल जेवण घेऊ लागले. तब्येत चांगली ठणठणीत झाली. गोंडगुड्याला पहेत गेले.  चारपाच किलोमीटर सहजपणे आणि वेगाने फिरून येऊ लागले. त्यानंतर मग माझी दोन्ही मुलं आणि बाबूजी एकापाठोपाठ आजारी पडले आणि तेही याच उपचारांनी बरे झाले. त्याची गोष्ट वर आलीच आहे. याच दरम्यान बहिणीच्या सहा वर्षाच्या  मुलाला पण ताप, सर्दी खोकला झाला आणि तोही तीन दिवसात आमच्यासारखाच घरी दुरूस्त झाला संत्रा ज्युस आणि काढा पिऊन. नाहीतर त्याला एकदा सर्दी झाली की ती किमान पंधरा दिवस चालायचीच आणि डाॕक्टरांकडे तीन चकरा व्हायच्याच. 
त्यानंतर आत्ता ह्या 11 मार्च 2021 मुलगी (केतकी) पुन्हा आजारी पडली. तेव्हा कोरोनाची दुसरी लाट येऊन आदळत होती. आणि नागपूरमध्येच सर्वात जास्त पेशंट आढळत होते. केतकी तिच्या मावशीकडे नागपूरलाच गेली होती. तिथून 11 मार्चला संध्याकाळी तिचा फोन आला तिला ताप आलाय म्हणून. मी म्हटले, काही होत नाही. रात्री जेवण करू नकोस. भूक लागली तर संत्रा, मोसंबी किंवा पायनॕपलचा ज्युस घे. दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजतपर्यंत ती फळांवरच होती. दुपारी तिला खूप भूक लागली म्हणून ती वरणभात जेवली. आणि संध्याकाळी पुन्हा ताप वाढला. मग मी तिला तिसऱ्या दिवसापासून फ्ल्यु डाएटवर राहाण्याचा सल्ला दिला. बहिणीला तसे सांगितले अन् मी पण चंद्रपूरहून नागपूरला गेले. हा तिच्या आजाराचा तिसरा दिवस होता अन् फ्ल्यु डाएटचा पहिला दिवस. तिच्या वजनानुसार पाच ग्लास नारळपाणी आणि पाच ग्लास ज्युसेस यात संत्रे, मोसंबी, पाईनॕपल तिन्ही प्रकारचे ज्युस आलटून पालटून होते. रात्री ती झोपली. रात्री दोनच्या सुमारास उलटी येतेय म्हणून ती उठली. मी तिला बाथरूमकडे घेऊन गेले. आणि बाथरूमजवळ जाताच ती कोसळू लागली. तिला चक्कर आणि ग्लानी येत होती. डोळे फिरवत होती. मी तिला घट्ट पकडून बाला होशमध्ये रहा होशमध्ये रहा म्हणत होते. ती मला म्हणाली, मला खाली झोपव न. माझ्या काळजात चर्र् झालं. मी आणि बहिण तिला बेडरूम नेण्यासाठी उचलू लागलो तर इथंच झोपव म्हणाली. आम्ही तिला बाथरूमजवळच जमिनीवर झोपवलं. फ्रेश एअरसाठी गॕलरीतले दरवाजे उघडले. तिने चार पाच मिनिटांनी डोळे उघडले. मग बेडरूममध्ये आली. झोपली. दुसऱ्या दिवशी आम्ही तिला चंद्रपूरला घेऊन आलो. तीन दिवस ती केवळ नारळपाणी आणि सिट्रस फ्रुट ज्युसवर राहिली. पण त्यानंतरही ताप होताच. सात दिवस मी दम धरून राहिले. ज्युसेस, फळे, सलाद आणि काढा देत. पण ताप काही उतरेना. सातव्या दिवशी मला भय वाटलं. नवरा पण घाबरला. टेस्ट करून घेऊ म्हणू लागला. मी डॕ. बिस्वरूप राॕय चौधरींना मेल केली. त्याच दिवशी त्यांच्या टीमकडून रिप्लाय आला. त्यांनी गुगल फाॕर्म ची लिंक पाठवली. मी पेशंटची करंट सिच्युएशन भरून फाॕर्म सबमीट केला. दुसऱ्या दिवशी मला एक फोन आला. त्यांनी विचारपूस केली. केतकीची केस N. I. C. E टिममधील मेम्बर हैद्राबादच्या व्हि. एस. लक्ष्मी यांच्याकडे सोपवली होती. आम्ही त्यांची 500 रु. फिस आॕनलाईन जमा केली. त्या आजार दुरूस्त होतपर्यंत सोबत असणार होत्या. त्यांनी फ्ल्यु डायट तीन दिवस घ्यायला सांगितलं. मी म्हटलं की तो उपचार आमचा करून झाला. मग त्यांनी दिवसातून एकवेळ नारळपाणी आणि एक वेळ कोणताही एक सिट्रस फ्रुट ज्युस द्यायला सांगितला. आणि सोबत कोणती फळे खायची, कोणती नाही खायची, कोणत्या पानांचा रस द्यायचा, सलाद किती वाजता खायचं सगळं सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी तिला पुन्हा एकदा थ्री डेज फ्ल्यु डाएटवर तिला ठेवलं. दिवसातून तिनदा त्या follow up घेत होत्या. आम्ही दिवसातून पाच सहा वेळ टेंपरेचर मोजत होतो. ते 102 f च रहायचं. ताप कमी होईना. नवव्या दिवसापासून सकाळी टेंपरेचर नाॕर्मल रहायचं आणि दुपारी तीन चार वाजता चढायचं. रात्री नऊ वाजेपर्यंत परत 102f व्हायचं. अशी स्थिती पुढचे पंधरा वीस दिवस राहिली. आजाराचा तेरावा दिवस होता. मी शाळेत जाण्याची तयारी करीत होते नि ती बाथरूमला गेली. बाथरूममधून परत येताना तिला पुन्हा चक्कर आली व ती कोसळू लागली. मी तिला पटकन घट्ट पकडून ठेवले. यावेळी पण तिने खाली झोपवा असे म्हटले. ती खाली झोपवा म्हणाली की मला भय वाटायचे. खाली म्हणजे तिला चटईसुद्धा नको असायची. नंतर बिस्वरूप राॕय चौधरी यांच्या आॕफिसमधून आलेली माहिती वाचली त्यातही लिहून होते, पेशंटला बरे वाटत नसेल, चक्कर येत असेल तर जमिनीवर झोपवा म्हणून. ते वाचून मला गंमत वाटली. केतकीला नॕचरलीच तसे वाटत होते. मध्ये मध्ये टेस्ट करावी का असा विचार यायचा. नवरा तर एकदा चांगलाच रागावला. केतकीची हालत बेडवरून उठून चालण्याची नव्हती. केवळ बाथरूमसाठी ती उठायची. तेही आम्ही सोबत असायचो तिच्या. पण नवरा रागावला म्हणून मी लेबाॕरेटरीला फोन करायला निघाले घरी येऊन ब्लड, युरीन आणि स्वॕब चे सॕम्पल घेण्यासाठी. तर नव-यानेच थांबवले. होईल या उपचारांनी बरी आपण धीर धरू म्हणून. व्ही. एस. लक्ष्मी पण सांगत होत्या, टेंपरेचर 102 f पर्यंत राहाते तर घाबरण्याचं कारण नाही. टेस्ट वगैरे करू नका. 
केतकी पूर्णपणे राॕ फुडवर होती. महिनाभर तिने शिजवलेले अन्न घेतले नाही. रोज फळे, फळांचे ज्युसेस, सलादमध्ये काकडी, गाजर, टमाटर, बीट, तीन दिवस पपईच्या पानांचा रस, मग  गुळवेलचा काढा, खूबकला, मिन्टज्युस, हळदीचा काढा, तुळस, कोथिंबिरीचा काढा, असं सुरू होतं. हे सगळं घेऊन ती त्रासली होती. पण घेत होती आणि प्रतिसाद देत होती. 
केतकीला 23 दिवास ताप होता. एव्हाना आम्ही तिला टायफाईड झाला असावा असा निष्कर्ष काढला. कारण टायफाईडचा ताप दीर्घ मुदतीचा असतो. पहिल्या आठवड्यात दिवसभर ताप आणि अंग, डोकेदुखी असते. दुसऱ्या आठवड्यात दुपारपासून चढतो आणि सकाळी शरीर नाॕर्मल राहाते. तिसऱ्या आठवड्यात ताप कमी जास्त होत राहातो. त्यानुसार आम्हाला तो टायफाईड वाटला. तो घरीच दुरूस्त करायचा होता. आम्हाला याचा अनुभव यापूर्वी दोनदा आला होता केतकीसाठीच आणि दवाखान्यात भरती राहाणे, पॕरासिटामोल, स्टिराॕईड्स, इतर ड्रग्ज मेडीसीनचे परिणाम शरिरावर झाले होते. लवकर थकणे, सुस्ती राहाणे असे परिणाम तिला त्रास देत होते.   यावेळी धीर धरून आणि आरोग्यपूर्ण आहाराच्या जोरावर ती यातून बाहेर पडली. ती फ्रेश आहे आता. खरेतर ती याच आनंदात आहे, की तिला हाॕस्पीटलाईज व्हावं लागलं नाही.  
कॕन्सरची भीती घातलेल्या बहिणीनेही मात केलीय या आहारशैलीच्या भरवशावर. युटेरस धुलाई करून त्याचे सॕम्पल तपासणीला दिल्यानंतर तो रिपोर्ट घेऊन डाॕक्टरांनी बोलावलं होतं. मात्र तो रिपोर्ट आल्यानंतर तो घेऊन ती पुन्हा दवाखान्यात नाही गेली. सोनोग्राफी आणि युटेरस धुलाई केल्यानंतर तिच्या वेदना अतिशयच वाढल्या होत्या. मरणप्राय वेदना जणू. मात्र तरीही धीर धरून आणि विश्वास ठेवून तिने हा नॕचरोपॕथी आहार घेतला व तिच्या रुमॕटाईड आर्थरायटिस आणि गर्भाशयाचा आजार या दोन्हीतून ती जवळपास 90% बाहेर पडलीय. तीन महिने ती पूर्णपणे राॕ फुड वर होती. आणि आत्ता ह्या एप्रिलमध्ये तिने कोविड रुग्णाची म्हणजे तिच्या नव-याची महिनाभर सेवाही केली. सोबतच तिच्या अपार्टमेन्टमध्ये ज्यांच्या घरी सर्वच्या सर्व सदस्य पाॕझिटिव्ह होते अशा दोन घरी तिने सकाळ संध्याकाळ दहा दिवस जेवण स्वतः तयार करून स्वतः नेऊन देणे अशी कामे केलीत. हे सांगणे ह्यासाठी आवश्यक कारण तिला रुमॕटाईड आर्थरायटिस हा आॕटो इम्युन डिसिज आहे. आॕटो इम्युन डिसिज असणाऱ्यांना जास्त धोका संभाळतो कोरोनाचा. तिने हे सगळं केवळ ह्या लाईफस्टाईल मेडिसीनच्या भरवशावर केलं. 
आॕगस्ट 2020 ते मार्च 2021 या काळात माझ्या आणि माझ्या परिवाराच्या आरोग्यासोबत जे घडलं ते तसंच्या तसं सांगितलं. जगभर *लाईफस्टाईल मेडीसीन* नावाचा शब्द मेडिकल सायन्समध्ये रुजत आहे. जगभरातील डाॕक्टर्स, संशोधक माणसाचे आरोग्य नैसर्गिकपणे सुदृढ आणि निरोगी राहावे आणि निसर्गाच्याच बळावर व्हायरल आजारांपासून दुरूस्त व्हावेत. यासाठी पुरजोर प्रयत्न करत आहेत. त्याच ताकदीने फार्मासिटीकल कंपन्या आपले अस्तित्व टिकवणे आणि वाढवणे यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. आणि ह्या कंपन्या भारी पडत आहेत कारण ही औषधे, इंजेक्शने, टॕबलेट्स म्हणजेच उपचार ही गोष्ट इतकी खोलपणे माणसांच्या मनात रुजली आहेत की कोणी दवाखान्यात जाऊ नका, इंजेक्शन्स, गोळ्या घेऊ नका ही पद्धती वापरा असे म्हटले की ती माणसे आपल्याला अवैज्ञानिक वाटू लागतात. अवैज्ञानिकच काय गुन्हेगार वाटू लागतात. रेमडेसीवीर इंजेक्शनमागचं खरं खोटं जाणून न घेता माणसे ब्लॕक नी ते इंजेक्शन वीस वीस पंचवीस पंचवीस हजाराला विकत घेत आहेत अन् इंजेक्शन घेऊनही मरत आहेत. आॕक्सीजनच्या मागे पळत सुटलीयत माणसं. कित्येक एम. बी. बी. एस. एम.डी. झालेले डाॕक्टर्स, अगदी AAIMS चे डायरेक्टर डाॕ. रणदिप गुलेरिया सांगतात, 95% माणसे घरी दुरूस्त होऊ शकतात, तुम्ही दवाखान्यात अॕडमिट होऊन बेड अडवू नका, व्हिटॕमिन सी युक्त फळे खा, अंगावर उन्हं घ्या, अगदी साधा आणि जमेस्तोवर शाकाहार घ्या, आॕक्सीजन लेव्हल कमी होत असेल तर प्रोन व्हेंटीलेशन घरच्या घरी करा म्हणून. त्यांनी तसा व्हिडीओ शेअर केलाय. पण मिडीयाने एवढी भीती माजवून ठेवलीय आणि आपणही शहाणी माणसे डोळसपणे बघून माहिती मिळवून निर्णय घेण्याऐवजी इमोशनल होत गेलो. 
आता आपल्याच हातात आहे, आरोग्याबाबत अज्ञानी राहून दुःख विकत घ्यायचं की ते समजून घेऊन आनंदी व्हायचं. जसजसं शरीर समजू लागतं तसतसा शरीराबद्दल आदर वाटू लागतो. स्वतःच्याच. अगदी प्रेम वाटू लागतं. शरीर अगदी प्रामाणिक आहे आपल्याशी. आणि डाॕ. एन. के. शर्मा म्हणतात त्याप्रमाणं शरीराला खरेच शौक नाही आजारी पडण्याचा. व्हायरल आजार होत राहाणार. त्यांच्याशी लढण्यासाठी आपलं शरीर सक्षम आहे. गरज आहे आपल्या या शरीराला योग्य तो आहार विहार देण्याची. वायरस कायम असणार आहेत. ते आपल्या आधीपासून आहेत. आपल्याला दरवर्षी इन्फेक्शन करणार आहेत. आपण कसं तयार व्हायचं आणि रहायचं हे आपल्या हातात आहे.
तसं हे शेवटचं उपदेशात्मक आहे. असा उपदेश देणं मला स्वतःलाच आवडलं नाही.  मला आरोग्याबाबत काही सर्वेसर्वा माहिती नाही तरीपण त्या दिशेने निघणं गरजेचं आहे.  
आमच्या चंद्रपूरचीच गोष्ट जवळच्या मैत्रीणीने सांगितलेली. तिच्या नात्यातील कोरोना पेशंटला चांगल्या हाॕस्पीटलमध्ये खोली मिळाली, बेड मिळालं, आॕक्सीजन मिळालं, वीस वीस हजाराचे दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स विकत घेतले, टोचून घेतले. स्वतःसाठी चार लाख रु. खर्च करण्याची तयारी ठेवली. तरतूद केली आणि इंजेक्शन्स घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी मरण पावला. डाॕ. तरुण कोठारी (M.B.B.S.M.D.) म्हणतात, लोग कोरोनासे नही मर रहे है, रेमडेसिवीर इंजेक्शनसे मर रहे है. एम्सचे डायरेक्टर पण म्हणाले रेमडेसिवीर सर्व पेशंटसाठी इफेक्टीव नाही म्हणून. आणि आपण आपल्या नातलगांना, आप्तेष्टांना, जवळच्या लोकांना, गावतल्या, शहरातल्या लोकांना सामाजिक बांधिलकी म्हाणून ते कसं उपलब्ध होईल म्हणून प्रयत्न करत सुटलोय. जे दाखवल्या जातेय तेच सत्य मानून चालायचं की आत आणखी काही आहे याचा शोध घ्यायचा हे ही आपल्याच हातात. 
भारतात एकीकडे डाॕ. बिस्वरूप राॕय चौधरी नॕचरोपॕथिस्ट, डाॕ. संदीप शर्मा MBBS, MD. डाॕ. तरुण कोठारी MBBS, MD. डाॕ. के. बी. तुमाने MBBS, MD. डाॕ. अमरसिंह आजाद MBBS, MD. असे काही डाॕक्टर्स सातत्याने लोकांना जागृत करत आहेत गेले वर्षभरापासून. हजारो कोरोना पेशंट्सना मेडीसिन, इंजेक्शन्सशिवाय आणि एकही पेशंट न गमावता दुरूस्त करत आहेत. त्या सर्व पेशंट्सच्या नोंदी ठेवल्या आहेत. त्यावर पुस्तके लिहित आहेत. शासनाला सांगितले जात आहे, आमचं ऐकून पहा किंवा आम्हाला खोटं ठरवून अरेस्ट करा असंही आवाहन करत आहेत.  
मला तर असं वाटतं गावागावात, शहरा शहरात जी लाॕकडाऊन पाळण्याबाबत, सैनेटायजर, मास्क, दो गज दुरी पाळण्याबाबत अनाउन्समेंट केली जाते, भोंग्यावर सांगत आॕटोरीक्षा किंवा तत्सम वाहने गावा, शहरात फिरतात तसं आरोग्याची काळजी कशी घ्यायची, आजारी पडलं तर काय करायचं, काय खायचं, काय प्यायचं काय नाही खायचं, प्रोन व्हेंटीलेशन कसं करायचं ते भोंगे लावून हे सर्व सांगितलं पाहिजे. नाहीतर हाहाकार वाढतच राहील.
हाॕस्पीटल्स वाढवणं, बेड वाढवणं, आॕक्सीजन, व्हेन्टीलेटर्स वाढवणं ही टेक्नीकल बुद्धिमत्ता झाली अन् माणसांना आजार न होऊ देणं, व्हायरल आजार घरीच दुरुस्त करायला शिकणं, कॕन्सर, बीपी, शुगर आणि असे शेकडो आजार न होऊ देणं ते झाले असतील तर घरीच दुरूस्त करणं ही वैज्ञानिक बुद्धिमत्ता झाली.  टेक्नाॕलाॕजीही तेवढीच महत्वपूर्ण आहे. पण त्यामागे सायन्स हरवून बसू नये. टेक्नाॕलाॕजीला मर्यादा असतील पण सायन्सला मर्यादा नाहीत हेच मी अनुभवलं या आठ महिन्याच्या काळात. आम्ही एवढ्यांदा एवढी माणसे आजारी पडलो पण टेस्ट मात्र केल्या नाहीत. आॕक्सीमीटर घरी घेतला नाही. त्याची गरज वाटली नाही. मी आताही कोरोना पेशंट्सच्या घरी जाते. विचारपूस करते. हवं नको ते विचारते.
मी जून 2020 पासून कोरोना वायरस, आरोग्य, आहार, आजार, उपचार याचा धांडोळा घेत राहिले गुगलवर. WHO च्या वेबसाईटवर फिरून आले. आणि असे धांडोळे घेताना मला ही लाइफस्टाइल मेडिसीन सापडली. त्यामुळं एवढ्या आजारांमधून निभावता आलं. 
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक डाॕक्टर्स, संशोधक सापडतील या मार्गाने निघालेले आणि लोकांना जागृत करत सुटलेले. आम्ही त्यांच्या मागे निघालोय त्यांच्यावर विश्वास ठेवून. आरोग्याच्या अनेक समस्यांपासून मुक्त होत. 
गुगलवर / यु ट्युबवर लाईफस्टाईल मेडिसीन टाकलं की त्याबाबत भरपूर माहिती मिळेल. जगभरचे डाॕक्टर्स भेटतील. किंवा 'द चायना स्टडी' नावाचं पुस्तकही सापडेल जे याच विषयावरचं संशोधन आहे. चीन यातून बाहेर कसा पडला असा प्रश्न ही आपल्याला पडलाच पाहिजे. 
संधी आहे. नवी दिशा वाट बघतेय. 
प्रत्येक मूल बुद्धिमान असतं, प्रत्येक मूल उत्तम शिकू शकतं आणि जन्मतः त्याला मानवी मूल्ये आवडतात आणि निसर्गाशी तो बांधिल असतो याचा साक्षात्कार झाल्यानंतर मला झालेल्या आनंदाएवढाच हा आनंद आहे. प्रत्येक मनुष्याला निरोगी जीवन जगण्याचा मुलभूत हक्क आहे,  प्रत्येक मनुष्य निरोगी जीवन जगू शकतो आणि नैसर्गिकरित्या आजारमुक्त होऊ शकतो. आजारावर लस शोधून काढणे हे  विज्ञान होतं. तो वैज्ञानिक चमत्कार होता. कितीतरी माणसांचे प्राण लसींनी वाचवलेत. आताही वाचत आहेत. आणि लसींशिवायही लढता येतं हा त्याहीपुढील वैज्ञानिक चमत्कार. विज्ञान नेहेमी पुढं जात असतं. नव्या शोधांसह. 

• (Gunter Blobel - German and American biologist यांचं एक नोबेल प्राईझ विनिंग संशोधन आहे -  proteins have intrinsic signals that govern their transport and localization in the cell. यावर आधारित हे raw food विज्ञान आहे.) 

• ताप, सर्दी, खोकला, थकवा किंवा तत्सम कोणतीही लक्षणे स्वतःला किंवा जवळच्यांना जाणवल्यास यु ट्युबवर three days flue diet शोधलं की उपचार सापडेल. तो शंभर टक्के काम करतो.


• prone ventilation चे व्हिडीओज पण यु ट्युबवर सापडतील. हे सुद्धा शंभर टक्के काम करतं.
 

- वैशाली गेडाम चालकुरे
- प्राथमिक शिक्षक
   8408907701

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.