"ओळख हिरकणी ची - 14 डिसेंबर." "मोनाली ताई पाटील." 🎂💐🌹 "महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी." संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 14 डिसेंबर 2022.
*ओळख हिरकणी ची - 14 डिसेंबर.*
*मोनाली ताई पाटील, जळगाव.*
🎂💐🌹
*महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी.*
*ओळख हिरकणी ची.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
14 डिसेंबर 2022.
*आज तुमच्या समोर फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या "ओळख हिरकणी ची " या विषयावर थोडसं लिहायला हवे म्हणून संवाद साधत आहे. खरं सांगायचं झालं तर आज कोणत्याही हिरकणी बाबत तुम्हाला सांगणार नाही. पण "सत्यम् शिवम् सुंदरम्" हे आगळं वेगळं आणि फक्त भगिनींचं मंदिर तयार करण्यासाठी सुरवात करताना काही मुलभूत गोष्टी हव्या होत्या. जसं की महिलांसाठी राखीव ग्रुप म्हटलं की ओघाने भगिनींचा सहभाग असणं हे जास्त महत्वाचे होतं. मुळातच माझ्या सोबत सुरवातीला चौघीजणी होत्या. आजही त्या आहेतच. त्यांच्या विषयी नंतर कधीतरी लिहिले जाईलच. पण आज लिहायचं आहे ते "मोनाली ताई पाटील" यांच्या बाबतीत.*
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇*
http://Sahebraomane1967.blogspot.com
वाचक म्हणून आम्ही एका भलत्याच ग्रुप मध्ये सहभागी होतो. पाच वर्षे झाली. आजही आहोत. *WhatsApp profileआ वरील नावं वाचून मोनाली ताईंना मी पहिला वैयक्तिक पातळीवर मेसेज पाठवला... "तुम्हाला फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप मध्ये सहभागी व्हायला आवडेल का?"*
(बऱ्याच वेळा हा मेसेज नव्याने सहभागी करून घेणाऱ्या भगिनींना देण्याची माझी प्रथा आहे. सुरवात अशीच होते. नंतर तासभर गप्पागोष्टी आणि नंतर होकार दिला तरच सहभागी करून घेतले जाते. ही सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप ची सुरवातीपासूनच पद्धत आहे. आजही काटेकोरपणे पालन केले जाते. त्या निमित्ताने का होईना "जगातील विविध क्षेत्रातील मान्यवर" भगिनींशी मला थेट बोलायला मिळते. खरं तर हा माझा स्वार्थ आहे असं म्हणू शकता. 😊)
अर्थात मोनाली ताईंनी मलाच प्रतिप्रश्न केला की... "तुम्ही स्वतः पुरुष आहात. ग्रुप फक्त महिलांसाठी राखीव आहे असं म्हणता. मग महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रुप मध्ये तुम्ही (पुरुष) कसे?" एक ना अनेक विविध प्रश्नांचा मारा केला होता. 😊
या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मला बरीच मोठी शर्यत पार पाडावी लागली आहे. तेंव्हा कुठे "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप रुपी मंदिरांची पायाभरणी बळकट झाली आहे. त्या मध्ये मोनाली ताई यांनी ग्रुप चा "पाचवा खांब" म्हणून मोलाचा वाटा उचलला आहे. वेगवेगळे प्रयोग कसे राबवता येतील या विषयावर सतत त्या आघाडीवर असतात.
मंदिररुपी सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप विशिष्ठ लक्ष घेऊन काम करत आहे. सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप चा विषय आगळा वेगळा आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कामकाज चालवले जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने कामकाज चालवले जात असताना कुठलाही विषय आम्हाला वर्ज्य नाही. अगदी लैंगिक शिक्षण आणि त्या बाबतीत या महिलांच्या ग्रुप मध्ये खुलेआम चर्चा केली जाते. याचं श्रेय जळगाव च्या मोनाली ताई यांना जाते. त्यांना सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप मध्ये सहभागी करून घेतले आणि ग्रुप चा नुर एकदम बदलला. ग्रुप ची उपयुक्तता आणि चांगुलपणा साठी जे काही लागेल ते सर्व काही करताना मोनाली ताई माझ्या पेक्षा दोन पावले नक्कीच पुढे असतात. सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी ध्येय धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या JUSTICE SSS GROUP MEMBERS च्या सुद्धा त्या सदस्या आहेत.
आपल्या सर्व ग्रुप चं नियंत्रण मी JUSTICE MEMBERS GROUP च्या हातात सोपवलेलं आहे. मी तुम्हाला फक्त कठपुतळी म्हणून नाचताना दिसतो आहे. आणि त्यामुळेच आपले सर्व ग्रुप सुरळीतपणे काम करत आहेत.
कदाचित मोनाली ताई या ग्रुप च्या सुरुवातीच्या प्रवासात भेटल्या नसत्या तर आजचं "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप चं चित्र दिसलं नसतं. आज जे काही थोडफार यश मिळाले आहे त्याचं थोडसं का होईना पण नक्कीच श्रेय त्यांना द्यायला हवं.
तीन वर्षापूर्वी डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या ब्लॉग च्या pdf file बनवण्याचं जिकीरीचं काम मी मोनाली ताईंना सोपवले होते. त्या पैकी पहिली pdf file त्यांनी बनवून योग्य वेळी माझ्याकडे सोपवली जी मी डॉ. अभिजीत सोनवणे यांना माझ्या घरी विशेष कार्यक्रम आयोजित करुन सोपवली आहे. उर्वरित ब्लॉग ची दुसरीही pdf file सुद्धा डॉ. अभिजीत सोनवणे यांचे कडे सुपूर्द केली. "@doctorforbeggars सोहम ट्रस्ट" साठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही यथाशक्ती आर्थिक मदत सुद्धा केली आहे. करत आहोत. त्या दिवशी अभिजीत सोनवणे यांनी तुम्ही मला दुसरी बहिण मिळवून दिली आहे असे म्हटले होते. बऱ्याच वेळा आमच्या चर्चा सुद्धा होतात. दोन्ही pdf file चा उपयोग करून डॉ. अभिजीत सोनवणे यांचे संबंधित ब्लॉग च्या माध्यमातून पुस्तक प्रकाशित झाले आहे ज्याच्या दुसऱ्या पानावर संकलन म्हणून मोनाली ताईंचे नावं मुद्रीत आहे. मोनाली ताईंच्या शिरपेचात एक मानाचा तुरा. 🥇🌹💐
सत्यम् शिवम् सुंदरम् आणि UNIVERSAL TRUTHS AND SCIENCE GROUP सोडले तर बाकी सर्व ग्रुप अॅडमीन सेटिंग मोडवर आहेत.
आजरोजी सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप मध्ये 470 बहिणी सहभागी आहेत ग्रुप ची लिंक नसताना.
UNIVERSAL TRUTHS AND SCIENCE GROUP मध्ये आजरोजी 800 सदस्य सहभागी आहेत. दोन्ही ग्रुप अपलोडींग साठी ओपन आहेत. पण ग्रुप च्या निर्मीती पासूनच नियम आणि अटींचे काटेकोरपणे पालन केले जात आहे म्हणून इतके जण सहभागी असूनही कुठेही अराजकता दिसत नाही. अर्थात याचं श्रेय सर्व सदस्यांना आहे. त्यासाठी झटणाऱ्या सर्व ग्रुप च्या अॅडमीन टीम चे अभिनंदन करतो.
UNIVERSAL TRUTHS AND SCIENCE GROUP मधील सदस्यांची संख्या पाहता त्या ग्रुप साठी सुद्धा लवकरच JUSTICE MEMBERS GROUP सुरु करण्याचा मानस आहे. कारण मी एकटा काहीही करु शकत नाही त्यासाठी मला काही सदस्यांची या ग्रुप साठी नियुक्ती करावी लागेल असे वाटते.
बरचं काही लिहायचं राहिलं आहे. इतरही अनेक भगिनी सदस्या आहेत की ज्यांनी ग्रुप च्या उभारणीसाठी भरपूर वेळ दिला आहे. त्यांच्या विषयी नंतर कधीतरी लिहीनचं. माझं लिहीनं हे flash back सारखं असेल. अधून मधून जसं आठवलं तसं लिहिलं जाईल.
मोनाली ताई, 🙏
*खरं तर आपण कधी ग्रुप च्या माध्यमातून शुभेच्छा देत नाही. पण आज तुमचा वाढदिवस सुद्धा आहे. "शोध हिरकणी चा" या लेखमालेचे हे पुर्वावलोकन लिहीताना तुम्हाला सुयश चिंततो. सुआरोग्य लाभो. दीर्घायुष्य लाभो..... दादा. पुणे*
🎂🌹💐🎂
*🙏आपुलकी जपणारी माणसं🙏*
*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973.*
14 डिसेंबर 2022.
Comments
Post a Comment