"महाराष्ट्राचा सर्वात कमी शिकलेला, सर्वात शहाणा माणूस : क्रांतीवीर विधायक महापुरूष "वसंतदादा". १३ नोव्हेंबर हा दादांचा जन्मदिवस. "महाराष्ट्राचा चांगुलपणा." संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 13 नोव्हेंबर 2022
*महाराष्ट्राचा सर्वात कमी शिकलेला, सर्वात शहाणा माणूस : क्रांतीवीर विधायक महापुरूष "वसंतदादा".*
१३ नोव्हेंबर हा दादांचा जन्मदिवस.
*महाराष्ट्राचा चांगुलपणा.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार - विकिपीडिया.
13 नोव्हेंबर 2022.
*महाराष्ट्राचे शिल्पकार.👇*
https://youtu.be/hjg4E1WBZ3w
साभार - IBN लोकमत.
*👉ही पोस्ट तुम्ही तुमच्या अन्य ग्रुप मध्ये फाॅरवर्ड करा.*
नवीन वाचकांना सहभागी होण्यासाठी लिंक दिली आहे. 👇
*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप क्रमांक 1*👇
https://chat.whatsapp.com/HX1b1ARWjXaBKcDMXy7pTx
*दादा म्हणजे वसंतदादा..* घराघरातले दादा. वसंतराव पाटील या नावावर पत्र पाठवले तर पोस्टमनला माणूस समजतही नव्हता. पण वसंतदादा म्हटलं की त्या एका शब्दावर दुनियेला कोण माणूस हे कळतं. दादांचं मोठेपण यामध्येच आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल या पदांपेक्षाही दादा खूप मोठे. त्या दादांविषयी...
१३ नोव्हेंबर हा दादांचा जन्मदिवस.
दादांची स्मृती, त्यांचे काम, सहकारातली त्यांची निष्ठा या सगळयांचे स्मरण आजच्या पिढीला होणे फार गरजेचे आहे. एका शेतकरी कुटुंबात पद्माळे येथे दादांचा जन्म झाला. अवघ्या चौथ्या इयत्तेपर्यंत दादा शिकले.
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com
महाराष्ट्राचा सर्वात कमी शिकलेला, सर्वात शहाणा माणूस दादाच होते. दादांचे वर्णन किती किती प्रकाराने करता येईल? ‘पहिले वर्णन असे आहे की, महाराष्ट्राच्या घराघरात ‘दादा’ या अगदी प्रेमाच्या आणि आपुलकीच्या नावाने हाक मारला जाणारा हा एकमेव माणूस. कोणत्याही घरात, कोणत्याही कार्यालयात, कोणत्याही समारंभात ‘वसंतराव पाटील आले’ असे कोणीही, कधीही म्हटलेले नाही.
अगदी सहजपणे उच्चार निघायचा तो म्हणजे ‘दादा आले’. मंत्री असले काय आणि नसले काय, मुख्यमंत्री असले काय आणि नसले काय, दादांना ‘दादा’ या नावाने हाक मारताना कोणालाही कधीही संकोच वाटला नाही आणि अडचणही वाटली नाही. दादा राजस्थानचे राज्यपाल होते. बैठकीच्या मुख्य खोलीत लुंगी आणि बनियनवर ते बसायचे.
राज्यपालांच्या एडीसीला दादांचे लुंगीवर वावरणे अवघड वाटायचे. त्यांनी असा राज्यपाल पाहिलाच नव्हता. राज्यपाल म्हणजे फूल पॅण्ट, बंद गळयाचा कोट. माणसं असली तरी कोट, नसली तरी बंद गळयाचा कोट. दादांचे उलटे होते. दादांना एकटे कधी बसलेले पाहिलेले आहे का? जेवतानाही दादांच्या भोवती गर्दी. ते कधी एकटे जेवलेसुद्धा नाहीत. पोटावर डायबेटीसचे इंजेक्शन घेतानाही समोर माणसे उभीच असायची. १०-२०-२५ माणसांमध्येच असलेले दादा सगळयांनी पाहिले आहेत. व्यक्तीचे घरगुतीपण म्हणजे काय, ते घरगुतीपण म्हणजे दादाच. दादा चौथी शिकले. पुढे शिकू शकले नाहीत. पण, महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांना नावाने हाक मारण्याची विलक्षण स्मरणशक्ती असलेल्या माणसाचे नावसुद्धा दादाचं.
*महाराष्ट्राचा चांगुलपणा 9028261973.*
https://chat.whatsapp.com/HX1b1ARWjXaBKcDMXy7pTx
दादा शिक्षण घेऊ शकले नाहीत. पण त्यांचा आवाका एवढा जबरदस्त होता की, अनुभव आणि सामाजिक शहाणपणाच्या जोरावर ते कुलपतींचेही कुलपती झाले. खेडयापाडयातल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांला वैद्यकीय शिक्षण मिळत नाही, अभियांत्रिकी शिक्षण मिळत नाही. कारण मुंबई-पुण्याच्या विद्यार्थ्यांनी सगळया जागा अडवल्या हे दादा पाहत होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रात उभारलेली रयत शिक्षणाची दारे दादा पाहत होते. यशवंतराव चव्हाणच ‘रयत’चे अध्यक्ष होते. वैद्यकीय शिक्षण खेडयापाडयातल्या विद्यार्थ्यांना का मिळू नये? हा विचार दादांनी केला. त्यातूनच ग्रामीण भागात वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये उभी राहिली.
खेडयापाडयातली मुले शिकू लागली. डॉक्टर झाली, इंजिनीअर झाली, दादांच्या त्या निर्णयानंतर आज किमान तीन पिढया ग्रामीण भागात उच्च शिक्षण घेऊन आपल्या जीवनात स्थिर झालेल्या आहेत. या संस्था मोडीत काढण्याचा कार्यक्रम सध्या सुरू झालेला आहे. पण, दादांच्या कामाला त्यामुळे कमीपणा येत नाही. दादांना सामाजिक जाण विलक्षण होती. त्यातूनच दादांनी हा निर्णय केला. त्यामुळे दादांच्या या कामाची नोंद शिक्षणशास्त्र्यांना घ्यावीच लागेल. दादांचे दुसरे काम शेतीमधले. महाराष्ट्रात ढीगभर कृषी विद्यापीठे आहेत. पण त्या कृषी विद्यापीठाची शेतीविषयक सगळी पुस्तकं एका तागडीत आणि दादांचे एकच वाक्य- ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’. दुस-या ताकडीत टाकले तर, दादांचीच तागडी भारी होईल.
पाणी अडवण्याचा हा दादांचा मंत्र शेतीसाठी सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. पण काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ याचं महत्त्व कळलं नाही. पाणी अडविण्याऐवजी ‘याला आडवा आणि त्याची जिरवा’ हाच कार्यक्रम महाराष्ट्रात मोठया प्रमाणात झाला. त्याचे परिणाम काँग्रेस भोगते आहे. दादांचा तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे अनुशेष. महाराष्ट्रात एक अशी तीव्र भावना होती की, पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला. विदर्भ-मराठवाडा मागे राहिला, का मागे राहिला? सुंदर सुपीक काळी जमीन असून, ढीगभर कापूस होत असून, विदर्भात सहकारी सूत गिरणी का उभी राहात नाही? कोल्हापूर, सोलापूर इथे कापसाचे बोंड होत नसताना सूत गिरणी का चालते? कोणी याचा विचार करायला तयार नाही. शेवटी दादांनी हिंमत करून निर्णय घेतला आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चि)म महाराष्ट्र, कोकण अशा सर्व?विभागांचा अनुशेष नेमका किती? याचा शोध?घेण्यासाठी डॉ. वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली. याच निर्णयामुळे आज राज्यपालांना विकासकामांच्या पैसे वाटपाचा अधिकार मिळालेला आहे.
निर्णय घेण्यात दादांसारखा माणूस नाही. पुन्हा फाफटपसारा नाही. दादांसमोर एकदा विषय आला की, ‘अ’ जिल्हा परिषदेतील कर्मचा-याला ‘ब’ जिल्हा परिषदेत बदली देता येत नाही. का देता येत नाही? तर तसा सरकारचा नियम आहे असे सांगण्यात आले. दादांसमोर हा विषय आला. ती स्वातंत्र्यसैनिकांची मुलगी होती. ती औरंगाबादहून पुण्यात जिल्हा परिषदेत तिला बदली हवी होती. कारण तिचे लग्न पुण्यातल्या मुलाशी ठरले होते. दादांनी सचिवाला बोलावले. सचिवाने सांगितले की, ‘अशी बदली देता येत नाही.’
दादा म्हणाले, ‘का देता येत नाही,’ सचिव म्हणाले, ‘सरकारचा नियम आहे.’ दादा म्हणाले ‘सरकार म्हणजे कोण’, मुख्यमंत्री सरकार नाही का? आणि मग दादांनी बजावले या जिल्हा परिषदेतून त्या जिल्हा परिषदेत बदली देता येईल असा चार ओळी जी आर काढून आण, फाईलवर माझी सही घे. त्या मुलीला बदलीची ऑर्डर देऊन टाक. दादांच्या एका छोटया निर्णयाचा फायदा आतापर्यंत ८००० जणांना मिळालेला आहे.
दादा सहा वेळा आमदार झाले. १९५२, १९५७, १९६२, १९६७, १९७२ आणि १९७७. खासदार १९८० साली झाले. चार वेळा मुख्यमंत्री झाले. १९५२ ते १९७२ असे सलग २० र्वष दादा आमदार होते आणि विधानसभेत शेवटच्या बाकावर बसत होते. याच २० वर्षाच्या काळात १९६७ ते १९७२ पाच वर्षे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. सलग २० वर्षे?आमदार असताना एकदाही ‘मला मंत्री करा’ असे दादा कधीही म्हणाले नाहीत. (आजचा आमदार निवडून आल्यावर २० दिवस शांत बसत नाही.) दादांचा विशेष असा की, १९६७ ते १९७२ या काळात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष होते.
१९६७च्या देशभरातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हातून काश्मीर, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश अशी ९ राज्ये गेली होती. पण दादांनी महाराष्ट्रात काँग्रेसचे २०२ आमदार निवडून आणले. १९७२ साली २२२, १९७२ साली वसंतराव नाईक यांना तिस-यांदा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय इंदिरा गांधींनी घेतला तेव्हा इंदिराजींच्या आदेशानुसारच वसंतदादांना क्रमांक दोनचे मंत्रीपद देऊन पाटबंधारे खाते देण्यात आले.
दादा हे असे व्यक्तिमत्त्व होते की, मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल या पदापेक्षाही ते मोठे होते. पदे त्यांच्यापुढे छोटी होती आणि दादांमधला माणूसही खूप मोठा वाटायचा. कारण त्यांचा साधेपणा. ते पाटबंधारे मंत्री असताना चीफ इंजिनीअर चाफेकर यांना दादांनी एकदा विचारले की, ‘या नदीच्या खो-यात किती पाणी आहे’ चाफेकरांनी सांगितले २० टीमसी. दादा म्हणाले, ‘टीमसी सांगू नका, किती एकर जमीन भिजेल ते सांगा,’ दादा असे सोपे आणि साधे बोलायचे. त्यांची भाषा कार्यकर्त्यांला कळायची आणि त्यामुळे दादाही घरातले वाटायचे. दादांच्या नेहमीच्या शर्टाच्या आत एक बंडी असायची. त्या बंडीला एक मोठा खिसा होता. त्या खिशात नेहमी थोडे पैसे ठेवलेले असायचे.
दादांना भेटायला आलेल्या माणसाने त्याच्या अडचणी सांगितल्या आणि तो जायला निघाला की, दादा आपल्या बंडीच्या खिशात हात घालून शे दोनशे रुपये काढायचे आणि त्याच्या हातावर टेकवायचे. दोन घास खाऊन जा असे म्हणायचे. एकदा ते जेवण घेत असताना दिल्लीचा एक बडा व्हीआयपी आला. दादांच्या चेंबरमध्ये जायला कोणालाच मज्जाव नव्हता, तो तर व्हीआयपी, त्याला पाहून दादा म्हणाले, ‘आओ भाई, दो घास खाओ’. दिल्लीवाल्यांना ‘घास’ म्हणजे गवत, पण तोही शहाणा होता, त्याला दादांचा मथितार्थ?कळला. आपल्याला हिंदी येत नाही, इंग्रजी येत नाही, याचा दादांना कधीच संकोच वाटला नाही.
‘माझी भावना मी माझ्या शब्दांतून व्यक्त करणार,’ इतके सरळ, नितळ दादा होते. एकदा विधानसभेत मुख्यमंत्री असताना आमदार हषू आडवाणी यांनी दादांना प्रश्न विचारला की, ‘केंद्र सरकार इतनी बडी राशी देने के बावजूद राज्य सरकार यह राशी क्यो नहीं उठा रही है’.. उत्तर द्यायला दादा उठले आणि म्हणाले, ‘हषूभाई, एैसा है, अंथरूण देखके पाय पसरना मंगता है’ सभागृहात प्रचंड हशा पिकला. आमदार केशवराव धोंडगे म्हणाले, ‘अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्र्यांचे उत्तर कोणत्या भाषेत आहे’? अध्यक्ष काही म्हणण्यापूर्वीच दादा उठून म्हणाले, ‘केशवराव, हषूभाईंकरिता हिंदीत आणि तुमच्याकरिता मराठीत’ नंतर त्यांनी हषू आडवाणींना विचारले की, ‘तुम्हाला समजले ना’. हषूभाई म्हणाले, ‘हा समजले’. दादा असं नेमकं बोलायचे.
१९८५च्या निवडणुकीत दादांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी काँग्रेसचा एक एक निरीक्षक नेमला आणि त्या प्रत्येकाला एक एक गाडी आणि पेट्रोलसाठी पाच-पाच हजार रुपये देण्याची व्यवस्था केली. रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी ताराबाई वर्तक (माई) यांना दिली. ताराबाई म्हणाल्या की, ‘दादा कोकणात घाट खूप आहेत, चढाव आहेत, पेट्रोलला पाच हजार रुपये पुरणार नाहीत’. दादांनी आणखी पाच हजार रुपये दिले. तरी माई सांगू लागल्या, ‘चढाव खूप आहेत’. दादा हळूच म्हणाले, ‘चढाव आहेत हे बरोबर, पण माई, काही उतार असतीलच.’ माईंनी दहा हजार रुपये घेऊन सुबाल्या केला.
दादांचा कस कसा होता?...
सत्तेचा त्यांना लोभ नव्हता आणि त्यांनी सत्तेची कधी पर्वा केली नाही. मुख्यमंत्र्यांना न विचारता दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींनी प्रभा राव यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केले म्हणून दादांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाकला. पण त्याच दादांनी इंदिराजींच्या भीषण हत्येनंतर राजीव गांधींना पंतप्रधान करण्यासाठी सगळयात मोठा पुढाकार घेतला. राजीवजींनी १९८४ साली पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर वसंतदादांना वाकून नमस्कार केला होता. त्याचे कारण दादांच्या पालकत्वाचा अधिकार हेच होते.
१९७८ साली वसंतदादांचे सरकार शरद पवार यांनी पाडले तेव्हा दादा आणि शरद पवार, दादा आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात फार मोठा तणाव निर्माण झाला. त्या तणावातूनच १९८० साली यशवंतरावांच्या विरोधातली लोकसभेची निवडणूक शालिनीताई पाटील यांनी लढवली. थोडया मतांनी यशवंतराव विजयी झाले.
शरद पवार काँग्रेसपासून पहिल्यांदा अलग झाले ते त्याचवेळी; परंतु २४ जून १९८८ रोजी शंकरराव चव्हाण यांच्या जागी शरद पवार यांना मुख्यमंत्री करावं याकरिता दादांनीच पुढाकार घेतला होता, हे आज किती जणांना माहीत आहे? दादांचे मन असे निर्मळ होते. त्यांनी कधी कुणाचा द्वेष केला नाही. ज्या शरद पवारांनी दादांचे सरकार पाडले, तेच शरद पवार दादांचे मोठेपण नेहमीच मान्य करतात आणि आज पुण्यात दादांचे जन्मशताब्दी वर्ष पंतप्रधानांच्या उपस्थितीत शरद पवारांमुळेच साजरे झाले.
*दादा मूळचे क्रांतिकारक होते, हे किती जणांना माहीत आहे?* दादांनी पाठीवर गोळी झेलली आहे, तुरुंग फोडला आहे. मिरजेच्या तटावरून उडी मारून दादा आपल्या सहका-यांसह पळाले. त्यांचे सहकारी पांडू मास्तर त्या गोळीबारात ठार झाले. दादांच्या पाठीत उजव्या बाजूला गोळी लागली. शस्त्रक्रिया करून ती गोळी काढावी लागली. दादांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत शस्त्रक्रियेची खूण त्यांच्या पाठीवर होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारातील एका गटाचे नेतृत्व वसंत बंडूजी पाटील यांच्याकडे होते. दादा घोडयावर बसून दौड करायचे. पाठीला दोन बंदुका लावलेल्या, काच्याचे धोतर, डोक्याला मुंडासे असा वसंत बंडुजी पाटील यांचा वेश असल्याचे, सातारा गॅजेटिअरच्या २०९ ते २१४ या पानावर उल्लेख केलेला आहे.
२४ जुलै १९४३ रोजी मिरजेचा तुरुंग दादांनी फोडला. ते क्रांतिकारक दादा महाराष्ट्राला फार कमी माहीत आहेत. नवीन पिढीला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, नागनाथ नायकवडी, नाथा लाड, बापू लाड, हे त्यावेळचे क्रांतिकारक माहीत नाहीत. त्यांचा त्याग माहीत नाही. स्वातंत्र्य चळवळीपर्यंत क्रांतिकारक असलेले दादा-स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झटकन सांधा बदलून सहकाराचे साधक होतात, हे काम एवढे सोपे नाही.
स्वातंत्र्य मिळाल्यावर बदुकीची गरज नाही, हे सूत्र दादांना पटकन समजले. दादा म्हणायचे, ‘आता गरज आहे रूमणं हातात धरण्याची.’ त्याच भावनेतून दादांनी विधायक कामाला सुरुवात केली. सांगलीत शेतकरी सहकारी कारखान्यांची उभारणी केली. आज कुणालाही खरे वाटणार नाही, पण ‘ऊस कसा लावायचा’, हे सांगलीतल्या शेतक-याला ७० वर्षापूर्वी माहीत नव्हते. जमिनीत आडवं गाडलेलं उसांच कांड सरळ वर कसं येईल? असा प्रश्न अंकलखोपच्या शेतक-यांनी दादांना विचारला होता. तेच अंकलखोप आज सवरेत्तम उसाची निर्मिती करत आहेत. याच शेतक-यांच्या मदतीने दादांनी सहकार फुलवला.
सांगली सहकारी बँक, सांगली शेतकरी सहकारी साखर कारखाना, अॅसिटोन प्रकल्प, दुग्धविकास प्रकल्प, कुक्कुटपालन, सूतगिरणी, महाविद्यालये असे एक की दोन.. अनेक प्रकल्प दादांनी बघता बघता उभे केले आणि मग पंचगंगा, कृष्णा, वाळवा, दत्तशिरोळ, भोगावती असे अनेक कारखाने आणि सूतगिरण्या पश्चिम महाराष्ट्रात वेगाने सुरू झाल्या. त्या कृषी उद्योगिक क्रांतीचे खरे श्रेय यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीला आणि वसंतदादा पाटील यांच्या कृतिशील निर्णयाला आहे. शिरवळपासून चंदगडपर्यंत, ३५० चौरस किलोमीटर पट्टा हिरवागार झाला.
हजारो शेतकरी सहकारी कारखान्यांचे मालक झाले. हजारोंना रोजगार मिळाला. ज्याच्या घरी सायकल नव्हती त्याच्या दारात फटफटी आली. त्या काळात फटफटीला फार महत्त्व होते. आज तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतक-याच्या दारात चार चाकी स्कार्पिओ उभी आहे, त्याच्या शेतात ट्रॅक्टर आहे. या सगळयाचे प्रणेते यशवंतराव आणि वसंतदादा आहेत. १९७२च्या दुष्काळात तासंगावच्या द्राक्षांचे मांडव सुकू लागले. तेव्हा तासगांवचे दिनकर आबा मुधळे आणि दिनकर आबा पाटील दादांकडे आले. दादांना म्हणाले, ‘द्राक्ष कशी जगवायची’, दादा म्हणाले, ‘गावकीची सभा घ्या, पाण्याचा टँकर गावात आला, जे हांडे, दोन हांडे पाणी तुम्हाला मिळेल, त्यातले अर्धे पाणी घरी न्या, अर्ध्या पाण्याची मडकी भरा, त्याला सुईएवढे बारीक छिद्र पाडा आणि द्राक्षाच्या वेलाला मडकी बांधा.
द्राक्ष जगवता येतील.’ दादांच्या त्या निर्णयाने १९७२ च्या दुष्काळात तासगांवची द्राक्ष नुसतीच जगली नाहीत तर परदेशात निर्यात झाली.. असे हे सहकारातले महापुरुष दादा, आधीचे क्रांतिवीर आणि नंतरचे सहकार महापुरुष. माणसातला महामाणूस.
१ मार्च १९८९ ला दादांनी जगाचा निरोप घेतला. दादांचे पार्थिव सांगलीच्या कृष्णा तीरावर आले तेव्हा जी अंत्ययात्रा निघाली ती दहा लाखांच्या पुढे होती. राजीव गांधी अंत्यसंस्काराला आले होते. त्यांचे हेलिकॉप्टर दहा लाखांचा जनसमुदाय पाहण्यासाठी १५ मिनिटे हवेत भिरभिरत होते. दादांना श्रद्धांजली वाहताना राजीव गांधींनी त्याचा उल्लेख केला. दादा गेल्यानंतर सांगली जिल्ह्यात घराघरात १३ दिवस सूतक पाळले गेले. पहिले तीन दिवस सांगली जिल्ह्यात चूल पेटली नव्हती, पळी उपडी घातली होती. दादांच्या अत्यंयात्रेत कृष्णा तीरावरच्या झाडांच्या फांद्यांवर इतकी माणसं चढली होती, की काही फांद्या माणसांसह तुटून नदीत पडल्या. चंदनाची चिता जेव्हा भडकली, तेव्हा माणसे ओक्साबोक्शी रडली होती. वारा पडला होता. झाडे निपचित होती. ‘दादा अमर रहे’ या एकाच घोषणेने आसमंत दुमदुमून गेला होता.
आज जन्माला आलेले दादा वयाच्या ७३ व्या वर्षी गेले. तसे अकालीच गेले. पण, विधायक कामांचा महापुरुष याच कर्तृत्वाने ते गेले. यशवंतराव गेले, दादा गेले, पागे गेले, भारदे गेले, राजारामबापू गेले, यशवंतराव मोहिते गेले. पश्चिम महाराष्ट्रातले खरे जनाधार निसर्ग नियमाने गेले असले तरी, महाराष्ट्राला पोरके करून गेले हे नाकारता येणार नाही. दादांच्या मंत्रिमंडळात प्रतिभाताई कॅबिनेट मंत्री होत्या आणि मंडल आयोगाच्या विधानसभेतील खडाजंगीच्या चर्चेला उत्तर देण्याची जबाबदारी, वसंतदादांनी प्रतिभाताईंवर सोपावली होती. त्या उत्तरातून ताईंचा कस लागला. ताईंनी सर्वाना निरूत्तर केले, दादांची शाबासकी मिळवली. आज त्या सगळया आठवणी अशा डोळयांसमोर येत आहेत.
तरी मनांत एक खंत आहेच..
ज्योत – ज्योतीला मिळून गेली
माती मातीलाही
कृष्णा काठी कुंडल आता
पहिले उरले नाही!
दादा आणि यशवंत...
दादांची सलग २३ वर्षे
सेवा करणारा दादांचा निस्सीम सेवक यशवंत हप्पे. जसा बाळासाहेब ठाकरेंचा थापा निष्ठावंत तसाच दादांचा यशवंत. मानसपुत्र आणि मित्रसुद्धा. दादांनी जातपात कधीच मानली नाही. गवळी समाजातला हा तरुण मुलगा. दादांच्या सेवेत आला आणि दादांचाच झाला. शंकरराव चव्हाण यांनी दादांना मंत्रिमंडळातून जेव्हा काढून टाकले तेव्हा म्हणजे १९७४ साली दादांनी राजकीय संन्यास घेतला आणि ते घरी पद्माळयाला बसले.
ते यशवंतला म्हणाले, ‘यशवंता, तुला दुसरीकडे कुठे चांगली नोकरी मिळत असेल तर पाहा बाबा. तुझे नुकसान होता कामा नये.’ यशवंत म्हणाला, ‘दादा कोणतीही परिस्थिती असो मी तुम्हाला सोडणार नाही’. दादांनी यशवंताला सांभाळले, यशवंताने दादांना सांभाळले.
दादा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी यशवंताला मुख्यमंत्री कोटयातून राहायला जागा दिली. दादांच्या पुतण्याचे आणि पुतणीचे लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात करण्यात आले तेव्हा, त्याच मांडवात दादांनी यशवंताचे लग्न लावले आणि पुढे यशवंताला उपजीविकेचे साधनही दादांनीच कायमचे मिळवून दिले.
*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी मी साहेबराव. पुणे. 9028261973. 13 नोव्हेंबर 2022.*
Comments
Post a Comment