"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग 33. लेखन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 3 नोव्हेंबर 2022. "भानगड ९६ कुळीची."
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग 33.
लेखन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
3 नोव्हेंबर 2022.
*"भानगड ९६ कुळीची."*
सज्जनहो नमस्कार 🙏
तुम्ही आम्ही आजकाल पत्रिका आणि जन्म कुंडली पाहतो त्या मध्ये एक गोष्ट नमुद केलेली दिसते. ती म्हणजे ९६ कुळी . माझ्या मते आम्ही १०० % मराठी खानदानाचे आहोत त्यात कुठेही कमी नाही असेच त्यामधून सुचवायचे असते . *पण तुम्ही कधी कोणाला विचारले आहे का की, ९६ कुळीच का? १०० का नाही?*
परंपरेने चालत आलेल्या गोष्ठी त्याच्या पाठीमागचे सत्य उलगडून न पाहता पुढे चालवायच्या एवढेच आपल्याला कळते. सत्याचा पाठलाग करण्याची तसदी आपण कधी घेतच नाही.
ज्यांच्या पत्रिकेत ९६ कुळीची नोंद आहे ते १०० नाहीत, म्हणजेच ४ कुळी कमी आहेत असे म्हटले तर चालेल का तुम्हाला? नाही ना चालणार ?
कारण स्पष्ट आहे. आपण मराठा १०० % आहोत. बरोबर ना.?
असं आहे तर आपण १०० कुळी असं का म्हणत नाही. ९६ कुळी असच का म्हणतो? कधी तरी तुम्ही याबद्दल आजोबा / पंजोबा/ किंवा इतर जाणकार लोकांना विचारले आहे का?
खर तर त्यांच्याकडे सुद्धा पटणारे उत्तर नाही. आपला फक्त पाठीमागेच्या रेघा ओढत बसलो आहोत. हीच "९६ कुळीची भानगड" मी आज सांगणार आहे.
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग 32.
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
*"पत्रिका पाहून लग्न करणे योग्य की अयोग्य?."*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/32-9028261973-30-2022.html
तेंव्हा शिक्षण घेतलेल्या आणि विचारांनी खऱ्या अर्थाने सुशिक्षित असलेल्या लोकांनी समजून घ्या आणि इतरांनी सुज्ञ लोकांकडून समजून घ्या.
*"भानगड ९६ कुळीची."*
जगावर सत्ता गाजवणाऱ्या इंग्रजांनी भारतात सर्व सुत्रे हातात घेतली तेंव्हा एकसुतत्रता असावी म्हणून त्यांनी अनेक व्यवहारात असणाऱ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने योग्य ठरतील अशा पद्धतीने अंमलात आणल्या. आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी अगोदर राज्यशाहीत होण/मुद्रा असायच्या. अगदी शेवटच्या टप्प्यात दमडी / पै / आणे अस्तित्वात होते.
इंग्रजांनी सत्ता करत असताना आर्थिक एकसमानता असावी म्हणून त्यांनी त्यांची इंग्रजी भाषा तर आणणीच पण सोबत रुपया अस्तित्वात आणला. पण आपण आपली व्यवस्था सोडायला तयार नव्हतो. मग शेवटचे आणे आणि रुपया ही दोन्ही चलने आस्तीस्वात राहीली. त्यामध्ये वजन / मापे /अंतरे आणि इतरही अनेक गोष्टी राबवण्यास सुरवात केली. मात्र त्यांच्या आर्थिक रुपयाच्या व्यवस्थेसोबत आपली आणे व्यवस्था मेळ खात नव्हती.
आपला एक आणा ६ आणि इंग्रजांनी आणलेला रुपयाचा ताळमेळ खालील तक्त्यात दाखवला आहे.
१) आपला १ आणा = ६ पैसे.
२) आपले ४ आणे = २४ पैसे.
*आपण २४ पैशांना "चार आणे" म्हणू लागलो. खरं तर हे २५ पैसे.*
पण इथे एक पैसा कमीच आहे.
३) आपले ८ आणे = ४८ पैसे.
*आपण ४८ पैशांना "आठ आणे" म्हणू लागलो. खरं तर हे ५० पैसे.*
पण इथे २ पैसे कमीच आहेत.
४) आपले १२ आणे = ७२ पैसे.
*आपण ७२ पैशांना "बारा आणे" म्हणू लागलो. खरं तर हे ७५ पैसे.*
इथे ३ पैसे कमीच आहेत.
५) आपले १६ आणे = ९६ पैसे.
*आपण ९६ पैशांना "बारा आणे" म्हणू लागलो. खरं तर हे ९६ पैसे.*
पण आपण १६ आणे म्हणजेच ९६ पैशांना एक रुपया म्हणू लागलो. इथे ४ पैसे कमीच आहेत आणि इथेच खरी मेख आहे.
आपला रुपया १६ आण्यांचा तर इंग्रजांचा रुपया १०० पैशांचा.
दोन्ही बाजू आपापल्या परीने योग्यच होत्या. पण व्यवहारात ते शक्य नव्हते. पण तशाही व्यवहार चालूच राहीले.
आजही काही लोकं १६ आणे म्हणजेच एक रुपया समजतात. हीच बाब पुढे मराठी माणसाने आपल्या जाती धर्माशी जोडताना आम्ही "बंदा रुपया" मराठी आहोत. आमच्यात कोणतीही खोट नाही असे संबोधण्यासाठी वापरणे सुरु केले. १६ आणे म्हणजेच १६ x ६ = ९६ कुळी ही बोलीभाषा रुढार्थाने वापरण्यास सुरुवात केली. आणि आजही आपण तेच करत आहोत. आम्ही ९६ कुळी म्हणजेच आम्ही खानदानी १०० पैसे (बंदा रुपया) मराठा आहोत अशी दाखवण्याची पद्धत सुरु झाली ती आजतागायत सुरु आहे. त्यासाठी काही जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामधील आमचे पुर्वज होते हे सांगायला कमी करत नाहीत.
*आपण ९६ कुळींचे आहोत यासाठी आपल्याकडे कागदोपत्री कुठलाही पुरावा नाही. आम्ही पत्रिकेत लिहिले सांगीतले ना... मग ते मान्य करा. असे सांगितले जाते. आहे की नाही खुळ्यांचा बाजार. खरं तर या गोष्टी शाळेच्या दाखल्यावर का नोंद करत नाहीत याचा सुज्ञांनी विचार करावा. सर्व गोष्टी सरकारी दप्तरी नोंद असतात मग ९६ कुळीची नोंद का करत नाहीत.*
उलट "रोटीबेटी" व्यवहार करा असे शासकीय यंत्रणा आणि आपले साधुसंत आणि फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती सांगून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलींच्या लग्नाचा इतिहास एकदा पाहून घ्या. त्यांनी तर सर्व मुली खालच्या वर्गातील मनसबदारी असलेल्या व्यक्तींच्या सोबत लावून दिली आहेत. आपण त्या थोर पुरुषांच्या एकाही गोष्टी चा अवलंब न करता त्यांना कमी लेखून आपण त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहोत की काय असे दाखवण्याची स्पर्धा सुरू केली आहे असे वाटते.
हल्ली सर्व गोष्टींची इतंम्भूत चौकशी करताना ९६ कुळीची खोलवर चौकशी का करत नाहीत. कारण ते कुणालाच माहीत नाही म्हणून. "हम करे सो कायदा."
इंग्रजांनी CGS आणि MKS ह्या दोन पद्धती आणल्या. आपण त्या आपापल्या परीने उपयोग होईल तसे वापरत गेलो. *हीच ती ९६ कुळीची गोष्ट.*
*आता दुसरी बाजू.*
=============
हल्ली वाॅट्स अप युनिव्हर्सिटी चे दिवस आहेत. गेल्या काही वर्षांपासून ठराविक आडनावे असणारी यादी वाॅट्स अप च्या माध्यमातून ९६ कुळीची म्हणून फाॅरवर्ड होत आहेत. अनेक याद्या मध्ये फरक आहे. यादी तयार करताना संबंधित व्यक्ती हवे तसा फरक करत चालले आहेत. कारण यासाठी कुठलाही पुरावा देण्याची गरज नसते. यादी मध्ये असणारे तेवढेच मराठी माणसे म्हणून 'लायक' आहेत आणि बाकीचे 'ना-लायक' आहेत असा दर्शवण्याचा हेतू आहे.
मुळात आजची असलेली जगाची लोकसंख्या (सुमारे) ७०० कोटी ही संख्या माणसाने उत्क्रांतीच्या नादात तयार केली आहे.
तुमच्या दारात असलेल्या आंब्याच्या झाडावर ७०० कोटी आंबे लागले आहेत असं समजा. प्रत्येक आंबा म्हणजे जगातील एक माणूस. प्रत्येकाची जात आणि धर्म वेगळा. पण झाडं तर एकाच आंब्याच्या कोयी पासून आले ना... म्हणजेच आपण एकाच जातीधर्माचे नाहीत का?
मग लग्न कुंडली मध्ये ९६ कुळीची नोंद करुन आपण नक्की काय साध्य करु इच्छितो आहोत याचा विचार करा.
*तीसरी बाजू.*
=========
जेंव्हा एखाद्या व्यक्तीला रक्त भरण्याची आवश्यकता पडते तेंव्हा रक्त स्विकारणारा व्यक्ती "हे रक्त एखाद्या मुस्लिमाचे नाही ना डॉक्टर?" असे विचारतो का? आणि तसं न विचारता तुमच्या शरीरात भरलेलं रक्त नक्की किती कुळीचं होते हे तुम्हाला कसं समजतं? जेंव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तात कमी कुळी असलेल्या व्यक्ती चं रक्त भरले जाते तेंव्हा अशा वेळी आपली ९६ कुळी कोठे जाते?
जेंव्हा जगण्यामरण्याची वेळ येते तेंव्हा आपण कधीच कुळी बघत नाही. हे इथे नमुद करावेसे वाटते.
असं असेल तर मग लग्न जुळवताना ९६ कुळीच का पाहतात?
एखाद्या प्रतिष्ठीत घरातली मुलगी किंवा मुलगा घरातून पळून जाऊन लग्न करतात आणि नंतर यथावकाश त्या दोघांनाही स्विकारले जाते.
*मग आपण खरचं ९६ कुळीचे आहोत का?* याचा एकदा तरी विचार करा.
अर्थात *आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं"* अस समजू नये.
वैज्ञानिक दृष्टिकोण.
साहेबराव माने.
9028261973.
3 नोव्हेंबर 2022.
पुढील भागात - नातीगोती.. खरी.. खोटी?" "नांदा सौख्य भरे" अर्थात "सुखाशी भांडतो आम्ही." भाग 1.
Comments
Post a Comment