"मधू दंडवते...! 12 तारीख अन् शरीरदानाचं विज्ञान!" "महाराष्ट्राचा चांगुलपणा." संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 16 नोव्हेंबर 2022.

*"मधू दंडवते...! 12 तारीख अन् शरीरदानाचं विज्ञान!"*
(21 January 1924. 
12 November 2005.) 
*महाराष्ट्राचा चांगुलपणा.*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
लेखक - डॉ. रेवत कानिंदे. 
जे. जे. रुग्णालय. वैद्यकीय अधिकारी. मुंबई. 
साभार - ABP माझा. 
डॉ. किरण परांजपे. 
कल्याण. 99694 99996 
16 नोव्हेंबर 2022. 

*समोरासमोर : मधू दंडवते.*
बोलतं केलं आहे कुमार केतकर यांनी. 👇
https://youtu.be/KB2N7W05ils
साभार - दुरदर्शन सह्याद्री. मुंबई.

*👉ही पोस्ट तुम्ही तुमच्या अन्य ग्रुप मध्ये फाॅरवर्ड करा.*
नवीन वाचकांना सहभागी होण्यासाठी लिंक दिली आहे. 👇
*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप क्रमांक 1*👇

https://chat.whatsapp.com/HX1b1ARWjXaBKcDMXy7pTx

मृत्यूनंतरही काही काळ का होईना आपण अवयवदान किंवा शरीर दान करून इतरांच्या उपयोगात येऊ शकतो, माणसं घडवू शकतो हे फक्त विज्ञानाशी एकनिष्ठ असलेल्या माणसालाच कळतं. आज 12 नोव्हेंबर. मधू दंडवते यांचा स्मृतिदिन. त्यांना आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारांना त्रिवार अभिवादन.🙏
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://Sahebraomane1967.blogspot.com

मी डॉ. रेवत कानिंदे.
 ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि जेजे हॉस्पिटल,मुंबई मधील माझ्या mbbs च्या पहिल्या वर्ष्याला होतो. दिवाळीच्या सुट्ट्यात सगळे विद्यार्थी घरी असले तरी मी आणि आणखी एक दोन विद्यार्थी एक्सट्रा क्लास साठी थांबलेलो. जेजे हॉस्पिटलच्या आवारात शरीर रचना शास्त्र (अनाटॉमी) विभागाचं भलं मोठं म्युझीअम आहे. रिकाम्या वेळात तिथं रेंगाळत राहणं माझं आवडतं काम. '१२ नोव्हेंबरला' असचं रेंगाळतांना कळलं की एक बॉडी (!) आली. शरीररचना शास्त्र विभागात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी डेड बॉडी असते. बॉडी आली हे कळताच मी एमबाल्बिंगची प्रोसेस पहायची म्हणून बाहेर आलो. बाहेर आल्यावर कळलं की बॉडी अजून अँबुलन्स मध्ये आहे. सोबत नातेवाईक असावेत. त्यांनी बॉडीला दंडवत केला आणि बॉडी विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. बॉडी घेण्यासाठी खुद्द विभागाचे विभाग प्रमुख आणि इतर वरिष्ठ डॉक्टर्स आलेले. त्यामुळे माझ्या मनात कुतूहल की कोण्या VIP ची बॉडी आहे. विचारपूस केल्यावर कळलं की ही माजी रेल्वे मंत्री मधू दंडवते यांची बॉडी. बॉडी हँडओव्हरची प्रोसेस सुरू होती. मी जेवायला कॅन्टीनला गेलो. त्यावेळेस माझ्या कडे मोबाईल नव्हता. कॅन्टीन मध्ये जेवता जेवता आवर्जून पेपर चाळला आणि मधू दंडवते यांच्या बद्दल वाचलं. मधू दंडवते हे भारताचे माजी रेल्वे आणि माजी अर्थमंत्री. पण माझ्या साठी विशेष आकर्षणाची बाब म्हणजे ते फिजिक्सचे विद्यार्थी. माझी नुकतीच १२वी झालेली, त्यात माझे वडील फिजिक्सचे प्राध्यापक, आणि ओघानेच फिजिक्स माझा आवडता विषय. मधू दंडवते हे सिद्धार्थ कॉलेजला फिजिक्सचे विभाग प्रमुख राहिलेले. उगाच एक अक्युट नातं जुळलं त्यांच्या सोबत. त्यांच्या विषयीचे पेपर मधले सर्व लेख वाचून मी अनाटॉमीला वापस आलो. एवढ्या मोठ्या माणसाने कुठलीही पूजापाठ न करता, अंतिमसंस्कार न करता, मोठी अंतयात्रा न काढता शेवटच्या इच्छे प्रमाणे शरीर दान करणे म्हणजे नक्कीच अभिमानास्पद गोष्ट. ए्मबाल्बिंगची प्रक्रिया करण्यासाठी त्यांची बॉडी स्ट्रेचरवर ठेवलेली होती. मी माझा कोणी सख्खा नातेवाईक असावा अश्या रितीने तिथे थांबलेलो. फिजिक्सशी असलेलं नातं तसं करतं कदाचित. ए्मबाल्बिंगच्या प्रोसेस मध्ये एका मोठ्या आकाराच्या सुईने रक्तवाहिनी मध्ये फॉर्मालिन नावाचा द्रव सोडला जातो, बॉडी प्रिझर्व करण्यासाठी. मी उगाच त्या 'डेड बॉडीला' कमी त्रास त्रास व्हावा म्हणून सुई टोचणाऱ्या कर्मचाऱ्याला "दादा जरा व्यस्तीतत करा हं" म्हणून सांगत होतो. तिथे उपस्थित कर्मचारी आणि डॉक्टर्सची नजर माझ्या कडे उपहासाने नवखा म्हणून बघणारी होती. तरीही मी ती प्रोसेस बघत थांबलो ते बॉडी व्यवस्तीत शिफ्ट करे पर्यंत. फिजीक्स विषयाचा एक माणूस आपल्यातून कमी झाला याचं दुःख माझ्या चेहऱ्यावर दिवसभर होतं आणि त्यांनी शरीर दान केलं याचा अभिमानही.
८१ वर्ष्याच्या प्रगल्भ आयुष्यात या माणसाने केलेली कामे आपण जर आज विकिपीडियावर वाचली तरी कळेल की विज्ञाननिष्ठ माणसं राजकारणात किती गरजेची आहेत.
रेल्वेच्या सेकंडक्लासच्या डब्यातल्या बर्थलाही कम्फर्टेबल कुशन्स असावेत हे भौतिकशास्त्राच्या माणसालाच नेमकं कळू शकतं. कुशन्सची डेंसिटी आणि शरीराला मिळणारा आराम यातला संबंध भौतिकशास्त्र तुम्हाला नक्कीच लक्षात आणून देतं.

बुद्धाचं तत्वज्ञान आपल्याला जन्म ते मृत्यू आणि त्या मधलं आयुष्य यावर लक्ष केंद्रित करायला सांगतं. आधीचा जन्म,मृत्यू नंतरच जग हे थोतांड असून जगत असलेल्या आयुष्याला सुखकर आणि इतरांच्या उपयोगी कसं पाडता येईल हे सांगतं. पण मृत्यू नंतरही काही काळ का होईना आपण अवयवदान किंवा शरीर दान करून इतरांच्या उपयोगात येऊ शकतो, माणसं घडवू शकतो हे फक्त विज्ञानाशी एकनिष्ठ असलेल्या माणसालाच कळतं.
आज (12 नोव्हेंबर) मधू दंडवते यांचा स्मृतिदिन. त्यांना आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारांना त्रिवार अभिवादन.
🙏🌹💐🙏
... डॉ. रेवत कानिंदे.
*महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी मी साहेबराव माने. पुणे. 9028261973.*
16 नोव्हेंबर 2022.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.