"ओळख हिरकणी ची". मनिषा ताई सोनवणे. 🌷🌹🎂🎂🌹🌷"महाराष्ट्राचा चांगुलपणा" संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 16 आक्टोंबर 2022.

*"ओळख हिरकणी"* ची- 16 आक्टोंबर.
*डॉ. मनिषा ताई सोनवणे.*
_________________________
*"महाराष्ट्राचा चांगुलपणा"*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
16 आक्टोंबर 2022. 
*16 आक्टोंबर : जन्म दिनाचे औचित्य साधून.*

*डॉ. मनिषा ताई सोनवणे.*
@doctorforbeggars.
🌷🌹🎂🎂🌹🌷

*डॉ. अभिजीत सोनवणे* हे गेले पाच वर्षे पुणे कार्यक्षेत्रात भिक्षेकऱ्यांची निस्वार्थी मनाने शुश्रूषा करताहेत. त्यांनी *भिक्षेकऱ्याला कष्ठकरी ते गावकरी* करण्यासाठी चंग बांधला आहे. आणि त्या दृष्टीने हवे ते सर्व प्रयत्न करताहेत.
प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो असे म्हणतात.
*डॉ. मनिषा ताई सोनवणे ह्या डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या सौभाग्यवती.*

डॉ. मनिषा ताईंच्या पाठींबा असल्याशिवाय डॉ. अभिजीत सोनवणे यांना कदाचित त्यांचं भिक्षेकऱ्यांना सेवा देणं अवघड झालं असतं.

*डॉ. मनिषा ताईं* 🙏
तुमच्या जन्म दिनाचे औचित्य साधून *"महाराष्ट्राचा चांगुलपणा"* च्या दोन्ही ग्रुप कडून आणि *सत्यम् शिवम् सुंदरम्* च्या दोन्ही ग्रुप कडून तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा.

💐🌹🎂
*डॉ. मनिषा ताई आणि डॉ. अभिजीत सोनवणे (मुलगा सोहमसह) यांच्या पदस्पर्शाने आमचे घर पवित्र झाले आहे. त्या दृष्टीने मी भाग्यवान आहे.*
अधूनमधून आमच्या काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी होत असतातच. बऱ्याच वेळा दोघांशी चर्चा करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या बोलण्यातून भिक्षेकऱ्यांसाठी असलेली तळमळ जाणवते. ते करत असलेले काम आपण करु शकत नाही. पण त्या कामासाठी यथाशक्ती आर्थिक मदत नक्कीच करु शकतो. बऱ्याच वेळा तशी संधी मला मिळाली आहे.
गेल्या दोन वर्षांत जगभरात आलेल्या कोरोना च्या महामारीने भारतात किमान पाच लाख व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. पण पुण्यात डॉ. अभिजीत सोनवणे यांचे कडे रजिस्ट्रेशन असलेल्या जवळपास 1100 पेक्षा जास्त भिक्षेकऱ्यांच्या पैकी एकही भिक्षेकऱ्याला जीव गमवावा लागला नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. हे केवळ डॉ. अभिजीत सोनवणे चं करु शकतात. त्या कामी डॉ. मनिषा ताईंची अमुल्य साथ आहे. त्या सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देत आहेत.
*समाजासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या आणि दुर्लक्षित असलेल्या लोकांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न "महाराष्ट्राचा चांगुलपणा" चे दोन्ही ग्रुप काम करत आहे.*
डॉ. अभिजीत सोनवणे यांचे सर्व ब्लॉग आपण pdf file च्या माध्यमातून एकत्र केलेले आहेत. त्या साठी आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या मोनाली ताई पाटिल यांची मदत झाली आहे. ते सर्व ब्लॉग असलेली (सुरवातीपासून गेल्या 30 सप्टेंबर 2021 पर्यंतचे ब्लॉग) pdf file महाराष्ट्राचा चांगुलपणा आणि सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप साठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ. अभिजीत सोनवणे यांचे सर्व ब्लॉग असलेले "भिक्षेकऱ्यांच्या डॉक्टर" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्या साठी मोनाली ताईंनी बनवलेली pdf file डॉ. अभिजीत सोनवणे आणि मनिषा ताईंना उपयुक्त ठरली आहे. "भिक्षेकऱ्यांच्या डॉक्टर" या पुस्तकात संकलन म्हणून मोनाली ताई पाटिल" यांना स्थान दिले आहे. 

डॉ. मनिषा ताई 🙏
औक्षवंत व्हा. किर्तीवंत व्हा. यशवंत व्हा. यशस्वी भव :

जिवेत् शरद् शतम्.
💐🎂🌹
*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

http://Sahebraomane1967.blogspot.com

... साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
16 आक्टोंबर 2022. 
*🙏आपुलकी जपणारी माणसं. 🙏*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.