"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग - 9. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 4 आक्टोंबर 2022 .
*पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल* भाग 9.
संकलन - साहेबराव माने.
9028261973.
4 आक्टोंबर 2022.
*जंत्री : पत्रिकेतील दोष आणि योगांची* (१)
*वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहीलं तर काहीही बिलकुल कारण नसताना जन्म कुंडली /मंगळदोष/शांती यज्ञ करायलाच लावून पुरोहित गुरुजींचा ( नको ती भिती घालून क्रियाकर्म करायला लाऊन) भरमसाठ आर्थिक कमाई चा धंदा घालू आहे. मंगळदोष म्हणजे पुरोहितांनी शोधलेली सोन्याची अंडी देणारी कोंबडीच जणू. दोष काढणारे तेच. उपायही सुचवणारे तेच. मंगळदोष निवारण करण्यासाठी काही पुरोहित तथाकथित गुरुजी १७००० रुपये घेतल्याची उदाहरणे आहेत. जरा विचार करा की घेतलेल्या पैशापैकी काही हिस्सा ते मंगळाला देतात काय जेणेकरून त्यांनी केलेल्या दोष निवारणामुळे मंगळ शांत होतो.* कळतयं पण वळत नाही अशी परिस्थिती झाली आहे वधुवर पालकांची. विशेष म्हणजे वधुवर पालकांनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी स्वतः च्या लग्नाच्या वेळी असं केलेलं नसतं. मग आत्ताच हे खुळ तुमच्या डोक्यात असं काय आलं? तर ते पद्धतशीरपणे पुरोहितांनी आपल्या मनांवर बिंबविलं आहे. त्यावर विनासायास धंदा सुरू आहे. *जरा विचार करा*
छत्तीस गुणांची जुळवाजुळव करण्यापूर्वी पत्रिकेच्या माध्यमातून दोष आणि योगांची खातरजमा केली जाते. दोष आणि योगविरहित पत्रिका असतील तरच गुणांच्या जुळणीत गुरुजी पडतात. चुकून काही दोष किंवा योग सापडेलच तर शांतीचा पर्याय गुरुजींकडे असतोच. कारण सहजासहजी आलेलं गिर्हाईक हाताचं सोडून कसं चालेल ? पत्रिकेतील अशाच काही दोषांची आणि योगांची त्यांनी मांडणी समजावून घेऊ आणि आपलं डोकं वापरू.
*मंगळदोष*
जन्मकुंडलीती प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम, द्वादश यापैकी कोणत्याही स्थानात मंगळ आला, तर कडक मंगळ असा शेरा पंचांगवाले मारतात. व्यक्तीच्या आयुष्यात अनंत अडचणी निर्माण करणारा आणि प्रगतीला मारक ठरणारा हा दोष पंचांगकर्त्याचा की मंगळाचा ? कुंडलीतील एकूण बारा घरांपैकी वरील पाच घरांमध्ये मंगळ येण्याची शक्यता जवळपास पन्नास टक्के आहे. पण केवळ त्या घरात आला म्हणून तो व्यक्तीमध्ये काही दोष निर्माण करतो, यावर विश्वास कसा ठेवायचा ? चिकित्सकपणे विचार केला तर मंगळाने केवळ तीच घरे का निवडली, याला काही आधार ? अर्थात ही घरे काही मंगळाने स्वतः निवडलेली नाहीत. ती पंचांगकर्त्यांनी कर्तबगारी. कोणताही ग्रह व्यक्तीमध्ये दोष निर्माण करायला मोकळा आहे का ? मुळात ग्रहांना भावना, विचार स्वातंत्र्य नाही हे आजही एकविसाव्या शतकात सांगावे लागते हेच मोठे दुर्दैव आहे.
कडक मंगळ असेल आणि लग्न करण्याची इच्छाच असेल तर पुरोहित वर्ग काही मार्ग सांगतात. यात या वर्गाचा आर्थिक फायदा दडलेला असतो. मुलाला मंगळ असेल तर मात्र शांती केली की, मंगळदोष नाहीसा होतो. पण मुलीच्या बाबतीत मंगळ शांत होत नाही. पृथ्वीपासून साडेसात कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगळाला कसे कळत असेल की पुरोहिताने आपली शांती केली की आपण आता शांत बसावे, हे पंचांगवालेच जाणोत ! कडक मंगळ असणारा मुलगा शांती केल्यानंतर कुठल्याही मुलीशी लग्न करू शकतो. पण कडक मंगळ असलेल्या मुलीला ही मुभा नाही. तिला फक्त कडक मंगळवालाच मुलगा चालतो. अन्यथा विरोधात जाऊन लग्न केल्यास अपत्यसुख नाही असं यांचं भाष्य. मग माणूस म्हणतो की ज्या सुखासाठी लग्न करायला निघालो, ते सुख नसेल तर कशाला रिस्क घ्या. तेव्हा शिकणारे जास्त धोका पत्करायला नको म्हणून विरोध करणे टाळतात.
*अपत्य निर्मिती मंगळामुळे होते हे जाहीरपणे मान्य करत, तुकारामांच्या 'नवसे कन्यापुत्र होती । तरी का करणे लागे पती ।।' या अभंगावर अक्षरश: बोळा फिरवतात.*
*यापूर्वीचा पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" भाग 8 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/8-9028261973-2022.html
🔭 *वैज्ञानिक दृष्टीकोन* 🔬
**********************
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973
4 आक्टोंबर 2022.
(याबाबतचे स्पष्टिकरण पुढील भागात)
*डाॅ. नितीन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना' या पुस्तकातुन साभार.*
Comments
Post a Comment