"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."भाग 7. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 2 आक्टोंबर 2022 .

*पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल.*
भाग 7. 
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
2 आक्टोंबर 2022 .
भाग 7
*रहस्य जन्मपत्रिकेचे* (१)

पत्रिका म्हणजे आपल्या जन्मावेळी मंगळ, गुरू, शनी इत्यादी ग्रह कोणत्या राशीमध्ये होते हे सांगणारा नकाशा असतो. पत्रिका काही ठरावीक मर्यादेपर्यंत वैज्ञानिक माहितीवर आधारलेली आहे. परंतु तिच्यावरुन भविष्य सांगणे हे मात्र अवैज्ञानिक आहे. पत्रिकेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टींचे मिश्रण आहे. पत्रिकेमध्ये मध्यभागी पृथ्वी आहे आणि तिच्याभोवती विश्व फिरते ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. हे सोळाव्या शतकात सिद्ध होऊनसुद्धा आम्ही बदललेले नाही. हेच पंचांगकर्त्यांचे 'खोटे पण रेटून बोलण्याचे' यशाचे गमक आहे.

 मध्यभागी पृथ्वी आणि सभोवती बारा घरे असलेली चौकोनी आकृती म्हणजे पत्रिका. घरांचे स्थाने प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ. . . ते द्वादश अशी दर्शवलेली आहेत. पत्रिकेतील स्थानांना फार महत्त्व आहे, अर्थात भटजीच्या दृष्टीने. स्थानांच्या क्रमांकाची सुरुवात अशीच का ? हे विचारायचे नाही. कारण धार्मिक चिकित्सेला अजिबात वाव नसतो. स्थानांची नावे कुंडलीमध्ये लिहिलेली नसतात. कारण हा त्यांचा 'छुपा अजेंडा' आहे. आणि 'छुपा अजेंडा' नेहमीच घातक असतो, हे आपण समजून घेण्याची गरज आहे.

कुंडलीमध्ये आडव्या तिडव्या रेषा मारण्यापेक्षा सरळ बारा चौकोन केले असते तर सोपे झाले असते. बहुजनांना समजले असते ! पण खरी मेख तर इथेच आहे. बहुजनांना पत्रिका कशी बनवतात हे समजले तर पंचांगांवरची विशिष्ट वर्गाची मक्तेदारी संपली असती. म्हणून धर्माने आणि संस्कृतीने जाणीवपूर्वक सोप्या गोष्टी अवघड करून ठेवल्या. आजचे पंचांग जेमतेम शंभर पानांचे. पण पाचशे पानांचे वैज्ञानिक अथवा इतर साहित्यिक पुस्तके लिहिणाऱ्याला अथवा वाचणार्‍यालाही ते समजू नये अशी त्याची रचना असते. हे भारतीय आश्चर्य ! पंचांगाच्या नादाला इतरांनी न लागण्याची सामाजिक व्यवस्थाच निर्माण केलेली असल्यामुळे हे घडतं. व्यक्तीची पत्रिका मांडताना व्यक्तीच्या जन्मावेळी पूर्व दिशेला जी रास उगवत असते त्या राशीचा अनुक्रमांक प्रथम स्थानात लिहतात. पुन्हा असेच का ? म्हणून प्रश्न विचारायचा नाही. त्यांनी जे ठरवले ते अंतिम. पत्रिकेमध्ये १ ते १२ आकडे हे राशींचे अनुक्रमांक आहेत. आकड्यांपेक्षा राशींची नावे लिहिण्यास अडचण नव्हती. पत्रिका न समजण्यासाठी केलेले हे आणखी एक प्रयोजन. 

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
2 आक्टोंबर 2022 

*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली चे गौडबंगाल भाग 6 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.* 👇
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/09/9028261973-6-1-2022.html

(पुढिल भागात या नमुन्याचे सविस्तर स्पष्टिकरण)

- *डाॅ. नितिन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना' या पुस्तकातुन साभार.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.