"ओळख हिरकणी ची..." "महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्." "ओळख हिरकणी ची - 27 आक्टोंबर. "उज्वला ताई क्षीरसागर."🌷🌹🎂🌹🌷जन्म दिनाचे औचित्य साधून. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 27 आक्टोंबर 2022.

"ओळख हिरकणी ची..."
*महाराष्ट्राचा चांगुलपणा*
आणि 
*सत्यम् शिवम् सुंदरम्.*

*"ओळख हिरकणी ची - 27 आक्टोंबर.*
*उज्वला ताई क्षीरसागर.*
🌷🌹🎂🌹🌷
जन्म दिनाचे औचित्य साधून. 

संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
साभार - थिंक महाराष्ट्र. 
27 आक्टोंबर 2022. 
उज्‍वला ताई ह्या आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ग्रुप सह इतरही अनेक ग्रुप च्या सुरवातीपासून सन्मानिय भगिनी सदस्या आहेत. मुख्य म्हणजे त्या ‘उमेश इंडस्‍ट्रीज’ या कंपनीच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक आहेत. त्‍यांनी मराठी विषयातून एम. ए.ची पदवी मिळवली आहे. त्‍यांना लिखाण आणि वाचनाची आवड आहे. ‘थिंक महाराष्‍ट्र’कडून आयोजित करण्‍यात आलेल्‍या सोलापूर आणि नाशिक जिल्‍ह्यांच्‍या ‘संस्‍कृतिवेध’ मोहिमांमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.
थिंक महाराष्ट्र वाचत असताना त्या वेळचे थिंक महाराष्ट्र वेब पोर्टल चे संचालक किरण क्षीरसागर यांच्या कडून उज्वला ताईंचे लेख मिळत गेले. आजही किरण क्षीरसागर यांच्या अधूनमधून पोस्ट आपल्याला येत आहेत. आता ते स्वतंत्रपणे मिडिया मध्ये काम करत आहेत. 

उज्वला ताई 🙏
तुमच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तुम्हाला सत्यम् शिवम् सुंदरम् आणि महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा. 
🌷🌹🎂🌹🌷

उज्वला ताईंचे अनेक वेगवेगळे लेख मी वाचले आहेत त्या पैकी "सिताफळांचा बादशहा - नवनाथ कसपटे" हा एक लेख आज तुमच्या साठी उपलब्ध करून देत आहे. यापुढेही महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप मध्ये इतर लेख वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. 

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.* 

http://Sahebraomane1967.blogspot.com

*सिताफळांचा बादशहा – नवनाथ कसपटे.*
नवनाथ कसपटे यांचे कर्तृत्व असे, की त्यांचे नाव घेतल्याबरोबर लोकांना सिताफळाची आठवण यावी! ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे रहिवासी आहेत. नवनाथ कसपटे यांचा जन्म 1 जून 1955 रोजी बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावी झाला. वडिलांचे नाव मल्हारी आणि आईचे नाव पार्वती. कसपटे यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले. त्यांना दोन मुले आहेत. एका मुलाचे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे तर दुसऱ्या मुलाने डी. फार्मसी केले आहे.

कसपटे यांच्या लहानपणी त्यांच्या आईवडिलांची पस्तीस एकर शेती होती. त्यांनी शेतात चिकू, पेरू, आंबा व पपई यांची लागवड केली. त्यांच्या शेतात, 1985 मध्ये बोअरवेलला पाणी लागले. तत्पूर्वी त्‍यांच्‍या शेतात कोरडवाहू भुसार पिके घेतली जात असत. मात्र पाणी लागल्यानंतर कसपटे फळबागांकडे वळले आणि शेतीत परिवर्तन सुरू झाले. कसपटे यांनी वीस एकर शेतात द्राक्षे लावली, चांगले उत्पन्न येऊ लागले. इतके, की कसपटे द्राक्षे निर्यात करू लागले! त्यांनी जवळ जवळ पंचवीस वर्षे द्राक्षे निर्यात केली. त्यांच्या द्राक्षांच्या निमित्ताने त्यांना ‘युरोगॅप सर्टिफिकेशन’ सोलापूर जिल्ह्यात प्रथमच मिळाले! शेतक-यांकडून शेतामध्ये पॅकिंग शेड, संडास बाथरूम, वॉश बेशिन इत्यादींची उभारणी केली जाते का? तसेच मजुरांची आरोग्य तपासणी, सर्व औषधांचे फवारणी वेळापत्रक या सर्व गोष्टींची नोंद ठेवणे, अशा सर्व गोष्टी शेतकरी नियमाप्रमाणे करतात का याची शेतावर जाऊन सर्व पाहणी करून ऑडिट केले जाते. त्यानंतर ज्याप्रमाणे कारखान्यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र दिले जाते त्याचप्रमाणे शेतातील रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष पाहणी करून ‘युरोगॅप सर्टिफिकेशन’ दिले जाते. कसपटे यांनी शेतावर मजुरांसाठी खोल्या बांधल्या असून निवाऱ्याची चांगली सोय केली आहे. ‘युरोगॅप सर्टिफिकेशन’मुळे कसपटेंना नावलौकिक मिळाला. त्यांची सर्वाधिक द्राक्ष निर्यात झाल्यामुळे महाराष्ट्रातून एकमेव निवड करून त्यांना मार्केटिंगच्या अभ्यासासाठी ‘महाग्रेप’ने लंडनला पाठवले.

पासष्ट बोअरवेल झाले तरीसुद्धा शेतात पाणी खूपच कमी प्रमाणात होते. काही पर्यायी करावे असे कसपटे यांना वाटू लागले. दिवसेंदिवस ती इच्छा बळावत गेली. बार्शीचे कृषी अधिकारी वि.ग. राऊळ यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणले, चर्चा होऊ लागल्या. चर्चेच्या मंथनातून काही चांगले प्रकट झाले व ‘अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ’ स्थापन झाला. त्याचे फळ म्हणजे राज्यात साठ हजार हेक्टर जमिनीत सिताफळाची लागवड करण्यात आली.
*महाराष्ट्राचा चांगुलपणा 9028261973.*
‘अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ’, पुणे ही NGO संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. संघाचे वर्षातून एकदा महाराष्ट्रात कोठेही राज्यव्यापी सीताफळ चर्चासत्र घेतले जाते. संघाने कृषिमंत्री शरद पवार यांच्या कडून सीताफळ संशोधन केंद्राकरिता आठ कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्याचपैकी चार कोटी रुपये बीड येथील आंबेजोगाई संशोधन केंद्राच्या बळकटीसाठी देण्यात आले, तर उर्वरित चार कोटी पुरंदर तालुक्यातील जाधववाडी येथे नवीन सीताफळ संशोधन केंद्रास दिले. जगातील पहिला सिताफळ संघ ऑस्ट्रेलियात तर दुसरा संघ भारतात आहे. सिताफळ संघातील वीस सदस्यांनी ऑस्ट्रेलिया येथील जागतिक सीताफळ चर्चासत्रात सहभाग घेतला होता. त्‍यांनी तेथील सीताफळांच्‍या शेतात जाऊन अभ्यास केला. सीताफळ संघात एकट्या बार्शी तालुक्यातील दीडशे सभासद आहेत. दीडशेपैकी दहा ते पंधरा लोक सिताफळाची शेती करणारे आहेत.

कसपटे हे कार्यक्षम व अभ्यासू आहेत. त्यांची सिताफळाची बाग बघून थक्क व्हायला होते. त्यांच्या कष्टांची पाहणाऱ्याला कल्पना येते. त्यांच्या शेतात बत्तीस जातींची सिताफळे आहेत. नवनाथ कसपटे यांनी निरीक्षणातून NMK1 (गोल्डन) व NMK2, NMK3 आणि फिंगर प्रिंट या चार जाती विकसित केल्या. कसपटे यांनी सिताफळांच्या नव्या जातींना नावे देताना स्वतःच्या ‘नवनाथ मल्हारी कसपटे’ नावातील आद्याक्षरांचा वापर केला. त्या जातींपैकी NMK1 (गोल्डन) ही सीताफळाची जात सर्वोत्तम आहे. कसपटे यांची सिताफळ उत्पादनात स्पेशालिटी झाली आहे. त्यांनी विकसित केलेल्या जातींच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

कसपटे सिताफळांची निर्यात परदेशी करतात. मात्र मुंबई ही त्यांची मुख्य बाजारपेठ आहे. NMK1 (गोल्डन) हे सिताफळ दुसऱ्या सिताफळांपेक्षा मोठे देखणे व चवीला गोड आहे. इतर सिताफळांच्या तुलनेत NMK1 (गोल्डन) या सीताफळात बिया कमी असतात. झाडावरून पिकलेले फळ पडले तर ते दबते, पण फुटत नाही. फळ झाडावर पंधरा दिवस व झाडावरून काढल्यावर आठ दिवस टिकते. दुसऱ्या जातीच्या सिताफळांत तीस ते पस्तीस टक्के गर असतो, तर NMK1(गोल्डन) सिताफळात पन्नास टक्के गर असतो. सिताफळांचा एकरी खर्च लागवडी नंतर दरवर्षी पंधरा हजार ते वीस हजार रुपये इतका येतो, तर उत्पन्न चार ते साडेचार लाख रुपयांपर्यंत येऊ शकते. सिताफळांना पाणी कमी लागते.

नवनाथ कसपटे यांनी 2002 पासून नर्सरी चालू केली आहे. रोपांची लागवड बारा महिने केली जाऊ शकते. पण सिताफळांच्या लागवडीचा काळ जुन -जुलै हा योग्य मानला जातो.

आफ्रिकेतील काही लोकांनी इंटरनेटवर पाहून कसपटे यांच्या शेतीला भेट दिली व 2014 साली सिताफळांची रोपे घेऊन गेले आहेत.

कसपटे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांपैकी पुढील काही –
1. सोलापूर जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार -1994
2. सर्वाधिक द्राक्षे निर्यातीचा महाग्रेपचा पुरस्कार – 1997-98
3. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ पुरस्कृत कृषिभूषण राज्य पुरस्कार – 2008
4. गुजरात सरकारचा श्रेष्ठ किसान पुरस्कार, गांधी नगर, गुजरात – सप्टेंबर 2013
5. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) अंतर्गत सिताफळ लागवड आणि पणन तंत्रज्ञान प्रसार व प्रचार प्रकल्प.
6. कै . वसंतराव नाईक कृषी माल निर्यात पुरस्कार . 2004
7. औरंगाबाद गुनीजन साहित्य संमेलनात बळीराजा पुरस्कार. 2006-07
8. बळीराजा मासिकाचा लेखन गौरव पुरस्कार . 2005
9. पुणे येथील भगवंत मित्रमंडळाचा भगवंतरत्न पुरस्कार .
10. सुरज क्रिडा व संस्कृतिक मंडळ बार्शी यांचा जीवन गौरव पुरस्कार . 2005-06
11. रोटरी क्लब सोलापूर शेती क्षेत्रातील कामगिरीबाबत पुरस्कार . 2005-06

नवनाथ कसपटे सिताफळांविषयी भरभरून बोलतात. त्यातून त्यांचा सिताफळ पिकाविषयीचा व्यासंग, अभ्यास व त्यांची त्या विषयाची रुची लक्षात येते. कसपटे जेवढे अभ्यासू वृत्तीचे तितकेच नम्रही आहेत. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रयोगांमध्ये आस्था वाटते. कसपटे यांच्या शेतीतील प्रयोगांचे अनुकरण करून इतर अनेक शेतक-यांनी स्वतःचा उत्कर्ष साधला आहे. त्यापैकी बार्शीचे राजेंद्र देशमुख (09822248478) आणि उस्मानाबादमधील भागवत गोडसे (07875774952) या यशस्वी शेतक-यांची नावे उदाहरणादाखल सांगता येतील.

कसपटे यांचे शेतीतील प्रयोग आणि त्‍यांची सिताफळे यांची ख्‍याती सर्वदूर पसरलेली आहे. पंजाब नॅशनल युनिव्हर्सिटीमधून योगेश गुप्ता (09041074172) हा विद्यार्थी कसपटे यांच्‍या सिताफळांचा अभ्‍यास करण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडे आला. तो तीन वर्षे कसपटे यांच्या शेतावर राहिला आणि त्याने त्याची NMK1 (गोल्डन) या सीताफळाच्या जातीवर पीएच.डी. पूर्ण केली!

नवनाथ कसपटे
09822669727, nmkaspate@yahoo.com
– उज्ज्वला क्षीरसागर. 

*लेखिका / साहित्यिका आणि उद्योजिका या क्षेत्रात पारंगत असणाऱ्या उज्वला ताई क्षीरसागर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने "महाराष्ट्राचा चांगुलपणा" आणि "सत्यम् शिवम् सुंदरम्" ग्रुप कडून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा.*
🌷🌹🎂🌹🌷
*महाराष्ट्राचा चांगुलपणा 9028261973.*
27 आक्टोंबर 2022.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.