"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल". भाग 27. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 25 आक्टोंबर 2022. "आर. एच. विसंगती."

*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".* 
भाग 27.
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
साभार - डॉ रविंद्र काळे.. 
MBBS, DGO
25 आक्टोंबर 2022. 

*आर. एच. विसंगती - लेख 1 आणि 2.*
... डॉ रविंद्र काळे.. 
MBBS DGO
स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ.

आर. एच. किंवा ऱ्हिसस फॅक्‍टर हे एक अनुवंशिकतेने येणारे प्रथिन आहे आणि लाल रक्‍तपेशींवरील पेशींच्या पडद्याच्या पृष्ठभागावर ते आढळते. तुमच्या रक्‍तामध्ये हे प्रथिन असेल तर तुम्ही आर. एच. पॉझिटिव्ह असता आणि ते नसेल तर आर एच निगेटिव्ह असता.
गरोदर स्त्री आर. एच. निगेटिव्ह असेल तर गरोदरपणात तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आर. एच. निगेटिव रक्तगट असलेल्या गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घ्यावी लागते.

विशेषत: तिच्या पोटातील बाळाचा रक्‍तगट आर. एच. पॉझिटिव्ह असेल तर आणखी काळजी घ्यावी लागते. या स्थितीला आर. एच. कम्पॅटिबिलिटी किंवा विसंगती असे म्हणतात. याचा मातेच्या पोटातील बाळावर परिणाम होऊ शकतो.

आईच्या शरीराची तिच्या बाळाच्या आर. एच. पॉझिटिव्ह रक्‍ताशी आंतर क्रिया होऊन अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) तयार होतात, तेव्हा आर. एच. विसंगती निर्माण होते. विशेषत: याच स्त्रीच्या दुसऱ्या गरोदरपणात बाळ आर. एच. पॉझिटिव्ह असेल, तर तत्काळ अँटिबॉडीज तयार होतात. आर. एच. पॉझिटिव्ह बाळाची वार ओलांडून या अँटिबॉडीज गेल्या की त्याच्या लाल रक्त पेशींचे नुकसान होते.

लाल रक्‍तपेशी शरीरात ऑक्‍सिजन प्रवाहित ठेवण्यासाठी अत्यावश्‍यक असतात. अशा परिस्थितीत लाल रक्तपेशींचे वेगाने नुकसान झाल्याने ऍनिमियासारखी अवस्था निर्माण होऊन बाळासाठी प्राणघातक ठरू शकते. नवीन लाल रक्तपेशी निर्माण करण्याची बाळाच्या शरीराची क्षमता कमी झाल्यास कठीण होते. यातून कावीळ, हार्टफेल्युअर, यकृताचे काम मंदावणे आदी अवस्था येतात आणि बाळासाठी हे प्राणघातक ठरते.

गरोदर स्त्रीची इनडायरेक्‍ट कूम्ब्स चाचणीही साधी रक्त चाचणी करून या अवस्थेचे निदान करता येते. रक्तामध्ये पेशी नष्ट करणाऱ्या अँटिबॉडीज आहेत की नाही याचे निदान या चाचणीद्वारे करता येते आणि तुमचे डॉक्‍टर यावर काय करायचे त्याबद्दल सल्ला देऊ शकतात. बाळाची आई आरएच निगेटिव्ह असेल आणि वडील आरएच पॉझिटिव्ह असेल तर इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्‍शन आईला देऊन तिच्या शरीरात आरएचअँटिबॉडीज तयार होणे रोखता येते.

*या पूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".*
भाग 26.
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

*"लग्नाच्या आधी ब्लडग्रुपचा गैरसमज."*

http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/26-9028261973-24-2022_24.html

*👉लेख... 2*

*रक्तगट आणि गर्भाच्या आरोग्यामध्ये काही संबंध आहे का? एका पालकाचा सकारात्मक आणि दुसर्‍याच्या नकारात्मक रक्तगट असेल तर?*

एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून मला बरेचजण लग्नापूर्वी आणि बाळंतपणात हा प्रश्न नेहमीच विचारतात.

पण इथे मुद्दाम नमूद करू इच्छितो की वधू वरांच्या रक्तगटांचा आणि वंध्यत्वाचा किंवा अनुवंशिक दोषांचा संबंध नाही परंतु जवळच्या नात्यातील लग्न टाळावे आणि स्त्रीचा रक्तगट निगेटिव्ह असल्यास पुढीलप्रमाणे काळजी / खबरदारी बाळगावी.

पालकाचा रक्त गटा पेक्षा त्या स्त्रीचा रक्तगट आर एच निगेटिव्ह ( Rh— Negative) मग तो कोणताही (A — Neg, B-Neg, AB-Neg किंवा O— Negative) असल्यास व तिच्या पतिचा रक्तगट हा RH— Positive असल्यास संबंधित स्त्रीला Negative किंवा Positive रक्तगटाचे बाळ होवू शकते .

Negative रक्तगटाच्या स्त्रीला Negative बाळ जन्माला आल्यास काही करावे लागत नाही

परंतू Negative रक्तगटाच्या स्त्रीस Positive रक्तगटाचे बाळ जन्मल्यास त्या स्त्रीच्या शरीरात विरूध्द पेशी ( Antibodies) तयार होतात .... आणि त्या पेशी पुढील होणाऱ्या बाळास अपाय करू शकतात ( जसे की गर्भपात होणे , गर्भाशयातील बाळ दगावणे, बाळास गर्भाशयात असताना रक्तक्षय ( anemia) किंवा कावीळ होणे , जन्मल्यानंतर पहिल्या दुसऱ्या दिवशी जास्त प्रमाणात कावीळ होणे इत्यादी गोष्टी संभावतात .

यासाठी बाळ जन्मल्यानंतर बाळाचा रक्तगट तपासून तो विरुद्ध असल्यास ( RH-positive) असल्यास — आईला — ( बाळाला नाही ) Anti— D नावाचे injection दिले जाते.

आणि हे प्रत्येक डिलिव्हरीनंतर करणे अपेक्षित आहे. जरी डिलिव्हरीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करायची असेल तरीही बाळाची रक्तगट तपासणी व गरज असल्यास हे injection घ्यावेच .

जरी अनावधानाने किंवा ठरवून गर्भपात केल्यास ... अश्यावेळी छोट्या गर्भाचा रक्तगट तपासणे अशक्य असते ... अश्यावेळी ते बाळ Rh— positive रक्ताचे असेल असे समजून inj Anti— D द्यावे.

पुरुषांचा रक्तगट Negative असल्यास असे काही करायची गरज नसते कारण बाळ स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असते.

तसेच Positive स्त्रीस — Negative बाळ झाल्यास काहीही करायची गरज नसते.

Rh Negative स्त्रीजातीचे बाळ ( मुलगी ) झाल्यास तिच्या लग्नावेळी / गर्भारपणात या गोष्टी पालक म्हणून लक्षात ठेवणे अपेक्षित.
तेंव्हा लग्न करताना वधुवरांच्या रक्तचा गट एक आहे म्हणून विचलित न होता बिनधास्तपणे लग्न कार्य करुन टाकावे. तथाकथित भटजी गुरुजींचा सल्ला धुडकावून लावून वैज्ञानिक दृष्टिकोण ठेवून विचार करावा. 
... डॉ. रविंद्र काळे. 

*वैज्ञानिक दृष्टिकोण.*
साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
25 आक्टोंबर 2022. 

*(पुढील भागात - ''एका लग्नाची गोष्ट''.)*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.