"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल". भाग 24. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 20 आक्टोंबर 2022. "राशीकुटगणचक्रम."
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग - 24.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
20 आक्टोंबर 2022.
*"राशीकुटगुणचक्रम"*
गुणमिलनामध्ये पासिंगसाठी जास्त गुण देऊन मदत करणारा पण नापासांना विचार करायला लावणारा हा आणखी एक प्रकार. सात गुणांसाठी असलेला हा विभाग राशींच्या क्रमांकावर अवलंबून आहे. पंचागामधील माहिती जेवढी अवघड करून देता येईल तेवढी देण्याचा कुटील डाव पंचांगकर्त्यांनी जाणीवपूर्वक केलेला आहे. प्रत्येकाची सोपी गुणपद्धती देण्यापेक्षा कोष्टकरूपाने देऊन बहुजनांना पंचांग न समजण्याची पंचांगकर्त्यांच्या दृष्टीने सोय करून ठेवलेली आहे. राशीकुटगुणाचे कोष्टक सोबत दिलेले आहे. कोष्टकाकडे बघितल्यानंतर हा फारच अवघड प्रकार आहे असे वाटेल. पण विचार केला तर याचे विश्लेषण फक्त एका ओळीत करता येते.
▪ मुलाच्या राशीला एक क्रमांक देऊन तिथून पुढील राशींना क्रमाने नंबर देणे.
▪जर मुलीच्या राशीचा क्रमांक १, ३, ४, ७, १०, ११ यापैकी आल्यास सात गुण. इतर क्रमांक आल्यास शून्य गुण आणि त्याला 'कुटदोष' म्हणून समजण्यात येते. पण एवढ्यावरच थांबतील ते ज्योतिषी कसे ? म्हणून त्यांनी अतिरिक्त 'नवपंचम' आणि 'द्विर्द्वादश' दोषांची निर्मिती केलेली आहे.
*उभयतांच्या राशी परस्परांपासून नवव्या किंवा पाचव्या आल्या तर नवपंचम दोष, अपत्यहानी आणि दुसऱ्या किंवा बाराव्या आल्या तर द्विर्द्वादश दोष, संपत्तीनाश. 👉कोणालाही मारण्याचा आणि त्यांची वाट लावण्याचा यांना कोणी अधिकार दिला ? असा प्रश्न जोपर्यंत पंचांगकर्त्याला विचारला जात नाही तो पर्यंत हे सहन करत राहण्याशिवाय पर्याय नाही.*
गाळलेल्या जागा भरल्यानंतर बरोबर असेल तर सात गुण, नाही तर शून्य गुण, असाच का काहीसा प्रकार. पण बरोबर असल्यास एकदम सात गुण. विचार केला तर आयुष्याची दोरी बांधणारी ही गणिती प्रणाली एवढे गुण न बिचकता कशी देऊन जाते ? हेच कळत नाही.
*गुण जुळवताना मुलामुलींचे व्यक्तिमत्त्व, प्रकृती, आवडीनिवडी, सामाजिक परिस्थिती, सभोवतालची परिस्थिती, शिक्षण इत्यादी गुणांची तरतूद नसलेले हे विधेयक आयुष्याची वाटचाल जोडीने करणाऱ्यांसाठी गुणमिलन ठरेल का कर्दनकाळ ठरेल ? याचा सुशिक्षित म्हणवणारे विचार करतील तेव्हाच खरे. सर्वगुणांच्या पुढे 'चक्रम' का लावले आहे ते आता आपणाला हळूहळू समजायला लागलेले असणार. 'नक्षत्र' ही संकल्पना भारतीयांची आहे. तर 'रास' ही संकल्पना ग्रीकांची आहे. आपली संस्कृती म्हणत असताना राशीवर अवलंबून असलेला गुणांचा प्रकार आपल्या संस्कृतीला कसा चालतो ? असा प्रश्न मला पडलेला आहे तुम्हाला पडतो का ? याचा विचार करा.*
दीपाली - सुनील जोडीची रास सिंह - वृश्चिक असल्यामुळे राशीकुटगुगुणाचे त्यांना सात गुण मिळतात. या विभागामध्ये ही जोडी सात गुण मिळवून सुपरहिट ठरलेली आहे. सात गुण मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाला तोड नाही. कृपया उसाच्या तोडीशी याचा संदर्भ जोडू नये. त्यांनी कशाचेही संदर्भ कोणाबरोबरही जोडले म्हणून आपण आपले संदर्भ अतार्किक पद्धतीने जोडण्याचा तसूभरही प्रयत्न करू नये.
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".*
भाग 23.
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
*"गुणगुणचक्रम."*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/23-9028261973-20-2022.html
🔭 *वैज्ञानिक दृष्टीकोन* 🔬
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
20 आक्टोंबर 2022.
*(पुढील भागात नाडीगुणचक्रम)*
- *डॉ. नितीन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना' या पुस्तकातुन साभार.*
Comments
Post a Comment