"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" .भाग 23. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 19 आक्टोंबर 2022. "गुणगुणचक्रम."

*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."* 
भाग 23. 
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
19 आक्टोंबर 2022. 

*"गणगुणचक्रम"*

 हा गुणांचा प्रकार मुला - मुलीच्या गणाशी संबंधित आहे. या विभागाला जास्तीत जास्त सहा गुण आहेत. सर्व नक्षत्रांची विभागांनी पंचांगकर्त्यांनी तीन प्रमुख गणात केलेली आहे. सत्तावीस नक्षत्रं असल्यामुळे प्रत्येक गणात नऊ नक्षत्रे येतात. गण निवडताना प्रचलित व्यवस्थेशी संबंधित देव, मनुष्य आणि राक्षस असे निवडलेले आहेत. आपला मुलगा अथवा मुलगी देव, मनुष्य किंवा राक्षस यापैकी एका गणात समाविष्ट असणारच आणि तो ठरविण्याचा अधिकार जन्मदात्यांना अजिबात नाही. गण हे मुलामुलीच्या नक्षत्रावरून ठरतात ते खालीलप्रमाणे :

▪देवगण - अश्विनी, मृग, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, श्रवण, अनुराधा, रेवती 
▪मनुष्यगण - भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, पूर्वाभाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा 
▪राक्षसगण - कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका

 नक्षत्रांची तीन गणांत विभागणी कशाच्या आधारे केली ? असा प्रश्न पंचांगकर्त्यांना विचारणे इष्ट नाही. कारण त्याचे उत्तर ठरलेले आहे 'आम्हाला वाटले म्हणून !' गणगुणचक्रमचे कोष्टक लेखाच्या सुरुवातीला दिले आहे.

मुलगा आणि मुलगी एकाच गणातील असतील तर सहा गुण मिळतात. मनुष्य आणि राक्षस गणातील मुलामुलींना शून्य गुण मिळतात. याला गणदोष म्हणतात आणि लग्न करण्यास परवानगी नाही. का ? म्हणून विचारायचं नाही, असा संस्कृतीचा शिरस्ता आहे. मुलगा अथवा मुलगी स्वभावाने चांगली असणे, सामाजिक भान जपणारे, इतरांना मदत करणारे याला काहीच किंमत पंचांगकर्त्यांने गण ठरवताना दिलेली नाही. *व्यक्तीच्या नक्षत्रावर देव अथवा राक्षस गण ठरत असेल तर दरोडेखोर, भ्रष्टाचारी, गुंड हे देव असणे आणि प्रकाश आमटे, मेधा पाटकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम एम कलबुर्गी, प्रा. एन डी पाटील, डाॅ. जयंत नारळीकर, कॉ. गोविंद पानसरे या व्यक्ती राक्षस गणात जाण्याची दाट शक्यता आहे. देव अथवा राक्षस व्यक्तीच्या कामावर न ठरता व्यक्तीचा जन्म कोणत्या नक्षत्रावर झाला यावर ठरत असेल तर या गुणाला कचऱ्याची टोपली दाखवणेच उत्तम.* पंचांगकर्त्यांचे अभिनंदन यासाठी कि, त्यांनी इथे ब्राह्मण वर्गाला मोठेपण दिलेले नाही. *गुणांची उधळण कशावर करावी ? आणि ती कशी करावी ? याची साधी अक्कल जर पंचांगकर्त्यांना नसेल तर आपण का त्या गुणमिलनाची कास धरायची याचा विचार सर्वसामान्यांनी करणे गरजेचे आहे.*
मघा नक्षत्राची दीपाली, राक्षस गणात तर अनुराधा नक्षत्राचा सुनील, देव गणात समाविष्ट होतो. दिपालीच्या बायोडेटामध्ये राक्षस लिहीताना दिपालीच्या पालकांनासुद्धा काहीच गैर वाटत नाही, हे आपल्या महान संस्कृतीचं मोठेपण आहे. आपली मुलगी राक्षस कशी काय ? हे विचारण्याचे धारिष्ट्य ना पालकांकडे ना दीपालीकडे. दीपाली - सुनील जोडी राक्षस - देव गणात असल्यामुळे त्यांना गणगुणाचा फक्त एक गुण मिळतो. *सांगलीमध्ये व्याख्यानानंतर एमबीबीएस झालेली मुलगी मला म्हणाली 'सर मला एम.डी. स्थळ आलेलं होतं. मला मुलगा पसंत होता. ओळखीचा, होतकरू आणि निर्व्यसनी होता. परंतु पत्रिकेत गणादोष आल्यामुळे आमचं लग्न ठरलं नाही. माझ्या बाबांनी स्थळ नाकारलं. उच्च विद्याविभूषितांचं सुद्धा या पत्रिकेबाबत काही चालत नाही, याचे हे द्योतक. 😔*
मुलगीचं नक्षत्र मघा असल्यामुळे तिचा गण राक्षस तर मुलाचं नक्षत्र भरणी असल्यामुळे त्याचा गण मनुष्य. राक्षस - मनुष्य या जोडीला या विभागांतर्गत शून्य गुण मिळतात. यालाच गणदोष म्हणतात. 
*मनाला प्रश्न पडतो की हा दोष डॉक्टर मुलाचा, डॉक्टर मुलीचा, गुण निर्मात्याचा, पालकांचा की परिस्थिती निर्माण करणाऱ्या समाजव्यवस्थेचा !?*

*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".*
भाग 22.
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 
*"ग्रहमैत्रीगुण"*

http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/22-9028261973-18-2022.html

*🔭 वैज्ञानिक दृष्टिकोन🔬*
साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
19 आक्टोंबर 2022. 

*(पुढील भागात "राशिकटगुणचक्रम" )*

- *डॉ. नितीन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना' या पुस्तकातुन साभार.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.