"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल". भाग 22. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 18 आक्टोंबर 2022. "ग्रहमैत्रीगुण."
*"पत्रिका जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग 22.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
18 आक्टोंबर 2022.
*"ग्रहमैत्रीगुण"*
वधुवरांच्या राशीवर आधारित असलेला पाच गुणांसाठीचा हा प्रकार आहे. राशींमध्ये मैत्री आणि शत्रुत्व असते असे यांचे महनीय संशोधन. ग्रहमैत्रीगुणाचे कोष्टक सोबत दिलेले आहे.
सिंह राशीचे वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ हे शत्रू आहेत. त्यामुळे या एकत्रीकरणाला शून्य गुण मिळतात. वधुवरांच्या राशीमध्ये एकाची सिंह आणि दुसऱ्याची वृषभ, तूळ, मकर, कुंभ यापैकी एखादी रास असेल तर त्या जोडीला ग्रहमैत्रीगुणाचे शून्य गुण मिळतात. कारण शत्रू बरोबर संबंध ठेवणे योग्य नाही, असे सर्वमान्य असलेले तत्त्व त्यांनी इथे लावले. त्यामुळे त्यांचे काहीच चुकले नाही. आमचेच चुकले. कारण वधुवर एकमेकांना पसंत असूनसुद्धा आम्ही गुण जुळवण्यासाठी त्यांच्या दारात गेलो. 'गुण जुळवून घ्या' म्हणून सांगायला ते आमच्याकडे आले नव्हते.
दीपाली - सुनील जोडीची रास सिंह - वृश्चिक असल्यामुळे त्यांना ग्रहमैत्रीगुणाचे पाच गुण मिळतात. कोष्टकामध्ये असलेली मार्किंग सिस्टिम अशीच का ? २, अडीच, साडेतीन किंवा साडेचार मार्क यांना वर्ज्य आहेत का ? असे त्यांना विचारणं म्हणजे त्यांच्यादृष्टीने आपलाच गाढवपणा ठरेल !
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".*
भाग 21.
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
*"योनिगुणचक्रम."*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/21-9028261973-17-2022.html
*वैज्ञानिक दृष्टिकोण.*
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
18 आक्टोंबर 2022
*(पुढील भागात गणगुणचक्रम)*
*डाॅ. नितीन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना' या पुस्तकातुन साभार.*
Comments
Post a Comment