"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल". भाग 21. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 17 आक्टोंबर 2022. "योनिगुणचक्रम."
*"पत्रिका आणि जन्म जुळवताना चे गौडबंगाल."*
भाग : 21.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
17 आक्टोंबर 2022.
*"योनिगुणचक्रम "*
वधुवरांच्या नक्षत्रांशी संबंधित असलेल्या या गुण प्रकारात जास्तीत जास्त चार गुण मिळतात. प्रत्येक नक्षत्राला योनी असते असे यांचे अफाट ज्ञान. योनींची नावे पण फारच वेचक आहेत. उदारणार्थ अश्व, सर्प, उंदीर, मुंगुस, वानर, श्वान इत्यादी. माणसाला प्राण्यांच्या योनीशी जोडणारे हे पंचांगकर्ते कोणत्या काळात वावरत आहेत हेच समजत नाही. प्रत्येक योनीला असणारी नक्षत्रे पुढे दिलेली आहेत.
अश्व : अश्विनी, शततारका
गज : भरणी, रेवती
मेष : कृत्तिका, पुष्य
सर्प : रोहिणी, मृगशीर्ष
श्वान : अार्द्रा, मूळ
मार्जार : पुनर्वसू, आश्लेषा
मूषक : मघा, पूर्वाफाल्गुनी
गौ : उत्तराफाल्गुनी, उत्तराभाद्रपदा
महिषी : हस्त, स्वाती
व्याघ्र : चित्रा, विशाखा
मृग : अनुराधा, ज्येष्ठा
वानर : पूर्वाषाढा, श्रवण
मुंगूस : उत्तराषाढा
सिंह : धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा
उंदराची योनी : समजा एखाद्याचे नक्षत्र मघा असेल तर त्या व्यक्तीची योनी होते उंदीर. काय कल्पना आहे पंचांगकर्त्यांची ! योनीला विज्ञानामध्ये जो अर्थ प्राप्त आहे त्या अर्थाचा कोणता अर्थ इथे लावायचा ? उंदराच्या योनीतून सदर व्यक्तीचा प्रवेश झाला की उंदीर योनीतून प्रवेशकर्ता झाला ? योनीगुणाचे कोष्टक लेखाच्या सुरुवातीला दिलेले आहे.
कोष्टकामध्ये गुणांची विभागणी शून्य ते चार कशाच्या आधारे केली ? असे प्रश्न विचारणे पंचांगकर्त्यांच्या दृष्टीकोणातून मूर्खपणाचे ठरेल. आपल्या दृष्टीकोनातून पंचांगकर्ते काय असतील ते मात्र आपणच ठरवायचे.
मघा नक्षत्र असलेल्या दीपालीची योनी मूषक तर अनुराधा नक्षत्र असलेल्या सुनीलची योनी मृग होते. दीपाली - सुनील या मुषक-मृग जोडीला योनीगुणाचे दोन गुण मिळतात. *मुळात योनी, नक्षत्र आणि व्यक्तीचा जन्म यांचा संबंध (?) लावुन गुण देणे हे एक अवैज्ञानिकपणाच लक्षण आहे. संबंध लावायचाच असेल तर दोघांच्या एकमेकांच्या स्वभावाचा संबंध लावा. एकमेकांच्या रक्ततपासणीचा संबंध लावा. पत्रिका पहायचीच असेल तर ती डॉक्टरांच्या कडे जाऊन 'आरोग्य पत्रिका' पहायला हवी जेणेकरून वधुवरांच्या वैवाहिक जीवनातील संभाव्य धोके लक्षात येतील. आज धकाधकीच्या जीवनात 'आरोग्य पत्रिका' महत्त्वाची आहे ती पाहावी आणि त्यावरुन गुण द्या. हेच जास्त योग्य. या गोष्टी शिक्षणाने सम्राट असलेल्या आजच्या पिढीला समजत नाहीत का? रुढी आणि परंपरा च्या नावाखाली आपणच आपल्या मुलामुलींचे (आरोग्य पत्रिका न पाहता भटजींची गरज नसलेली भलतीच गौडबंगाल असलेली पत्रिका पाहून त्या आधारे लग्न करुन) वैवाहिक आयुष्य खराब करत आहोत हे लक्षात असू द्या.*
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".*
भाग 20.
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
*"तारागुणचक्रम."*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/20-9028261973-15-2022.html
🔬 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
17 आक्टोंबर 2022.
*(पुढील भागात ग्रहमैत्रीगुण)*
- *डॉ. नितीन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना' या पुस्तकातून साभार.*
Comments
Post a Comment