"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल". भाग 20. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 15 आक्टोंबर 2022. "तारागुणचक्रम."

*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल"*
भाग 20. 
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
15 आक्टोंबर 2022. 

*तारागुणचक्रम* 

वधुवरांच्या नक्षत्रांच्या क्रमांकावर अवलंबून असलेला हा गुणांचा प्रकार पंचांगकर्त्यांनी तीन गुणांसाठी ठेवलेला आहे. कोष्टक मोठे आहे परंतु गुण मात्र फारच कमी ठेवलेले आहेत. यांची गुण देण्याची पद्धतच वेगळी आहे. जास्त गुणांसाठी कमी मजकूर आणि कमी गुणांसाठी जास्त मजकूर. तारागुणाचे दिलेले आहे.

▪वधू आणि वराच्या नक्षत्रांच्या क्रमांकाला ९ ने भागणे.
▪ भागाकारानंतर जी बाकी उरते ती बाकी ० ते ८ पर्यंत असणार.
▪ दोन्ही भागाकारात बाकी किती राहते यावर गुण देणारा हा प्रकार आहे.

कोष्टकाचा बारकाईने निरीक्षण केले तर अनेक चित्रविचित्र बाबी लक्षात येतात.
▪ दोन्ही भागाकारात बाकी ३, ५, ७ राहिली असता तारा अशुभ असतो अस यांचं संशोधन आणि शून्य गुण दिले जातात.
▪ एकाची अशुभ आणि दुसऱ्याची शुभ बाकी राहिली तर दिड गुण.
▪ दोघांचीही शुभ बाकी राहिली असता तीन गुण दिले जातात.

 संख्येला ९ ने भागले तर बाकी शून्य ते आठ राहणारच, त्यात काय फार मोठं गणिती तत्त्वज्ञान आहे ? आणि बाकी ३, ५,७ असेल तर अशुभ आणि ०, १,२,६,८ असेल तर शुभ. या गणिती मांडणीला काही आधार ? आहे ना आधार. संस्कृतीचा, प्राचीन परंपरेचा, वेदांचा अशी यांची ठरलेली उत्तरे असतात. भागाकारातून बाकी राहण्याचा आणि मुलामुलीचे लग्न होऊन सुखी संसार होण्याचा काही संबंध आहे का ? अर्थात विचार करायचा असं ठरवलं असेल तरच अशा प्रश्नांचा वेध घेण्याचा धारिष्ट्य येण्याची शक्यता आहे.

 दीपाली - सुनील जोडीचे नक्षत्र मघा - अनुराधा आहे. सदर नक्षत्रांचा क्रमांक ‍१०-१७ आहे. दोन्ही क्रमांकांना ९ ने भागले तर बाकी १-८ उरते. तारागुणाच्या कोष्टकावरून या जोडीला तीन गुण मिळतात.

*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".*
भाग 19.
*"वश्यगुणचक्रम."*
वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/19-9028261973-14-2022.html

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
15 आक्टोंबर 2022. 

(पुढील भागात योनीगुणचक्रम)

- *डॉ. नितीन शिंदे यांच्या "पत्रिका जुळवताना" पुस्तकातून साभार.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.