"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" भाग 19.संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 14 आक्टोंबर 2022. "वश्यगुणचक्रम."

*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".*
भाग 19.
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
14 आक्टोंबर 2022. 

*"वश्यगुणचक्रम."*

 वधुवराच्या राशीवर अवलंबून असलेला हा विभाग दोन गुणांसाठी आहे. आणि विशेष म्हणजे अर्धा गुण देण्याची सुद्धा सोय या विभागात करण्यात आलेली आहे. वश्यगुणाचे कोष्टक लेखाच्या सुरुवातीला दिलेले आहे. 

बारा राशींची वर्गवारी यांनी पाच विभागामध्ये हुशारीने केलेली आहे. राशींचे जे काल्पनिक आकार आहेत त्याप्रमाणे त्यांची विभागाणी पाच गटांत खालीलप्रमाणे केलेले आहे. आपला मुलगा अथवा मुलगी चतुष्पाद, मानव, जलचर, वनचर किंवा कीटक यापैकी हमखास एका वर्गातला असणारच भले ते त्यांच्यासारखे दिसत नसले तरी दोन गुणांसाठी ही विभागणी आवश्यक आहेत.
 
चतुष्पाद - मेष, वृषभ 
मानव - मिथुन, धनु, कुंभ, कन्या, तूळ 
जलचर - कर्क, मीन, मकर 
वानर - सिंह 
कीटक - वृश्चिक 

चतुष्पाद मध्ये समाविष्ट असलेली मेष रास म्हणजे मेंढा तर वृषभ म्हणजे बैल. हे चार पायांचे प्राणी आहेत म्हणून त्या राशींची गणना चतुष्पादमध्ये. अर्थात व्यक्तीची रास मेष असली म्हणून व्यक्ती मेंढ्यासारखी दिसत नाही किंवा तिचे आचरण मेंढ्यासारखे नसते, हे आपण समजून घ्यायचे असते. मानवामध्ये समाविष्ट असलेली मिथुन रास म्हणजे दोन मुले एकमेकांच्या खांद्यावर हात टाकलेली. धनू म्हणजे बाण मारत असलेला अर्धा प्राणी तर अर्धा माणूस. कुंभ म्हणजे पाणी ओतणारा पाणक्या, कन्या म्हणजे खुर्चीत बसलेली मुलगी, तुळ म्हणजे तराजू, तराजू मात्र मानव या संकल्पनेत का समाविष्ट केला हे समजत नाही. बहुतेक कोर्टात निकाल देणारा माणूसच असतो म्हणून कदाचित असा धोरणात्मक निर्णय पंचांगवाल्यांनी घेतला असावा. सिंह जंगलात राहतो म्हणून वनचर. तर वृश्चिक म्हणजे विंचू हा कीटक प्रकारात मोडतो म्हणून कीटक. पंचांगकर्ते किती धोरणी, हुशार, उच्च विद्याविभूषित असले पाहिजेत हे या गट विभागणीवरून लक्षात येते.

सिंह रास असलेली दीपाली वनचर विभागात तर वृश्चिक रास असलेला सुनील कीटक या विभागात समाविष्ट होतो. दीपाली - सुनील या वनचर - कीटक जोडीला वैश्यगुणाचे शून्य गुण मिळतात. आमची दीपाली वनचर आहे तर आमचा सुनील कीटक आहे, असं उच्चारायला कोणत्याही प्रकारचा कमीपणा आमच्या आईबाबांना वाटू नये याचं आश्चर्यच आहे !

*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल"*
 भाग 18. 
*"वर्णगुणचक्रम."*
 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/18-9028261973-13-2022.html

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
14 आक्टोंबर 2022 

*(पुढील भागात तारागुणचक्रम)*

- *डॉ. नितीन शिंदे यांच्या "पत्रिका जुळवताना" पुस्तकातून साभार.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.