"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" भाग 18. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 13 आक्टोंबर 2022. "वर्णगुणचक्रम."
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल"*
भाग 18.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
13 आक्टोंबर 2022.
*वर्णगुणचक्रम*
हा गुणाचा प्रकार मुला-मुलीच्या वर्णाशी जोडलेला आहे. वर्णगुणाचे उपलब्ध असलेले कोष्टक खाली दिलेले आहे. खालील कोष्टकाप्रमाणे जास्तीत जास्त एक अथवा कमीत कमी शून्य गुण मिळतात.
कोष्टक पाहिल्यानंतर फारच अवघड आहे, असे वाटण्याची शक्यता आहे. कोष्टक समजून घ्यायला फार सोपे आहे. पण कोष्टका पाठीमागे फार मोठी सामाजिक विषमता दडलेली आहे. कोष्टकामध्ये असलेला विप्र शब्द नवीन वाटणे स्वाभाविक आहे. पण विप्र म्हणजे ब्राह्मण. विप्रच्या ऐवजी ब्राह्मण लिहिण्यास काय अडचण होती ? आपले वर्चस्व टिकवून ठेवणे हाच यातील मूळ हेतू. सर्व वर्णातील महिलांना दुय्यम लेखणारा हा गुणांचा प्रकार आहे. कोष्टकाचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात येते की,
▪ वरच्या वर्णातील वर्गाने त्याच्या अथवा खालच्या वर्णातील वधूशी लग्न केल्यास एक गुण.
▪ वरच्या वर्णातील वधूने खालच्या वर्णातील वराशी लग्न केल्यास मात्र शून्य गुण.
*प्रत्येक वर्णातील मुलीला कमी लेखण्याचा हा प्रकार वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था घट्ट करण्याचेच काम करतो.*
*पंचांगकर्त्याच्या अधिकारामुळे वरच्या जातीतील मुलाने खालच्या जातीतील मुलीशी लग्न केले तर चालते. पण वरच्या जातीतील मुलीने खालच्या जातीतील मुलाशी लग्न केले तर मात्र चालत नाही. कारण मुलीने केले तर 'खानदान की इज्जत पुरी मिट्टीमें मिल जाती है!' हा विरोधाभास वाटत नाही का ? म्हणजे संस्कृती रक्षणाची जबाबदारी फक्त मुलींचीच का ? पुरुषी अहंकार बाजूला ठेवून विचार केला तरच असे प्रश्न पडू शकतील.* *पुरुषांमध्येही ब्राह्मण मुलाला उच्चस्थानी तर शूद्राला सगळ्यात तळाला ठेवण्यात आलेले आहे. हे जातिव्यवस्थेचे समर्थन नव्हे का ? पंचांग हे वर्णवर्चस्ववादी, जातीयवादी आणि पुरुषप्रधान असल्याचा हा एक नमुना. आजही लग्न ठरवताना आपण गुणमिलनाचा आग्रह धरणार असाल तर जातिव्यवस्थेचे, वर्णवर्चस्वाचे आणि स्त्री पुरुष असमानतेचे समर्थन आपण करतो, असा त्याचा अर्थ होतो. आज एकविसाव्या शतकामध्ये जात, वर्ण नष्ट झालेले आहेत असे एकीकडे आवर्जून सांगायचे आणि दुसरीकडे संस्कृतीच्या नावाखाली ते घट्ट करायचे असे दुटप्पी वर्तन करणे योग्य नव्हे. किंबहुना ते लोकशाही विरोधी आहे. आणि आपण ते मान्य करुन एकप्रकारे त्यांच्या उद्दिष्टपूर्तीला खतपाणीच घालत आहोत. या गोष्टी चा विचार का करत नाही?*
*राजा बोले, दल हाले."* असाच प्रकार सुरु आहे.*
मुलामुलींची ठरवून लग्न करताना पालकवर्ग प्रामुख्याने आपल्याच जातीतील आणि धर्मातील मुलामुलींचे लग्न करत असल्यामुळे दीपाली - सुनील या जोडीला वर्णगुणांतर्गत एक गुण हमखास मिळाल्यात जमा आहे.
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग 17 वा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/17-9028261973-12-2022_11.html
*वैज्ञानिक दृष्टिकोण.*
साहेबराव माने. पुणे.
9028261973.
13 आक्टोंबर 2022.
*(पुढील भागात वश्यगुणचक्रम)*
- *डॉ. नितीन शिंदे यांच्या "पत्रिका जुळवताना" या पुस्तकातून साभार.*
Comments
Post a Comment