"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग . 17. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 12 आक्टोंबर 2022 . "गुणमिलनाचे गौडबंगाल."
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल.*
भाग 17.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
12 आक्टोंबर 2022.
*गुणमिलनाचे गौडबंगाल*
पत्रिका जुळत नाही अथवा गुण जुळत नाहीत एवढ्या कारणास्तव अनेकांची लग्ने मोडतात. पण पत्रिका का जुळत नाहीत ? काय कारण आहे, हे मात्र वधुवराकडील कोणीही पंचांगकर्त्याला विचारत नाही. बहुजनांवर या विभागाचा मात्र चांगलाच प्रभाव पडलेला आहे. मुलगा अथवा मुलगी पसंत नसेल तर नकार कळविण्यापेक्षा पत्रिका जुळत नाही, असे सांगितल्यामुळे प्रतिष्ठा टिकवून ठेवता येते. गुणमिलन हा प्रकार किती तकलादू, वर्णवर्चस्ववादी, स्त्री पुरुष असमानतेचे समर्थन करणारा आणि मुख्यत्वे फसवाफसवीचा आहे हे मात्र समजून घेणे काळाची गरज आहे. मुला मुलींचे विवाह ठरवताना मुलगा आणि मुलीचे गुण जुळणे भारतीय समाजात महत्त्वाचे मानले जाते. यालाच पत्रिका जुळवणे असेही समजतात. पत्रिका जुळविण्यासाठी छत्तीस गुणांची परीक्षा असते. त्या परीक्षेत अठरा गुण पडले तरच उत्तीर्ण. पण हे गुण मिळवण्यासाठी मुला मुलीला कसलाही अभ्यास करावा लागत नाही. आपली पत्रिका दिली की पंचांगकर्ते किती गुण पडले हे सांगतात. हे गुण कसे दिले जातात ? किंवा कसे जुळवले जातात ? याबद्दल एक चकार शब्दही मुलामुलींच्या पालकांनी भटजीकडे काढू नये ही अस्वस्थ करून सोडणारी गोष्ट आहे. प्रस्थापित व्यवस्थेने संस्कृतीच्या नावाखाली भारतीय समाज किती आंधळा करून सोडला आहे याचे हे बोलके उदाहरण आहे.
पालकवर्ग गुण जुळल्याशिवाय मुलामुलींची लग्न ठरवत नाहीत. चुकीच्या परंपरांचा अभिमान बाळगायचा की आधुनिकतेचा विचार करायचा हे युवकवर्गाने ठरविल्याशिवाय भारत महासत्ता होणे फारच अवघड आहे.
गुणमिलनातील छत्तीस गुणांची विभागाने आठ प्रमुख गटांमध्ये केलेली आहे. त्यापैकी वर्णगुणचक्रमला सर्वात कमी गुण, म्हणजे एक गुण. तर नाडीगुणचक्रमला सर्वात जास्त म्हणजे आठ गुण आहे. पदवी परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या गुणांचे असतात. तसेच काहीसे अनुकरण पंचांगवाल्यांनीही केलेले आहे. गुणांची विभागणी खालीलप्रमाणे आहे.
वर्णगुणचक्रम : १ गुण
वश्यगुणचक्रम : २ गुण
तारागुणचक्रम : ३ गुण
योनीगुणचक्रम : ४ गुण
ग्रहमैत्रीगुणचक्रम : ५ गुण
गुणगुणचक्रम : ६ गुण
राशीकुटगुणचक्रम : ७ गुण
नाडीगुणचक्रम : ८ गुण
मघा या दहा क्रमांकाच्या नक्षत्रावर जन्मलेली सिंह राशीची दीपाली आणि सतराव्या क्रमांकाच्या अनुराधा नक्षत्रावर जन्मलेला वृश्चिक राशीचा सुनील या वधूवरांच्या जोडीला छत्तीस गुणांपैकी किती गुण मिळतात याचा त्यांच्या पद्धतीने आढावा घेऊ आणि आपल्या पद्धतीने विचार करू.
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" भाग 16 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/16-9028261973-11-2022.html
🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
12 आक्टोंबर 2022.
*(पुढील भागात वर्णगुणचक्रम)*
- *डॉ. नितीन शिंदे यांच्या पत्रिका जुळवताना या पुस्तकातून साभार.*
Comments
Post a Comment