"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग . 15. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 10 आक्टोंबर 2022 .
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल"*
भाग 15.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
10 आक्टोंबर 2022.
*मूळ नक्षत्र मुळावर उठते !*
पंचांगकर्त्यांनी प्रत्येक भारतीयाला एक नक्षत्र दिलेलं आहे. ज्यादिवशी व्यक्तीचा जन्म होतो त्यादिवशी जे नक्षत्र असते, ते जन्मलेल्या व्यक्तीचे नक्षत्र होते. भारताची लोकसंख्या जवळपास एकशेवीस कोटी गृहित धरली तर जवळजवळ चार कोटी व्यक्ती एका नक्षत्राच्या येतील. दोन कोटी स्त्रिया आणि दोन कोटी पुरुष. त्यामुळे दोन कोटी स्त्रियांच्या वाटणीला मूळ नक्षत्राचे प्रताप येतात. मूळ नक्षत्र सासऱ्यास वाईट, आश्लेषा नक्षत्र सासूस, तर ज्येष्ठा नक्षत्र दिरास वाईट. अशा विविध प्रकारच्या तरतुदी पंचांगनिर्मात्याने करून ठेवलेल्या आहेत. याला पुरावा काय ? तर उत्तर येतं संस्कृती, परंपरा, धर्म, वेदवाक्य इत्यादी. सदर नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना या त्रासातून मुक्त होण्यासाठी शांती हा प्रकार आहेच. एखाद्या नक्षत्राची शांती केल्यावर तो आपल्याला त्रासातून मुक्त करतो, हा प्रकार हास्यास्पद वाटतो. पण त्यासाठी हे नक्षत्र आकाशामध्ये पाहायला पाहिजे आणि नक्षत्र म्हणजे काय असते ते समजावून घ्यायला पाहिजे. अर्थात यासाठी वेळ पाहिजे. तो आहे कोणाकडे ? नक्षत्र आकाशात न पाहता त्याच्या शांतीसाठी मात्र पुरोहितवर्गाच्या मदतीने शॉर्टकट्स शोधले जातात.
'मुलगी मूळ नक्षत्राची असेल तर मुळावर उठते' असे पंचांगकर्ते म्हणतात. पंचांगकर्त्याला हे वाक्य लिहित असताना थोडा विचार करणे गरजेचे होते. आपणही कोणातरी मुलीच्या पोटी जन्म घेतलेला असणार हे विसरता ? सासऱ्यांना काही वाईट घडलं तर सून जबाबदार, सासऱ्याच्या कर्तृत्वाचा काहीच रोल नाही का ? सासरी जर काही दुर्घटना घडली तर सुनेच्या पायगुणांवर घसरण्यासाठीची संस्कृतीने केलेली ही तरतूद आहे. मुलगा मात्र मूळ नक्षत्राचा असेल तर चालतो. पुरुषप्रधान संस्कृतीचे हे आणखी एक रूप. आपल्यावर वाईट प्रसंग का येतात याची सासरेबुवांनी चिकित्सा करायला पाहिजे. त्या प्रसंगाच्या कारणांपर्यंत गेले पाहिजे. ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सुनेला कशाला दोष द्यायचा ! शेवटी तीही कोणाची तरी मुलगी आहेच ना ?
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" भाग 14 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/14-9028261973-9-2022.html
🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
10 आक्टोंबर 2022.
(पुढील भागात वैरवर्ग)
- *डॉ. नितीन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना या पुस्तकातून साभार.*
Comments
Post a Comment