"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." भाग . 13 . संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 8 आक्टोंबर 2022 .

*पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल*
भाग १३. 
संकलन - साहेबराव माने. 
पुणे 9028261973 
8 आक्टोंबर 2022. 

*मृत्यूषडाष्टक योग*

राशीच्या क्रमांकावर आधारलेला हा योग आहे. नावामध्येच भीती निर्माण करणारा हा सहा (षड) आणि आठचा (अष्टक) योग, साक्षात मृत्यूची चाहूल देत असेल, तर विचार करणे गरजेचे आहे, हे (तथाकथित) सुशिक्षितासही कळते. मृत्यूचा योग असेल तर तो टाळलेला बरा, असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण पंचांगवाल्यांची दहशतच प्रचंड आहे. उदाहरणार्थ मुलगा वृश्चिक राशीचा आणि मुलगी मेष राशीची असेल तर मृत्यूषडाष्टक योग येतो. वधूवराची रास परस्परांच्या राशीपासून सहा अथवा आठव्या क्रमांकावर आल्यास मृत्यूषडाष्टक योग आला असे म्हणतात. वधूच्या अथवा वराच्या राशीला एक क्रमांक देऊन पुढील तिथून पुढील राशींना क्रमाने नंबर दिल्यावर, वर अथवा वधूची रास सहा अथवा आठव्या क्रमांकावर आली तर हा योग संभवतो. या योगामध्ये दोघांचाही मृत्यू अटळ आहे. पण शांती केल्यास तो टाळता येतो. *सर्व (रोगांवर) रामबाण उपाय म्हणजे शांती. अर्थात जप, तप आणि दान. शेवटी मात्र दान ! कारण हे दान म्हणजे बहुजनांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या श्रमाचं, पैशाचं शोषण करून पिढ्यानपिढ्या आयतं जगण्याची व्यवस्था होय.* वधूची रास वराच्या राशीपासून सहाव्या क्रमांकावर येते आणि वराची रास वधूच्या राशीपासुन बरोबर आठव्या क्रमांकावर येते. काय अफलातून गणित आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. किती प्रचंड अभ्यास या पंचांगवाल्यांनी केला असेल असे क्षणभर आपल्याला वाटेल. पण जरा डोके लढवले तर लक्ष येते की एकूण राशी बारा आहेत. पहिली रास दुसऱ्या राशीपासून सहाव्या क्रमांकावर आली तर दुसरी रास पहिल्या राशीपासून आठव्या क्रमांकावर येणारच. त्यात कसला आलाय प्रचंड अभ्यास आणि किचकट आकडेमोड. हा शुद्ध भंपकपणा आहे. पण संस्कृती आणि परंपरेच्या भीतीने तो आदराचा विषय ठरलेला आहे.

*ही असली अतार्किक आकडेमोड करणाऱ्याला आम्ही 'गुरुजी' म्हणून संबंधतो. हा खरे तर शाळेत शिकवणाऱ्या गुरुजींचा अपमान आहे. सरळ सरळ आपल्या नावाने समाजाला फसवायचा बिनभांडवली उद्योग ही मंडळी राजरोसपणे करीत आहेत. ग्रह तारे ही खरी तर शिक्षण खात्याची मालमत्ता आहे. परंतु या ज्योतिष मंडळींनी हायजॅक केलेली आहे. केवळ आपल्या निष्काळजीपणामुळेच !*

*सुशिक्षित असूनही अशिक्षितासारखे वागू नका. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विचार करा.*

*यापूर्वीचा पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" भाग 12 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/12-9028261973-7-2022.html

🔭 *वैज्ञानिक दृष्टीकोन* 🔬
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
8 आक्टोंबर 2022. 
(पुढील भागात शनीची साडेसाती)

- *डॉ. नितीन शिंदे*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.