"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."भाग . 12. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 7 आक्टोंबर 2022 .
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल"*
भाग - 12.
संकलन - साहेबराव माने.
9028261973.
7 आक्टोंबर 2022.
*गुरुदोष*
पंचांगामध्ये गुरु ग्रहाला फार महत्त्व आहे. बहुतेक तो सर्व गृहात मोठा असावा म्हणून त्यास हा मान दिलेला असावा. गुरुबल उत्तम असणे ही पंचांगाच्या दृष्टीने फार महत्त्वाची बाब. यंदा आठवा गुरु आहे त्यामुळे लग्नकर्तव्य नाही. असं शिकलेली मुलं म्हणतात त्यावेळेला हसू येतं. आठवा गुरू असणे म्हणजे काय ? हे माहीत नसतानाही त्याबद्दल भीती बाळगणारे महाभाग समाजामध्ये फार मोठ्या संख्येने आहेत.
गुरूला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी बारा वर्षे लागतात. आकाशाचे बारा भाग, बारा राशींच्या रूपाने केलेले आहेत. याचाच अर्थ गुरू दरवर्षी एका राशीमध्ये असतो. दरवर्षी ऑगस्टमध्ये गुरु रास बदलत असतो. ऑगस्ट २०१५ मध्ये तो सिंह राशीमध्ये २०१६ मध्ये कन्या राशीमध्ये याप्रमाणे तो मार्गक्रमण करणार. प्रत्येकाला एक रास असते. आपल्या राशीला एक क्रमांक द्यावा आणि सध्या गुरू ज्या राशीमध्ये असेल तिथपर्यंत ओळीने क्रमांक मोजत जावे. जो क्रमांक येईल त्या क्रमांकाचा गुरू आपल्याला असतो.
समजा सध्या गुरु सिंह राशीमध्ये आहे. मुलाची रास वृश्चिक आहे. वृश्चिकला एक क्रमांक दिल्यानंतर सिंह येईपर्यंत क्रमांक देत गेल्यास दहा क्रमांक येतो. याचाच अर्थ सध्या मुलाला दहावा गुरू आहे. गुरू किती नंबरचा आहे यावर त्यांची कर्मकांडे अवलंबून आहेत.
गुरू २, ५, ७, ९, ११ वा असेल तर शुभ होय.
गुरू १, ३, ६, १० वा असेल तर गुरूच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन करावे, म्हणजे गुरू अनुकूल होईल.
आणि जर गुरु ४, ८, १२ वा असेल तर अत्यंत धोकादायक. त्याच्या निवारणासाठी जप, तप आणि दान करून शांती करणे गरजेचे आहे. तरच गुरू अनुकूल होतो. दान करताना गुरूची सोन्याची प्रतिमा दान द्यावी असा स्पष्ट उल्लेख पंचांगात आहे.
पंचांग कोणाची मक्तेदारी आहे हे स्पष्टच आहे. बिनभांडवली जोरात चालणारा धंदा असे म्हटले तर वावगे ठरू नये. सगळा आकड्यांचा खेळ पंचांगकर्त्यांच्या आकडय़ांच्या खेळाला अधिकृत मान्यता आणि परंपरेबरोबर संस्कृतीचे अधिष्ठान.
*यापूर्वीचा "पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" भाग 11 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/11-9028261973-6-2022.html
*वैज्ञानिक दृष्टिकोण*
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
7 आक्टोंबर 2022.
(पुढील भागात मृत्यूषडाष्टक योग)
*डॉ. नितीन शिंदे*
Comments
Post a Comment