"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."भाग . 11. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 6 आक्टोंबर 2022 .
*पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल.*
भाग 11.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
*कालसर्पयोग*
महान नेत्यांनी आणि चित्रपट कलाकारांनी अडचणीच्यावेळी धसका घेतलेला तसेच लग्नात अडथळा ठरणारा हा योग. कालसर्पयोगाच्या निर्मात्याने नाव पण वेचकच निवडलेले आहे. ज्याला मानवप्राणी जास्त भीतो तो साप. आणि त्यात काल. मग विधी करण्यास विलंब लावण्याचे व्यक्तीचे धाडस होईल का ? कालसर्पयोग बाधित व्यक्तीचे लग्न ठरण्यामध्ये अडचण येत असल्यामुळे त्यातून सुटका करण्यासाठी तो नारायणनागबली विधीच्या मागे लागतो.
कालसर्पयोग आहे असे सांगितल्यानंतर व्यक्ती हा योग कसा असतो ? हे विचारण्यापेक्षा तो निवारण्यासाठी काय केले पाहिजे, याची विचारपूस करते. एड्सग्रस्तापेक्षाही कालसर्पयोगग्रस्त व्यक्ती जास्त विवंचनेत राहते. राहू आणि केतू हे दोन पंचांगकर्त्यांचे ग्रह. प्रत्यक्षात विज्ञानाच्या दृष्टीने अवकाशातील काल्पनिक छेदनबिंदू. पंचांगकर्त्यांनी राक्षस म्हणून यांना संबोधले. राहू ते केतू हा एक मोठा साप आहे, असे ते समजतात. त्यापैकी राहू हे सापाचे तोंड आणि केतू हे शेपूट. पत्रिकेमधील सर्व ग्रह राहू आणि केतूच्या एकाच बाजूला आले तर कालसर्पयोग. हा साप त्या बाधिताला सोडत नाही, वेटोळा घालून घट्ट बसलेला असतो, असे ज्योतिषवाल्यांचे प्रतिपादन. मग या कालसर्पयोगबाधित व्यक्तीचे सुटकेसाठी सुरू होतात शांतीचे उपाय. त्यासाठी आहे नारायणनागबली विधी. कालसर्पयोगबाधित व्यक्तीची पत्रिका सोबत दिलेली आहे.
सदर पत्रिकेमध्ये राहू आणि केतूच्या एकाच बाजूला सर्वग्रह आल्यामुळे कालसर्पयोगबाधित पत्रिका. अशा प्रकारची पत्रिका असणार्यांनी नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर किंवा कोल्हापूर जवळील नृसिंहवाडी येथे जाऊन नारायणनागबली विधीअंतर्गत जप, ताप आणि नागाची सोन्याची मूर्ती दान केल्यास सापाचा विळखा सुटतो. *काय शक्कल आहे बघा पंचांग निर्मात्याची ! योग निर्माण करणारा तोच आणि सोडणाराही तोच. फक्त नाडवले जाणारे आपण.*
हा योग आपल्या नावावरून बेतलेला आहे हे जर समस्त सर्पजातीला कळाले तर बदनामीसाठी केवळ आम्हीच दिसलो का ? असं म्हणून पंचांगकर्त्यांना सोडणार नाहीत हे नक्की!
पण..... जिथे शिकलेल्या मानवी प्राण्यास हे समजलेले नाही, तिथे त्या सापांचे काय चालणार म्हणा !
*सज्ञान अधिक सांगणे न लगे* 😊
*यापूर्वीचा पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल भाग 10 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/10-9028261973-5-2022.html
🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोण* 🔬
साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
(पुढील भागात गुरूदोष)
*डॉ. नितिन शिंदे*
Comments
Post a Comment