"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."भाग . 10 - संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 5 आक्टोंबर 2022 .
*"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल".*
भाग 10.
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
5 आक्टोंबर 2022.
*जंत्री : पत्रिकेतील दोष आणि योगांची* (२)
दीपालीच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानी मंगळ आलेला असल्यामुळे दीपालीला कडक मंगळ आहे. असा शेरा गुरुजी मारतात. एक मात्र निश्चित की कडक मंगळ आहे म्हणून मुलाचे पालक लग्नास नकार देतात. ज्यांना लग्न करायचे आहे त्यांना पसंत नापसंतीचा अधिकार आमच्या महान संस्कृतीने दिलेला नाही. किती महान संस्कृतीचे वारसदार आहोत आम्ही ! कडक मंगळ कसा ? याची यत्किंचितही माहिती पालक अथवा वधूवर यापैकी कोणालाही नसते. माहिती करून घेण्याचे कष्टही ते घेत नाहीत. हा सगळा व्यवहार पंचांगवाले भटजी किंवा पुरोहितांवर अवलंबून असतो. त्यामुळे भटजी सांगेल ते कर्मकांड करणे भाग पडते. पंचागामधील अनेक योग अथवा दोष बघितले तर ते महिलावर्गावर अधिक अन्याय करणारे आहेत. पण संस्कृतीच्या नावाखाली महिलावर्गच केवळ अज्ञानापोटी ते टिकवून ठेवत आहे असे खेदाने म्हणावे लागते. अर्थात पुरुषप्रधान संस्कृतीमुळे हे करावे लागते, हे पण तितकेच खरे आहे.
कडक मंगळाच्या बाबतीत आणखी काही धोरणात्मक निर्णय पंचांगवाल्यांनी घेतलेले आहेत. राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती होते त्याप्रमाणे अधूनमधून ही घटनादुरुस्ती पंचांगवाले आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पंचांगांमध्ये करत असतात. मुलगा आणि मुलगी दोघांच्याही कुंडल्यामध्ये कडक मंगळ असेल तर विवाह जमविण्यास हरकत नाही. फक्त त्यासाठी एक अट पूर्ण व्हावी लागते. एकाच्या कुंडलीत मंगळदोष असून जर दुसऱ्याच्या कुंडलीत प्रथम, चतुर्थ, पंचम, सप्तम, अष्टम, दशम, द्वादश यापैकी कोणत्याही स्थानी शनी असेल तर मंगळदोषाचा परिहार होतो. काय भन्नाट कल्पना आहे ! एकाचा कडकपणा घालवण्यासाठी दुसऱ्याचा उपायोग. पंचांगवाले कोणाचा कसा वापर करून घेतील याचा अजिबात नेम नाही. शनीला जर हे कळले की मंगळाला शांत करण्यासाठी माझा उपयोग करतात तर तो गप्प बसेल काय ?
आर्थिक फायदा करून घेण्यासाठी असली अतार्किक आकडेमोड सांगितली की सर्वसामान्यांना कळत नाही. त्यांना फक्त लग्न जुळवून आणायचे असते एवढेच. मंगळ हा पापग्रह असून अनिष्ट असता नुकसानकारक आणि इष्ट असता राजवैभवासारखे अधिकार व्यक्तीस देतो, असे ज्योतिषवाले सांगतात. याची चिकित्सा करण्यासाठी फार डोके लढवण्याची गरज नाही. शालेय जीवनातील अभ्यासाच्या आधारेसुद्धा ते करता येते. मंगळ हा ग्रह सूर्यापासून जवळपास तेवीस कोटी किलोमीटर अंतरावर आहे. या ग्रहाला भावना, दृष्टी नाही. त्याला सुर्याचा प्रकाश मिळतो आणि तेथून परावर्तित होऊन पृथ्वीवर येतो. त्यामुळे तो सायंकाळी तांबड्या रंगाच्या चांदणीच्या स्वरूपात दिसतो. चांदणीसारखा दिसणारा मंगळ व्यक्तीला ओळखु शकेल काय ? मंगळाला जर काही करता येत असते तर मंगळावर पाठवलेले पाथ फाइंडर यान मंगळाने स्वतःवर उतरू कसे दिले ? हा प्रश्न उरतोच आणि भारताचे मंगळयान मंगळाने स्वतःभोवती फिरूच कसे दिले ?
*कळतयं पण वळत नाही हेच खरे.* 👇
https://youtu.be/yN-kIWRAPuk
*जन्म पत्रिका किंवा कुंडली किती खरी किती खोटी?*
*ग्रहांना फक्त भारतातील लोकचं दिसतात का? आपल्या कामात गोंधळ घालणे एवढेच काम आहे का ग्रहांना?*
लग्नकार्यात गोंधळ घालणारी पत्रिका /कुंडली हे प्रकार आपल्या माथ्यावर मारले गेले आहेत. आपणही परंपरेच्या नावाखाली प्रथा चालूच ठेवली आहे. हे योग्य आहे का?
जाणून घ्या खगोलशास्त्राचे अभ्यासक डॉ. नितीन शिंदे यांच्या कडून.
(व्याख्यान इंग्रजी मधून असले तरी ते सर्व सामान्यांना समजेल. आतापर्यंत सुमारे 5000 (पाच हजार) व्याख्याने झाली आहेत.)
🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोण* 🔬
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
5 आक्टोंबर 2022.
*पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल.*
भाग 9 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/10/9-9028261973-4-2022.html
(पुढील भागात कालसर्पयोग)
- *डॉ. नितीन शिंदे*
Comments
Post a Comment