"ओळख हिरकणी ची - 10 आक्टोंबर." "विजयालक्ष्मी ताई बोलके. कोल्हापूर." 🌹🌷🎂🌷🌹 "महाराष्ट्राचा चांगुलपणा" संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 10 आक्टोंबर 2022.

*ओळख हिरकणी ची - 10 आक्टोंबर.*
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात ते अगदी खरं आहे. 
*विजयालक्ष्मी ताई बोलके. कोल्हापूर.*
🌹🌷🎂🌷🌹
*महाराष्ट्राचा चांगुलपणा*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
10 आक्टोंबर 2022. 
*सुरवातीला त्यांनी नेसरी खिंड येथे भेट देऊन भटकंती ग्रुप साठी बनवलेला Video.*
*म्यानातुनि उसळे तरवारीची पात*
*वेडात मराठे वीर दौडले सात !*

.... विजयालक्ष्मी बोलके. कोल्हापूर. 

https://youtu.be/ifB8TWSoTrw

... विजयालक्ष्मी बोलके. कोल्हापूर. भटकंतीकार. 

कोल्हापूर मधील गडहिंग्लज तालुक्यातील महाराष्ट्राचे शेवटचे टोक म्हणजे नेसरी आणि याच भूमीने पाहिला सात विरांचा पराक्रमाचा इतिहास. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि सहा मावळ्यांच्या रक्तांनी पावन झालेली ही *"नेसरी खिंड"*.
====================

खरं सांगायचं तर किल्ले आणि मंदिरे हा विषय कधीच माझा नव्हताच. त्या विषयावर चे लेख आपल्या कोणत्याही ग्रुप मध्ये विषयांचे बंधन असल्याने अपलोड करण्यासाठी जागा (योग्य ग्रुप) नव्हती. त्यामुळे काही महिने विजयालक्ष्मी ताईंना वेद-विज्ञान ग्रुप मध्ये सहभागी करून दिले होते. पण तिथेही त्यांच्या पोस्ट ला न्याय मिळत नव्हता. शेवटी विजयालक्ष्मी ताईंच्या साठी *भटकंती-किल्ले मंदिरांची* ग्रुप ची बांधणी केली आणि आज भटकंती किल्ले मंदिरांची या विषयावर दोन WhatsApp ग्रुप सुरु आहेत. 
विजयालक्ष्मी बोलके ताई ह्या स्वतः भटकंती करुन माहिती आणि videos संकलन करतात. वेळोवेळी त्यांच्या पोस्ट भटकंती किल्ले मंदिरांची ग्रुप मध्ये अपलोड होत असतात. त्या उत्तम पत्रकार आहेत. कविता सुद्धा करतात. भटकंती-किल्ले मंदिरांची ग्रुप च्या निर्मितीसाठी त्या कारणीभूत ठरल्या आहेत. 
त्या सत्यम् शिवम् सुंदरम् ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या होत्या. 
सद्ध्या त्या कमर्शियल भटकंती किल्ले मंदिरांची यु ट्यूब चॅनेल मध्ये सेवा देत आहेत. 
अधूनमधून लेख भटकंती ग्रुप साठी येत राहतील. असो... 

त्यांनी लिहिलेला आणि माझ्या वाचनात आलेला थिंक महाराष्ट्र वेब पोर्टल वरील लेख खाली देत आहे. तिथूनच आमची गाडी भटकंती किल्ले मंदिरांची ग्रुप साठी धावू लागली. 

विजयालक्ष्मी बोलके ताई 🙏, 
तुम्हाला तुमच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'सत्यम् शिवम् सुंदरम्', 'महाराष्ट्राचा चांगुलपणा', आणि 'भटकंती किल्ले मंदिरांची' ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा. 
🌹🎂💐
जिवेत् शरद् शतम्. 
औक्षवंत व्हा. किर्तीवंत व्हा. यशवंत व्हा. यशस्वी भव. 
साहेबराव माने. पुणे. 9028261973. 

 *रांगोळींचे महागाव - ऐतिहासिक वारसा...*

...विजयालक्ष्मी बोलके.
कोल्हापूर.  
10 आक्टोंबर. 
🌹💐🎂
        
ऐतिहासिक वारसा लाभने ही एक भाग्याची संधी असते. अशाप्रकारचा एक वारसा आपल्याही गावला लाभला आहे आणि तो वारसा म्हणजे रंगांच्या उधळणीतून साकारलेला "रांगोळींचा वारसा". गेली कित्तेक वर्ष ही प्रथा आपल्या गावामध्ये चालू आहे. या कलेची जोपासना आजही होताना दिसत आहे.

       या कलेची सुरुवात इ.स.१९८० च्या काळात झाली, असे म्हंटले जाते. व्ही.बी.पाटील(सर), आनंदा सुतार(सर),महम्मद बागवान(सर) या थोर कलावंतांनी ही सुवर्णरेखा आखली. पूर्वीच्या काळी हे कलाकार रांगोळी सोबतच रंग तयार करण्यापासून मेहनत घेत असत. कोळशापासून काळी, हळदीपासून पिवळ, कुंकवापासून लाल अशापद्धतीने रंग तयार करत असत. या अथक मेहनतीनंतर उजाळणारी ती रांगोळी पाहताच अगदी डोळ्यांचे पारणे फितून जात असे. सुरवातीस या रंगोळीचा आकार लहान असे आजकाल तो वाढत जाऊन चक्क संपूर्ण हॉल भरून भव्यदिव्य रांगोळी काढली जात आहे. त्याकाळी व्ही.बी. पाटील सरांची 'बंड्या' या आपल्या महागाव गावातील व्यक्तीची रांगोळी साकारली होती. त्याचसोबत सुतार सरांची सरस्वती देवी, बागवान सरांची लँडस्केप या रांगोळींच्या माध्यमातून आपल्या महागाव गावाला हा वारसा बहाल केला. 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून हा उपक्रम अनेक मंडळे राबवतात. रांगोळी हे एक समाजप्रबोधन करणारे माध्यम ठरले आहे. रांगोळीच्या माध्यमातून समाजातील यातना, सुख,दुःख दाखवता येतात. "समाजजागृती करण्याचे एक उत्तम मध्यम म्हणजे रांगोळी असे म्हणने वावगे ठरणार नाही". गावातील लोकांचे या सणामध्ये असणारे कुतूहल म्हणजे येणारी नवीन प्रकारची रांगोळी. मोठ्या संख्येने खास रांगोळी पाहण्यासाठी गावकरी तसेच पंचक्रोशीतील लोक जमा होतात आणि कलाकारांच्या या कलेला दाद देतात. त्याचसोबत सचिन सुतार(सर), सुभाष सुतार(सर) बाळासाहेब परीटकर(सर), धनाजी सुतार(सर) यांच्या माध्यमातून गावातील महाविद्यालयामध्ये आजही ही कला नवोदित मुलांच्यामध्ये रुजविण्याचे काम अखंडित चालू आहे. शाळा महाविद्यालयाबाहेरील मुलांना आपल्या कलेचे सोने करण्याची संधी देण्याचे काम जमीर आणि समीर बागवान यांच्या माध्यमातून 'फ्रेंड्स ग्रुपने' केले.

 व्ही.बी.परीटकर(सर) आणि सुतार सर यांनी महापुराच्या भीषण स्वरूपाचे चित्रण रंगोळीतुन जिवंतपणे साकारले आहे. त्याचसोबत स्त्री-शिक्षणाची प्रेरणा घेऊन येणारी रांगोळी म्हणजे "अनादी गोपाळ". ही भव्यदिव्य रांगोळी साकारण्याचे काम गावचे सुपुत्र स्वप्नील शिंदे आणि नवीन सुतार सर यांनी केले. गावचा वारसा जपण्याचे काम आज ही पिढी करताना दिसते. भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी रांगोळी म्हणजे "बाळूमामाच्या नावानं चांगभल". समृद्ध कलाकारांची भूमी म्हणून आज आपले महागाव गाव ओळखले जात आहे. 

लोकांच्या मनाला भिडणारी, त्यांच्या जीवनाशी सुसंगत अशी रांगोळी साकारणे हे एका कलाकारासाठी अत्यंत कठीण गोष्ट असते परंतु जेव्हा लोकांची दाद कलाकारांना भेटते तेव्हा त्यांच्या कष्टाचे सोने होते. अशीच दाद आज महागाव गावातील कलाकारांना देऊन हा वारसा पुढे चालावा असे सर्वाना वाटते. ही परंपरा अखंडित चालू ठेवून आपल्या महागाव गावचे नाव "रांगोळींचे गाव" या सुवर्णाक्षरांनी कोरले जावे. गेली ३९ वर्षे चालू असणारा हा रांगोळी चा वारसा अखंड असाच चालत राहून जी कलेची ज्योत पेटविली ती अखंडपणे तेवत राहो.

साभार : नवीन सुतार, स्वप्नील शिंदे, बाळेश पाटील.
*महाराष्ट्राचा चांगुलपणा.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
10 आक्टोंबर 2022.

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.