"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल." संकलन - साहेबराव माने. 9028261973. भाग 6 - 1 आक्टोंबर 2022.

*पत्रिका जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल.*
भाग 6.
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
1 आक्टोंबर 2022. 
*पत्रिका जुळवताना चे गौडबंगाल.* 

*वेध, जन्म, नक्षत्र आणि राशींचा...*
भाग 6 

 चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास सत्तावीस दिवस लागतात. त्यामुळे भारतीयांनी आकाशाचे सत्तावीस भाग नक्षत्रांच्या रूपाने निर्माण केले. याचा अर्थ चंद्र रोज एका नक्षत्रात असतो. अर्थात चंद्राचा आणि नक्षत्राचा बिलकुल संबंध नाही. कारण चंद्र आहे जवळपास चार लाख किलोमीटर अंतरावर तर पाठीमागील ताऱ्यांनी निर्माण केलेलं नक्षत्र ५,२००,०००,०००,०००,००० किलोमीटर अंतरावर. आकडा वाचतांना डोळे फिरतात. आणि एवढ्या दूरच्या नक्षत्राशी नातं जुळवायला निघालोय आपण, आपल्या महनीय ज्योतिषांच्या साथीने. अशा आंधळेपणाला नेमकं काय म्हणायचं ? कॅलेंडरमध्ये रोज एका नक्षत्राचे नाव लिहीलेले असते. उदारणार्थ, अश्विनी, भरणी, कृत्तिका. . . याचा अर्थ त्यादिवशीचा चंद्र त्या नक्षत्रात असतो. व्यक्तीच्या जन्मावेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते त्याचे जन्म नक्षत्र. आणि ते नक्षत्र ज्या राशीमध्ये असते ती सदर व्यक्तीची रास. एवढं सोपं गणित आहे, रास आणि नक्षत्रांचं. पण समजून घेतलं तर. . . 

👉नावरस नाव हा एक ज्योतिषांनी प्रचलित केलेला त्यांच्या सोयीसाठीचा अतिरिक्त प्रकार आहे. प्रत्येक नक्षत्रासाठी त्यांनी काही अक्षर नेमून दिलेली आहेत. मघा नक्षत्रासाठी मा,मी,मू,मे तर अनुराधा नक्षत्रासाठी ना,नी,नू,ने ही अक्षरं वाट्याला आलेली आहेत. हीच अक्षरं का ? असा भाबडा प्रश्न विचारणं गैर ठरेल. मघा नक्षत्रावर एखाद्याचा जन्म झाला असेल तर मा,मी,मू,मे या अाद्दाक्षरांनी नावरस नाव ठेवणे. म्हणजे नक्षत्रावरून नावरस नाव ठेवता येते किंवा नावरस नाव सांगितले तर ज्योतिषी लगेच नक्षत्र सांगतो आणि आपण अचंबित होतो. यात अचंबित होण्यासारखं काय आहे ! ज्योतिषानेच जर नक्षत्रांना अद्दाक्षरं दिली असतील तर बाराखडी शिकलेला कोणताही मुलगा नावरस नावावरून नक्षत्र सांगणारच. भले तो दहावी नापास झालेला असला तरी.

 नावरस नावाच्या सिद्धांतानुसार मघा नक्षत्रावर जन्मलेल्या दीपालीची रास सिंह आणि नावरस नाव मीना होते. तर अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या सुनीलची रास वृश्चिक आणि नावरस नाव निलेश होते. व्यक्तीच्या कोणकोणत्या गोष्टींमध्ये ज्योतिषी आणि तथाकथित गुरुजी घुसतील याचा अजिबात नेम नाही. आपल्या मुलामुलींचे नाव ठेवण्याचा अधिकार जन्मदात्यांनासुद्धा त्यांनी ठेवलेला नाही. मघा नक्षत्र आणि सिंह रास असलेल्या दिपालीच्या जन्मवेळेची चंद्राची आकाशातील स्थिती सोबतच्या चित्रामध्ये दाखवलेली आहे.

*यापूर्वीचा पत्रिका जुळवताना चे गौडबंगाल भाग 5 : "दुनिया नक्षत्र आणि राशींची" (१/२)वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*👇
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/09/9028261973-5-30-2022.html

संकलन - साहेबराव माने. 
9028261973. भाग 5. 
1 आक्टोंबर 2022.

(पुढील भागात रहस्य जन्मपत्रिकेचे)

- *डॉ. नितीन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना' या पुस्तकातुन साभार.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.