"पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल."संकलन - साहेबराव माने. 9028261973. भाग 5 - 30 सप्टेंबर 2022.

*पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल.*
संकलन - साहेबराव माने. 
9028261973. भाग 5 - 
30 सप्टेंबर 2022. 
*दुनिया नक्षत्र आणि राशींची* 
(१/२)

बारा राशींपैकी आपणाला समजण्यासाठी फक्त दोन राशींची ओळख करून घेऊ. 

*सिंह आणि वृश्चिक रास....*

सिंह राशीमध्ये मघा, पूर्वाफाल्गुनी आणि उत्तराफाल्गुनी ही तीन नक्षत्रे येतात. तर वृश्चिक राशीमध्ये अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ ही तीन नक्षत्रे येतात. सिंह राशीतील तारे ९००,०००,०००,०००,००० किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर मोजताना दमछाक होते म्हणून या प्रचंड अंतराला नव्वद प्रकाशवर्ष म्हणतात. याचा अर्थ असा होतो की आज रात्री आकाशात जर आपण सिंह रास पाहिली, तर ती आजची नसते, नव्वद वर्षांपूर्वीचे असते. *नव्वद वर्षांपूर्वीची रास व्यक्तीचं भविष्य घडवणार ? की आपण निर्माण केलेली परिस्थिती ?*

*वृश्चिक रास*...
वृश्चिक साशितले तारे आहेत ५,२००,०००,०००,०००,००० किलोमीटर अंतरावर म्हणजेच पाचशे वीस प्रकाश वर्षे दूर. आज पाहिलेली वृश्चिक रास पाचशे वीस वर्षांपूर्वीची असणार. *या प्रचंड अंतरावरील राशींना आणि नक्षत्रांना आपल्या जन्माशी जोडायला जाणारे एकविसाव्या शतकातील तथाकथित गुरुजी /पुरोहित आणि सुशिक्षित म्हणवणाऱ्या आपण सर्वांनीच वस्तुस्थिती नीट समजावून घेतली पाहिजे.* चित्ररूपाने सिंह आणि वृश्चिकक रास सोबत दाखविली आहे. आकाशामध्ये फक्त तारे दिसणार. आपण त्या ताऱ्यांना कल्पनेनं जोडल्यानंतर नक्षत्र किंवा रास या आकृत्या तयार होतात.

*यापूर्वी पत्रिका जुळवताना चे गौडबंगाल चा भाग 4 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.*

http://sahebraomane1967.blogspot.com/2022/09/9028261973-4-29-2022.html

संकलन - साहेबराव माने. 
9028261973. 
30 सप्टेंबर 2022. 

*क्रमश:*

(पुढील भागात वेध, जन्म नक्षत्र आणि राशींचा)

- *डाॅ. नितिन शिंदे यांच्या'पत्रिका जुळवताना'पुस्तकातून साभार.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.