''पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल" संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. भाग 4 - 29 सप्टेंबर 2022

*पत्रिका आणि जन्म कुंडली जुळवताना चे गौडबंगाल* 
भाग 4
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
29 सप्टेंबर 2022

*वैज्ञानिक दृष्टिकोन*

सुर्यमाला 👇

https://youtube.com/watch?v=S_XVGrIYXSk&feature=share

*युरेनस* 

दुर्बिणीच्या साह्याने शोधलेला पहिला ग्रह म्हणून युरेनसचा उल्लेख करावा लागेल. सूर्यापासून दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी किलोमीटर अंतरावरून चौर्‍याऐंशी वर्षातून युरेनस एक फेरी पूर्ण करतो. युरेनस कोठे आहे ? हे सांगण्यासाठी मात्र दुर्बिणीची आणि विज्ञानाची आवश्यकता आहे. ज्योतिषी या ग्रहाला हर्षल असे संबोधतात. त्यांनी काय नाव द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. ज्योतिषांना हा ग्रह पाहायचा असेल तर विज्ञानातून निर्माण झालेल्या दुर्बिणीचाच वापर करावा लागेल हे मात्र नक्की.

*नेपच्यून* -

 सूर्याभोवती चारशे पन्नास कोटी किलोमीटर अंतरावरुन नेपच्यून एकशे पासष्ट वर्षातून एक फेरी पूर्ण करतो. हा ग्रह पाहण्यासाठी आणि तो सध्या कुठे आहे हे सांगण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता आहे. उघड्या डोळ्यांनी अजिबात दिसत नाही.

*प्लूटो* -

२००६ साली या ग्रहांचं ग्रहपद नाकारण्यात आलं. सध्या बटू ग्रह म्हणून समजला जाणारा प्लुटो, सूर्यापासून सहाशे कोटी किलोमीटर अंतरावरून दोनशे अठ्ठेचाळीस वर्षातून एक फेरी पूर्ण करतो. प्लूटोचे आकारमान आणि वस्तुमान इतर ग्रहांच्या तुलनेत अत्यंत कमी असल्यामुळे त्याचं ग्रहपद काढून घेण्यात आलेलं आहे. याला पाहण्यासाठीसुद्धा दुर्बिणीची गरज आहेच. आपण जर बुधावर असतो तर आपला वाढदिवस अठ्ठ्याऐंशी दिवसांतून आला असता आणि प्लुटोवर असतो तर आपला वाढदिवस दोनशे अठ्ठेचाळीस वर्षांनंतर आला असता. प्रचंड अंतरावर असलेले हे ग्रह विचारात घेतले तर मानवाचं अस्तित्व अत्यंत नगण्य असल्याची कल्पना येते. अहो आपल्या शेजारच्या घरात काय चाललं आहे हे आपणाला समजत नाही तर इथे सहाशे कोटी किलोमीटर अंतरावरील प्लुटोचा हवाला हे ज्योतिषी कसा काय घेतात ? हेच मला कळत नाही. आपली सूर्यमाला आणि सूर्याच्या तुलनेत इतर ग्रहांच आकारमान सोबतच्या चित्रावरून स्पष्ट होते.

आपल्या सूर्यमालेच एकूण वस्तुमान शंभर किलो गृहीत धरले तर एकट्या सूर्याचं वस्तुमान ९९.८६ किलो तर इतर सर्वांचं मिळून ०.१४ किलो आहे. मग त्यातील पृथ्वीच्या वाट्याला किती आणि आपल्या वाट्याला किती ? विचार केला तर आपल्या आयुष्यात सुख दुःखाच्या प्रसंगाचे वाटेकरी व्हायला प्रचंड अंतरावरील हे ग्रह रिकामे आहेत का ? या प्रश्नाची सोडवणूक अवश्य करा.

*दुसरे सूर्य* -

 रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या असंख्य चांगण्यांपैकी पाच चांदण्या हे आपले ग्रह असतात. तर राहिलेल्या इतर चांदण्या हे तारे म्हणजे दुसरे सूर्य असतात. आपल्या सूर्यापेक्षा प्रचंड तेजस्वी आणि मोठे असतात याची आपणाला फक्त कल्पना नसते. हे दुसरे सूर्य आपल्यापासून प्रचंड अंतरावर आहेत. आपला सूर्य आपल्यापासून सव्वा आठ मिनिट अंतरावर आहे तर आपल्याला सर्वात जवळचा असणारा 'मित्र' नावाचा दुसरा सूर्य चार प्रकाशवर्ष अंतरावर आहे. या 'मित्रा'पासून प्रकाश आपल्यापर्यंत यायला जवळपास चार वर्षे लागतात. आणि हो, हा 'मित्र' तारा रात्रीच्या वेळी आकाशात दक्षिणेला उघड्या डोळ्यांनी दिसतो. आज रात्री जर आपण मित्र तारा पाहिला तर तो चार वर्षांपूर्वीचा असणार हे लक्षात घेण्याची गरज आहे. 'मित्रा' व्यतिरिक्त इतर ताऱ्यांची कल्पनाच न केलेली बरी. उत्तरेकडे दिसणारा ध्रुवतारा जवळपास चारशे वर्षापूर्वीचा आहे. रात्री ताऱ्यांनी भरलेलं आकाश हे फार वर्षांपूर्वीच असतं. याच ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आपले आठ ग्रह आणि चंद्र फिरत असतात. त्यामुळे आकाशातील ग्रहांचे किंवा चंद्राचे स्थान दाखवण्यासाठी आकाशातील या पाठीमागील ताऱ्यांचे भारतीयांनी सत्तावीस समूह नक्षत्राच्या रुपाने केले, तर ग्रीकांनी बारा समूह राशींच्या रूपाने तयार केले. नक्षत्र आणि रास हे रात्रीच्यावेळी उघड्या डोळ्यांनी आपणाला आकाशात पाहता येतात. अर्थात पाहण्याची तसदी घेतली तरच !

*क्रमश:* 

*यापूर्वीचा भाग 3 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.* 👇

http://sahebraomane1967.blogspot.com/2022/09/9028261973-328-2022.html

(पुढील भागात दुनिया नक्षत्र आणि राशींची)

संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973 
29 सप्टेंबर 2022. 

- *डाॅ. नितिन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना' या पुस्तकातून साभार.*

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.