"पत्रिका आणि जन्म कुंडली चे गौडबंगाल." संकलन - साहेबराव माने. 9028261973भाग 328 सप्टेंबर 2022. "ग्रह-ताऱ्यांचं वास्तव"
*पत्रिका आणि जन्म कुंडली चे गौडबंगाल.*
संकलन - साहेबराव माने.
पुणे 9028261973
भाग 3
28 सप्टेंबर 2022.
*ग्रह-ताऱ्यांचं वास्तव*
ज्या ग्रह ताऱ्यांचा वापर ज्योतिषी पत्रिकेसाठी करतात त्या ग्रह ताऱ्यांची शालेय अभ्यासक्रमांमध्ये असलेली वैज्ञानिक माहिती काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. *त्या शिवाय पुढील गौडबंगाल समजणार नाही.*
*सूर्य* -
आपल्या पृथ्वीपासून पंधरा कोटी किलोमीटर अंतरावरून सूर्य आपल्याला प्रकाश देत आहे. सूर्य आहे म्हणून पृथ्वी आणि पर्यायाने माणूस आहे. सूर्यामुळे सर्व ग्रहांना प्रकाश मिळतो. सूर्यापासून सेकंदाला तीन लाख किलोमीटर वेगाने निघालेला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोचायला सव्वाआठ मिनिट लागतात. याचा अर्थ ज्यावेळेस आपण सूर्य पाहत असतो, तो सव्वाआठ मिनिटांपूर्वीचा असतो. वेळेच्या भाषेत सूर्य आपल्यापासून सव्वाआठ मिनिट अंतरावर आहे.
*बुध* -
सूर्याभोवती अठ्ठ्याऐंशी दिवसांत एक फेरी पूर्ण करणारा आणि सूर्याला सर्वात जवळचा बुध हा ग्रह आहे. सूर्यापासून बुध सहा कोटी किलोमीटर अंतरावर आहे. सायंकाळी पश्चिमेला किंवा सूर्योदयापूर्वी पूर्वेला हा ग्रह आपणाला चांदणीच्या रूपामध्ये उघड्या डोळ्यांनी दिसतो.
*शुक्र* -
सूर्याभोवती दोनशे पंचवीस दिवसांत एक फेरी पूर्ण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा हा ग्रह, सूर्यापासून दहा कोटी किलोमीटर अंतरावर आहे. सायंकाळी पश्चिमेला किंवा सूर्योदयापूर्वी पूर्वेला अत्यंत तेजस्वी चांदणीच्या रूपामध्ये आपणाला शुक्र उघड्या डोळ्यांनी दिसतो.
*पृथ्वी* -
माणसाचं भविष्य घडवणारी पृथ्वी, सूर्यापासून पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य म्हणजे भविष्य घडविणारी परिस्थितीसुद्धा माणसानेच निर्माण केलेली आहे. त्यामुळे आपलं भविष्य आपणच घडवायचं आहे. मन, मेंदू आणि मनगट यावर ते अवलंबून आहे. मनातील सुंदर विचार, हृदयाची धगधग, मनगटाच्या जोरावर आणि त्याला सभोवतालची परिस्थिती किती साथ देते यावर आपलं भविष्य घडणार आहे. ज्या दिवशी आपण जन्माला आलो तिथंपासून ते मरेपर्यंत आयुष्य आपलं आहे. ते सुंदर करणं आपल्याच हातात आहे.
*मंगळ* -
*सूर्याभोवती सहाशे सत्त्याऐेंशी दिवसांत एक फेरी पूर्ण करणारा मंगळ हा ग्रह ज्योतिषवाल्यांनी फारच बदनाम केलाला आहे.*
पृथ्वीपासून साडेसात कोटी किलोमीटर अंतरावर हा ग्रह आहे. *भारताचे मंगळयान मंगळाभोवतीच्या कक्षेत जाण्यासाठी तब्बल तीनशे दिवस लागले. तरीही आम्ही कडक मंगळाच्या फेऱ्यात आजही अडकून पडलेलो आहोत. या गोष्टी चा जरा विचार करा.*
रात्रभर आपणाला तांबड्या चांदणीच्या रूपामध्ये हा ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसतो.
*गुरू* -
सुर्याभोवती अठ्ठ्याहत्तर कोटी किलोमीटर अंतरावरून बारा वर्षातून गुरू हा ग्रह एक फेरी पूर्ण करतो. आकाराने सर्वात मोठा असलेला गुरु ग्रह रात्रभर आपणाला तेजस्वी चांदणीच्या रूपामध्ये दिसतो.
*शनी* -
सूर्यापासून एकशे चाळीस कोटी किलोमीटर अंतरावरून शनी तीस वर्षात एक फेरी पूर्ण करतो. रात्रभर निळ्या चांदणीच्या रुपात आपणाला उघड्या डोळ्यांनी हा ग्रह दिसतो. एक मात्र नक्की की शनीची कडी पाहण्यासाठी मात्र दुर्बिणीची आवश्यकता असते.
*यापूर्वीचा भाग 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.* 👇
http://sahebraomane1967.blogspot.com/2022/09/9028261973-2.html
*क्रमश:*
(पुढील भागात युरेनस, नेपच्यून प्लुटो आणि दुसरे सूर्य)
संकलन - साहेबराव माने.
9028261973.
28 सप्टेंबर 2022
- *डाॅ. नितीन शिंदे यांच्या 'पत्रिका जुळवताना पुस्तकातून साभार.*
Comments
Post a Comment