"महाराष्ट्राचा चांगुलपणा"संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. 29 सप्टेंबर 2022. "ओळख हिरकणी ची - डिंपल ताई घाडगे. - 29 सप्टेंबर.जन्म दिनाचे औचित्य साधून. 🌹🎂💐

*"महाराष्ट्राचा चांगुलपणा"*
संकलन - साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
29 सप्टेंबर 2022. 
*"ओळख हिरकणी ची - डिंपल ताई घाडगे. - 29 सप्टेंबर.*
जन्म दिनाचे औचित्य साधून. 
🌹🎂💐

*ब्लॉग मधील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.* 👇

http://Sahebraomane1967.blogspot.com

*अनाथांच्या आयुष्यात मायेची ‘पालवी’*

https://youtu.be/dib-sMnLZsI

*'डिंपल ताई घाडगे' आणि 'मंगलताई शहा' ह्या मायलेकी आपल्या फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या "सत्यम् शिवम् सुंदरम्" (आणि इतरही) ग्रुप च्या सन्मानिय भगिनी सदस्या आहेत.*
...साहेबराव माने.
 पुणे. 9028261973. 

*मंगलताईंची गोष्ट.*👇

https://youtu.be/W4X6HQkWKb4
☝️अनाथ एड्सबाधित मुले-मुली आणि महिलांना आयुष्य सुखाने व आनंदाने जगता यावे, म्हणून मंगलताई शहा यांनी त्यांची मुलगी डिंपल घाडगे हिच्या साथीने पंढरपूरमध्ये ‘पालवी’ हे पुनर्वसन केंद्र सुरू केले. इथल्या मायेच्या स्पर्शाने अशा मुलांच्या आयुष्याला आता खऱ्या अर्थाने पालवी फुटली आहे. ‘तुजऐसी नाही’ या मालिकेत आज मंगलताईंची गोष्ट...

*डिंपल घाडगे सोबत बोलताना - सायली. : पालवी प्रोजेक्ट. सामाजिक HIV जनजागृती.*👇
https://youtu.be/qLrXauMj_dk

हा व्हिडिओ प्रायोजित नाही. हे पूर्णपणे माझ्या प्रेरणा आणि सामाजिक हिताच्या बाहेर आहे. पालवीच्या सचिव श्रीमती डिंपल घाडगे या मुलाखतीच्या पाहुण्या आहेत.
पंढरपूर येथे प्रभा-हिरा प्रतिष्ठान अंतर्गत पालवी प्रकल्पाची स्थापना 2001 मध्ये झाली. हे एचआयव्ही ग्रस्त अनाथ मुलांसाठी केअर होम प्रदान करते. पलावीचा असा विश्वास आहे की सर्व मुलांना आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षित, कलंकमुक्त वातावरणासह प्रेमळ, आनंदाने भरलेले बालपण मिळण्याचे मूलभूत अधिकार आहेत.
पलावीने त्यांच्या शैक्षणिक, पौष्टिक, वैद्यकीय आणि मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आजीवन वचनबद्धता दिली आहे. HIV/AIDS बद्दल जागरुकता आणणे आणि सामान्य लोकसंख्येला HIV च्या प्रादुर्भावाबद्दल जागरूक करणे हे देखील आमचे ध्येय आहे. श्रीमती मंगल शाह पालवीच्या संस्थापक आणि विश्वस्त आहेत. पालवीची स्थापना 2001 मध्ये झाली जेव्हा दोन मुली एका गोठ्यात सोडलेल्या आढळल्या. निर्जन अर्भक एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. सौ मंगलताईंनी अशा मुलांना मोकळेपणाने प्रेम, काळजी आणि आधार देण्यास सुरुवात केली.
पलावीशी संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक आहेत- 9860069949, 9673664455

*बालकांना मायेची ऊब देणारी ''पालवी"*
... डिंपल ताई घाडगे. 

https://youtu.be/NiaS-oYYjoM

एड्स रोगानं मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांना अक्षरश: कुठंही टाकून दिलं जातं. रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅण्ड, कचराकुंडी आणि स्मशानात अशी बालकं सापडतात. अशा बालकांना मायेची ऊब देऊन त्यांचं जीवन उभं करण्याचं काम पंढरपुरातील पालवी ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून करते आहे. सध्या 'पालवी'त ५४ एचआयव्हीबाधित मुलं आनंदानं वाढताहेत.


मरण कोणालाच टळले नाही. परंतु काहींना आयुष्यात मरणयातना जास्त भोगाव्या लागतात. एड्सबाधितांचेही तसेच आहे. त्यांना शारीरिक यातनांसोबतच समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीचा त्रासही सोसावा लागतो. त्यांच्या या व्यथा कमी करण्यासाठी प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंगलताई शहा यांनी पुढाकार घेतला. दानशूर व्यक्तींचे सहकार्यही त्यांनी घेतले. त्यामुळे ‘पालवी’ या प्रकल्पात आज ११० एड्सबाधित विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एड्सबाधित पाच अनाथ महिलांनाही तेथे आधार मिळाला आहे. पुढच्या टप्प्यात सेवातीर्थ प्रकल्पाच्या माध्यमातून, ‘एचआयव्ही’ची लागण झालेल्यांच्या पुनर्वसन केंद्राचा साडेचार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

पंढरपूर-कराड रस्त्यावर पंढरपूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पालवी हा प्रकल्प आहे. खरे तर हा केवळ प्रकल्प नसून पंढरीच्या वाटेवरील एक सेवातीर्थच म्हणावे लागेल. कारण इथे रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त प्रेमाने बालकांचा सांभाळ केला जातो. प्रस्तुत प्रतिनिधीने गेल्या आठवड्यात या प्रकल्पाला भेट दिली, तेव्हा मंगलताई दोन-तीन महिन्याच्या एका गोंडस बाळाला मांडीवर घेऊन मायेने थोपटत होत्या. बाळ रडू लागले तर त्याला बाटलीतून प्रोटीनयुक्त पाणी पाजत होत्या. बाळ शांत झोपी गेल्यावर मंगलताईंशी संवाद साधता आला. तेव्हा ताईंनी त्या बाळाच्या जन्माची कहाणी सांगितली. साधारण सात-आठ महिन्यांपूर्वी एक ‘एचआयव्ही’बाधित महिला ‘पालवी’त दाखल झाली होती. तिच्या पतीचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले होते. दोन मुली असल्यामुळे पुढच्या आयुष्यासाठी तिला कोणाचा तरी आधार हवा होता. तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन दिलेल्या व्यक्तीने ते पाळले नाही आणि तोपर्यंत फार उशीर झाला होता. अखेर ती महिला पाचव्या महिन्यात ‘पालवी’त दाखल झाली. तिथेच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. बाळ दोन महिन्यांचे झाल्यावर ती बाळाला मंगलताईंच्या कुशीत ठेवून निघून गेली. आता या बाळाची आई बनून मंगलताई त्याला वाढवत आहेत. अशा प्रकारे मंगलताई आणि त्यांची मुलगी डिंपल घाडगे यांनी आजवर ११० बालकांचा सांभाळ केला आहे. मुलांच्या शिक्षणाचीही सोय सुद्धा या संस्थेत आहे. 

परमेश्वराला सगळीकडे जाता येत नाही म्हणून त्याने आई तयार केली असावी, असे म्हणतात. परंतु, काळजावर दगड ठेवून आपल्या पोटच्या गोळ्याला रस्त्यावर फेकून देणाऱ्या अनेक महिलांचीही उदाहरणे आहेत. अशा बाळांचा या केंद्रात सांभाळ करावा लागत आहे. त्यातही एचआयव्ही संसर्गित बालकांचा सांभाळ करणे ही अवघड गोष्ट आहे. 

‘एचआयव्ही’बाधित लोकांना स्वीकारायला समाज आजही तयार नाही. अशा परिस्थितीत या मायलेकी मात्र त्या बाळांच्या आई-आजी बनून त्यांच्यावर माया करतात. ही अर्थातच वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीय ती. आईविना नवजात बालकाचे संगोपन करणे ही अवघड गोष्ट आहे. ही कामे एक आईच करू शकते. तिथल्या बालकांचा आहार, विहार व मोठ्या मुलांच्या शाळेचे नियोजन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आरोग्याची खास अशी काळजी घेतली जाते.

‘अशा मुलांचे संगोपन करण्याचे बळ तुमच्या अंगात कुठून येते,’ असे विचारल्यावर त्या म्हणतात, ‘ही मुले हीच आमची शक्ती आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिला, कोणताच शीण वाटत नाही.’ इथे या मुला-मुलींचे केवळ संगोपनच केले जात नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना सन्मानाने आयुष्य जगता यावे म्हणून त्यांना हातरुमाल, गोधड्या, शुभेच्छापत्रे, पर्यावरणपूरक आकाशकंदील, पर्स, पणत्या इत्यादी वस्तू बनवण्याचे, तसेच शिलाईचे प्रशिक्षणही दिले जाते. २००१मध्ये दोन मुलांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आता इयत्ता दहावीपर्यंतची शाळा सुरू करावी लागली आहे. या मुलांकडून दररोज प्रार्थना म्हणून घेतली जाते. योगासने करून घेतली जातात. समाजाप्रति आपुलकी वाढावी म्हणून येथील मुले कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत जाऊन त्यांची सेवा करतात. या मुलांना अजूनही समाज स्वीकारत नाही. म्हणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असल्याचे मंगलताईंनी सांगितले.
‘संस्थेतील पाच वर्षांच्या एका मुलाच्या डोक्याला जखम झाली होती. ती लवकर भरून येणार नसल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले होते. आम्ही त्याच्यावर उपचार करण्याचे थांबवले नाही. त्यामुळे त्याची जखम पूर्ण बरी झाली आणि त्याचे प्राण वाचले. आज तो मुलगा सतरा वर्षांचा झाला आहे. या गोष्टीतून मला सर्वांत जास्त आनंद मिळाला,’ असे मंगलताईंनी सांगितले. या मुलांना समाजात सन्मानाने वागणूक मिळावी म्हणून डिंपलताई कोणत्याही कार्यक्रमाला जाताना यातील एखाद्या लहान बाळाला स्वतःच्या मुलाप्रमाणे अगदी अभिमानाने कडेवर घेऊन जातात. मायलेकीच्या या मायेमुळे या संस्थेत आता गोकुळ नांदत आहे. त्यांच्या कार्याला "सत्यम् शिवम् सुंदरम्" आणि "महाराष्ट्राचा चांगुलपणा" ग्रुप कडून शुभेच्छा आणि सदिच्छा... 
🥇🌹🎂💐🥇
... साहेबराव माने. 
पुणे. 9028261973. 
29 सप्टेंबर 2022. 

संपर्क : पालवी संस्था, पंढरपूर. 
फोन : (०२१८६) २२३३५०.
मोबाइल : ९८६०० ६९९४९, ९९७०१ ६९९४९.
ई-मेल : info@palawi.org, dimple@palawi.org
(‘तुजऐसी नाही’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या 
 https://goo.gl/idhJdV 
 या लिंकवर उपलब्ध असतील.)

Comments

Popular posts from this blog

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू. जन्म - 16 नोव्हेंबर 1927. संकलन - साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार - इंटरनेट. 16 नोव्हेंबर 2022.

सद्गुरूवाचून सापडेल सोय.

*स्वतःची विष्ठा दान करून 'ही' तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!*संकलन - साहेबराव माने पुणे 9028261973. 25 एप्रिल 2022.